“अशक्य!” याचा काय अर्थ होतो?
“अशक्य!” याचा काय अर्थ होतो?
सन १९१२ मध्ये पहिल्यांदा समुद्र-प्रवासाला निघालेले टायटॅनिक जहाज हे त्या काळचे सगळ्यात प्रशस्त व आरामदायी जहाज होते. त्याची रचना अत्यंत आधुनिक पद्धतीने केल्यामुळे ते बुडणे “अशक्य” आहे असे मानले गेले होते. पण, त्या जहाजाचे शेवटी काय झाले हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. पहिल्याच समुद्र-प्रवासाला निघालेले हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरातील हिमनगाला जाऊन धडकले आणि त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी सुमारे १,५०० लोकांसह समुद्र-तळी गेले. होय, एके काळी ज्या जहाजाबद्दल असे म्हटले होते की ते कधीच बुडणार नाही तेच जहाज अवघ्या काही तासांत समुद्राच्या उदरात गडप झाले.
“अशक्य” या शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट करणे, समजणे किंवा ती सहन करणे आपल्या क्षमतेपलीकडे असल्यास ती अशक्य आहे असे म्हटले जाऊ शकते. आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेले असंख्य नवनवीन शोध एके काळी अशक्य मानले जायचे; कारण त्या काळी हे शोध लावणे मानवी क्षमतेच्या, इतकेच नव्हे तर मानवी कल्पनेच्या पलीकडे होते. उदाहरण द्यायचे झाल्यास, मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवणे, मंगळग्रहावर यान पाठवून पृथ्वीवरून त्याचे नियंत्रण करणे, ‘डीएनए’तील माहितीचे अचूक निरीक्षण करणे, आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घडलेल्या घटनांचे वृत्त आपल्या डोळ्यांनी पाहणे अशा सर्व गोष्टी आज वास्तविकता असल्या, तरी केवळ पन्नासएक वर्षांपूर्वी त्या कदाचित अशक्य वाटल्या असाव्यात. विज्ञानाच्या क्षेत्रांत कार्यशील असणाऱ्या नामवंत लोकांच्या एका गटाशी बोलताना अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अगदी उचितपणे याचे वर्णन केले. त्यांनी म्हटले: “तंत्रज्ञानाच्या जगात अग्रेसर असणाऱ्या तुम्हा लोकांमुळेच, कालपरवापर्यंत ज्या गोष्टी अशक्यप्राय होत्या त्या आज शक्य झाल्या आहेत.”
सध्याच्या या नवनवीन, अद्भुत शोधांविषयी बोलताना प्राध्यापक जॉन ब्रोबेक यांनी म्हटले: “आज एकही वैज्ञानिक प्रामाणिकपणे असं म्हणू शकत नाही की अमुक एक गोष्ट करणं अशक्य आहे. निदान या क्षणीतरी ती कठीण आहे इतकंच काय तो म्हणू शकतो. पण, आपल्या सध्याच्या ज्ञानाच्या बळावर अमुक एका गोष्टीचं स्पष्टीकरण देणं अशक्य आहे असं तो म्हणू शकतो.” त्यांनी पुढे असे म्हटले, की आपल्याला जर एखादी गोष्ट अशक्य वाटत असेल, तर “आपण एक गोष्ट मान्य केली पाहिजे, की जीवशास्त्रात व शरीरविज्ञानशास्त्रात अज्ञात असलेली एक शक्ती आहे. त्या शक्तीला आपल्या धर्मशास्त्रांत देवाची शक्ती असं म्हटलं आहे.”
देवाला काहीच अशक्य नाही
प्राध्यापक ब्रोबेक यांनी जे म्हटले त्याच्या कितीतरी काळाआधी पृथ्वीवर होऊन गेलेल्या सगळ्यात श्रेष्ठ पुरुषाने अर्थात नासरेथच्या येशूने म्हटले होते: “ज्या लूक १८:२७) देवाचा पवित्र आत्मा ही विश्वातील सगळ्यात सामर्थ्यशाली शक्ती आहे. तिचे कोणत्याही प्रकारे मोजमाप करणे शक्य नाही. आपण स्वतःच्या बळावर जे करू शकत नाही ते देवाच्या पवित्र आत्म्यामुळे करणे आपल्याला शक्य होऊ शकते.
गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.” (आपण मानव असल्यामुळे आपल्या सर्वांसमोर अशा काही समस्या येतात ज्यांच्यावर मात करणे अशक्य आहे असे आपल्याला वाटू शकते. उदाहरणार्थ, आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे किंवा कुटुंबातील ताणतणावामुळे आपण इतके खचून जाऊ की आपल्याला जीवन नकोसे वाटू शकते. कदाचित जीवनातील आपल्या समस्यांमुळे आपण निराशेच्या खाईत लोटले जाऊ आणि त्यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग नाही असे आपल्याला वाटू शकते. आपल्याला अगदी असहाय, अगदी हतबल झाल्यासारखे वाटू शकते. अशा वेळी आपण काय करू शकतो?
बायबल आपल्याला आश्वासन देते, की जी व्यक्ती सर्वसमर्थ देवावर विश्वास ठेवून जीवन जगते आणि त्याच्या आत्म्याच्या मदतीसाठी प्रार्थना करते तिला जीवनातील मोठ्यातल्या मोठ्या आव्हानांवरही यशस्वीपणे मात करण्यासाठी मदत मिळू शकते. येशूने जे दिलासादायक शब्द म्हटले होते त्यांचा विचार करा: “मी तुम्हाला खचित सांगतो की, जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा, असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता, आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल.” (मार्क ११:२३) आपण देवाच्या वचनातील शक्तीला आणि त्याच्या आत्म्याला आपल्या जीवनावर प्रभाव पाडू दिला तर जीवनातील कोणत्याच समस्या सोसणे किंवा त्यांवर मात करणे आपल्यासाठी अशक्य नसेल.
एका मनुष्याचे उदाहरण विचारात घ्या ज्याचे लग्न होऊन ३८ वर्षे झाली होती. पण, इतके वर्षे एकत्र संसार केल्यानंतर त्याच्या पत्नीचा कॅन्सरने मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूमुळे तो पार उद्ध्वस्त झाला होता. तिच्याशिवाय जीवन जगणे अशक्य आहे असे त्याला वाटू लागले. काही वेळा तर एकटे जगण्यापेक्षा आयुष्य संपवून टाकावे असा विचारही त्याच्या मनाला शिवून गेला. आपण जणू मृत्युच्छायेच्या दरीतून जात आहोत असे त्याला वाटले. (स्तोत्र २३:४) या कटू प्रसंगाचा सामना करणे अशक्य आहे असे त्याला वाटले होते. पण, आज मागे वळून पाहताना त्याला याची जाणीव होते, की त्या वेळी त्याने रडूनरडून देवाला केलेल्या प्रार्थना, दररोज केलेले बायबलचे वाचन, तसेच मार्गदर्शनासाठी मागितलेली पवित्र आत्म्याची मदत यांमुळेच तो त्या प्रसंगाचा यशस्वीपणे सामना करू शकला.
एका जोडप्याचे वैवाहिक जीवन खूप वादळग्रस्त होते. पतीचा स्वभाव अत्यंत तापट होता आणि त्याला अनेक वाईट सवयी होत्या. पतीच्या या स्वभावाला विटून त्याच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पुढे, तिच्या पतीने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यातून तो जे काही शिकला त्यामुळे त्याने त्याच्या वाईट सवयी सोडून दिल्या आणि आपल्या तापट स्वभावावर मात केली. त्याच्यातील हे बदल पाहून त्याची पत्नी खूप चकित झाली, कारण आपल्या पतीमध्ये बदल होणे “अशक्य” आहे असे तिला पूर्वी वाटले होते.
आणखी एका मनुष्याचे उदाहरण विचारात घ्या. ड्रग्सच्या व्यसनामुळे व अनैतिक जीवनशैलीमुळे तो पार खचून गेला होता. तो म्हणतो: “मी माझा आत्मसन्मान गमावून बसलो.” मग, त्याने कळकळून देवाला प्रार्थना केली: “देवा, तू माझी अवस्था पाहत आहे ना, कृपा करून मला यातून बाहेर काढ.” अशा प्रकारे प्रार्थना केल्यानंतर काही दिवसांतच यहोवाच्या साक्षीदारांशी त्याची गाठ पडली आणि त्याने त्यांच्यासोबत बायबल अभ्यास सुरू केला. त्याला एक वेळ अशक्य वाटत होते ते बदल तो आपल्या जीवनात बायबलच्या अभ्यासामुळे करू शकला. तो म्हणतो: “मला अनेकदा दोषीपणाची, कमीपणाची भावना छळायची. काही वेळा तर मी खूप निराश व्हायचो. पण, देवाच्या वचनानं मला या नकारार्थी भावनांवर मात करण्यास मदत केली. रात्री मला झोप येत नसे तेव्हा मी शिकलेली बायबलची वचने मनातल्या मनात म्हणायचो. यामुळे मनातले नकारात्मक विचार दूर करणं मला शक्य झालं.” आज हा मनुष्य एक सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. देवाच्या वचनात किती सामर्थ्य आहे हे इतरांना पटवून देण्याच्या कार्यात तो व त्याची पत्नी उत्साहाने सहभाग घेत आहेत. आपण कधी इतके चांगले व आनंदी जीवन जगू ही कल्पनादेखील तरुणपणी त्याला अशक्य वाटली असेल.
या अनुभवांवरून दिसून येते, की देवाचे वचन खरोखर खूप शक्तिशाली आहे आणि “अशक्य” वाटणाऱ्या गोष्टीदेखील त्याच्या पवित्र आत्म्याच्या मदतीमुळे शक्य होऊ शकतात. पण, तुम्ही कदाचित म्हणाल, “त्यासाठी विश्वास असला पाहिजे!” होय, विश्वास असलाच पाहिजे. कारण, “विश्वासावाचून इब्री लोकांस ११:६) समजा तुमचा एक चांगला मित्र आहे जो बँक मॅनेजरच्या पदावर किंवा एका मोठ्या हुद्द्यावर काम करतो. तो तुम्हाला म्हणतो: “अरे काळजी करू नकोस. मी आहे ना, काहीही मदत हवी असेल तर सरळ माझ्याकडे ये.” त्याच्या या शब्दांमुळे तुम्हाला नक्कीच खूप दिलासा मिळेल. पण, दुःखाची गोष्ट म्हणजे आपल्याला मदतीची गरज असते तेव्हा अनेक जण आपल्याला मदत करू शकत नाहीत. कदाचित तुमच्या मित्रावर अचानक संकट कोसळल्यामुळे त्याने तुम्हाला दिलेला शब्द तो पाळू शकत नाही. किंवा, एकाएकी त्याचा मृत्यू झाल्यामुळे तुम्हाला मदत करण्याची त्याची मनस्वी इच्छा व क्षमताही त्याच्याबरोबर नष्ट होते. पण दुसरीकडे पाहता, देवाच्या बाबतीत असे काहीच होऊ शकत नाही. उलट, बायबल आपल्याला आश्वासन देते: “देवाला काहीच अशक्य होणार नाही.”—लूक १:३७.
[देवाला] संतोषविणे अशक्य आहे,” असे बायबल म्हणते. (तुम्ही हे खरे मानता का?
‘देवाला काहीच अशक्य नाही’ या गोष्टीला दुजोरा देणारे अनेक वृत्तान्त बायबलमध्ये नमूद आहेत. त्याची काही उदाहरणे विचारात घ्या.
वयाच्या ९० व्या वर्षी साराला जेव्हा असे सांगण्यात आले की ती एका मुलाला जन्म देईल तेव्हा असे घडेल यावर विश्वास न ठेवून ती हसली होती. पण, हे शक्य झाले असे म्हणता येईल कारण तिच्या मुलापासूनच एक मोठे इस्राएल राष्ट्र तयार झाले. एका मोठ्या माशाने एका माणसाला गिळंकृत केले आणि तीन दिवस माशाच्या पोटात राहिलेला हा मनुष्य आपली ही कथा लिहिण्यासाठी जिवंत राहिला. त्याचे नाव होते योना. लूक नावाच्या वैद्याला, बेशुद्ध अवस्था व मृत अवस्था यांत काय फरक आहे हे अचूकपणे माहीत होते. आणि म्हणूनच युतुख नावाचा एक तरुण तिसऱ्या मजल्यावरील खोलीच्या खिडकीतून खाली पडून दगावल्यानंतरही त्याला पुन्हा जिवंत कसे करण्यात आले हे लूक नमूद करतो. ही सर्व उदाहरणे काही दंतकथा नाहीत. या प्रत्येक वृत्तान्ताचा बारकाईने अभ्यास केल्यास ते किती खरे आहेत हे दिसून येईल.—उत्पत्ति १८:१०-१४; २१:१, २; योना १:१७; २:१, १०; प्रेषितांची कृत्ये २०:९-१२.
येशूने मार्था नावाच्या आपल्या मैत्रिणीशी बोलताना चकीत करणारे हे विधान केले: “जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही.” अशक्य वाटणारे हे अभिवचन देताना येशूने तिला एक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला: “हे तू खरे मानतेस काय?” त्या प्रश्नावर बारकाईने विचार करणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.—योहान ११:२६.
पृथ्वीवर अनंतकाळ जगणे—अशक्य आहे का?
दीर्घायुष्यावरील एका अभ्यासात वैज्ञानिकांनी असा निष्कर्ष काढला: “तो काळ फार दूर नाही जेव्हा आपले आयुष्य आत्तापेक्षा कितीतरी पटीने अधिक वाढेल. आपण कदाचित अनंतकाळही जगू.” द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका या विश्वकोशात असे म्हटले आहे, की शरीरातील पेशींचे कार्य थांबल्यामुळे, पेशी कमकुवत झाल्यामुळे किंवा इतर प्रक्रियांमुळे मृत्यू ओढवत नाही; तर एका अज्ञात कारणामुळे शरीरातील प्रक्रियेत बिघाड होतो किंवा ती ठप्प पडते आणि त्यामुळे मृत्यू ओढवतो. * त्यात पुढे असे म्हटले आहे: “शरीरातील जटील प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असलेल्या नियंत्रण प्रक्रियेत बिघाड झाल्यामुळे मानव वयोवृद्ध होत असावा.”
ही सर्व माहिती मनोवेधक असली तरी आपण अनंतकाळ जगू शकतो यावर विश्वास ठेवण्यासाठी विज्ञानशास्त्रातील कोणत्याही कारणापेक्षा अधिक सबळ असे कारण बायबलमध्ये दिले आहे. ते म्हणजे आपला निर्माणकर्ता, आपल्या जीवनाचा स्रोत असलेल्या यहोवा देवाने आपल्याला दिलेले अभिवचन. तो म्हणतो की, मी “मृत्यु कायमचा नाहीसा” करेन. (स्तोत्र ३६:९; यशया २५:८) तुम्ही हे खरे मानता का? हे अभिवचन खुद्द यहोवाने दिलेले आहे जो कधीच खोटे बोलत नाही.—तीत १:२. (w१२-E ०६/०१)
[तळटीप]
^ परि. 18 वृद्धावस्था व आयुर्मान यांवरील सखोल माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले सावध राहा! मे २००६ या अंकातील “हाऊ लाँग कॅन यू लिव्ह?” ही शीर्षक लेखमाला पाहा.
[११ पानांवरील संक्षिप्त आशय]
“कालपरवापर्यंत ज्या गोष्टी अशक्यप्राय होत्या त्या आज शक्य झाल्या आहेत.” —रोनाल्ड रेगन
[१२ पानांवरील संक्षिप्त आशय]
जीवन जगणे अशक्य आहे असे वाटते तेव्हा मदतीसाठी तुम्ही कोणाकडे वळता?
[११ पानांवरील चित्राचे श्रेय]
NASA photo