धडा ५४
“विश्वासू आणि बुद्धिमान दास” कोण आहे आणि तो काय काम करतो?
येशू हा ख्रिस्ती मंडळीचं मस्तक म्हणजेच प्रमुख आहे. (इफिसकर ५:२३) आज राजा येशू स्वर्गातून, पृथ्वीवरच्या आपल्या अनुयायांचं मार्गदर्शन एका ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाद्वारे’ करत आहे. (मत्तय २४:४५ वाचा.) या ‘दासाला’ स्वतः येशूने नेमलंय. त्यामुळे त्याच्याजवळ नक्कीच काही प्रमाणात अधिकार आहे. पण तरीसुद्धा तो ख्रिस्ताचा दास आहे आणि तो त्याच्या भावांची सेवा करतो. मग हा दास कोण आहे? आणि तो आपल्या सर्वांची काळजी कशी घेतो?
१. “विश्वासू आणि बुद्धिमान दास” कोण आहे?
यहोवाने नेहमीच आपल्या लोकांचं मार्गदर्शन करण्यासाठी एखाद्या माणसाचा किंवा माणसांच्या एका लहान गटाचा वापर केलाय. (मलाखी २:७; इब्री लोकांना १:१) येशूच्या मृत्यूनंतर यरुशलेममधल्या प्रेषितांनी आणि वडील जनांनी ख्रिस्ती मंडळीचं नेतृत्व केलं. (प्रेषितांची कार्यं १५:२) त्याच प्रकारे आजसुद्धा वडिलांचा एक लहानसा गट यहोवाच्या लोकांना आध्यात्मिक अन्न पुरवतो आणि प्रचार कार्याचं मार्गदर्शन करतो. वडिलांच्या या गटाला ‘यहोवाच्या साक्षीदारांचं नियमन मंडळ’ असं म्हटलं जातं. हे नियमन मंडळच ‘येशूने नेमलेला विश्वासू आणि बुद्धिमान दास’ आहे. (मत्तय २४:४५ख) नियमन मंडळाचे सगळे सदस्य पवित्र शक्तीने अभिषिक्त असलेले ख्रिस्ती आहेत. आणि पृथ्वीवरचं त्यांचं जीवन संपल्यावर त्यांना ख्रिस्तासोबत त्याच्या स्वर्गीय राज्यात राज्य करण्याची आशा आहे.
२. विश्वासू दास पुरवत असलेल्या आध्यात्मिक अन्नामुळे आपल्याला कशी मदत होते?
येशूने म्हटलं होतं की विश्वासू दास आपल्या ख्रिस्ती बांधवांना “योग्य वेळी अन्न” पुरवेल. (मत्तय २४:४५क) आपण जे अन्न खातो त्यामुळे आपल्याला सुदृढ आणि निरोगी राहायला मदत होते. त्याच प्रकारे, आध्यात्मिक अन्नामुळे म्हणजेच देवाच्या वचनातल्या मार्गदर्शनामुळे आपल्याला यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी आणि येशूने दिलेलं काम पूर्ण करण्यासाठी मदत मिळते. (१ तीमथ्य ४:६) हे आध्यात्मिक अन्न आपल्याला सभांमधून, संमेलनांमधून आणि अधिवेशनांमधून मिळतं. तसंच, बायबल आधारित साहित्यांमधून आणि व्हिडिओंमधूनसुद्धा देवाची इच्छा जाणून घ्यायला आणि त्याच्यासोबतचं नातं मजबूत करायला आपल्याला मदत मिळते.
आणखी जाणून घेऊ या
आपल्याला “विश्वासू आणि बुद्धिमान दास” म्हणजेच नियमन मंडळाची गरज का आहे, हे पाहू या.
३. यहोवाच्या लोकांनी संघटित असलं पाहिजे
येशूच्या मार्गदर्शनाखाली नियमन मंडळ यहोवाच्या साक्षीदारांच्या कामाची देखरेख करतं. अशीच व्यवस्था पहिल्या शतकातल्या ख्रिस्ती मंडळीतही होती. व्हिडिओ पाहा.
१ करिंथकर १४:३३, ४० वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
-
आपल्या साक्षीदारांनी संघटित असावं अशी यहोवाची इच्छा आहे, हे या वचनांवरून कसं दिसून येतं?
४. विश्वासू दास प्रचार कार्याची देखरेख करतो
पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनी प्रचार कार्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं. प्रेषितांची कार्यं ८:१४, २५ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
-
सुरुवातीच्या ख्रिश्चनांमध्ये प्रचार कार्याची देखरेख कोण करायचं?
-
पेत्र आणि योहानने इतर प्रेषितांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचं पालन कसं केलं?
आज नियमन मंडळसुद्धा प्रचाराच्या कामाला सगळ्यात जास्त महत्त्व देतं. व्हिडिओ पाहा.
मार्क १३:१० वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
येशूने हे स्पष्टपणे सांगितलं की प्रचाराचं काम खूप महत्त्वाचंय.-
नियमन मंडळ प्रचाराच्या कामाला इतकं महत्त्व का देतं?
-
जगभरात चाललेलं हे काम संघटित रितीने करण्यासाठी आपल्याला ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाची’ गरज का आहे?
५. विश्वासू दास आपल्याला मार्गदर्शन देतो
नियमन मंडळ सबंध जगातल्या ख्रिस्ती बांधवांना मार्गदर्शन देतं. कोणत्याही बाबतीत आपल्याला सूचना देताना नियमन मंडळातले बांधव कशा प्रकारे निर्णय घेतात? पहिल्या शतकात नियमन मंडळ म्हणून काम करणाऱ्या बांधवांनी हे कसं केलं ते पाहू या. प्रेषितांची कार्यं १५:१, २ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
-
पहिल्या शतकातल्या काही ख्रिस्ती बांधवांमध्ये कोणत्या विषयावरून वाद निर्माण झाला होता?
-
हा वाद मिटवण्यासाठी पौल, बर्णबा आणि इतर जण कोणाकडे गेले?
प्रेषितांची कार्यं १५:१२-१८, २३-२९ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
-
निर्णय घेण्याआधी, या विषयावर देवाचं मार्गदर्शन मिळावं म्हणून पहिल्या शतकातल्या नियमन मंडळाने कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या?—१२, १५ आणि २८ ही वचनं पाहा.
प्रेषितांची कार्यं १५:३०, ३१ आणि १६:४, ५ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
-
नियमन मंडळाने दिलेल्या मार्गदर्शनाला पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनी कसा प्रतिसाद दिला?
-
त्यांनी आज्ञाधारकपणा दाखवल्यामुळे यहोवाने त्यांना कसा आशीर्वाद दिला?
२ तीमथ्य ३:१६ आणि याकोब १:५ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
-
आज नियमन मंडळातले भाऊ निर्णय घेताना कोणाचं मार्गदर्शन घेतात?
काही जण म्हणतात: “नियमन मंडळाचं का ऐकायचं? तीपण माणसंच आहेत.”
-
येशू नियमन मंडळाचं नेतृत्व करतोय यावर तुम्हाला विश्वास आहे का? आणि तुम्हाला असा विश्वास का आहे?
थोडक्यात
ख्रिस्ताने नियुक्त केलेला “विश्वासू आणि बुद्धिमान दास” म्हणजे नियमन मंडळ आहे. नियमन मंडळ आज सबंध जगात असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांना मार्गदर्शन आणि आध्यात्मिक अन्न पुरवतं.
उजळणी
-
‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाला’ कोणी नियुक्त केलं?
-
नियमन मंडळ आपल्या सगळ्यांची कशा प्रकारे काळजी घेतं?
-
नियमन मंडळच “विश्वासू आणि बुद्धिमान दास” आहे याची तुम्हाला खातरी आहे का?
हेसुद्धा पाहा
नियमन मंडळ कशा प्रकारे काम करतं ते पाहा.
“यहोवाच्या साक्षीदारांचं नियमन मंडळ कसं काम करतं?” (वेबसाईटवरचा लेख)
आपल्याला दिलं जाणारं आध्यात्मिक अन्न अचूक आणि भरवशालायक आहे, याची खातरी नियमन मंडळ कसं करतं ते जाणून घ्या.
येशूने सोपवलेल्या कामाबद्दल नियमन मंडळातल्या भावांना काय वाटतं?
नियमन मंडळाला यहोवाच मार्गदर्शन देत आहे हे आपल्या सभा आणि अधिवेशनांमधून कसं दिसून येतं?