प्रस्तावना
“विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे.”—इब्री लोकांस ६:१२.
१, २. एका प्रवासी पर्यवेक्षकाला बायबलमधील व्यक्ती कशा वाटायच्या, आणि या व्यक्तींशी मैत्री केल्यामुळं आपल्याला काय फायदा होईल?
एका वयस्कर प्रवासी पर्यवेक्षकांचं भाषण ऐकल्यावर एका ख्रिस्ती बहिणीनं म्हटलं, “ते बायबलमधल्या व्यक्तींविषयी असं बोलतात जणू काय ते त्यांचे जुने मित्रच आहेत.” या बहिणीला असं वाटण्यामागचं कारणंही तसंच होतं. या बांधवानं अनेक वर्षांपासून बायबलचा चांगला अभ्यास केला होता. तसंच, बायबलच्या आधारावर इतरांना शिकवण्याचाही त्यांना बराच अनुभव होता. त्यामुळं खरोखरच, बायबलमधले विश्वासू स्त्रीपुरुष त्यांच्यासाठी खूप जुनी ओळख असलेल्या, जवळच्या मित्रांसारखे बनले होते.
२ तुम्हालादेखील बायबलमध्ये उल्लेख केलेल्या या व्यक्तींसोबत मैत्री करायला मिळाली तर? त्यांच्याशी मैत्री करण्याइतक्या तुम्हाला या व्यक्ती खऱ्या वाटतात का? कल्पना करा, नोहा, अब्राहाम, रूथ, एलीया, एस्तेर यांसारख्या व्यक्तींशी बोलण्याची, त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची, त्यांची ओळख करून घेण्याची संधी तुम्हाला मिळाली तर तुम्हाला कसं वाटेल? या सर्व व्यक्तींकडून मिळणारा मोलाचा सल्ला आणि प्रोत्साहन यांमुळं तुम्हाला किती फायदा होईल याचा विचार करा!—नीतिसूत्रे १३:२० वाचा.
३. (क) विश्वासू स्त्रीपुरुषांच्या उदाहरणांवरून शिकण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? (ख) आपण कोणत्या प्रश्नांवर विचार करणार आहोत?
३ “नीतिमानांचे . . . पुनरुत्थान होईल” तेव्हा आपल्याला या सर्व लोकांबरोबर अशी मैत्री करण्याची संधी मिळेल, हे तर खरं आहे. (प्रे. कृत्ये २४:१५) पण आजही आपण बायबलमध्ये उल्लेख केलेल्या या विश्वासू स्त्रीपुरुषांकडून बरंच काही शिकू शकतो. ते कसं? यासाठी आपण काय केलं पाहिजे हे प्रेषित पौलानं सांगितलं. त्यानं म्हटलं: “विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे.” (इब्री ६:१२) पण, पौलाचे हे शब्द वाचल्यावर कदाचित आपल्या मनात काही प्रश्न येतील. जसं की, विश्वास म्हणजे नेमकं काय? आपल्याला विश्वासाची गरज का आहे? आणि जुन्या काळातल्या विश्वासू लोकांचं अनुकरण आपण कसं करू शकतो? तेव्हा, बायबलमधील विश्वासू स्त्रीपुरुषांच्या उदाहरणाचं परीक्षण करण्यास सुरुवात करण्याआधी आपण या प्रश्नांवर थोडा विचार करू या.
विश्वास म्हणजे काय? आपल्याला त्याची गरज का आहे?
४. विश्वासाबद्दल अनेकांचं काय मत आहे, आणि ते चुकीचं का आहे?
४ विश्वास हा एक अतिशय सुरेख गुण आहे. आणि या पुस्तकात आपण ज्या स्त्रीपुरुषांच्या उदाहरणांचं परीक्षण करणार आहोत त्या सर्वांनीच या गुणाचं महत्त्व ओळखलं. पण, आजच्या जगात बहुतेक लोक विश्वासाला फारसं महत्त्व देत नाहीत. त्यांच्या मते कोणताही पुरावा नसताना एखादी गोष्ट मानणं म्हणजे विश्वास. पण हे चुकीचं आहे. फक्त कुणाच्यातरी सांगण्यावरून एखादी गोष्ट खरी मानणं याको. २:१९.
म्हणजे विश्वास नाही. खरंतर असं करणं धोकादायक ठरू शकतं. तसंच, विश्वास ही नुसतीच मनातली भावना नाही. भावना मनात येते आणि जातेही. शिवाय, देवाच्या बाबतीत पाहिल्यास, तो आहे इतकं मानणंच पुरेसं नाही. कारण, दुरात्मेसुद्धा “तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात.”—५, ६. (क) आपण कोणत्या दोन “न दिसणाऱ्या” गोष्टींवर विश्वास ठेवतो? (ख) आपल्या विश्वासामुळं आपल्याला कोणता भरवसा मिळतो? उदाहरण देऊन सांगा.
५ खरा विश्वास हा या सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे. विश्वास म्हणजे नेमकं काय याबद्दल बायबलमध्ये काय सांगितलं आहे, तुम्हाला आठवतं का? ( इब्री लोकांस ११:१ वाचा.) पौलानं या वचनात स्पष्ट केलं की आपण दोन प्रकारच्या “न दिसणाऱ्या” गोष्टींवर विश्वास ठेवतो. एक तर, सध्या अस्तित्वात असलेल्या गोष्टी. उदाहरणार्थ, यहोवा देव, त्याचा पुत्र किंवा सध्या स्वर्गात शासन करत असलेलं देवाचं राज्य. या आत्मिक गोष्टी खऱ्या असल्या तरी आपल्या डोळ्यांनी आपण त्या पाहू शकत नाही. दुसरं म्हणजे, “आशा धरलेल्या” किंवा भविष्यात घडतील अशा गोष्टी. उदाहरणार्थ, देवाच्या राज्याद्वारे लवकरच येणारं नवीन जग. ते भविष्यात येणार असल्यामुळे आताच आपण ते पाहू शकत नाही. पण म्हणून, या “न दिसणाऱ्या” गोष्टींवर असलेला आपला विश्वास बिनबुडाचा किंवा निराधार आहे असं म्हणता येईल का?
६ मुळीच नाही! खऱ्या विश्वासाला भक्कम आधार असतो ही गोष्ट पौलानं अगदी स्पष्ट केली. त्यानं म्हटलं की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा “भरवसा” आहे. या ठिकाणी त्यानं मूळ ग्रीक भाषेत जो शब्द वापरला त्याचं भाषांतर “हक्कलेख” असंही करता येईल. पौलाला नेमकं काय सांगायचं होतं? अशी कल्पना करा, की एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला एक घर द्यायचं ठरवलं आहे. तो तुम्हाला घराचा हक्कलेख, म्हणजेच मालकी हक्क सिद्ध करणारी कागदपत्रं देऊन म्हणतो, “हे घ्या तुमचं नवीन घर.” अर्थात, ती कागदपत्रं म्हणजे तुमचं नवीन घर नसतं. पण, ती कागदपत्रं कायदेशीर असल्यामुळं, ती तुमच्या हातात देणं म्हणजे घरच तुमच्या ताब्यात देण्यासारखं आहे. त्याच प्रकारे, आपल्या विश्वासामुळं आपल्याला हा भरवसा मिळतो की देवानं त्याच्या वचनात जे काही सांगितलं आहे ते पूर्ण झाल्यासारखंच आहे.
७. खऱ्या विश्वासात काय समाविष्ट आहे?
७ तेव्हा, खरा विश्वास म्हणजे यहोवा, त्याची अभिवचनं, त्याचं वचन आणि त्याचा उद्देश यांबद्दल पूर्ण भरवसा व पक्की खात्री असणं. यहोवावर विश्वास असल्यामुळे तो आपला प्रेमळ पिता आहे हे आपण ओळखतो. आणि यामुळे त्यानं दिलेली सर्व अभिवचनं नक्कीच पूर्ण होतील असा भरवसा आपल्याला असतो. पण, खऱ्या विश्वासात इतकंच समाविष्ट नाही. एखाद्या प्राण्याला जिवंत राहण्यासाठी ज्याप्रमाणे अन्नपाणी घेत राहण्याची गरज असते, त्याचप्रमाणे विश्वासाला जिवंत ठेवण्यासाठी तो कार्यांतून दाखवत राहण्याची गरज आहे. नाहीतर, तो निर्जीव होईल.—याको. २:२६.
८. विश्वास असणं इतकं महत्त्वाचं का आहे?
८ विश्वास असणं इतकं महत्त्वाचं का आहे? पौल आपल्याला या प्रश्नाचं पटण्याजोगं उत्तर देतो. ( इब्री लोकांस ११:६ वाचा.) विश्वासाशिवाय यहोवाला प्रार्थना करणं किंवा त्याला संतुष्ट करणं आपल्याला शक्य नाही. खरंतर, आपल्या स्वर्गातील पित्याशी जवळचा नातेसंबंध जोडणं आणि त्याचा गौरव करणं हाच प्रत्येक बुद्धिमान प्राण्याच्या जीवनाचा मुख्य उद्देश आहे; आणि हा उद्देश पूर्ण करण्यासाठी विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे.
९. आपल्या सेवकांना विश्वासाची गरज आहे याची जाणीव यहोवाला असल्यामुळं त्यानं काय केलं आहे?
इब्री १३:७) पण, यहोवानं आपल्याला आणखी एका मार्गानं मदत पुरवली आहे. पौलानं सांगितलं की आपण प्राचीन काळातल्या विश्वासू स्त्रीपुरुषांच्या एका “मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहो.” या विश्वासू सेवकांच्या उदाहरणांवरूनही आपण बरंच काही शिकू शकतो. (इब्री १२:१) इब्री लोकांस या पुस्तकाच्या ११ व्या अध्यायात पौलानं ज्या अनेक विश्वासू जनांचा उल्लेख केला आहे, त्यांच्या शिवायही बायबलमध्ये कितीतरी विश्वासू जनांची उदाहरणं आढळतात. यांत स्त्रियांचा व पुरुषांचा, तरुणांचा व वृद्धांचा, तसंच वेगवेगळ्या परिस्थितींत असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. ते सर्व जण आयुष्यभर यहोवाला विश्वासू राहिले. आजच्या जगात, खरा विश्वास फार कमी पाहायला मिळतो; पण अशा या जगात राहत असताना, प्राचीन काळातल्या विश्वासू जनांकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे.
९ आपल्या सेवकांना विश्वासाची किती गरज आहे याची यहोवाला जाणीव आहे. म्हणूनच, विश्वास कसा उत्पन्न करावा आणि तो कसा व्यक्त करावा हे तो अनेक उदाहरणांवरून आपल्याला शिकवतो. ख्रिस्ती मंडळीत पुढाकार घेणाऱ्या अनेक विश्वासू बांधवांची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. देवाच्या वचनात आपल्याला असं सांगितलं आहे: “त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.” (इतरांच्या विश्वासाचं अनुकरण आपण कसं करू शकतो?
१०. बायबल अहवालांतील व्यक्तींचं अनुकरण करण्यासाठी वैयक्तिक अभ्यास आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकतो?
१० एखाद्या व्यक्तीचं जवळून निरीक्षण केल्याशिवाय आपण तिचं अनुकरण करू शकत नाही. प्राचीन काळातल्या विश्वासू व्यक्तींचं अनुकरण करणं तुम्हाला सोपं जावं म्हणून या पुस्तकात आधीच खूप संशोधन करून माहिती सादर करण्यात आली आहे. तरीसुद्धा, पुस्तक वाचत असताना तुम्हीही आणखी संशोधन करू शकता. वैयक्तिक अभ्यास करताना, तुमच्याजवळ असलेल्या संशोधन साधनांच्या साहाय्यानं बायबलमधल्या अहवालांच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न करा. वाचलेल्या माहितीवर मनन करताना अहवालात वर्णन केलेल्या दृश्याचं आणि तेव्हाच्या परिस्थितीचं चित्र डोळ्यांपुढं उभं करण्याचा प्रयत्न करा. त्या दृश्यात काय काय घडत असेल, कोणकोणते आवाज ऐकू येत असतील, कोणकोणते गंध दरवळत असतील याची कल्पना करा. पण, याहून महत्त्वाचं म्हणजे अहवालातील व्यक्तींच्या मनात त्या वेळी कोणत्या भावना आल्या असतील यावर विचार करा. जेव्हा तुम्ही या विश्वासू स्त्रीपुरुषांच्या भावना समजून घ्याल, तेव्हा तुम्हाला त्या अगदी खऱ्याखुऱ्या, ओळखीच्या व्यक्ती वाटू लागतील. कोण जाणे, कदाचित त्यांपैकी काही जण तुम्हाला बऱ्याच वर्षांची ओळख असलेल्या जुन्या मित्रांसारखेदेखील वाटू लागतील!
११, १२. (क) अब्राम व साराय यांना तुम्ही आणखी चांगल्या प्रकारे कसं ओळखू शकाल? (ख) हन्ना, एलीया व शमुवेल यांच्या उदाहरणांचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा होऊ शकेल?
११ जेव्हा तुम्हाला या व्यक्तींची अशी चांगल्या प्रकारे ओळख होईल, तेव्हा तुम्हाला आपोआपच त्यांचं अनुकरण करावंसं वाटू लागेल. अशी कल्पना करा, की तुमच्यावर एक नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कदाचित तुमची सेवा वाढवण्यासाठी यहोवाच्या संघटनेकडून तुम्हाला एखादी नवीन नेमणूक हाती घेण्याचं आमंत्रण मिळालं असेल. उदाहरणार्थ, प्रचारकांची खूप गरज असलेल्या एखाद्या ठिकाणी जाऊन सेवा करण्यास तुम्हाला सांगण्यात
आलं असेल. किंवा तुम्ही पूर्वी कधीही न केलेल्या आणि तुम्हाला फारशा आवडत नसलेल्या पद्धतीनं प्रचार करण्याचं प्रोत्साहन तुम्हाला देण्यात आलं असेल. तुम्हाला मिळालेल्या नव्या नेमणुकीबद्दल प्रार्थनापूर्वक विचार करत असताना, अब्रामाच्या उदाहरणावर मनन केल्यानं तुम्हाला काही मदत मिळू शकेल का? अब्राम व साराय ऊर देशातल्या सर्व सुखसोयी सोडून यहोवा दाखवेल त्या ठिकाणी जाण्यास तयार झाले. आणि यामुळं त्यांना यहोवाकडून कितीतरी आशीर्वाद मिळाले. तुम्ही त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालाल, तेव्हा तुम्ही पूर्वीपेक्षा आणखी चांगल्या प्रकारे त्यांना ओळखता असं तुम्हाला वाटू लागेल.१२ किंवा, एका वेगळ्या परिस्थितीची कल्पना करा. असं समजा की एखाद्या जवळच्या व्यक्तीनं तुमच्या भावना दुखावल्या आहेत. तुम्ही अगदी निराश झाला आहात. कदाचित तुम्हाला सभांनाही जावंसं वाटत नसेल. अशा वेळी, तुम्ही हन्नाच्या उदाहरणावर मनन करू शकता. पनिन्ना हन्नाशी खूप वाईट वागली, तरीसुद्धा हन्नानं देवाची उपासना करण्याचं सोडलं नाही. या गोष्टीवर विचार केल्यास तुम्हाला योग्य पाऊल उचलण्यास मदत मिळेल. अशा प्रकारे हन्नाचं अनुकरण केल्यामुळं ती तुम्हाला अगदी जवळची वाटू लागेल. त्याच प्रकारे, स्वतःबद्दल कमीपणा वाटत असल्यामुळं जर तुम्ही निराश झाला असाल, तर एलीयाच्या उदाहरणाचं परीक्षण करा. त्याच्यावर कोणते दुःखद प्रसंग आले आणि यहोवानं त्याला कशा प्रकारे धीर दिला यावर विचार केल्यास तुम्हाला एलीया एखाद्या जवळच्या व्यक्तीसारखा वाटू लागेल. शिवाय, ज्या तरुणांना शाळासोबत्यांकडून वाईट कामं करण्याच्या दबावाला सतत तोंड द्यावं लागतं त्यांच्याबद्दल काय? शमुवेलानं निवासमंडपात सेवा करत असताना एलीच्या मुलांच्या दुष्ट प्रभावाला कशा प्रकारे तोंड दिलं, याचा अभ्यास केल्यावर शमुवेल त्यांना एका जिवलग मित्रासारखा वाटू लागेल.
१३. बायबलमधील व्यक्तींचं आपण अनुकरण करतो, तेव्हा आपला विश्वास कुठंतरी कमी पडतो असा त्याचा अर्थ होतो का? स्पष्ट करा.
१३ पण, बायबलमधल्या या विश्वासू व्यक्तींचं अनुकरण केल्यामुळं, तुम्ही केवळ त्यांची नक्कल करत आहात, किंवा तुमच्या विश्वासात तुमचं स्वतःचं असं काहीच नाही, असा अर्थ होतो का? नक्कीच नाही. यहोवाचं वचनच आपल्याला या विश्वासू जनांचं अनुकरण करण्याचं प्रोत्साहन देतं. (१ करिंथ. ४:१६; ११:१; २ थेस्सलनी. ३:७, ९) शिवाय, या पुस्तकात दिलेल्या काही व्यक्तींनीही स्वतः त्यांच्याआधी होऊन गेलेल्या विश्वासू जनांचं अनुकरण केलं होतं. उदाहरणार्थ, १७ व्या अध्यायात मरीयेनं यहोवाची स्तुती करताना हन्नाच्या प्रार्थनेतले काही शब्द वापरल्याचं आपल्याला दिसून येतं. याचा अर्थ, तिनंही हन्नाचं अनुकरण केलं. पण यामुळे मरीयेचा विश्वास कुठंतरी कमी पडला, असा याचा अर्थ होतो का? मुळीच नाही! उलट, हन्नाच्या उदाहरणामुळे मरीयेला आपला विश्वास आणखी मजबूत करण्यास मदत मिळाली. आणि यामुळं ती यहोवावर उल्लेखनीय विश्वास दाखवू शकली.
१४, १५. या पुस्तकाची काही वैशिष्ट्ये काय आहेत व तुम्ही या पुस्तकाचा वापर कसा करू शकता?
१४ तुम्हाला तुमचा विश्वास मजबूत करण्यास मदत मिळावी या उद्देशानंच हे पुस्तक तयार करण्यात आलं आहे. या पुस्तकातील अध्याय, २००८ ते २०१३ सालांदरम्यान टेहळणी बुरूजमध्ये प्रकाशित झालेल्या “त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा” या लेखमालेतून घेण्यात आले आहेत. पण काही नवीन माहितीचीही भर त्यात घालण्यात
आली आहे. चर्चा करण्यास आणि दिलेली माहिती जीवनात कशी लागू करता येईल हे समजण्यास मदत करण्यासाठी प्रत्येक अध्यायात प्रश्न पुरवण्यात आले आहेत. अनेक आकर्षक चित्रं खास या पुस्तकासाठी तयार करण्यात आली आणि ती तयार करत असताना बऱ्याच बारीकसारीक गोष्टींकडेही लक्ष देण्यात आलं. तसंच, पूर्वीच्या लेखांमध्ये दिलेल्या चित्रांचाही आकार मोठा करून व ती आणखी आकर्षक बनवून वापरण्यात आली आहेत. अभ्यास करण्यास साहाय्यक ठरतील अशी इतर वैशिष्ट्ये म्हणजे या पुस्तकात ऐतिहासिक घटनांचा क्रम दाखवणारी समयरेषा आणि नकाशे देण्यात आले आहेत. त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा हे पुस्तक वैयक्तिक, कौटुंबिक आणि मंडळीच्या अभ्यासासाठी उपयोगी पडेल अशा रीतीनं तयार करण्यात आलं आहे. पण, तुम्ही कुटुंब मिळून यातल्या गोष्टी मोठ्यानं वाचूनदेखील त्यांचा आनंद घेऊ शकता.१५ यहोवाच्या प्राचीन काळातल्या एकनिष्ठ सेवकांच्या विश्वासाचं अनुकरण करण्यास हे पुस्तक तुम्हाला मदत करो! आणि यामुळे आपल्या स्वर्गातील पित्यासोबतचा तुमचा नातेसंबंध आणि विश्वास दिवसेंदिवस मजबूत होत राहो!