व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यिर्मयाने हाती घेतलेले काम अर्धवट सोडून दिले नाही

यिर्मयाने हाती घेतलेले काम अर्धवट सोडून दिले नाही

आपल्या मुलांना शिकवा

यिर्मयाने हाती घेतलेले काम अर्धवट सोडून दिले नाही

तुला कधी निराशेमुळे, हाती घेतलेले एखादे काम अर्ध्यातच सोडून द्यावेसे वाटले होते का?— * अनेकांना असे वाटते. तरुण यिर्मयालाही एकदा असे वाटले होते. पण, इतरांनी त्याला जे म्हटले किंवा ते त्याच्याशी ज्याप्रकारे वागले त्यामुळे देवाने त्याला सोपवलेले काम त्याने सोडून दिले नाही. यिर्मया हा देवाचा आवडता सेवक होता. तरीपण देवाचे काम सोडून द्यावेसे त्याला का वाटले ते आपण पाहूया.

यिर्मयाचा जन्म व्हायच्या आधीच खरा देव यहोवा याने त्याला, जे लोक देवाच्या इच्छेनुसार वागत नव्हते अशा दुष्ट लोकांना इशारा देण्यास निवडले. खूप वर्षांनंतर यिर्मयाने यहोवाला काय सांगितले माहीत आहे?— तो त्याला म्हणाला: “मला बोलावयाचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ [बालक] आहे.”

यावर यहोवाचे उत्तर काय असावे असे तुला वाटते?— यहोवाने त्याला अगदी दयाळू पण कडकपणे म्हटले: “मी बाळ [बालक] आहे असे म्हणू नको. ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याजकडे तू जा व तुला आज्ञापीन ते बोल. त्यांस तू भिऊ नको. तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे.”—यिर्मया १:४-८.

यहोवाने यिर्मयाला इतके आश्‍वासन देऊनही, लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तो निराश झाला. तो देवाची सेवा करत होता म्हणून लोक त्याची टर उडवत होते. त्याने म्हटले: ‘सर्व लोक मला दिवसभर हसतात, माझी थट्टा करतात.’ म्हणून त्याने संदेश देण्याचे काम सोडून द्यायचे ठरवले. त्याने म्हटले: “मी [यहोवाचे] नाव काढणार नाही, यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही.” मग खरेच यिर्मयाने असे केले का?

नाही. यिर्मयाला भीती वाटली होती, पण यहोवावर त्याचे खूप प्रेम असल्यामुळे त्याने प्रचार करायचे सोडून दिले नाही. देवाच्या नावाचा मी उच्चार करणार नाही असे जेव्हा त्याने ठरवले तेव्हा त्याच्या ‘हाडात कोंडलेला अग्नी जळत आहे असे त्याच्या हृदयाला झाले.’ “मी स्वतःला आवरता आवरता थकलो,” असे तो म्हणाला. (यिर्मया २०:७-९) यिर्मयाने संदेश देण्याचे काम मधेच सोडून दिले नाही म्हणून यहोवाने त्याला वाचवले. कसे वाचवले ते पुढे पाहूया.

तुम्ही जर तुमचा वाईट मार्ग सोडून दिला नाही तर तुमचा नाश होईल, असे जेरुसलेमच्या लोकांना सांगण्याचे काम यहोवाने यिर्मयावर सोपवले होते. यिर्मयाने जेव्हा लोकांना यहोवाचा हा संदेश सांगितला तेव्हा ते त्याच्यावर चिडले आणि म्हणाले: “हा मनुष्य मरणदंडास पात्र आहे.” तरीपण, यिर्मयाने त्यांना ‘परमेश्‍वराची वाणी’ ऐकण्याची गयावया केली व पुढे म्हटले: ‘तुम्ही मला जिवे माराल तर तुम्ही एका निरपराध माणसाला माराल कारण, . . . ही सर्व वचने तुमच्या कानी पडावी म्हणून परमेश्‍वराने मला तुम्हाकडे पाठविले आहे.’ याचा परिणाम काय झाला माहीत आहे?—

बायबलमध्ये म्हटले आहे: “सरदार व सर्व लोक याजकांस व संदेष्ट्यास म्हणाले, हा मनुष्य मरणदंडास पात्र नाही; कारण परमेश्‍वर आमचा देव याच्या नामाने तो आम्हाबरोबर बोलला आहे.” बघितलत, यिर्मयाने घाबरून जाऊन जेव्हा यहोवाने त्याला दिलेले काम सोडून दिले नाही तेव्हा यहोवाने त्याला कसे वाचवले? आता आपण, यहोवाच्या आणखी एका संदेष्ट्याविषयी पाहूया ज्याने घाबरून यहोवाने त्याला दिलेले काम अर्ध्यातच सोडून दिले. त्याचे नाव होते उरीया.

बायबल त्याच्याविषयी असे म्हणते, “यिर्मयाने सांगितलेल्या सर्व वचनांप्रमाणेच त्याने या नगराविरुद्ध व या देशाविरुद्ध संदेश दिला.” पण जेव्हा राजा यहोयाकीम त्याच्यावर चिडला तेव्हा उरीयाने काय केले माहीत आहे?— तो खूप भ्याला. त्याने संदेश द्यायचे काम मधेच सोडून दिले आणि इजिप्तला पळून गेला. मग राजाने त्याला शोधून परत आणायला लोकांना पाठवले. त्याला धरून आणल्यानंतर या वाईट राजाने काय केले माहीत आहे?— त्याने तलवारीने उरीयाला ठार मारले.—यिर्मया २६:८-२४.

यहोवाने यिर्मयाला वाचवले पण उरियाला वाचवले नाही, असे का?— उरीयासारखी यिर्मयालासुद्धा भीती वाटली होती पण तो देवाची सेवा करायची सोडून पळून गेला नाही. त्याने देवाचे काम अर्ध्यावरच सोडून दिले नाही. यिर्मयाच्या उदाहरणावरून आपण कोणता धडा शिकू शकतो, असं तुला वाटतं?— हाच धडा शिकू शकतो, की देव आपल्याला जे सांगतो ते करायला कधीकधी आपल्याला जड जाते, तरीपण आपण त्याच्यावर भरवसा ठेवला पाहिजे आणि त्याच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे. (w०९-E १२/०१)

[तळटीप]

^ परि. 3 तुम्ही हा लेख आपल्या मुलाला वाचून दाखवत असाल तर, लेखात काही वाक्यांच्या पुढे जेव्हा एक छोटीशी रेघ तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्ही तेथे थांबून तुमच्या मुलाला काय वाटते ते विचारायचे आहे.

प्रश्‍न:

❍ देवाने यिर्मयाला कोणते काम दिले?

❍ यिर्मयाला हे काम सोडून द्यावेसे का वाटले?

❍ देवाने यिर्मयाला का वाचवले, पण उरीयाला का वाचवले नाही?

❍ यिर्मयाच्या उदाहरणावरून तू काय शिकलास?