अध्याय सतरा
“पाहा! मी प्रभूची दासी!”
१, २. (क) अनोळखी पाहुण्यानं मरीयेला पाहून काय म्हटलं? (ख) मरीया जीवनाच्या एका महत्त्वाच्या वळणावर उभी होती असं का म्हणता येईल?
मरीया तिच्या घरी आलेल्या पाहुण्याकडे आश्चर्यानं पाहतच राहिली. त्या पाहुण्यानं तिच्या आईवडिलांबद्दल काहीही विचारलं नाही. कारण, तो तिलाच भेटायला आला होता! तो नासरेथचा नव्हता हे तर स्पष्टच होतं. कारण, नासरेथसारख्या लहानशा गावात बहुतेक लोक एकमेकांना ओळखायचे. त्यामुळं एखादा अनोळखी माणूस गावात आल्यास ते लगेच लक्षात यायचं. आणि हा तर इतका वेगळा होता, की त्यानं कुठंही लोकांचं लक्ष वेधून घेतलं असतं. शिवाय, मरीयेला पाहिल्यावर त्यानं जे म्हटलं तेसुद्धा फार वेगळं होतं. आजपर्यंत कुणीही तिला असं काही म्हटलेलं नव्हतं. तो पाहुणा तिला म्हणाला: “हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो; प्रभू तुझ्याबरोबर असो.”—लूक १:२६-२८ वाचा.
२ अशा रीतीनं बायबल आपल्याला मरीयेची ओळख करून देतं. ती हेलीची मुलगी होती आणि आपल्या आईवडिलांसोबत गालील प्रांतातल्या नासरेथमध्ये राहत होती. बायबलमध्ये मरीयेचा उल्लेख येतो, तेव्हा ती जीवनाच्या एका अतिशय महत्त्वाच्या वळणावर उभी होती. व्यवसायानं सुतार असलेल्या योसेफाशी तिची मागणी झाली होती. योसेफ हा श्रीमंत नसला, तरी देवाचा एक विश्वासू उपासक होता. त्यामुळं, लग्नानंतर मरीयेचं पुढचं जीवन कसं असेल, हे जवळजवळ ठरलेलंच होतं. योसेफाची पत्नी या नात्यानं सुखदुःखात त्याला साथ देत, आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करण्याची स्वप्नं कदाचित मरीयेनं रंगवली असतील. पण, अचानक हा पाहुणा तिच्या घरी आला आणि देवानं तिला एका अतिशय खास कामासाठी निवडलं असल्याचा निरोप तिला दिला. देवानं तिच्यावर सोपवलेल्या त्या कामामुळं तिचं जीवन पूर्णपणे बदलून जाणार होतं.
३, ४. मरीयेबद्दल जाणून घ्यायचं असल्यास आपल्याला कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागेल, आणि आपण कशावर लक्ष केंद्रित करू?
३ बायबलमध्ये मरीयेबद्दल फारशी माहिती दिलेली नाही, याचं अनेकांना आश्चर्य वाटतं. मरीयेच्या पूर्वीच्या जीवनाबद्दल बायबल जास्त काही सांगत नाही. तसंच, तिच्यात कोणते गुण होते याबद्दलही खूप काही सांगितलेलं नाही. आणि ती कशी दिसायची, याबद्दल तर काहीच सांगितलेलं नाही. पण असं असलं, तरी देवाच्या वचनात मरीयेबद्दल जी थोडीफार माहिती देण्यात आली आहे त्यावरून आपल्याला तिच्याबद्दल बरंच काही समजतं.
४ मरीयेबद्दल खरोखरच जाणून घ्यायचं असेल, तर वेगवेगळ्या धर्मपंथांनी तिच्याबद्दल जे काही शिकवलं आहे; आणि त्यामुळं तिच्याविषयी ज्या धारणा निर्माण झाल्या आहेत, त्यांकडे आपल्याला दुर्लक्ष करावं लागेल. म्हणून, आता मरीयेबद्दल माहिती घेत असताना
तुम्ही याआधी तिची जी चित्रं पाहिली असतील, ज्या प्रतिमा किंवा पुतळे पाहिले असतील त्यांचा विचार करू नका. तसंच, ज्या पारंपरिक धर्मसिद्धान्तांच्या आधारावर या नम्र स्त्रीला “देवमाता” आणि “स्वर्गाची राणी” यांसारख्या मोठमोठ्या पदव्या बहाल करण्यात आल्या आहेत, त्यांकडेही आपण काही वेळ दुर्लक्ष करू या. त्याऐवजी, बायबल तिच्याविषयी नेमकं काय सांगतं यावर आपण लक्ष केंद्रित करू. कारण, मरीयेच्या विश्वासाबद्दल आणि आपण कशा प्रकारे तिचं अनुकरण करू शकतो, याबद्दल आपल्याला बायबलमध्ये अतिशय मौल्यवान माहिती सापडते.एका देवदूताची भेट
५. (क) गब्रीएलाचे शब्द ऐकून मरीयेला कसं वाटलं, आणि त्यावरून आपल्याला तिच्याबद्दल काय समजतं? (ख) मरीयेकडून आपण कोणती महत्त्वाची गोष्ट शिकू शकतो?
५ मरीयेकडे आलेला पाहुणा हा कोणी सर्वसाधारण माणूस नव्हता. तो गब्रीएल नावाचा देवदूत होता. त्यानं मरीयेला “कृपा पावलेल्या स्त्रिये” असं म्हटलं, तेव्हा ते ऐकून “तिच्या मनात खळबळ उडाली.” (लूक १:२९) तिला कोणाची ‘कृपा पावली’ आहे, असं देवदूत सांगत होता? आपल्याला लोकांची कृपा मिळावी किंवा चारचौघांत आपली प्रशंसा व्हावी, अशी मरीयेची मुळीच इच्छा नव्हती. पण देवदूत लोकांच्या नव्हे, तर यहोवा देवाच्या कृपेबद्दल बोलत होता. आणि देवाची कृपा आपल्याला मिळावी असं मरीयेला नक्कीच वाटत होतं. पण, आपण फार धार्मिक आहोत आणि त्यामुळं आपल्याला आधीच देवाची कृपा मिळालेली आहे, असा मरीयेनं गर्विष्ठपणे विचार केला नाही. आज आपणही देवाची कृपापसंती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला ती आधीच मिळाली आहे असा गर्विष्ठ विचार आपण कधीही करू नये. असं केल्यास, एक महत्त्वाची गोष्ट, जी मरीयेला पूर्णपणे समजली होती, ती आपल्यालाही समजली असल्याचं आपण दाखवू. ती गोष्ट म्हणजे, देव गर्विष्ठांचा विरोध करतो पण नम्र व दीन लोकांवर तो प्रेम करतो आणि त्यांना साहाय्य करतो.—याको. ४:६.
आपल्याला देवाची कृपापसंती आधीपासूनच मिळाली आहे असा मरीयेनं गर्विष्ठपणे विचार केला नाही
६. देवदूतानं मरीयेला काय सांगितलं?
६ मरीयेनं नम्र असणं नक्कीच गरजेचं होतं. कारण कल्पनाही करता येणार नाही इतका मोठा विशेषाधिकार तिला मिळाला असल्याचं देवदूतानं सांगितलं. त्यानं तिला सांगितलं, की ती एका मुलाला जन्म देईल आणि तो सर्वश्रेष्ठ मनुष्य बनेल. गब्रीएलानं तिला सांगितलं: “प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल; आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील, व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” (लूक १:३२, ३३) देवानं दाविदाला एक हजार वर्षांपेक्षाही जास्त काळाआधी दिलेल्या या वचनाबद्दल मरीयेला माहीत असेल यात शंका नाही. देवानं दाविदाला सांगितलं होतं की त्याच्या वंशजांपैकी एक जण सदासर्वकाळ राज्य करेल. (२ शमु. ७:१२, १३) मरीयेला जाणीव झाली, की देवाचे लोक ज्याची कित्येक शतकांपासून वाट पाहत होते, तो मसीहा तिच्या पोटी जन्माला येणार आहे!
७. (क) मरीयेनं देवदूताला जे म्हटलं त्यावरून तिच्याबद्दल काय कळतं? (ख) आज तरुण लोक मरीयेकडून काय शिकू शकतात?
७ इतकंच नाही, तर देवदूतानं तिला असंही सांगितलं, की तिच्या मुलाला ‘देवाचा पुत्र’ म्हणतील. पण, पृथ्वीवर राहणारी एक स्त्री देवाच्या पुत्राला कशी काय जन्म देऊ शकत होती? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मरीयेनं एका बाळाला जन्म देणं मुळातच कसं शक्य होतं? कारण तिची योसेफासोबत मागणी झाली असली, तरी अजून त्यांचा विवाह झालेला नव्हता. त्यामुळं मरीयेनं कोणताही संकोच न बाळगता देवदूताला म्हटलं: “मला मूल कसे होईल, मी कुमारिका आहे.” (लूक १:३४, सुबोधभाषांतर) आज जगातल्या अनेक भागांत तरुण लोकांना लग्नापूर्वीच आपलं कौमार्य गमावण्याबद्दल काहीही वाटत नाही. उलट, ज्यांनी आपलं कौमार्य अजूनही टिकवून ठेवलं आहे त्यांची थट्टा केली जाते. पण मरीयेनं देवदूताला आपण कुमारी असल्याचं अगदी स्पष्टपणे सांगितलं. तिला आपल्या शुद्ध चारित्र्याचा अभिमान होता. नैतिकतेबद्दल जगाचा दृष्टिकोन जरी आज बदलला असला, तरी यहोवा मात्र बदललेला नाही. (मला. ३:६) मरीयेच्या काळाप्रमाणेच आजदेखील जे त्याच्या नैतिक स्तरांना जडून राहतात ते लोक त्याला प्रिय वाटतात.—इब्री लोकांस १३:४ वाचा.
८. मरीया अपरिपूर्ण असूनही ती एका परिपूर्ण मुलाला जन्म कशी काय देऊ शकणार होती?
८ मरीया देवाची विश्वासू सेवक असली, तरी तीसुद्धा अपरिपूर्ण मानवांपैकी एक होती. मग, ती देवाच्या पुत्राला, म्हणजेच एका परिपूर्ण बाळाला जन्म कशी देऊ शकणार होती? गब्रीएलानं याचा खुलासा केला: “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील.” (लूक १:३५) पवित्र म्हणजे “शुद्ध” व “निष्कलंक.” सर्वसाधारण मानवांमध्ये, जन्माच्या वेळी आईवडिलांची अपरिपूर्णता, त्यांचा पापपूर्ण स्वभाव मुलांमध्ये येतो. पण, मरीयेच्या बाबतीत मात्र यहोवा एक असाधारण गोष्ट, एक चमत्कार करणार होता. तो आपल्या पुत्राचं जीवन स्वर्गातून मरीयेच्या उदरात स्थलांतरीत करणार होता. देवदूतानं मरीयेला सांगितलं, की देवाची शक्ती अर्थात त्याचा पवित्र आत्मा तिच्यावर “छाया” करेल, म्हणजेच तिच्या उदरात वाढणाऱ्या मुलामध्ये पापाचा अंशही येऊ नये म्हणून त्याचं रक्षण करेल. मरीयेनं देवदूताच्या शब्दांवर विश्वास ठेवला का? तिनं देवदूताला काय उत्तर दिलं?
मरीयेनं गब्रीएलाला दिलेलं उत्तर
९. (क) मरीयेच्या वृत्तान्तावर शंका घेणाऱ्यांचं कुठं चुकतं? (ख) गब्रीएलानं मरीयेचा विश्वास कशा प्रकारे मजबूत केला?
९ बायबलमधल्या माहितीवर शंका घेणाऱ्या काहींना, इतकंच काय तर बायबलच्या काही विद्वानांनासुद्धा, एका कुमारीच्या पोटी मूल जन्माला येऊ शकतं या गोष्टीवर विश्वास ठेवणं खूप कठीण वाटतं. इतकं शिक्षण घेतलेलं असूनही, एक साधीशी गोष्ट त्यांच्या लक्षात लूक १:३७) मरीयेनं गब्रीएलाचे शब्द खरे मानले कारण तिचा देवावर पूर्ण विश्वास होता. पण, हा विश्वास म्हणजे, ‘कोणी काहीही सांगावं आणि आपण त्यावर विश्वास ठेवावा’ अशा प्रकारचा भोळसटपणा नव्हता. तर कोणत्याही समजदार व्यक्तीप्रमाणेच तिचा विश्वासदेखील पुराव्यांवर आधारित होता. आणि गब्रीएलानं तिला आणखी एक पुरावा दिला. त्यानं तिच्या नात्यातल्या अलीशिबा या वयस्कर स्त्रीबद्दल तिला सांगितलं. बऱ्याच वर्षांपासून मूल होत नसलेल्या या स्त्रीला, देवानं चमत्कार केल्यामुळं दिवस गेले होते!
येत नाही. ती कोणती? गब्रीएलाच्या शब्दांत सांगायचं झालं, तर ती गोष्ट म्हणजे, “देवाला काहीच अशक्य होणार नाही.” (१०. मरीयेच्या मनात कोणतीही भीती नव्हती किंवा तिच्यासमोर कोणतेही अडथळे नव्हते असं आपण का समजू नये?
१० आता मरीया काय करणार होती? देवानं तिच्यावर एक जबाबदारी सोपवली होती. तसंच, गब्रीएलानं जे काही सांगितलं होतं ते सर्व देव निश्चितच करेल याचा पुरावादेखील तिच्याजवळ होता. पण, यहोवानं सोपवलेली जबाबदारी एक सुहक्क असला, तरी ती स्वीकारणं मरीयेला सोपं जाणार नव्हतं. तिच्या मनात कोणतीही भीती नसेल, असं आपण समजू नये. खरंतर, तिच्यासमोर अनेक अडथळे होते. एकतर तिची योसेफाशी मागणी झाली होती. ती गरोदर असल्याचं ऐकल्यावर योसेफ खरंच तिच्याशी लग्न करेल का, असा प्रश्न नक्कीच तिच्या मनात आला असावा. शिवाय, देवानं तिच्यावर सोपवलेलं कामसुद्धा सोपं नव्हतं. कारण, देवानं निर्माण केलेल्यांपैकी त्याला सर्वात मौल्यवान वाटणाऱ्या त्याच्या एकुलत्या एका पुत्राला ती आपल्या उदरात वाढवणार होती! त्याचा जन्म झाल्यावर तिला त्याचं संगोपन करावं लागणार होतं आणि एका दुष्ट जगात त्याचं संरक्षण करावं लागणार होतं. नक्कीच ही जबाबदारी साधीसुधी नव्हती!
११, १२. (क) देवाच्या काही विश्वासू व एकनिष्ठ सेवकांनीही अवघड वाटणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारताना कशा प्रकारे मागंपुढं पाहिलं? (ख) मरीयेनं गब्रीएलाला दिलेल्या उत्तरावरून आपल्याला तिच्याबद्दल काय कळून येतं?
११ काही वेळा, देवावर पूर्ण विश्वास असणाऱ्या त्याच्या एकनिष्ठ सेवकांनीही त्याच्याकडून अवघड वाटणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारताना मागंपुढं पाहिलं, असं बायबल आपल्याला सांगतं. उदाहरणार्थ, मोशे. देवाच्या वतीनं फारोशी बोलण्यासाठी देवानं त्याला निवडलं तेव्हा आपल्याला नीट बोलता येत नाही, असं त्यानं म्हटलं होतं. (निर्ग. ४:१०) तसंच, यिर्मयानंदेखील देवानं दिलेली जबाबदारी स्वीकारण्यास आपल्याजवळ पुरेसा अनुभव नाही, आपण “केवळ बाळ” आहोत असं म्हटलं. (यिर्म. १:६) आणि योना तर देवानं दिलेलं काम करण्याऐवजी विरुद्ध दिशेला पळून गेला होता. (योना १:३) पण, मरीयेनं काय केलं?
१२ मरीयेनं गब्रीएलाला अगदी साध्या शब्दांत उत्तर दिलं. पण, तिच्या त्या शब्दांतून तिचा नम्रपणा व आज्ञाधारकता झळकते आणि आजसुद्धा देवाच्या उपासकांना तिचे शब्द लूक १:३८) त्या काळी, घरातल्या सर्व सेवकांपैकी दासीचा दर्जा सर्वात खालचा होता; तिचं जीवन पूर्णतः तिच्या मालकाच्या हातात असायचं. पण, तरीसुद्धा मरीयेनं स्वतःला यहोवाची दासी म्हटलं. तो आपला मालक आहे आणि आपलं जीवन त्याच्या हाती सुरक्षित आहे याची तिला जाणीव होती. यहोवाला विश्वासू राहणाऱ्यांचं तो संरक्षण करतो हे तिला माहीत होतं. आणि देवानं सोपवलेली जबाबदारी कठीण असली, तरी ती पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न केल्यास यहोवा आपल्याला आशीर्वाद देईल याची तिला खातरी होती.—स्तो. ३१:२३.
लक्षात आहेत. ती गब्रीएलाला इतकंच म्हणाली, “पाहा मी प्रभूची दासी; आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो.” (यहोवा देव विश्वासू आहे आणि त्याच्या हातात आपलं जीवन सुरक्षित आहे याची मरीयेला खातरी होती
१३. देवानं दिलेलं काम कठीण आहे असं वाटल्यास आपण मरीयेच्या उदाहरणाचं कशा प्रकारे अनुकरण करू शकतो?
१३ देवानं आपल्यावर सोपवलेलं काम कठीण आहे, किंवा ते करणं आपल्याला शक्यच नाही असं कधीकधी आपल्याला वाटू शकतं. पण, देवाचं वचन आपल्याला हे आश्वासन देतं की आपण यहोवावर अगदी पूर्ण भरवसा ठेवू शकतो आणि मरीयेप्रमाणे स्वतःला त्याच्या स्वाधीन करू शकतो. (नीति. ३:५, ६) मग, तुम्ही असं करणार का? असं केल्यास, यहोवा आपल्याला चांगलं प्रतिफळ देईल आणि त्यामुळं त्याच्यावरचा आपला विश्वास आणखीन मजबूत होईल.
अलीशिबेला दिलेली भेट
१४, १५. (क) अलीशिबा आणि जखऱ्या यांच्या घरी मरीया गेली तेव्हा तिला यहोवाकडून आणखी कोणता पुरावा मिळाला? (ख) लूक १:४६-५५ यात दिलेल्या मरीयेच्या शब्दांवरून तिच्याविषयी आपल्याला काय कळून येतं?
१४ गब्रीएलानं अलीशिबेबद्दल मरीयेला सांगितलं तेव्हा तिला फार प्रोत्साहन मिळालं. अलीशिबाच आपली परिस्थिती आणि भावना अगदी चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकेल हे तिला माहीत होतं. त्यामुळं मरीया लगबगीनं यहुदाच्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या अलीशिबेची भेट घ्यायला गेली. कदाचित तिला तिथं जायला तीन ते चार दिवस लागले असतील. अलीशिबा आणि याजक असलेला तिचा पती जखऱ्या यांच्या घरात मरीयेनं पाऊल ठेवताच, यहोवानं तिचा विश्वास मजबूत करण्यासाठी आणखी एक भक्कम पुरावा दिला. अलीशिबेनं मरीयेचा आवाज ऐकला, तेव्हा तिच्या उदरातल्या बाळानं आनंदानं उसळी मारली. अलीशिबा पवित्र आत्म्यानं परिपूर्ण झाली आणि तिनं मरीयेला ‘माझ्या प्रभूची माता,’ असं म्हणून संबोधलं. देवानंच अलीशिबेला ही गोष्ट प्रकट केली होती, की मरीयेचा पुत्र तिचा प्रभू, म्हणजेच मसीहा असेल. शिवाय, पवित्र आत्म्यानं तिला मरीयेच्या विश्वासूपणाबद्दल व आज्ञाधारक मनोवृत्तीबद्दल तिची प्रशंसा करण्यासही प्रेरित केलं. ती म्हणाली: “जिने विश्वास ठेवला ती धन्य.” (लूक १:३९-४५) यहोवानं आपल्याला दिलेलं प्रत्येक वचन खरं ठरणार आहे याविषयी मरीयेच्या मनात खरोखर कोणतीही शंका उरली नव्हती!
१५ त्यामुळं, अलीशिबेचं बोलणं संपल्यावर मरीया बोलू लागली. तिचे शब्द देवाच्या वचनात जतन करून ठेवण्यात आले आहेत. (लूक १:४६-५५ वाचा.) बायबलमध्ये मरीयेचे शब्द नमूद असलेला हा सर्वात मोठा उतारा आहे आणि तिच्या शब्दांतून आपल्याला तिच्याबद्दल बरीच माहिती मिळते. पहिली गोष्ट म्हणजे, तिनं यहोवाची स्तुती केली आहे. यावरून, मसीहाची आई होण्याचा सुहक्क दिल्याबद्दल यहोवाप्रती तिच्या मनात किती कदर व कृतज्ञता होती, हे दिसून येतं. तसंच, मरीयेचा यहोवावर किती गाढ विश्वास होता हेही तिच्या शब्दांवरून दिसून येतं. ती म्हणते, की यहोवा गर्विष्ठांना त्यांची जागा दाखवतो, पण त्याची सेवा करायला उत्सुक असलेल्या दीनदुबळ्यांना तो साहाय्य करतो. मरीयेच्या शब्दांवरून तिच्याजवळ असलेल्या ज्ञानाचाही अंदाज येतो. असं म्हटलं जातं, की या एकाच उताऱ्यात तिनं २० पेक्षा जास्त वेळा इब्री शास्त्रवचनांचा संदर्भ घेतला. *
१६, १७. (क) मरीयेनं व तिच्या पुत्रानं कोणती अनुकरणीय मनोवृत्ती दाखवली? (ख) मरीयेनं अलीशिबेला दिलेल्या भेटीवरून आपल्याला मैत्रीबद्दल काय कळतं?
१६ खरोखर, मरीया देवाच्या वचनावर खोलवर मनन करायची यात शंका नाही. पण, ती गर्विष्ठ बनली नाही. स्वतःच्या मनाप्रमाणे बोलण्याऐवजी तिनं आपले विचार व्यक्त करताना शास्त्रवचनांचा उपयोग केला. तिच्या उदरात वाढत असलेल्या मुलानंही पुढं जाऊन अशीच नम्र मनोवृत्ती दाखवली. त्यानं एकदा असं म्हटलं: “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठवले त्याची आहे.” (योहा. ७:१६) आपणही स्वतःला हा प्रश्न विचारू शकतो: ‘माझ्या मनात देवाच्या वचनाबद्दल असाच गाढ आदर आहे का? की, स्वतःच्याच विचारांना आणि मतांना जास्त महत्त्व देण्याची माझी प्रवृत्ती आहे?’ या बाबतीत मरीयेनं आपल्यासाठी अतिशय सुंदर उदाहरण मांडलं.
१७ मरीया जवळजवळ तीन महिने अलीशिबेकडे राहिली. त्या काळात नक्कीच तिला अलीशिबेकडून खूप प्रोत्साहन मिळालं असेल. (लूक १:५६) यहोवाची उपासना करणाऱ्या आपल्या जवळच्या लोकांकडून आपल्याला किती आधार मिळू शकतो, हे बायबलच्या या सुरेख अहवालातून आपल्याला दिसून येतं. यहोवावर मनापासून प्रेम करणाऱ्यांसोबत मैत्री केल्यास आपली आध्यात्मिक रीत्या प्रगती होईल आणि यहोवाशी असलेला आपला नातेसंबंधही नक्कीच घनिष्ठ होईल. (नीति. १३:२०) शेवटी मरीयेची घरी जाण्याची वेळ आली. ती गरोदर असल्याचं ऐकल्यावर योसेफाची काय प्रतिक्रिया असेल, याचा कदाचित मरीया विचार करत असेल.
मरीया आणि योसेफ
१८. मरीयेनं योसेफाला काय सांगितलं आणि ते ऐकून त्यानं काय केलं?
१८ आपण गरोदर असल्याचं स्पष्ट दिसून येईपर्यंत मरीया थांबून राहिली नाही. आज ना उद्या तिला योसेफाला सर्वकाही सांगावंच लागणार होतं. सुरुवातीला कदाचित तिच्या मनात प्रश्न आला असेल, की तिनं सगळं सांगितल्यावर या देवभीरू माणसाची काय प्रतिक्रिया असेल? पण हे सगळे विचार बाजूला सारून, मरीया योसेफाकडे गेली आणि तिनं त्याला सर्वकाही सांगितलं. योसेफ ते सारं ऐकून किती अस्वस्थ झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो. मरीयेवर त्याचं प्रेम होतं आणि तिच्यावर त्याला भरवसाही होता. पण तरीसुद्धा, एकंदर परिस्थितीवरून तिनं त्याच्याशी अविश्वासूपणा मत्त. १:१८, १९) या अगदीच असाधारण परिस्थितीमुळं या साध्यासरळ माणसाला किती मनःस्ताप होत आहे, हे पाहून मरीयेला नक्कीच खूप दुःख झालं असेल. पण, आपल्यावर विश्वास न ठेवल्याबद्दल तिनं कधीही योसेफाला दोष दिला नाही.
केला होता असं वाटत होतं. त्या क्षणी योसेफाच्या मनात कोणते विचार आले, हे बायबलमध्ये सांगितलेलं नाही. उलट, इतकंच सांगितलं आहे की त्यानं तिला सोडचिठ्ठी देण्याचं ठरवलं. त्या काळी मागणी झालेल्या जोडप्यांकडे लग्न झालेल्यांप्रमाणेच पाहिलं जायचं. पण, मरीयेची बदनामी होऊ नये म्हणून योसेफानं तिला गपचूप सोडून द्यायचं ठरवलं. (१९. यहोवानं योसेफाला योग्य निर्णय घ्यायला कशा प्रकारे मदत केली?
१९ यहोवानं अतिशय प्रेमळपणे योसेफाला योग्य निर्णय घ्यायला मदत केली. एका मत्त. १:२०-२४.
स्वप्नाद्वारे देवदूतानं योसेफाला सांगितलं की मरीयेचा गरोदरपणा हा खरोखर चमत्कारामुळंच आहे. किती हायसं वाटलं असेल योसेफाला हे जाणून! आता मात्र योसेफानंही तेच केलं, जे मरीयेनं सुरुवातीपासूनच केलं होतं. अर्थात, यहोवा जे काही सांगेल त्याप्रमाणे तो वागला. त्यानं मरीयेशी लग्न केलं आणि यहोवाच्या पुत्राची काळजी घेण्याची जी असाधारण जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली होती, ती पार पाडण्याची तो तयारी करू लागला.—२०, २१. ज्यांचा विवाह झाला आहे आणि जे विवाहाच्या विचारात आहेत ते मरीया व योसेफ यांच्याकडून काय शिकू शकतात?
२० वयानं लहान असून मरीयासुद्धा वैवाहिक जीवनाच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडू लागली. हे पाहून, आपण देवदूताच्या सांगण्याप्रमाणे वागलो, याचं योसेफाला नक्कीच समाधान वाटलं असेल. तसंच, महत्त्वाचे निर्णय घेताना यहोवावर विसंबून राहणं किती गरजेचं आहे, याचीही त्याला खातरी पटली असेल. (स्तो. ३७:५; नीति. १८:१३) आणि नक्कीच पुढंही कुटुंबप्रमुख या नात्यानं योसेफानं अतिशय काळजीपूर्वक आणि प्रेमळपणे आपल्या कुटुंबासाठी सर्व निर्णय घेतले असतील. ज्यांचा विवाह झाला आहे आणि जे विवाह करण्याचा विचार करत आहेत, ते आजपासून २,००० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या या तरुण जोडप्याकडून बरंच काही शिकू शकतात.
२१ दुसरीकडे पाहता, सुरुवातीला जरी योसेफानं मरीयेवर विश्वास ठेवला नाही, तरीसुद्धा ती त्याच्याशी लग्न करायला तयार झाली यावरून काय दिसून येतं? योसेफ पुढं आपला कुटुंबप्रमुख असेल याची तिला जाणीव होती. आणि ही जाणीव बाळगून तिनं निर्णय योसेफावर सोडला. धीरानं वाट पाहणं किती महत्त्वाचं आहे हे नक्कीच तिला यावरून शिकायला मिळालं असेल. आणि आजही ख्रिस्ती स्त्रिया या बाबतीत मरीयेच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात. या सर्व घटनांतून योसेफ आणि मरीया या दोघांनाही एकमेकांशी प्रामाणिकपणे आणि मनमोकळेपणानं बोलण्याचं महत्त्व पटलं असेल, हे नक्की.—नीतिसूत्रे १५:२२ वाचा.
२२. योसेफ व मरीया यांच्या वैवाहिक जीवनाचा पाया अतिशय भक्कम का होता, आणि भविष्यात त्यांच्याकरता काय राखून ठेवलेलं होतं?
२२ खरोखर, मरीया व योसेफ या तरुण जोडप्याच्या वैवाहिक जीवनाचा पाया अतिशय भक्कम होता, असं म्हणता येईल. कारण, त्या दोघांचंही यहोवावर सर्वात जास्त प्रेम होतं आणि आईवडील या नात्यानं आपली जबाबदारी काळजीपूर्वक व प्रेमळपणे पार पाडण्याची त्यांची इच्छा होती. अर्थात, पुढं अनेक मोठे आशीर्वाद आणि आव्हानंदेखील त्यांच्या वाट्याला येणार होती. ते येशूचं संगोपन करणार होते, जो या जगात जन्माला येणारा सर्वश्रेष्ठ मनुष्य ठरणार होता!
^ परि. 15 उदाहरणार्थ, मरीयेनं हन्ना या विश्वासू स्त्रीच्या प्रार्थनेतील शब्दांचा उल्लेख केला असं दिसतं. हन्नालाही देवाच्या आशीर्वादानं मूल झालं होतं.—अध्याय ६ मधील “दोन उल्लेखनीय प्रार्थना,” या शीर्षकाची चौकट पाहा.