भाग १३
देवाला आनंदित करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
वाईट गोष्टींपासून दूर राहा. १ करिंथकर ६:९, १०
आपलं यहोवावर प्रेम असेल तर ज्या गोष्टी त्याला आवडत नाहीत, त्या आपण करणार नाही.
चोरी करणं, दारूची नशा करणं, तसंच ड्रग्स किंवा नशा आणणारे पदार्थ घेणं यांसारख्या गोष्टी यहोवा पसंत करत नाही.
खून करणं, गर्भपात करणं, पुरुषांनी पुरुषांसोबत आणि स्त्रियांनी स्त्रियांसोबत संबंध ठेवणं या गोष्टी देवाला अजिबात आवडत नाहीत. तसंच लालचीपणा करणं, दुसऱ्यांशी भांडणं किंवा मारामारी करणंही देवाला आवडत नाही.
आपण मूर्तींची पूजा आणि जादूटोणा या गोष्टी नाही केल्या पाहिजे.
पृथ्वी नंदनवन होईल, तेव्हा वाईट गोष्टी करणाऱ्यांना राहू दिलं जाणार नाही.
मत्तय ७:१२
चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करा.देवाला आनंदित करण्यासाठी आपण त्याच्यासारखं वागायचा प्रयत्न केला पाहिजे.
इतरांवर प्रेम करा. दयाळू आणि उदार असा.
नेहमी प्रामाणिकपणे वागा.
क्षमा करायला तयार असा.
यहोवाबद्दल आणि त्याच्या इच्छेबद्दल सर्वांना सांगा.—यशया ४३:१०.