धडा ३३
देवाचं राज्य आपल्यासाठी काय करेल?
देवाचं राज्य स्वर्गात सुरू झालंय. लवकरच ते पृथ्वीवरही राज्य करायला सुरुवात करेल आणि इथली परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकेल. हे राज्य आपल्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी करणार आहे, हे आता आपण पाहू या.
१. देवाचं राज्य या पृथ्वीवर शांती कशी आणेल?
देवाच्या राज्याचा राजा येशू, हर्मगिदोनच्या युद्धात दुष्ट लोकांचा आणि सरकारांचा नाश करेल. (प्रकटीकरण १६:१४, १६) त्यावेळी बायबलमधलं हे वचन पूर्ण होईल: “थोड्याच काळाने दुष्ट लोक नाहीसे होतील.” (स्तोत्र ३७:१०) अशा प्रकारे, येशू त्याच्या राज्याद्वारे अन्याय दूर करेल आणि संपूर्ण पृथ्वीवर शांती आणेल.—यशया ११:४ वाचा.
२. पृथ्वीवर देवाची इच्छा पूर्ण होईल तेव्हा आपलं जीवन कसं असेल?
देवाच्या राज्यात “नीतिमान लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल, आणि ते तिच्यावर सर्वकाळ राहतील.” (स्तोत्र ३७:२९) कल्पना करा, ते जग किती सुंदर असेल! सगळे लोक चांगले आणि प्रामाणिक असतील. कोणीच आजारी पडणार नाही आणि प्रत्येक जण कायम जीवनाचा आनंद घेईल.
३. वाईट लोकांचा नाश झाल्यावर देवाचं राज्य आपल्यासाठी काय करेल?
वाईट लोकांचा नाश झाल्यावर येशू १,००० वर्षं राज्य करेल. यादरम्यान तो आणि त्याच्यासोबत राज्य करणारे १,४४,००० जण, पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांना पापापासून मुक्त व्हायला मदत करतील. १,००० वर्षांचं ते राज्य संपेपर्यंत पृथ्वी एका सुंदर बागेसारखी झालेली असेल. आणि यहोवाच्या नियमांचं पालन केल्यामुळे सगळे जण आनंदाने आणि सुखाने राहतील. मग येशू त्याचं राज्य पित्याला, म्हणजेच यहोवाला परत सोपवून देईल. त्या वेळी खऱ्या अर्थाने यहोवाचं नाव पवित्र मानलं जाईल. (मत्तय ६:९, १०) यहोवाचं मानवांवर प्रेम आहे आणि त्याचं शासनच सगळ्यात चांगलं आहे हे त्या वेळी पूर्णपणे सिद्ध झालेलं असेल. त्यानंतर यहोवा देव, सैतानाचा आणि दुष्ट स्वर्गदूतांचा, तसंच त्याच्या शासनाचा विरोध करणाऱ्या सर्वांचा नाश करेल. (प्रकटीकरण २०:७-१०) अशा प्रकारे, देवाच्या राज्याद्वारे आलेली ही चांगली परिस्थिती कायम तशीच राहील.
आणखी जाणून घेऊ या
बायबलमध्ये आपल्या भविष्यासाठी दिलेली सगळी अभिवचनं देव त्याच्या राज्याद्वारे पूर्ण करेल. यावर आपण भरवसा का ठेवू शकतो हे आता आपण पाहू या.
४. देवाचं राज्य मानवी सरकारांचा अंत करेल
“माणसाने माणसावर अधिकार गाजवून त्याचं नुकसान केलं आहे.” (उपदेशक ८:९) पण यहोवा त्याच्या राज्याद्वारे हे नुकसान भरून काढेल.
दानीएल २:४४ आणि २ थेस्सलनीकाकर १:६-८ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
-
मानवी सरकारं आणि त्यांना साथ देणाऱ्यांचं यहोवा आणि येशू काय करेल?
-
आतापर्यंत आपण यहोवा आणि येशूबद्दल जे शिकलो त्यावरून तुम्हाला कसं कळतं, की ते जे काही करतील ते योग्य आणि न्यायाला धरून असेल?
५. येशू सगळ्यात चांगला राजा आहे
देवाच्या राज्याचा राजा या नात्याने येशू लोकांच्या भल्यासाठी बरंच काही करेल. लोकांना मदत करण्याची येशूला इच्छाही आहे आणि त्यासाठी देवाने त्याला शक्तीही दिली आहे. ही गोष्ट त्याने पृथ्वीवर असताना दाखवून दिली होती. त्याने हे कसं केलं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.
भविष्यात देवाचं राज्य कायकाय करेल याची पृथ्वीवर असताना येशूने झलक दिली होती. इथे दिलेल्या आशीर्वादांपैकी तुम्ही कोणते आशीर्वाद पाहायला उत्सुक आहात? त्या आशीर्वादांसोबत दिलेली वचनं वाचा.
पृथ्वीवर असताना येशूने . . . |
देवाच्या राज्यात येशू . . . |
---|---|
|
|
|
|
|
|
|
|
६. देवाच्या राज्यात आपल्याला एक चांगलं जीवन मिळेल
मानवांनी चांगलं आयुष्य जगावं हा देवाचा मूळ उद्देश होता. आणि हा उद्देश लवकरच खऱ्या अर्थाने त्याच्या राज्याद्वारे पूर्ण होणार आहे. त्या राज्यात लोक पृथ्वीवरच्या नंदनवनात कायम जीवनाचा आनंद घेतील. यहोवा आपल्या मुलाद्वारे, म्हणजे येशूद्वारे त्याचा मूळ उद्देश कसा पूर्ण करत आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.
स्तोत्र १४५:१६ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
-
यहोवा “प्रत्येक जिवाची इच्छा” पूर्ण करेल हे माहीत झाल्यावर तुम्हाला कसं वाटतं?
काही जण म्हणतात: “सगळ्यांनी एकत्र मिळून प्रयत्न केले तर आपण जगातल्या समस्या सोडवू शकतो.”
-
देवाचं राज्य अशा कोणत्या समस्या काढून टाकेल, ज्या मानवी सरकारांना काढून टाकणं अशक्य आहे?
थोडक्यात
देवाचं राज्य संपूर्ण पृथ्वीला एक नंदनवन बनवेल. तिथे चांगल्या मनाचे लोक कायम यहोवाची उपासना करतील. हाच या राज्याचा उद्देश आहे.
उजळणी
-
देवाच्या राज्यामुळे यहोवाचं नाव कसं पवित्र होईल?
-
देवाच्या राज्यात बायबलमधली सगळी अभिवचनं पूर्ण होतील हे आपण खातरीने का म्हणू शकतो?
-
तुम्ही कोणतं अभिवचन पूर्ण होण्याची आतुरतेने वाट पाहत आहात?
हेसुद्धा पाहा
हर्मगिदोन म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्या.
येशूने ज्याला “मोठं संकट” म्हटलं, त्या वेळी कोणत्या घटना घडतील ते पाहा.—मत्तय २४:२१.
कुटुंबातले सर्व जण मिळून देवाच्या राज्यातल्या आशीर्वादांवर मनन कसं करू शकतात ते पाहा.
सरकारविरुद्ध बंड करणाऱ्या एका माणसाला त्याच्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळाली ते, “मैं कई सवालों को लेकर परेशान था,” यात वाचा.