मतभेद सोडवणं
कोणी आपलं मन दुखावलं तर आपण मनात राग धरायचं आणि बदला घ्यायचं का टाळलं पाहिजे?
नीत २०:२२; २४:२९; रोम १२:१७, १८; याक १:१९, २०; १पेत्र ३:८, ९
उपयोगी बायबल अहवाल:
१शमु २५:९-१३, २३-३५—नाबालने जेव्हा दावीदचा आणि त्याच्या माणसांचा अपमान केला आणि त्यांना मदत केली नाही, तेव्हा दावीदने रागाच्या भरात कसलाही विचार न करता त्याला आणि त्याच्या घराण्याला मारून टाकायचं ठरवलं. पण अबीगईलच्या सुज्ञ सल्ल्यामुळे दावीद रक्तदोषापासून वाचला
नीत २४:१७-२०—शलमोन राजाने देवाच्या प्रेरणेने लोकांना इशारा दिला, की त्यांच्या शत्रूंचं वाईट होतं तेव्हा त्यांनी खूश होऊ नये; तर यहोवा दुष्ट लोकांचा न्याय करेल असा भरवसा त्यांनी ठेवला पाहिजे
एखाद्यासोबत आपले मतभेद झाले तर आपण त्याच्याशी बोलणं सोडून दिलं पाहिजे का? किंवा त्याच्याबद्दल मनात राग धरून ठेवला पाहिजे का?
लेवी १९:१७, १८; १कर १३:४, ५; इफि ४:२६
उपयोगी बायबल अहवाल:
मत्त ५:२३, २४—येशूने समजवलं की आपल्या भावाला आपल्याविरुद्ध काही तक्रार असेल, तर त्याच्यासोबत शांतीचे संबंध जोडण्यासाठी आपण सगळे प्रयत्न केले पाहिजेत
कोणी आपलं मन दुखावतं तेव्हा आपण काय केलं पाहिजे?
एखाद्याने कितीही वेळा आपलं मन दुखावलं पण नंतर मनापासून पश्चात्ताप केला, तरी आपण त्याला माफ का केलं पाहिजे?
एखाद्या भावाने किंवा बहिणीने जर आपल्याविरुद्ध गंभीर चूक केली आणि आपण जर ती विसरूच शकत नसलो (जसं की कोणी आपली बदनामी केली किंवा आपल्याला फसवलं), तर त्याच्याशी कोणी जाऊन बोललं पाहिजे आणि त्यामागचा हेतू काय असला पाहिजे?
हेसुद्धा पाहा: याक ५:२०
आपली बदनामी किंवा फसवणूक करणाऱ्याशी एकट्यात बोलल्यावरही तो पश्चात्ताप करायला तयार नसेल, तर आपण काय केलं पाहिजे?