तुमचे हार्दिक स्वागत आहे
तुमचे हार्दिक स्वागत आहे
तुमच्या भागातल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या एका राज्य सभागृहाशेजारून जाताना कदाचित तुम्ही विचार करू लागता, की इथे कसले कार्यक्रम होत असावेत? या सभागृहांमध्ये दर आठवडी होणाऱ्या सभांना कोणीही येऊ शकतात, हे तुम्हाला माहीत होते का? नवीन लोकांचे इथे हार्दिक स्वागत केले जाते.
तुमच्या मनात काही प्रश्न असतील. जसे की, यहोवाच्या साक्षीदारांच्या सभा का होतात? या सभांमध्ये कोणते कार्यक्रम चालतात? आणि यहोवाचे साक्षीदार नसलेले लोक या सभांना येतात तेव्हा त्यांना कसे वाटते, त्यांचे काय म्हणणे आहे?
‘सर्व लोकांना जमव’
प्राचीन काळापासूनच, देवाची उपासना करण्यासाठी व त्याच्याविषयी शिकून घेण्यासाठी लोक एकत्र येत होते. जसे की, इस्राएल लोकांना सुमारे ३,५०० वर्षांपूर्वी असे सांगण्यात आले होते: “सर्व लोकांना म्हणजे पुरुष, स्त्रिया, बालके आणि तुझ्या नगरातला उपरी ह्यांना जमव म्हणजे ते ऐकून शिकतील आणि तुमचा देव परमेश्वर ह्याचे भय धरतील आणि ह्या नियमशास्त्रातली सर्व वचने काळजीपूर्वक पाळतील.” (अनुवाद ३१:१२) अशा प्रकारे, इस्राएलातील लहानमोठ्या अशा सर्व लोकांना यहोवा देवाची उपासना करण्याचे व त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचे शिक्षण दिले जात होते.
अनेक शतकांनंतर, जेव्हा ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाली तेव्हाही या सभा खऱ्या उपासनेचा एक महत्त्वपूर्ण भाग होत्या. प्रेषित पौलाने असे लिहिले: “प्रेम करायला व सत्कृत्ये करायला आपण एकमेकांना प्रवृत्त करू या. कित्येक करतात त्याप्रमाणे आपण एकत्र जमायचे सोडता कामा नये. उलट आपण एकमेकांना उत्तेजन देत असावे.” (इब्री लोकांस १०:२४, २५, मराठी कॉमन लँग्वेज) कुटुंबातल्या सदस्यांमध्ये जशी, एकमेकांसोबत वेळ घालवल्यामुळे जवळीक वाढते, तशीच देवाची सेवा करू इच्छिणारे उपासनेसाठी एकत्र जमतात तेव्हा त्यांच्यातील जवळीक वाढते.
बायबलमध्ये दिलेल्या या उदाहरणांनुसार, यहोवाचे साक्षीदार आठवड्यातून दोनदा आपआपल्या राज्य सभागृहांमध्ये जमतात. या सभांमध्ये त्यांना बायबलमधील तत्त्वांचे महत्त्व जाणण्यास, ते समजण्यास व त्यांचा आपल्या जीवनात अवलंब करण्यास शिकवले जाते. शक्यतो, सबंध जगभरात एकच कार्यक्रम असतो आणि प्रत्येक सभेचा एक विशिष्ट उद्देश असतो. सभांना उपस्थित राहणारे, सभांच्या आधी व नंतर प्रोत्साहनदायक गोष्टी बोलून एकमेकांना “उत्तेजन” देतात. (रोमकर १:१२) पण या सभांमध्ये कोणकोणते कार्यक्रम होतात?
बायबल आधारित व्याख्यान
बहुतेक लोक पहिल्यांदा उपस्थित राहतात ते याच सभेला. या सभेत बायबलवर आधारित व्याख्यान दिले जाते. ते सहसा शनिवारी अथवा रविवारी असते. येशू ख्रिस्ताने अशी अनेक जाहीर व्याख्याने दिली. त्यांपैकी सुप्रसिद्ध व्याख्यान म्हणजे त्याने डोंगरावर दिलेले प्रवचन. (मत्तय ५:१; ७:२८, २९) प्रेषित पौलाने अथेन्समधील लोकांना उद्देशून जाहीर व्याख्यान दिले. (प्रेषितांची कृत्ये १७:२२-३४) येशूने व प्रेषित पौलाने जशी व्याख्याने दिली तशीच यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांमध्ये जाहीर व्याख्याने दिली जातात जी विशेषकरून यहोवाचे साक्षीदार नसलेल्यांसाठी असतात. उपस्थितांपैकी काही जण कदाचित पहिल्यांदाच या सभेला आले असतील.
या सभेची सुरुवात, यहोवाचे गुणगान करा या गीत पुस्तकातील एका गीताने केली जाते. * गीत गाण्यासाठी सर्वांना उभे राहण्याची विनंती केली जाते तेव्हा इच्छा असणारे उभे राहून हे गीत गाऊ शकतात. गीतानंतर होणाऱ्या लहानशा प्रार्थनेनंतर, एक अनुभवी वक्ता ३० मिनिटांचे व्याख्यान देतो. (“जनतेसाठी असलेली व्यावहारिक व्याख्याने” असे शीर्षक असलेला चौकोन पाहा.) हे व्याख्यान पूर्णपणे बायबलवर आधारित असते. वक्ता अधूनमधून विषयाला लागून असलेली शास्त्रवचने बायबलमधून वाचतो तेव्हा श्रोत्यांना आपआपल्या बायबलमध्ये ती वचने पाहण्याचे प्रोत्साहन तो देतो. तेव्हा, या सभेला येताना तुम्ही आपले बायबल आणू शकता. किंवा मग, सभेच्या आधी यहोवाचे साक्षीदार असलेल्यांकडून एक बायबल मागू शकता.
टेहळणी बुरूज अभ्यास
यहोवाच्या साक्षीदारांच्या बहुतेक मंडळ्यांमध्ये जाहीर भाषणानंतर म्हणजे व्याख्यानानंतर टेहळणी बुरूज या नियतकालिकाचा अभ्यास केला जातो. एक तास चालणाऱ्या या अभ्यासात, बायबलच्या एखाद्या विषयावर प्रश्न व उत्तराने चर्चा केली जाते. या सभेला उपस्थित असलेल्यांना प्रेषित पौलाच्या दिवसांतील बिरुयाच्या लोकांचे अनुकरण करण्याचे उत्तेजन दिले जाते. बिरुयाच्या लोकांनी “मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि . . . ह्याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले.”—प्रेषितांची कृत्ये १७:११.
टेहळणी बुरूज अभ्यासाची सुरुवात देखील एका गीताने होते. अभ्यासादरम्यान संचालक चर्चा करत असलेल्या विषयाची माहिती व ते विचारत असलेले प्रश्न नियतकालिकातील अभ्यास लेखात असतात. यहोवाच्या साक्षीदारांकडून तुम्ही या नियतकालिकाची एक प्रत घेऊ शकता. “पालकांनो आपल्या मुलांना प्रेमाने वळण लावा,” “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका” व “सर्व दुःखांचा अंत लवकरच का होणार आहे?” यांसारख्या विषयांवर अलीकडेच चर्चा करण्यात आली होती. या अभ्यासात संचालक प्रश्न विचारतात आणि उत्तरे देण्याची सर्वांना संधी असते. उत्तरे देणारे सहसा सभेला येण्याआधी, चर्चा होत असलेला लेख आणि लेखातील शास्त्रवचने चांगल्या प्रकारे वाचतात व त्यांचा अर्थ समजून घेतात. एका गीताने व प्रार्थनेने सभा समाप्त होते.—मत्तय २६:३०; इफिसकर ५:१९.
मंडळीचा बायबल अभ्यास
आठवड्यातल्या आणखी एका दिवशी यहोवाच्या साक्षीदारांची दुसरी एक सभा असते. १ तास ४५ मिनिटे चालणाऱ्या या सभेत तीन कार्यक्रम असतात. पहिला कार्यक्रम २५ मिनिटांचा असतो. याला मंडळीचा बायबल अभ्यास म्हणतात. या कार्यक्रमात, उपस्थित असलेल्यांना बायबलची माहिती दिली जाते, बायबलनुसार आपल्या विचारसरणीत व मनोवृत्तीत बदल करण्यास मदत केली जाते व ख्रिस्ताचे शिष्य म्हणून कोणकोणत्या बाबतीत सुधारणा करायच्या हे २ तीमथ्य ३:१६, १७) टेहळणी बुरूज अभ्यासाप्रमाणेच या कार्यक्रमातही बायबलच्या एखाद्या विषयावर प्रश्न व उत्तराने चर्चा होते आणि इच्छा असलेले उत्तरे देऊ शकतात. हा बायबल अभ्यास, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या एखाद्या पुस्तकातून किंवा माहितीपत्रकातून चालवला जातो.
शिकवले जाते. (पण सभांमध्ये बायबल आधारित प्रकाशनांचा उपयोग का केला जातो? बायबल लिहिण्यात आले होते त्या काळांत, फक्त त्याचे वाचन करणे पुरेसे नव्हते. तर ते ‘स्पष्टीकरणासह वाचले जात असे. त्यामुळे लोकांना वाचलेले चांगले समजायचे.’ (नहेम्या ८:८) अलीकडच्या वर्षांमध्ये बायबलमधील यशया, दानीएल व प्रकटीकरण या पुस्तकांची माहिती देणाऱ्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकांची चर्चा मंडळीच्या बायबल अभ्यासात केल्यामुळे उपस्थित राहिलेल्यांना बायबलविषयी बरीच समज प्राप्त झाली आहे.
ईश्वरशासित सेवा प्रशाला
मंडळीच्या बायबल अभ्यासानंतर, ईश्वरशासित सेवा प्रशाला असते. ही ३० मिनिटांची प्रशाला, ख्रिश्चनांना ‘शिक्षणाची कला’ विकसित करण्यास मदत करते. (२ तीमथ्य ४:२) उदाहरणार्थ, तुमच्या मुलाने अथवा मित्राने तुम्हाला देवाविषयी किंवा बायबलविषयी एखादा प्रश्न विचारला आणि तुम्हाला त्याचे उत्तर देता आले नाही, असे कधी झाले आहे का? ईश्वरशासित सेवा प्रशाला तुम्हाला, कठीण प्रश्नांची प्रोत्साहनदायक व बायबल आधारित उत्तरे कशी द्यायची हे शिकवते. आपल्यालाही मग यशया संदेष्ट्यासारखा अनुभव येईल. त्याने असे म्हटले: “शिणलेल्यास बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभु परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे.”—यशया ५०:४.
ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या सुरुवातीला, बायबलच्या एका भागावर आधारित भाषण दिले जाते. उपस्थित असलेल्यांना सभेला येण्याआधी बायबलचा हा भाग आदल्या आठवड्याभरात वाचून यायला सांगितले जाते. या भाषणानंतर वक्ता, श्रोत्यांना या भागातून त्यांना उपयोगी वाटलेले मुद्दे थोडक्यात सांगण्याचे उत्तेजन देतात. या नंतर मग प्रशालेत भाग घेण्यासाठी नेमण्यात आलेले विद्यार्थी आपआपला भाग सादर करतात.
विद्यार्थ्यांना, बायबलमधल्या एका भागाचे वाचन करण्यास किंवा शास्त्रवचनातला एखादा विषय दुसऱ्या व्यक्तीला कसा शिकवायचा त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यास नेमले जाते. प्रत्येक भाषणानंतर, एक अनुभवी सल्लागार ईश्वरशासित
सेवा प्रशालेतून लाभ घ्या (इंग्रजी), या पाठ्यपुस्तकाच्या आधारावर, विद्यार्थ्याने आपली नेमणूक कशी सादर केली त्याबाबत त्याची अथवा तिची प्रशंसा करतात. नंतर मग खासगीत ते विद्यार्थ्याला, कोठे सुधारणा करण्याची गरज आहे ते सांगतात.एका पाठोपाठ एक असे भाग असलेला हा कार्यक्रम, आपल्या वाचनाच्या, बोलण्याच्या व शिकवण्याच्या कलांमध्ये सुधारणा करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर उपस्थित असलेल्या सर्वांना मदत करण्यासाठी बनवण्यात आला आहे. ईश्वरशासित सेवा प्रशाला समाप्त झाल्यावर, सेवा सभेची सुरुवात बायबलवर आधारित असलेल्या एका गीताने होते.
सेवा सभा
कार्यक्रमातील शेवटला भाग म्हणजे सेवा सभा. या सभेत, भाषणे, प्रात्यक्षिके, मुलाखती व श्रोत्यांच्या टिप्पणी असल्यामुळे, उपस्थित असलेल्यांना बायबलमधील सत्य प्रभावीपणे शिकवण्याचे प्रशिक्षण मिळते. आपल्या शिष्यांना प्रचाराला पाठवण्याआधी येशूने त्यांना एकत्र बोलवले आणि तपशीलवार सूचना दिल्या. (लूक १०:१-१६) इतरांना सुवार्ता सांगण्यास ते पूर्णपणे तयार झाल्यामुळे, त्यांना पुष्कळ चांगले अनुभव आले. हे अनुभव त्यांनी नंतर येशूला सांगितले. (लूक १०:१७) शिष्य नेहमी एकमेकांनाही आपले अनुभव सांगत असत.—प्रेषितांची कृत्ये ४:२३; १५:४.
सेवा सभा ही ३५ मिनिटांची असते. या सभेचा कार्यक्रम आमची राज्य सेवा नावाच्या दर महिन्याला निघणाऱ्या बातमीपत्रात दिलेला असतो. “कुटुंब मिळून यहोवाची उपासना करणे,” “आपण वारंवार लोकांकडे का जातो” व “आपल्या सेवाकार्यात ख्रिस्ताचे अनुकरण करा” यांसारख्या विषयांवर या बातमीपत्रकात अलीकडेच चर्चा करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या शेवटी एक गीत होते आणि मंडळीतल्या एका सदस्याला समारोपाची प्रार्थना करण्यास नेमले जाते.
पहिल्यांदाच उपस्थित राहिलेल्यांचे मनोगत
यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांतील सर्व बंधूभगिनी नवीन लोकांचे अगदी आपुलकीने स्वागत करतात. ॲन्ड्रूचे उदाहरण घ्या. त्याने यहोवाच्या साक्षीदारांविषयी बऱ्याच चुकीच्या गोष्टी ऐकल्या होत्या. पण जेव्हा तो पहिल्यांदा सभेला आला तेव्हा मंडळीतल्या सर्वांनी त्याचे प्रेमळपणे स्वागत केले तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले. तो म्हणतो: “मला ते ठिकाण खूप आवडलं. हे लोक किती प्रेमळ आहेत, आपल्यामध्ये किती आवड घेतात हे पाहून मला आश्चर्य वाटलं.” कॅनडातील ॲशल नावाच्या एका किशोरवयीन मुलीचे देखील हेच म्हणणे आहे. ती म्हणते: “मला त्यांची सभा खूप आवडली. मला बऱ्याच गोष्टी समजल्या.”
ब्राझीलमध्ये राहणारा झूझे, हा भांडखोर म्हणून ओळखला जायचा. तरीपण स्थानिक राज्य सभागृहात होणाऱ्या सभेला उपस्थित राहण्यासाठी त्याला आमंत्रण देण्यात आले. तो म्हणतो: “राज्य सभागृहातील लोकांना माझ्याविषयी सर्वकाही माहीत असूनही त्यांनी माझं मनःपूर्वक स्वागत केलं.” जपानमध्ये राहणारा आत्सुशी आठवून सांगतो: “खरं तर, मी पहिल्यांदाच यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेला गेलो तेव्हा मला थोडंसं अवघडल्यासारखंच वाटत होतं. तरीपण, हे लोक आपल्यासारखेच आहेत, हे मला जाणवलं. त्यांनी मला परक्यासारखं वागवलं नाही.”
तुमचे हार्दिक स्वागत आहे
यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना पहिल्यांदाच उपस्थित राहिलेल्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतांवरून कळते, की राज्य सभागृहात आल्याने खरोखरच खूप आनंद होतो. येथे तुम्हाला देवाविषयी शिकायला मिळेल. तसेच, तेथे दिल्या जाणाऱ्या बायबल आधारित प्रशिक्षणाद्वारे “जे हितकारक ते” यहोवा देव तुम्हाला शिकवेल.—यशया ४८:१७.
यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहांमध्ये तुम्ही विनामूल्य प्रवेश करू शकता व तेथे कसलीही वर्गणी गोळा केली जात नाही. अशा सभेला तुम्हाला उपस्थित राहायला आवडेल का? मग तुमचे हार्दिक स्वागत आहे! (w०९ २/१)
[तळटीप]
^ या लेखात उल्लेखण्यात आलेली सर्व प्रकाशने यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेली आहेत.
[१९ पानांवरील चौकट]
जनतेसाठी असलेली व्यावहारिक व्याख्याने
बायबलवर आधारित व्याख्याने ही १७० विविध विषयांवर आहेत. काहींचे विषय खाली दिले आहेत:
◼ मानवाचा उगम—तुम्ही काय विश्वास करता हे खरोखरच इतके महत्त्वाचे आहे का?
◼ लैंगिक संबंध आणि विवाह यांच्याबद्दलचा ईश्वरी दृष्टिकोन
◼ या त्रस्त जगात तुम्ही सुरक्षितता अनुभवू शकता
◼ जीवनाच्या चिंतांना लढा देणे
◼ सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का?
[१९ पानांवरील चित्र]
बायबल आधारित व्याख्यान
[१९ पानांवरील चित्र]
“टेहळणी बुरूज” अभ्यास
[२० पानांवरील चित्रे]
मंडळीचा बायबल अभ्यास
[२० पानांवरील चित्र]
ईश्वरशासित सेवा प्रशाला
[२१ पानांवरील चित्र]
सेवा सभा