व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सैतान एक खरीखुरी व्यक्‍ती आहे का?

सैतान एक खरीखुरी व्यक्‍ती आहे का?

वाचक विचारतात

सैतान एक खरीखुरी व्यक्‍ती आहे का?

सैतान एक खरीखुरी व्यक्‍ती आहे असेच बायबल शिकवते. परंतु बायबलचे टीकाकार असे मानत नाहीत. त्यांचे असे म्हणणे आहे, की सैतान म्हणजे माणसाच्या मनातील दुष्ट प्रवृत्ती किंवा दुर्गुण.

सैतानाच्या अस्तित्वाबद्दल लोकांच्या मनात चाललेल्या गोंधळाचा परिणाम आपल्यावर देखील झाला पाहिजे का? नाही. पुढील उदाहरणाचा जरा विचार करा: एक गुन्हेगार कदाचित गुन्हा केल्यानंतर त्याची ओळख मिटवण्यासाठी त्याच्या बोटांचे ठसे पुसून त्याची काळी कृत्ये सफाईदारपणे चालू ठेवेल. त्याचप्रमाणे, सैतान हा एक सराईत गुन्हेगार आहे. तो पडद्यामागे राहून अगदी सफाईदारपणे आपली काळी कृत्ये चालू ठेवण्यात समाधान मानतो. तो लोकांना नैतिकरीत्या भ्रष्ट करत आहे. पण लोकांना याची जाणीव होत नाही. परंतु येशूने, मानवांमध्ये घडणाऱ्‍या वाईट गोष्टींस जबाबदार असलेल्या सैतानाचे पितळ उघडे केले. त्याने त्याला या “जगाचा अधिकारी” म्हटले.—योहान १२:३१.

पण हा सैतान आला कोठून? सैतान पूर्वी सैतान नव्हता. स्वर्गात देवाने त्याला एक परिपूर्ण आत्मिक प्राणी म्हणून निर्माण केले होते. पण या देवदूताने देवाविरुद्ध बंडाळी करून स्वतःला दियाबल अर्थात सैतान बनवले. देवाला मिळणारी उपासना आपल्याला मिळाली पाहिजे या अयोग्य इच्छेने तो पछाडून गेला. येशू पृथ्वीवर असताना त्याच्यात व सैतानात झालेल्या संभाषणावरून सैतानाच्या मनातील ही स्वार्थी महत्त्वाकांक्षा दिसून येते. हे संभाषण आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळते. सैतानाने येशूला त्याच्या ‘पाया पडून त्याला नमन’ करण्यास प्रवृत्त केले होते.—मत्तय ४:८, ९.

तसेच, ईयोबाच्या पुस्तकातील देव आणि सैतान यांच्यातील संभाषणावरून सैतानाने, त्याच्या मनात नेमके काय आहे हे दाखवले. देवाला सोडून देण्यास मानवांना प्रवृत्त करण्यासाठी तो कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकतो, हे त्याने दाखवून दिले.—ईयोब १:१३-१९; २:७, ८.

आता विचार करा. जर सैतानाने यहोवा देव आणि येशू ख्रिस्त यांच्याबरोबर संभाषण केले तर तो इतरांमध्ये वास करत असलेली केवळ एक दुष्ट प्रवृत्ती किंवा दुर्गुण कसा काय असू शकतो? देवामध्ये व त्याच्या पुत्रामध्ये कोणताही दुर्गुण नाही. म्हणजेच, सैतान एक दुष्ट आत्मिक व्यक्‍ती आहे जिला यहोवा आणि येशू यांच्याबद्दल तीळमात्रही आदर नाही.

आजचे भ्रष्ट मानवी कारभार, सैतान एक खरीखुरी व्यक्‍ती असल्याचा पुरावा देते. जगातील राष्ट्रे, जास्तीचे धान्य गोदामांमध्ये सडू देतील पण उपाशी जनतेला खाऊ घालणार नाहीत. ते एकमेकांचा मोठ्या प्रमाणावर संहार करू शकणारी शस्त्रास्त्रे साठवत आहेत. पृथ्वीचे पर्यावरण दूषित करत आहेत. तरीसुद्धा एवढी सर्व द्वेषपूर्ण, आत्म-घातकी कृत्ये घडत असतानाही लोक जणू काय अंधळे झाले आहेत. का बरे?

कारण सैतानाने “विश्‍वास न ठेवणाऱ्‍या लोकांची मने . . . आंधळी केली आहेत,” असे बायबलमध्ये म्हटले आहे. (२ करिंथकर ४:४) मानवजातीला आपल्या कह्‍यात ठेवण्यासाठी तो एका अदृश्‍य संघटनेचा उपयोग करतो. तो “भुतांचा अधिपति” आहे. (मत्तय १२:२४) संघटित रुपात गुन्हेगारी करणाऱ्‍या टोळीचा म्होरक्या ज्याप्रकारे, टोळीत समाविष्ट असलेल्या गुन्हेगारांना स्वतःची ओळख न देता मोठ्या प्रमाणावर अवैध कारभार चालवू शकतो त्याचप्रमाणे सैतान, त्याच्या प्रभावाची जराही जाणीव नसलेल्या असंख्य लोकांना आपल्या कह्‍यात ठेवण्यासाठी त्याच्या दुष्ट देवदूतांच्या घातक संघटनेचा उपयोग करतो.

पण बायबल, दियाबल आणि त्याच्या संघटनेचा पर्दाफाश करत असल्यामुळे आपण देवाचे आभार मानले पाहिजेत. यामुळे आपण सैतानाच्या प्रभावाचा प्रतिकार करू शकतो. बायबल आपल्याला असा सल्ला देते: “देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हांपासून पळून जाईल.”—याकोब ४:७. (w०९-E १०/०१)