आध्यात्मिक नंदनवनाला आणखी सुंदर बनवा!
“माझे पदासन मी शोभायमान करेन.”—यश. ६०:१३.
गीत क्रमांक: २८, ५३
१, २. इब्री शास्त्रवचनांत “पदासन” या शब्दाचा वापर कशासाठी करण्यात आला आहे?
यहोवानं म्हटलं, “आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पदासन आहे.” (यशया ६६:१) आणखी एका ठिकाणी आपल्या “पदासनाबद्दल” तो म्हणतो, “माझे पदासन मी शोभायमान करेन.” (यश. ६०:१३) त्यामुळे साहजिकच आपल्यासमोर असा प्रश्न निर्माण होतो, की यहोवा आपल्या ‘पदासनाला’ आणखी शोभायमान, किंवा सुंदर कसं करणार आहे? आणि जे त्याच्या ‘पदासनावर’ म्हणजे पृथ्वीवर राहतात, त्यांच्यासाठी याचा काय अर्थ होतो?
२ इब्री शास्त्रवचनांत, “पदासन” हा शब्द इस्राएलमधील प्राचीन मंदिराचं वर्णन करण्याकरताही वापरण्यात आला आहे. (१ इति. २८:२; स्तो. १३२:७) हे मंदिर खऱ्या उपासनेचं केंद्र होतं आणि पृथ्वीवर यहोवाच्या नावाचा महिमा करण्यासाठी या मंदिराचा वापर केला जात होता. त्यामुळे, यहोवाच्या नजरेत हे मंदिर खूप सुंदर होतं.
३. आज खऱ्या उपासनेचं केंद्र कशाला म्हणता येईल, आणि ते केव्हा अस्तित्वात आलं?
३ पण आज खऱ्या उपासनेचं केंद्र कशाला म्हणता येईल? प्राचीन काळातील मंदिराप्रमाणे हे केंद्र एक इमारत नाही, तर एक आध्यात्मिक मंदिर आहे. या आध्यात्मिक मंदिरात, इतर कोणत्याही वास्तविक मंदिरात केला नसेल इतक्या मोठ्या प्रमाणात यहोवाच्या नावाचा महिमा केला जात आहे. पण मग, हे आध्यात्मिक मंदिर नेमकं काय आहे? ही देवानं केलेली अशी एक तरतूद आहे ज्यामुळे मानवजातीला त्याच्याशी मैत्री करणं आणि त्याची उपासना इब्री ९:११, १२.
करणं शक्य होतं. ही तरतूद येशूनं दिलेल्या खंडणीमुळेच शक्य झाली आहे. इ.स. २९ मध्ये जेव्हा येशूचा बाप्तिस्मा झाला आणि यहोवाच्या आध्यात्मिक मंदिराचा प्रमुख याजक म्हणून त्याला अभिषिक्त करण्यात आलं, तेव्हा ही तरतूद अस्तित्वात आली.—४, ५. (क) स्तोत्र ९९ मध्ये सांगितल्यानुसार यहोवाच्या खऱ्या उपासकांची काय इच्छा आहे? (ख) आपण स्वतःला कोणता प्रश्न विचारला पाहिजे?
४ खऱ्या उपासनेच्या या तरतुदीबद्दल आपण यहोवाचे नक्कीच खूप आभार मानले पाहिजेत. यहोवाच्या नावाबद्दल आणि खंडणीच्या प्रेमळ भेटीबद्दल जेव्हा आपण इतरांना सांगतो, तेव्हा त्याच्या तरतुदीबद्दल आपल्याला कदर असल्याचं दिसून येतं. शिवाय, ऐंशी लाखांपेक्षा जास्त लोक दररोज यहोवाची स्तुती करत आहेत, हे पाहणंदेखील खूप प्रोत्साहनदायक आहे. एकीकडे असे पुष्कळ लोक आहेत ज्यांना वाटतं, की मृत्यूनंतर ते स्वर्गात जातील आणि मग तिथं देवाची स्तुती करतील. पण याउलट, आता आणि इथंच यहोवाची स्तुती करणं किती महत्त्वाचं आहे, हे त्याच्या लोकांना माहीत आहे.
५ आपण जेव्हा यहोवाची स्तुती करतो, तेव्हा स्तोत्र ९९:१-३, ५ (वाचा.) यात वर्णन करण्यात आलेल्या विश्वासू सेवकांच्या उदाहरणाचं आपण अनुकरण करत असतो. मोशे, अहरोन आणि शमुवेल यांच्यासारख्या विश्वासू पुरूषांनी गतकाळात, खऱ्या उपासनेसाठी देवाच्या तरतुदींना पूर्ण पाठिंबा दिला होता. (स्तो. ९९:६, ७) त्याचप्रमाणे, आज अभिषिक्त जन आध्यात्मिक मंदिराच्या पृथ्वीवरील भागात विश्वासूपणे सेवा करत आहेत. आणि या कामात ‘दुसऱ्या मेंढरांतील’ लाखो जण त्यांना एकनिष्ठपणे मदत करत आहेत. (योहा. १०:१६) हे दोन्ही गट आज एकजुटीनं यहोवाची उपासना करत आहेत. पण असं असलं, तरी आपण व्यक्तिगत रीत्या स्वतःला असा प्रश्न विचारला पाहिजे: ‘खऱ्या उपासनेसाठी यहोवानं केलेल्या या तरतुदीला मी पूर्णपणे पाठिंबा देत आहे का?’
आध्यात्मिक मंदिरात सेवा करणाऱ्यांची ओळख
६, ७. सुरवातीच्या खिस्ती मंडळीत कोणती समस्या निर्माण झाली, आणि १९१९ साली कोणती गोष्ट घडली?
६ ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाल्यानंतर, भविष्यवाणी केल्याप्रमाणे केवळ १०० वर्षांच्या आतच धर्मत्यागाला सुरवात झाली. (प्रे. कृत्ये २०:२८-३०; २ थेस्सलनी. २:३, ४) त्यानंतर देवाच्या खऱ्या उपासकांना ओळखणं आणखीनच कठीण होत गेलं. पण पुढं शेकडो वर्षं उलटल्यावर, आध्यात्मिक मंदिरात खरोखर कोण सेवा करत आहेत हे यहोवानं येशूद्वारे स्पष्ट केलं.
७ पण १९१९ पर्यंत, देवाची स्वीकृती असणाऱ्या आणि त्याच्या आध्यात्मिक मंदिरात सेवा करणाऱ्या त्याच्या सेवकांची ओळख स्पष्ट झाली. आपली उपासना देवाला आणखी स्वीकारयोग्य व्हावी म्हणून त्यांनी बरेच बदल केले. (यश. ४:२, ३; मला. ३:१-४) त्यामुळे शेकडो वर्षांआधी प्रेषित पौलानं दृष्टांतात पाहिलेल्या गोष्टी, आता पूर्ण होण्यास सुरवात झाली होती.
८, ९. पौलानं दृष्टांतात पाहिलेलं “सुखलोक” किंवा नंदनवन कशाला सूचित करतं?
८ पौलाला मिळालेल्या दृष्टांताविषयी आपल्याला २ करिंथकर १२:१-४ (वाचा.) मध्ये वाचायला मिळतं. या दृष्टांतात, यहोवानं पौलाला भविष्यात होणाऱ्या काही गोष्टी दाखवल्या. पौलानं या दृष्टांतात पाहिलेलं “सुखलोक” म्हणजे नंदनवन कशाला सूचित करतं? हे नंदनवन कदाचित पृथ्वीवर लवकरच येणाऱ्या वास्तविक नंदनवनाला, (लूक २३:४३) नवीन जगातील परिपूर्ण आध्यात्मिक नंदनवनाला किंवा “देवाच्या बागेत” म्हणजे स्वर्गात असणाऱ्या सर्वोत्तम परिस्थितीला सूचित करत असावं.—प्रकटी. २:७.
९ पण मग, “माणसाने ज्यांचा उच्चारही करणे उचित नाही अशी वाक्ये” मी ऐकली, असं पौलानं का म्हटलं? कारण दृष्टांतात त्यानं ज्या अद्भुत गोष्टी पाहिल्या त्यांचा खुलासा करण्याची ती वेळ नव्हती. पण, आज आपण ज्या आशीर्वादांचा अनुभव घेत आहोत त्यांविषयी इतरांना सांगण्याची यहोवानं आपल्याला अनुमती दिली आहे. ही किती आनंदाची गोष्ट आहे, नाही का?
१०. आध्यात्मिक मंदिर आणि आध्यात्मिक नंदनवन या दोन वेगवेगळ्या गोष्टी कशा आहेत?
१० आपण नेहमी ज्या आध्यात्मिक नंदनवनाबद्दल बोलत असतो, ते नेमकं काय आहे? हे देवानं आपल्या लोकांना दिलेलं एक खास शांतीपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे आध्यात्मिक नंदनवन आणि आध्यात्मिक मंदिर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आध्यात्मिक मंदिर खऱ्या उपासनेकरता देवानं केलेल्या तरतुदीला सूचित करतं; तर आध्यात्मिक नंदनवन देवाकडून स्वीकृती मिळालेल्या आणि त्याच्या आध्यात्मिक मंदिरात सेवा करणाऱ्या लोकांना सूचित करतं.—११. आज आपल्याला कोणता बहुमान मिळाला आहे?
११ सन १९१९ पासून यहोवानं अपरिपूर्ण मानवांना त्याच्या आध्यात्मिक नंदनवनाला सांभाळण्याची, मजबूत करण्याची आणि वाढवण्याची अनुमती दिली आहे. हे जाणून आपल्याला किती आनंद होतो! पण या कामात तुम्हीही सहभागी आहात का? यहोवासोबत मिळून या पृथ्वीवर त्याच्या नावाचा गौरव करण्याचा जो बहुमान तुम्हाला मिळाला आहे, त्याची तुम्हाला खरंच कदर आहे का?
यहोवा त्याच्या संघटनेची सुंदरता आणखी वाढवत आहे
१२. यशया ६०:१७ मधील शब्द खरे ठरले आहेत असं आपण का म्हणू शकतो? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)
१२ देवाच्या संघटनेच्या पृथ्वीवरील भागात बरेच बदल आणि सुधारणा होतील, असं यशया संदेष्ट्यानं आधीच भाकीत केलं होतं. (यशया ६०:१७ वाचा.) आजच्या तरुण ख्रिस्ती पिढीनं आणि सत्यात आलेल्या नवीन लोकांनी याबद्दल केवळ वाचलं किंवा ऐकलं असेल. पण, आपले असे कित्येक विश्वासू बंधुभगिनी आहेत ज्यांना या अद्भुत सुधारणा स्वतः अनुभवण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यांना याची पूर्ण खात्री आहे की आपला राजा असलेल्या येशूला, यहोवा त्याच्या संघटनेचं मार्गदर्शन करण्यासाठी वापरत आहे. आणि जेव्हा या प्रिय बंधुभगिनींकडून आपण याविषयी ऐकतो, तेव्हा यहोवावरील आपला विश्वास आणि भरवसादेखील आणखी मजबूत होतो.
१३. स्तोत्र ४८:१२-१४ नुसार आपल्याला काय करण्याची गरज आहे?
१३ म्हणून सर्व खऱ्या ख्रिश्चनांनी यहोवाच्या संघटनेबद्दल इतरांना सांगणं गरजेचं आहे. आज सैतानाच्या या दुष्ट जगात राहत असूनही शांतीपूर्ण आणि संघटित बंधुसमाजाचा अनुभव घेणं हे एका चमत्कारासारखंच आहे, नाही का? आपण अगदी आनंदानं ‘पुढच्या पिढीला’ यहोवाच्या संघटनेबद्दल आणि आध्यात्मिक नंदनवनाबद्दल सांगितलं पाहिजे!—स्तोत्र ४८:१२-१४ वाचा.
१४, १५. सन १९७० नंतर कोणत्या सुधारणा करण्यात आल्या, आणि याचा संघटनेला कसा फायदा झाला?
१४ यहोवाच्या संघटनेचा पृथ्वीवरील भाग ज्या सुधारणांमुळे आणखी सुंदर बनला आहे, त्यांना आपल्या मंडळीतील कित्येक वृद्ध बंधुभगिनींनी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. त्या आठवणी ते आजही सांगू शकतात. उदाहरणार्थ, आज मंडळीत काम करणाऱ्या वडीलवर्गाऐवजी पूर्वी केवळ एक जण मंडळीचा सेवक म्हणून काम करायचा. तसंच सध्या शाखा कार्यालयात काम करणाऱ्या शाखा समितीऐवजी, केवळ एकच बांधव शाखा कार्यालयाचा सेवक म्हणून काम करायचा. तर नियमन मंडळाऐवजी वॉचटावर सोसायटीचे अध्यक्ष कामकाजाचं नेतृत्व करायचे. जरी या सर्व बांधवांना इतर काही विश्वासू बांधव मदत करत होते तरी मंडळीत, शाखा कार्यालयात आणि जागतिक मुख्यालयात घेण्यात येणाऱ्या निर्णयांसाठी केवळ एकच बांधव सहसा जबाबदार असायचा. पण याबाबतीत १९७० सालानंतर करण्यात आलेल्या सुधारणांमुळे केवळ एकट्यानं निर्णय घेण्याऐवजी, आज ही जबाबदारी मंडळीतील वडिलांच्या गटाला देण्यात आली आहे.
१५ या सर्व सुधारणांचा संघटनेला फायदा झाला, असं का म्हणता येईल? कारण या सर्व सुधारणा शास्त्रवचनांची जी स्पष्ट समज मिळाली, त्यावर आधारित होत्या. शिवाय या सुधारणांमुळे निर्णय इफिस. ४:८; नीति. २४:६.
घेण्यासाठी केवळ एकाच व्यक्तीच्या चांगल्या गुणांवर अवलंबून राहण्याऐवजी सर्व वडिलांमध्ये असणाऱ्या चांगल्या गुणांचा यासाठी उपयोग होणार होता. याचा परिणाम म्हणजे, यहोवानं पुरवलेल्या या ‘मानवी देणग्यांचा’ संघटनेला फायदा झाला.—१६, १७. अलीकडे झालेल्या सुधारणांपैकी कोणती गोष्ट तुम्हाला जास्त प्रभावित करते, आणि का?
१६ आपल्या साहित्याच्या बाबतीत अलीकडेच झालेल्या काही सुधारणांचाही विचार करा. क्षेत्रसेवेत आकर्षक आणि उपयुक्त ठरतील अशा विषयांवर आधारित साहित्य लोकांना देण्यात आपल्याला आनंद होतो. शिवाय, सुवार्तेचा प्रचार करण्याच्या कामात आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा ज्या प्रकारे वापर करत आहोत, त्याचाही विचार करा! उदाहरणार्थ, jw.org या आपल्या वेबसाईटमुळे जास्तीजास्त लोकांपर्यंत पोचून त्यांना हवी असणारी मदत पुरवणं आता शक्य झालं आहे. या सर्व सुधारणांवरून हेच दिसून येतं, की यहोवाला लोकांमध्ये आस्था आहे आणि त्याचं लोकांवर खूप प्रेम आहे.
१७ यासोबतच कौटुंबिक उपासनेसाठी आणि व्यक्तिगत अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून, सभांमध्ये जो बदल करण्यात आला त्याचाही आपल्याला खूप फायदा झाला आहे. शिवाय, संमेलन आणि अधिवेशनांच्या कार्यक्रमात करण्यात आलेल्या बदलांमुळेही आपल्याला जो फायदा झाला, त्याचाही विचार करा. दरवर्षी त्यांमध्ये होणारे नवनवीन बदल पाहून आपल्याला किती आनंद होतो! वेगवेगळ्या बायबल प्रशालांमुळे आज आपल्याला जे प्रशिक्षण मिळत आहे त्याबद्दलही आपण खूप आभारी आहोत. या सर्व सुधारणांमुळे, यहोवा त्याच्या संघटनेला मार्गदर्शित करत आहे आणि त्याच्या आध्यात्मिक नंदनवनाला आणखी सुंदर बनवत आहे, हे आपण अगदी स्पष्टपणे ओळखू शकतो.
आध्यात्मिक नंदनवनाला आणखी सुंदर बनवण्यात आपला हातभार
१८, १९. आध्यात्मिक नंदनवनाला आणखी सुंदर बनवण्यासाठी आपण कशी मदत करू शकतो?
१८ आध्यात्मिक नंदनवनाला आणखी सुंदर बनवण्याच्या कामात मदत करण्याचा बहुमान यहोवानं आपल्याला दिला आहे. पण आपण ही मदत कशी करू शकतो? राज्याची सुवार्ता सांगण्याच्या आणि शिष्य बनवण्याच्या कामात आवेशानं सहभाग घेऊन आपण असं करू शकतो. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला देवाचा सेवक बनण्यास मदत करतो, तेव्हा या आध्यात्मिक नंदनवनाला आणखी वाढवण्यास खरंतर आपण हातभार लावत असतो.—यश. २६:१५; ५४:२.
१९ आपल्या ख्रिस्ती व्यक्तिमत्त्वाला सुधारण्यासाठी जेव्हा आपण परिश्रम घेतो, तेव्हादेखील एका अर्थानं आपण या आध्यात्मिक नंदनवनाला आणखी सुंदर बनवत असतो. सहसा लोक आपल्याला असलेल्या बायबलच्या ज्ञानामुळे नव्हे, तर आपल्या शुद्ध व शांतीपूर्ण आचरणामुळे आपल्या संघटनेकडे आणि यहोवा व येशूकडे आकर्षित होतात. या सर्व कारणांमुळे आध्यात्मिक नंदनवनाला किती शोभा येते!
२०. नीतिसूत्र १४:३५ नुसार आपण काय करण्याची गरज आहे?
२० आज जेव्हा यहोवा आणि येशू आपल्या आध्यात्मिक नंदनवनाला पाहत असतील, तेव्हा त्यांना किती आनंद होत असेल! या नंदनवनाला सुंदर बनवण्यात आपल्याला खूप आनंद होतो, हे खरं आहे. पण पृथ्वीचं एका वास्तविक नंदनवनात रूपांतर करताना आपल्याला जो आनंद होईल, तो यापेक्षाही कितीतरी पटीनं जास्त असेल. तेव्हा नीतिसूत्रे १४:३५ मधील शब्द आपण नेहमी लक्षात ठेवू या. तिथं म्हटलं आहे, “शहाण्या सेवकावर राजाचा प्रसाद होतो.” म्हणून आध्यात्मिक नंदनवनाला सुंदर बनवण्याच्या कामात हातभार लावून आपण समंजसपणा दाखवत राहू या.