व्हिडिओ पाहण्यासाठी

दुःख कधी संपेल का?

दुःख कधी संपेल का?

कदाचित तुम्ही म्हणाल . . .

  • हो.

  • नाही.

  • माहीत नाही.

पवित्र शास्त्र असं शिकवतं

“देव . . . त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. यापुढे कोणीही मरणार नाही, कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही.”​—प्रकटीकरण २१:३, ४, नवे जग भाषांतर.

या शिकवणीचा तुम्हाला काय फायदा होईल?

देव आपल्या दुःखाला जबाबदार नाही याची खातरी मिळेल.​—याकोब १:१३.

आपल्यावर दुःख कोसळतं तेव्हा देवाला वाईट वाटतं हे माहित झाल्यामुळे आपल्याला सांत्वन मिळेल.​—जखऱ्‍या २:८.

सर्व प्रकारचं दुःख संपेल  याची आशा मिळेल.​—स्तोत्र ३७:९-११.

पवित्र शास्त्रात जे म्हटलं आहे त्यावर आपण खरंच विश्‍वास ठेवू शकतो का?

नक्कीच, याची कमीतकमी दोन कारणं आहेत:

  • यहोवा देवाला दुःखाचा आणि अन्यायाचा वीट आहे. जुन्या काळात यहोवा देवाच्या लोकांवर निर्दयी अत्याचार होत होते, तेव्हा त्याला कसं वाटलं त्यावर विचार करा. ‘त्यांच्यावर लोक जुलूम करत’ असल्यामुळे देवाला फार वाईट वाटलं असं पवित्र शास्त्रात सांगितलं आहे.​—शास्ते २:१८.

    दुसऱ्‍यांवर अत्याचार करणाऱ्‍यांचा देवाला खूप राग येतो. उदाहरणार्थ, “निर्दोष रक्‍त सांडणारे हात” त्याला घृणास्पद वाटतात, असं बायबलमध्ये म्हटलं आहे.​—नीतिवचनं ६:१६, १७.

  • यहोवा देव प्रत्येक व्यक्‍तीची काळजी घेतो. आपण लोकांना सहसा असं बोलताना ऐकतो, की माझ्या ‘यातना आणि माझं दुःख’ फक्‍त मलाच कळतं, दुसऱ्‍या कोणालाही ते कळणार नाही. पण यहोवाला मात्र आपलं दुःख कळतं.​—२ इतिहास ६:२९, ३०.

    यहोवा त्याच्या राज्याद्वारे लवकरच प्रत्येक व्यक्‍तीचं दुःख मुळासकट काढून टाकणार आहे. (मत्तय ६:९, १०) तोपर्यंत, जे लोक पूर्ण मनाने त्याचा शोध करतात त्यांना तो सांत्वन देतो.​—प्रेषितांची कार्यं १७:२७; २ करिंथकर १:३, ४.

थोडा विचार करा

अजूनपर्यंत देवाने दुःख का काढून टाकलं नाही?

याचं उत्तर पवित्र शास्त्रातल्या रोमकर ५:१२ आणि २ पेत्र ३:९ या वचनांत मिळतं.