अध्याय तीन
विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा पिता
१, २. नोहाच्या काळानंतर जग कसं बदललं होतं, आणि त्याबद्दल अब्रामाला कसं वाटलं?
ऊर शहरात राहणाऱ्या अब्रामानं शहरातील सर्वात उंच इमारत असलेल्या ‘झिगुरातवर’ नजर टाकली. * पिरॅमिडच्या आकाराच्या त्या मंदिरातून धुराचा लोट वर आकाशाकडे जात होता. तिथून लोकांचा गोंगाट ऐकू येत होता. नेहमीप्रमाणे पुजारी चंद्र देवतेला बलिदानं अर्पण करत होते. अब्रामाला ते दृश्य पाहावेनासं झालं. कपाळावर आठ्या आणून त्यानं त्यावरून आपली नजर हटवली. गर्दीतून वाट काढत घरी परतताना कदाचित त्याच्या मनात शहरात पसरलेल्या मूर्तिपूजेबद्दलचे विचार घोळू लागले असतील. खरंच, नोहाच्या काळानंतर संबंध जगात खोटी उपासना किती मोठ्या प्रमाणात पसरली होती!
२ अब्रामाचा जन्म झाला त्याच्या फक्त दोन वर्षांआधी नोहाचा मृत्यू झाला होता. जलप्रलयानंतर नोहा आणि त्याचं कुटुंब तारवातून सुखरूप बाहेर आल्यावर नोहानं यहोवा देवाला अर्पण दिलं; तेव्हा देवानं आकाशात मेघधनुष्य दाखवलं. (उत्प. ८:२०; ९:१२-१४) त्या वेळी, जगात केवळ शुद्ध उपासना म्हणजे यहोवाची उपासना केली जायची. पण आता, नोहानंतरची दहावी पिढी पृथ्वीवर होती आणि त्या वेळी शुद्ध उपासना करणाऱ्यांची संख्या फार कमी झाली होती. लोक मोठ्या प्रमाणात मूर्तिपूजा करत होते. अगदी अब्रामाचा पिता, तेरहसुद्धा मूर्तिपूजक होता; कदाचित तो मूर्ती बनवत असावा.—यहो. २४:२.
विश्वासाच्या बाबतीत अब्राम इतका उल्लेखनीय कशामुळे ठरला?
३. कोणत्या गोष्टीमुळे अब्रामाचा वेगळेपणा दिसून आला, आणि हे जाणून घेतल्यामुळे आपल्याला काय फायदा होईल?
३ पण, अब्राम खूप वेगळा होता. त्याचं आयुष्य सरत गेलं तसतसा त्याचा हा वेगळेपणा देवावरील त्याच्या विश्वासामुळे अधिकच स्पष्ट दिसून आला. रोमकर ४:११ वाचा.) पण, कोणत्या गोष्टीनं अब्रामाला अशा प्रकारचा असाधारण विश्वास दाखवण्यास मदत केली ते आता आपण पाहू. यामुळे आपल्याला आपला विश्वास वाढवण्यास बरीच मदत मिळेल.
आणि म्हणूनच पुढं प्रेषित पौलानं देवाच्या प्रेरणेनं त्याला ‘विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा पिता!’ असं म्हटलं. (प्रलयानंतरच्या काळात यहोवाची उपासना
४, ५. अब्रामाला यहोवाबद्दल कोणाकडून शिकायला मिळालं असेल, आणि आपण असं का म्हणू शकतो?
४ अब्रामाला यहोवा देवाबद्दल कसं शिकायला मिळालं? आपल्याला माहीत आहे, की त्या काळी पृथ्वीवर यहोवाचे काही विश्वासू सेवक होते. त्यांपैकीच शेम हाही एक होता. तसं पाहिलं, तर नोहाच्या तीन मुलांमध्ये शेम थोरला नव्हता. पण, कदाचित देवावरील त्याच्या उल्लेखनीय विश्वासामुळे सहसा त्याचा सर्वात आधी उल्लेख केला जातो. * जलप्रलयाच्या काही काळानंतर नोहानं यहोवाबद्दल बोलताना त्याला “शेमाचा देव” असं म्हटलं. (उत्प. ९:२६) शेमाला यहोवाबद्दल आणि शुद्ध उपासनेबद्दल खूप आदर होता.
५ अब्राम शेमला ओळखत होता का? हो, कदाचित ओळखत असावा. शेमसारखा अनुभवी, वडीलधारा माणूस आपल्या कुटुंबात आहे याचा लहानपणी अब्रामाला किती अभिमान वाटत असेल! कारण शेम हा चारशे वर्षांदरम्यान घडलेल्या घटनांचा साक्षीदार होता. त्यानं जलप्रलयापूर्वीची दुष्टाई, तसंच पृथ्वीवरून ही दुष्टाई नाहीशी करणारा जलप्रलय पाहिला होता. याशिवाय त्यानं, मानवांची संख्या वाढून नवनवीन राषट्रं निर्माण होताना आणि त्यानंतर निम्रोदच्या काळात झालेली बंडाळीही पाहिली होती. पण, विश्वासू शेम त्या बंडाळीपासून चार हात दूरच राहिला होता. त्यामुळं देवानं, बाबेलचा बुरूज बांधणाऱ्या लोकांच्या भाषेत गोंधळ केला तेव्हा शेम व त्याच्या कुटुंबाची भाषा बदलली नाही. ते पुढंही मानवाची मूळ भाषा अर्थात नोहाची भाषा बोलत राहिले. अब्रामसुद्धा शेमच्या त्या कुटुंबाचाच भाग होता. साहजिकच या सर्व गोष्टींमुळे अब्रामाच्या मनात शेमबद्दल गाढ आदर असावा. इतकंच नाही, तर अब्रामाच्या दीर्घायुष्यात शेम बरीच वर्षं जिवंत होता. त्यामुळं अब्रामाला शेमकडून यहोवाबद्दल बरंच काही शिकायला मिळालं असेल.
६. (क) जलप्रलयातून अब्रामानं नक्कीच धडा घेतला असेल असा का म्हणता येईल? (ख) अब्राम आणि साराय यांचं जीवन कसं होतं?
६ एक गोष्ट मात्र आपण खातरीनं म्हणू शकतो. ती म्हणजे, * अब्राम आणि साराय यांना मूलबाळ नसलं, तरी एकमेकांच्या सोबतीनं ते आनंदानं यहोवाची सेवा करत राहिले. तसंच, अब्रामाचा पुतण्या, लोट यालाही त्यांनी दत्तक घेतलं.
पृथ्वीवर आलेल्या जलप्रलयातून अब्रामानं महत्त्वाचा धडा घेतला होता. म्हणूनच, नोहाप्रमाणे त्यानंही देवाबरोबर चालण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या काळातील मूर्तिपूजेपासून तो दूर राहिला. तसंच, त्याच्या विश्वासामुळे तो फक्त ऊर शहरातच नव्हे, तर अगदी स्वतःच्या कुटुंबातसुद्धा इतरांपेक्षा वेगळा होता. पुढं त्याला जीवनात एका उत्तम पत्नीची साथ लाभली. त्याची पत्नी साराय अतिशय सुंदर तर होतीच; पण, तिचा यहोवावर अढळ विश्वासही होता.७. येशूचे अनुयायी अब्रामाचं अनुकरण कसं करू शकतात?
७ ऊर देशात मोठ्या प्रमाणात मूर्तिपूजा होत असली, तरी अब्रामानं एका क्षणासाठीदेखील यहोवाची उपासना सोडली नाही. मूर्तिपूजक समाजात राहूनसुद्धा तो आणि साराय इतरांपेक्षा वेगळे होते. एका अर्थानं, ते प्रवाहाच्या विरोधात पोहण्यास तयार होते. खरा विश्वास उत्पन्न करायचा असेल, तर आपणही अशीच मनोवृत्ती दाखवली पाहिजे. दुसऱ्या शब्दांत, आपणही प्रवाहाच्या विरोधात पोहण्यास तयार असलं पाहिजे. येशूनं म्हटलं, की त्याचे अनुयायी जगाचे भाग नसतील आणि त्यामुळं जग त्यांचा द्वेष करेल. (योहान १५:१९ वाचा.) यहोवाची सेवा करत असल्यामुळं तुमच्या कुटुंबानं किंवा समाजानं तुमच्याकडे पाठ फिरवली असली, तरी निराश होऊ नका. कारण तुम्ही अब्राम आणि साराय यांच्यासारख्या विश्वासू सेवकांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत आहात!
देश सोडून जाण्याची आज्ञा
८, ९. (क) एके दिवशी अब्रामाच्या जीवनात कोणती घटना घडली? (ख) देवानं अब्रामाला काय सांगितलं?
८ एके दिवशी अब्रामाच्या जीवनात एक अशी घटना घडली जी त्याच्या मनावर कायमची कोरली गेली. त्याला यहोवा देवाकडून एक संदेश मिळाला! त्याबद्दल बायबल आपल्याला फारशी माहिती देत नाही. पण, ‘गौरवशाली प्रेषितांची कृत्ये ७:२, ३ वाचा.) अब्रामाला कदाचित एका देवदूताद्वारे, सबंध विश्वात सर्वोच्च असलेल्या यहोवा देवाच्या विलक्षण गौरवाची झलक मिळाली असेल. जिवंत देव यहोवा हा त्या काळच्या निर्जीव मूर्तींपेक्षा अगदी वेगळा आहे हे पाहून अब्रामाला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा!
देवाने’ त्या विश्वासू पुरुषाला दर्शन दिलं इतकं मात्र बायबल सांगतं. (९ यहोवानं अब्रामाला काय सांगितलं? त्यानं त्याला म्हटलं: “तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा.” कोणत्या देशात जायचं हे यहोवानं त्याला सांगितलं नव्हतं; तर ‘मी दाखवीन त्या देशात जा’ इतकंच यहोवानं म्हटलं. त्यासाठी अब्रामाला आपलं घरदार आणि नातेवाइकांना सोडून जावं लागणार होतं. प्राचीन काळी, मध्य-पूर्वेकडील देशांत कौटुंबिक नाती खूप जपली जायची. त्यामुळं एखाद्यावर नातेवाइकांना सोडून जाण्याची वेळ येणं हे खूप मोठं दुर्दैव समजलं जायचं; त्यापेक्षा मरण परवडलं, असं लोकांना वाटायचं.
१०. ऊरमधलं आपलं घर सोडताना अब्राम आणि साराय यांना कोणते त्याग करावे लागले असतील?
१० आपला देश सोडून जाण्यासाठी अब्रामाला नक्कीच खूप त्याग करावे लागले. पुराव्यावरून दिसून येतं, की ऊर हे एक गजबजलेलं, समृद्ध असं शहर होतं. (“अब्राम आणि साराय यांनी सोडलेलं शहर,” ही चौकट पाहा.) ऐतिहासिक माहिती गोळा करण्यासाठी केलेल्या खोदकामावरून दिसून येतं, की प्राचीन ऊर शहरातली घरं ऐसपैस असून त्यात बऱ्याच सुखसोयी होत्या. काही घरांमध्ये तर बारा-बारा खोल्या असायच्या ज्यात कुटुंब आणि दास राहायचे. शिवाय, मधोमध फरश्या बसवलेलं मोठं अंगणसुद्धा असायचं. तसंच प्रत्येक घरात नळांची, शौचालयांची आणि सांडपाण्याची चांगली व्यवस्था होती. शिवाय हेही लक्षात घ्या, की अब्राम आणि साराय आता तरुण राहिले नव्हते; अब्रामानं सत्तरी, तर सारायनं साठी ओलांडली होती. आणि कोणत्याही चांगल्या पतीप्रमाणे नक्कीच अब्रामालादेखील सारायची चांगली काळजी घेण्याची, तिला सुखात ठेवण्याची इच्छा असेल. त्यामुळे, देवानं देश सोडून जाण्याची आज्ञा दिली तेव्हा त्यांच्या मनात कोणकोणत्या चिंता, प्रश्न आले असतील आणि त्याबद्दल ते एकमेकांशी काय बोलले असतील, याची आपण कल्पना करू शकतो. पण, सारायनं कोणतीही तक्रार न करता हे आव्हान स्वीकारलं याचा अब्रामाला किती आनंद झाला असेल! अब्रामाप्रमाणेच, तीसुद्धा ऊर देशातलं आपलं आरामदायी जीवन सोडून देण्यास तयार झाली.
११, १२. (क) ऊर शहरातून निघण्याआधी अब्रामाला आणि सारायला कोणकोणती तयारी करावी लागणार होती? (ख) ऊर शहरातून निघण्याच्या दिवसाचं वर्णन करा.
११ अब्राम आणि साराय यांनी ऊर शहर सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. सामानाची बांधाबांध करायची होती, बऱ्याच गोष्टींची व्यवस्था लावायची होती. आपण प्रवासाला तर निघालो, पण जायचं कुठं हे माहीत नसताना कोणत्या गोष्टी घ्यायच्या? कोणत्या गोष्टी मागे सोडायच्या? असे प्रश्न त्यांना पडले असतील. पण, त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्या जवळच्या माणसांचाही त्यांना विचार करावा लागला असेल. तेरह बराच वयस्कर झाला होता. त्याची कशी व्यवस्था करावी असा प्रश्न त्यांच्यापुढं असेल. शेवटी त्यांनी त्यालाही आपल्यासोबत घेऊन जाण्याचा आणि त्याची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. तेरहसुद्धा त्यांच्यासोबत जायला आनंदानं तयार झाला असेल. आपण असं का म्हणू शकतो? कारण अब्राम नव्हे, तर कुलप्रमुख या नात्यानं तेरह आपल्या कुटुंबाला घेऊन ऊरमधून निघाला, असं बायबल म्हणतं. आतापर्यंत त्यानं मूर्तिपूजा नक्कीच सोडून दिली असावी. प्रवास करणाऱ्यांसोबत अब्रामाचा पुतण्या लोट हादेखील असणार होता.—१२ शेवटी, ऊर शहर सोडण्याचा दिवस उजाडला. प्रवासाला निघालेल्यांचा मोठा ताफा शहराच्या वेशीजवळ एकत्र जमत असल्याचं दृश्य डोळ्यांपुढं आणा. उंटांच्या आणि गाढवांच्या पाठीवर सामान लादलं आहे. * गुराढोरांना एकत्र करण्यात आलं आहे; कुटुंबाचे सदस्य, नोकरचाकर सर्व जण निघायला तयार आहेत. सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे. सर्वांच्या नजरा कदाचित अब्रामाकडे लागल्या असतील; तो कधी एकदाचा निघायचा इशारा देतो याची ते वाट पाहत असतील. शेवटी, तो क्षणही येतो आणि ऊर शहर कायमचं मागे सोडून ते प्रवासाला निघतात.
१३. आज यहोवाचे अनेक सेवक अब्राम आणि सारायसारखी मनोवृत्ती कशी दाखवतात?
१३ आज यहोवाच्या सेवकांपैकी अनेक जण, प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याचा निर्णय घेतात. तर काही जण, आपले सेवाकार्य वाढवण्याच्या उद्देशानं एखादी नवीन भाषा शिकण्याचं ठरवतात. किंवा मग, पूर्वी कधीही न केलेला किंवा कठीण वाटणारा सेवेचा एखादा प्रकार अजमावून पाहण्याचा ते निर्णय घेतात. असे निर्णय घेताना सहसा काही त्याग इब्री ६:१०; ११:६) अब्रामाच्या बाबतीतही त्यानं असंच केलं का?
करावे लागतात. थोड्याफार प्रमाणात का होईना, पण गैरसोय सहन करण्याची तयारी दाखवावी लागते. पण, यहोवाचे सेवक अशी त्यागाची मनोवृत्ती दाखवतात ही खरोखर प्रशंसा करण्यासारखी गोष्ट नाही का? असं करण्याद्वारे खरंतर ते अब्रामाचं आणि सारायचंच अनुकरण करत असतात. आपणही या बांधवांसारखा विश्वास दाखवल्यास ही खातरी बाळगू शकतो, की आपण केलेल्या त्यागांपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आशीर्वाद यहोवा आपल्याला देईल! कारण विश्वास दाखवणाऱ्यांना यहोवा कधीही प्रतिफळ दिल्याशिवाय राहत नाही. (ते फरात नदी पार करतात
१४, १५. अब्रामानं आणि त्याच्या कुटुंबानं ऊरपासून हारानला केलेला प्रवास कसा होता, आणि अब्रामानं हारानमध्ये मुक्काम करण्याचं का ठरवलं असेल?
१४ हळूहळू त्यांचा काफिला मार्गाला लागला. आपण कल्पना करू शकतो, अब्राम आणि साराय कधी उंटावर बसून, तर कधी पायी प्रवास करत असतील. एकमेकांसोबत गप्पा मारत जात असताना उंटांच्या गळ्यातल्या घुंगरांची किणकिण त्यांच्या कानावर पडत असेल. प्रवासाचा फारसा अनुभव
नसलेल्यांनाही आता तळ ठोकण्याचा आणि तळ उठवण्याचा सराव झाला होता; वयस्कर तेरहाला उंटावर किंवा गाढवावर बसायला मदत करणं त्यांना चांगलं जमू लागलं होतं. फरात नदीच्या किनाऱ्यावरून प्रवास करत ते उत्तरपश्चिमेच्या दिशेनं जात होते. दिवसांमागून दिवस प्रवास करत ते पुढं जात राहिले.१५ शेवटी, सुमारे ९६० किलोमीटरचा प्रवास केल्यावर ते हारानला पोहंचले. हे समृद्ध शहर, पूर्व आणि पश्चिमेकडील व्यापारी मार्ग जिथं एकमेकांना मिळायचे अशा ठिकाणी वसलेलं होतं. तिथली घरं मधमाश्यांच्या पोळ्यासारखी होती. या ठिकाणी पोहचल्यावर त्यांनी काही काळ तिथं मुक्काम करायचं ठरवलं. कारण तेरहचं वय खूप झाल्यामुळं त्याला पुढचा प्रवास करणं शक्य नव्हतं.
१६, १७. (क) आब्रामाला कोणत्या करारामुळे आनंद झाला? (ख) हारानमध्ये असताना यहोवानं अब्रामाला कसं आशीर्वादित केलं?
१६ काही काळानंतर तेरहचा मृत्यू झाला. त्या वेळी तो २०५ वर्षांचा होता. (उत्प. ११:३२) पण, या दुःखाच्या काळात अब्रामाला खूप सांत्वन मिळालं; कारण यहोवा पुन्हा एकदा त्याच्याशी बोलला. ऊर देशात असताना दिलेल्या सूचना यहोवानं पुन्हा एकदा त्याला सांगितल्या; तसंच, त्याला जी अभिवचनं दिली होती त्यात यहोवानं आणखी माहितीची भर घातली. अब्रामापासून एक “मोठे राष्ट्र” बनेल आणि त्याच्यामुळं पृथ्वीवरील सर्व कुटुंबांना आशीर्वाद मिळतील असं यहोवानं सांगितलं. (उत्पत्ति १२:२, ३ वाचा.) देवानं अब्रामाशी केलेल्या या करारामुळे अब्रामाला नक्कीच आनंद झाला असेल. आणि पुढच्या प्रवासाला निघण्याची आता वेळ आली आहे याची जाणीव त्याला झाली असेल.
१७ या वेळी तर त्यांना आणखीनच जास्त सामानाची बांधाबांध करावी लागणार होती. कारण अब्राम हारानमध्ये राहत असताना यहोवानं त्यांना खूप आशीर्वादित केलं होतं. म्हणूनच बायबल उत्प. १२:५, ईझी-टू-रीड व्हर्शन) एक मोठं राष्ट्र बनण्यासाठी साहजिकच मालमत्तेची, नोकरचाकरांची गरज होती. आणि हे सर्वकाही यहोवानं अब्रामाला पुरवलं. अर्थात, यहोवा नेहमीच आपल्या सेवकांना श्रीमंत बनवत नाही. पण, त्याच्या उद्देशानुसार त्यांना कार्य करता यावं म्हणून आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी तो त्यांना पुरवतो. अशा प्रकारे, समृद्ध झालेला अब्राम आपला काफिला घेऊन एका अज्ञात देशी जाण्यास निघाला.
म्हणतं, की “हारानमध्ये त्यांनी मिळवलेली मालमत्ता तसेच गुलाम या सर्वांना बरोबर घेऊन त्याने हारान सोडले.” (१८. (क) अब्रामानं यहोवाच्या लोकांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा केव्हा गाठला? (ख) पुढं अनेक वर्षांनंतर, इतर कोणत्या महत्त्वाच्या घटना निसान १४ च्या दिवशी घडल्या? (“बायबलच्या इतिहासातली एक महत्त्वपूर्ण तारीख,” ही चौकट पाहा.)
१८ हारानपासून अनेक दिवसांच्या अंतरावर कर्कमीश हे ठिकाण होतं; प्रवासी सहसा इथूनच फरात नदी पार करून जायचे. इ.स.पू. १९४३ साली, निसान महिन्याच्या १४ व्या दिवशी, कदाचित याच ठिकाणाहून अब्राम आपल्या काफिल्याला घेऊन ती नदी पार करून पलीकडे गेला असेल. (निर्ग. १२:४०-४३) इथूनच दक्षिणेकडे, यहोवानं अब्रामाला वचन दिलेला देश पसरलेला होता. अशा रीतीनं त्या दिवशी, देवानं अब्रामाशी केलेला करार अंमलात आला. आणि अब्रामानं यहोवाच्या लोकांच्या इतिहासातला एक अतिशय महत्त्वाचा टप्पा गाठला.
१९. यहोवानं अब्रामाला जे अभिवचन दिलं त्यात कशाचा उल्लेख करण्यात आला होता, आणि ते ऐकून अब्रामाला कशाची आठवण झाली असेल?
१९ अब्राम आपला काफिला घेऊन देशाच्या दक्षिणेकडे गेला आणि ते शखेमाजवळील मोरे या ठिकाणी असलेल्या वृक्षांजवळ येऊन पोहचले. तिथं पुन्हा एकदा यहोवा त्याच्याशी बोलला. या वेळी, यहोवानं अब्रामाच्या संतानाचा उल्लेख केला आणि हे संतान देशाचा ताबा घेईल असं सांगितलं. ते ऐकल्यानंतर, अब्रामाला एदेन बागेतली भविष्यवाणी आठवली असेल का? कदाचित आठवली असेल. कारण एदेन बागेत केलेल्या त्या भविष्यवाणीत यहोवानं मानवजातीची सुटका करणाऱ्या एका संततीचा उल्लेख केला होता. (उत्प. ३:१५; १२:७) त्यामुळे, आपणही देवाच्या महान उद्देशाचा एक भाग आहोत याची अब्रामाला थोडीफार कल्पना येऊ लागली असेल.
२०. यहोवाकडून मिळालेल्या बहुमानाची कदर असल्याचं अब्रामानं कसं दाखवून दिलं?
२० अब्राम ज्या देशात गेला तिथं अजूनही कनानी लोक राहत होते. त्यामुळे त्या देशात प्रवास करताना त्यानं खूप सावधगिरी बाळगली. पण, यहोवाच्या उत्पत्ति १२:७, ८ वाचा.) अर्थात, अब्रामाच्या आयुष्यात पुढं अनेक कठीण वळणं येणार होती. त्याचा विश्वास पारखला जाणार होता. पण, त्यानं कधीही मागे वळून पाहिलं नाही. ऊर शहरातील आपलं घर आणि सुखसोयी यांचा विचार करण्याऐवजी त्यानं आपली नजर भविष्याकडे लावली होती. म्हणूनच, इब्री लोकांस ११:१० यात त्याच्याविषयी असं म्हटलं आहे: “पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता.”
महान उद्देशाचा एक भाग असण्याचा जो बहुमान त्याला लाभला होता, त्याची त्याला मनापासून कदर होती. त्यामुळं प्रवासादरम्यान त्यानं काही ठिकाणी यहोवासाठी वेद्या बांधल्या; सर्वात आधी मोरे या ठिकाणी असलेल्या वृक्षांजवळ आणि नंतर बेथेल इथं. तसंच, त्यानं देवाच्या नावानं प्रार्थनाही केली. भविष्यात आपल्या संततीला मिळणार असलेल्या अद्भुत आशीर्वादांबद्दल त्यानं यहोवाला मनापासून कृतज्ञता व्यक्त केली असेल. तसंच, कदाचित त्यानं कनानमधील लोकांना यहोवाबद्दल सांगितलं असेल. (२१. देवाच्या राज्याबद्दल अब्रामाला माहीत नसलेल्या कोणकोणत्या गोष्टी आज आपल्याला माहीत आहेत?
२१ अब्रामाच्या तुलनेत, त्या लाक्षणिक नगराबद्दल अर्थात देवाच्या राज्याबद्दल आज आपल्याला कितीतरी जास्त माहीत आहे. उदाहरणार्थ आपल्याला माहीत आहे, की ते राज्य सध्या स्वर्गात शासन करत आहे आणि लवकरच ते या दुष्ट जगाचा अंत करेल; तसंच, फार पूर्वी भाकीत केलेली अब्रामाची संतती अर्थात येशू ख्रिस्त त्या राज्याचा राजा या नात्यानं सध्या राज्य करत आहे, हेसुद्धा आपल्याला माहीत आहे. भविष्यात अब्राहामाचं पुनरुत्थान होईल त्या काळाची कल्पना करा! पूर्वी ज्या गोष्टींची त्याला फक्त पुसटशी माहिती होती, त्या गोष्टी तेव्हा त्याला पूर्णपणे समजतील. तुम्हाला यहोवाचं प्रत्येक अभिवचन पूर्ण होताना पाहायचंय का? तर मग, अब्रामासारखी मनोवृत्ती दाखवत राहा. त्याग करण्याची व आज्ञांचं पालन करण्याची वृत्ती दाखवा आणि यहोवाकडून मिळणाऱ्या बहुमानांची मनापासून कदर करा. तुम्ही जर अब्रामासारखा विश्वास दाखवला तर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा पिता असलेला अब्राम एका अर्थानं तुमचाही पिता होईल!
^ परि. 1 याच्या अनेक वर्षांनंतर, देवानं अब्रामाचं नाव बदलून त्याला अब्राहाम हे नाव दिलं, ज्याचा अर्थ “जनसमूहाचा पिता” असा होतो.—उत्प. १७:५.
^ परि. 4 त्याचप्रमाणे, अब्रामसुद्धा तेरहचा थोरला मुलगा नसला, तरी सहसा त्याचाच पहिला उल्लेख केला जातो.
^ परि. 6 पुढं देवानं सारायचं नाव बदलून तिला सारा असं नाव दिलं, ज्याचा अर्थ “राणी” होतो.—उत्प. १७:१५.
^ परि. 12 अब्रामाच्या काळात उंट हे पाळीव प्राणी होते का? अशी शंका काही विद्वान व्यक्त करतात. पण, अशी शंका बाळगण्यासाठी कोणताही ठोस आधार नाही. खरंतर, बायबलमध्ये अब्रामाच्या मालमत्तेचा उल्लेख करताना बऱ्याच वेळा उंटांचा उल्लेख आढळतो.—उत्प. १२:१६; २४:३५.