व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ५३

यहोवाच्या दृष्टीने चांगलं मनोरंजन निवडा

यहोवाच्या दृष्टीने चांगलं मनोरंजन निवडा

यहोवा ‘आनंदी देव’ आहे. (१ तीमथ्य १:११) आणि त्याची इच्छा आहे की आपणही जीवनाचा आनंद घ्यावा आणि खूश राहावं. जेव्हा आपण रोजच्या धावपळीतून आराम करण्यासाठी, निवांत होण्यासाठी थोडा वेळ काढतो तेव्हा त्याला आनंद होतो. पण आपल्या फावल्या वेळात आपण जे काही करतो त्यामुळे आपल्याला आनंद होण्यासोबतच, ते यहोवाच्या नजरेतही योग्य असेल याची आपण खातरी केली पाहिजे. हे आपण कसं करू शकतो याबद्दल आपण या धड्यात पाहू या.

१. मनोरंजन निवडताना आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे?

तुम्हाला फावल्या वेळात काय करायला आवडतं? काही जणांना शांतपणे आपल्या घरात बसून पुस्तक वाचायला, गाणी ऐकायला, पिक्चर पाहायला किंवा इंटरनेटवर माहिती शोधायला आवडतं. तर इतरांना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत फिरायला, पिकनिकला जायला किंवा खेळायला आवडतं. यांपैकी आपली आवड काहीही असली, तरी “प्रभूच्या दृष्टीत कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत” याची आपण नेहमी खातरी केली पाहिजे. (इफिसकर ५:१०) याकडे आपण खास लक्ष का दिलं पाहिजे? कारण आज लोकप्रिय असलेल्या मनोरंजनाच्या बऱ्‍याचशा प्रकारांत अशा गोष्टी असतात ज्यांची यहोवाला घृणा वाटते. जसं की, हिंसा, अनैतिकता किंवा भूतविद्या. (स्तोत्र ११:५ वाचा.) मग मनोरंजनाच्या बाबतीत योग्य निर्णय घ्यायला आपल्याला कशामुळे मदत होईल?

जर आपण यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांशी मैत्री केली, तर त्याचा आपल्यावर आणि मनोरंजनाच्या आपल्या आवडीनिवडींवर चांगला परिणाम होईल. आपण ४८ व्या धड्यात शिकलो होतो, की “बुद्धिमानांसोबत चालणारा बुद्धिमान होईल.” पण याच्या अगदी उलट, जर आपण यहोवाच्या स्तरांवर प्रेम नसणाऱ्‍या लोकांसोबत सारखासारखा वेळ घालवला, तर आपलं “नुकसान होईल.”—नीतिवचनं १३:२०.

२. मनोरंजनात आपण किती वेळ घालवतो याचं भान ठेवणं महत्त्वाचं का आहे?

आपण चांगलं मनोरंजन निवडलं, तरीसुद्धा आपला खूप जास्त वेळ त्यात जाणार नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर, ज्या जास्त महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी आपल्याकडे वेळच उरणार नाही. बायबल आपल्याला असा सल्ला देतं, की “वेळेचा चांगला उपयोग करा.”इफिसकर ५:१५, १६ वाचा.

आणखी जाणून घेऊ या

मनोरंजनाच्या बाबतीत आपण चांगले निर्णय कसे घेऊ शकतो हे आता पाहू या.

३. चुकीचं मनोरंजन टाळा

आपण खूप सांभाळून मनोरंजन निवडलं पाहिजे. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • प्राचीन काळातल्या रोमी लोकांच्या खेळांत आणि आजच्या काळातल्या मनोरंजनात कोणत्या गोष्टी सारख्या आहेत?

  • मनोरंजनाच्या बाबतीत डॅनीला कोणती गोष्ट समजली?

रोमकर १२:९ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • मनोरंजन निवडताना तुम्हाला या वचनामुळे कशी मदत होईल?

यहोवाला काही गोष्टींची घृणा वाटते. नीतिवचनं ६:१६, १७ आणि गलतीकर ५:१९-२१ वाचा. प्रत्येक वचन वाचून झाल्यानंतर या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • या वचनात सांगितलेल्या कोणत्या गोष्टी आजकालच्या मनोरंजनात सर्रासपणे पाहायला मिळतात?

 कसं निवडाल चांगलं मनोरंजन?

स्वतःला विचारा:

  • यात यहोवाला घृणा असलेली एखादी गोष्ट आहे का?

  • हे जास्त महत्त्वाच्या गोष्टी करण्याच्या आड येईल का?

  • यामुळे मला यहोवावर प्रेम नसलेल्या लोकांच्या संपर्कात यावं लागेल का, किंवा त्यांच्यासोबत खूप जास्त वेळ घालवावा लागेल का?

धोक्यापासून आपण जितकं दूर राहतो, तितकंच आपण सुरक्षित असतो. त्याचप्रमाणे मनोरंजनाच्या एखाद्या प्रकाराबद्दल जर आपल्याला शंका असेल, तर त्यापासून दूर राहिलेलंच बरं

४. वेळेचा चांगला उपयोग करा

व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • व्हिडिओमधला भाऊ काही चुकीचं पाहत नव्हता. तरीसुद्धा, तो आपल्या फावल्या वेळाचा जसा उपयोग करत होता, त्यामुळे त्याच्यावर कसा परिणाम झाला?

फिलिप्पैकर १:१० वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • मनोरंजनात किती वेळ घालवावा हे ठरवण्यासाठी हे वचन आपल्याला कशी मदत करू शकतं?

५. चांगलं मनोरंजन निवडा

काही प्रकारचं मनोरंजन यहोवाला आवडत नसलं, तरी अशा बऱ्‍याचशा गोष्टी आहेत ज्या त्याच्या नजरेत चुकीच्या नाहीत आणि ज्यांचा आनंद आपण घेऊ शकतो. उपदेशक ८:१५ आणि फिलिप्पैकर ४:८ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • चांगल्या मनोरंजनापैकी तुम्हाला कायकाय आवडतं?

चांगल्या मनोरंजनाचे असे कितीतरी प्रकार आहेत ज्यांचा तुम्ही आनंद घेऊ शकता

काही जण म्हणतात: “मनोरंजनात हिंसा, अनैतिकता किंवा भूतविद्या असली तर काय झालं? आपण थोडीच त्या गोष्टी करतो.”

  • तुम्ही काय उत्तर द्याल?

थोडक्यात

आपण चांगलं मनोरंजन निवडावं आणि त्याचा आनंद घ्यावा अशी यहोवाची इच्छा आहे.

उजळणी

  • खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी कोणत्या प्रकारचं मनोरंजन टाळलं पाहिजे?

  • मनोरंजनात आपण किती वेळ घालवतो याचं भान का ठेवलं पाहिजे?

  • यहोवाच्या नजरेत योग्य असलेलं मनोरंजन निवडल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होईल?

ध्येय

हेसुद्धा पाहा

मनोरंजनाच्या बाबतीत तुम्ही चांगले निर्णय कसे घेऊ शकता हे पाहा.

“तुम्ही जी करमणूक निवडता ती हितकारक आहे का?” (टेहळणी बुरूज, १५ ऑक्टोबर, २०११)

“मी मनातून भेदभावपण काढून टाकला,” या अनुभवात एका माणसाला मनोरंजनाच्या बाबतीत बदल करण्याची गरज का पडली हे वाचा.

“बायबलने बदललं जीवन” (ऑनलाईन लेख)

भूतविद्येशी संबंधित असलेल्या मनोरंजनाच्या बाबतीत एक स्त्री योग्य निर्णय कसा घेते ते पाहा.

भूतविद्या असलेलं मनोरंजन टाळा (२:०२)