तुम्हाला आठवतं का?
टेहळणी बुरूज नियतकालिकातील अलीकडील अंक तुम्ही काळजीपूर्वक वाचले आहेत का? तर मग, पुढील प्रश्नांची उत्तरं देण्यास तुम्हाला जमतं का ते पाहा:
यहेज्केलच्या पुस्तकात उल्लेख करण्यात आलेला मागोग देशातील गोग कोण आहे?
मागोग देशातील गोग सैतानाला नाही तर राष्ट्रांच्या समूहाला सूचित करतो. हा समूह मोठ्या संकटाची सुरवात झाल्यानंतर देवाच्या लोकांचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न करेल.—५/१५, पृष्ठे २९-३०.
येशूनं केलेल्या चमत्कारांतून त्याची उदारता कशी दिसून येते?
काना शहरातील एका लग्नसमारंभात येशूनं जवळजवळ ३८० लिटर पाण्याचं रूपांतर द्राक्षारसात केलं. आणखी एका प्रसंगी त्यानं चमत्कारिक रीत्या ५,००० लोकांना जेवू घातलं. (मत्त. १४:१४-२१; योहा. २:६-११) या दोन्ही वेळेस तो आपल्या पित्यानं दाखवलेल्या उदारतेचं अनुकरण करत होता.—६/१५, पृष्ठे ४-५.
अंत येईल तेव्हा कोणत्या गोष्टींचा नाश होईल?
अंत येईल तेव्हा अपयशी ठरलेल्या मानवी सरकारांचा, युद्ध आणि अन्यायाचा, देवाची व मानवांची निराशा करणाऱ्या धर्मांचा आणि भक्तिहीन लोकांचा नाश होईल.—७/१, पृष्ठे ३-५.
मोठ्या बाबेलचा नाश होईल तेव्हा खोट्या धर्माच्या सर्वच सदस्यांचा नाश होईल का?
असं म्हणता येणार नाही. कारण जखऱ्या १३:४-६ या वचनांनुसार खोट्या धर्माचे काही धार्मिक पुढारी, ‘मोठ्या बाबेलचा’ भाग असल्याचं नाकारतील.—७/१५, पृष्ठे १५-१६.
आपण कोणत्या काही गोष्टींवर मनन करू शकतो?
यहोवाची निर्मिती, त्याचं वचन बायबल, प्रार्थना करण्याचा विशेषाधिकार आणि त्यानं पुरवलेली खंडणीची तरतूद यासारख्या गोष्टींवर आपण मनन करू शकतो.—८/१५, पृष्ठे १०-१३.
आपण कोणाशी लग्नाच्या उद्देशानं भेटीगाठी करतो, यावर वाईट संगत टाळण्याच्या सल्ल्याचा कसा प्रभाव पडतो?
प्रत्येकाशी मैत्रीनं राहावं असं आपल्याला मनापासून वाटतं, हे खरं आहे. पण तरी, यहोवाला समर्पित नसलेल्या व त्याच्या दर्जांनुसार जीवन न जगणाऱ्या व्यक्तीसोबत लग्नाच्या उद्देशानं भेटीगाठी करणं शहाणपणाचं ठरणार नाही. (१ करिंथ. १५:३३)—८/१५, पृष्ठ २५.
पेत्राला स्वतःचा विश्वास बळकट करण्यास कशामुळे मदत झाली?
विश्वास असल्यामुळेच पेत्र येशूकडे पाण्यावर चालत गेला. (मत्त. १४:२४-३२) पण वादळाला पाहिल्याबरोबर पेत्र घाबरला. तेव्हा त्यानं पुन्हा येशूवर लक्ष केंद्रित केलं आणि येशूची मदत स्वीकारली. यामुळे त्याला विश्वास बळकट करण्यास मदत झाली.—९/१५, पृष्ठे १६-१७.
अपरिपूर्ण असूनही देवाला खूश करणं आपल्याला शक्य आहे, अशी खात्री आपण का बाळगू शकतो?
कारण ईयोब, लोट आणि दावीद यांच्या हातूनदेखील चुका झाल्या होत्या. तरी पण, देवाची सेवा करत राहण्याची त्यांची इच्छा होती. त्यांनीही पश्चात्ताप केला आणि स्वतःच्या जीवनात बदल केले. यामुळे त्यांना देवाची कृपापसंती मिळाली. त्यामुळे आपल्यालाही देवाला खूश करणं शक्य आहे, अशी खात्री आपण का बाळगू शकतो.—१०/१, पृष्ठे १०-११.
मार्थेच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?
एकदा मार्था येशूसाठी जेवण तयार करण्यात इतकी व्यस्त होती, की येशूच्या बोलण्याकडे तिचं लक्ष नव्हतं. पण येशूनं मरीयेची प्रशंसा केली. तिनं “चांगला वाटा” निवडला आहे असं तो म्हणाला. कारण ती त्याचं लक्ष देऊन ऐकत होती. म्हणून आपणदेखील गरज नसलेल्या गोष्टींना आपल्या आध्यात्मिक कार्यांच्या आड येऊ देता कामा नये.—१०/१५, पृष्ठे १८-२०.