प्रभूच्या प्रार्थनेनुसार जीवन जगा—भाग १
“तुझे नाव पवित्र मानले जावो.”—मत्त. ६:९.
१. प्रचार करताना मत्तय ६:९-१३ मधील येशूच्या प्रार्थनेचा आपण कसा उपयोग करू शकतो?
मत्तय ६:९-१३ मध्ये दिलेली प्रभूची प्रार्थना बहुतेकांना अगदी तोंडपाठ आहे. आपण प्रचाराला जातो तेव्हा या प्रार्थनेतील शब्दांचा उपयोग करून राज्याबद्दल लोकांना सांगतो. हे राज्य देवाचं एक खरोखरचं सरकार आहे आणि ते या पृथ्वीला एक सुंदर नंदनवन बनवेल, असं आपण त्यांना सांगतो. तसंच, “तुझे नाव पवित्र मानले जावो” या शब्दांचा उपयोग करून आपण लोकांना हे दाखवून देतो की देवाचं एक व्यक्तिगत नाव आहे आणि आपण ते पवित्र मानलं पाहिजे.—मत्त. ६:९.
२. प्रार्थना करताना आपण पुन्हापुन्हा तेच शब्द बोलावेत अशी येशूची इच्छा नव्हती हे कशावरून दिसून येतं?
२ येशूनं शिकवलेल्या प्रार्थनेतील शब्द तोंडपाठ करून आपण पुन्हापुन्हा तेच शब्द बोलले पाहिजेत असं येशूला म्हणायचं नव्हतं. हे खरं आहे की अनेक लोक असंच करतात. पण, येशूनं म्हटलं होतं, “तोंडपाठ एकच प्रार्थना पुनःपुन्हा म्हणू नका.” (मत्त. ६:७, सुबोधभाषांतर) आणखी एके प्रसंगी तो आपल्या शिष्यांना प्रार्थना कशी करायची हे शिकवत होता. तेव्हा त्यानं तीच प्रार्थना त्यांना शिकवली. पण, या वेळी मात्र त्यानं वेगळ्या शब्दांचा उपयोग केला. (लूक ११:१-४) यावरून हेच कळतं की प्रार्थना कशी करायची याचा येशूनं केवळ एक नमुना दिला होता. प्रार्थनेत कोणत्या गोष्टींची विनंती केली पाहिजे हे यावरून समजणार होतं.
३. प्रभूच्या प्रार्थनेचं परीक्षण करताना आपण स्वतःला काय विचारू शकतो?
३ या आणि पुढच्या लेखात आपण प्रभूच्या प्रार्थनेचं बारकाईनं परीक्षण करू या. असं करताना आपण स्वतःला विचारू शकतो: ‘या प्रार्थनेमुळे मला माझ्या प्रार्थनेचा दर्जा कसा वाढवता येईल?’ आणि ‘मी या प्रार्थनेनुसार जीवन जगत आहे का?’
“हे आमच्या स्वर्गातील पित्या”
४. “हे आमच्या स्वर्गातील पित्या” या शब्दांवरून आपल्याला काय समजतं, आणि यहोवा कोणत्या अर्थानं आपला पिता आहे?
४ येशूनं प्रार्थनेची सुरवात “हे आमच्या स्वर्गातील पित्या” या शब्दांनी केली. या ठिकाणी येशूनं ‘माझ्या पित्या’ न म्हणता ‘आमच्या पित्या’ असं म्हटलं. यावरून येशूला हेच सांगायचं होतं की आपण सर्व एका कुटुंबाचे सदस्य आहोत आणि यहोवा आपल्या सर्वांचा पिता आहे. (१ पेत्र २:१७) यहोवानं ज्यांना स्वर्गात राज्य करण्यासाठी निवडलं आहे त्यांचा तो एका खास अर्थानं पिता आहे. कारण, यहोवानं त्यांना आपली मुलं या नात्यानं दत्तक घेतलं आहे. (रोम. ८:१५-१७) तसंच, पृथ्वीवर जगण्याची आशा असलेल्यांना यहोवानं जीवन दिलं आहे आणि त्यांच्या सर्व गरजा तो पुरवतो. म्हणून, तेसुद्धा यहोवाला ‘पिता’ म्हणू शकतात. पण, हजार वर्षांच्या राज्यानंतर शेवटची परीक्षा होईल, तेव्हा एकनिष्ठ राहिल्यास ते खऱ्या अर्थानं ‘देवाची मुलं’ बनतील.—रोम. ८:२१; प्रकटी. २०:७, ८.
५, ६. आईवडील आपल्या मुलांना कोणती मौल्यवान देणगी देऊ शकतात, आणि प्रत्येक मुलाची कोणती जबाबदारी आहे? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)
५ यहोवा आपला स्वर्गातील पिता आहे आणि आपण त्याला प्रार्थना कशी केली पाहिजे हे जेव्हा आईवडील आपल्या मुलांना शिकवतात, तेव्हा ते एका अर्थानं त्यांना खूप मौल्यवान भेट देत असतात. दक्षिण आफ्रिकेत राहणारे एक विभागीय पर्यवेक्षक असं म्हणतात, “आमच्या मुलींचा जन्म झाला त्या दिवसापासूनच मी त्यांच्यासोबत रोज रात्री प्रार्थना करायचो. माझ्या मुली नेहमी सांगतात, की मी ज्या प्रार्थना करायचो त्यातले शब्द तर त्यांना आठवत नाहीत. पण, तेव्हाचं वातावरण, त्या वातावरणातलं पावित्र्य, त्यानंतर मनाला वाटणारी शांती आणि सुरक्षितता आजही त्यांना आठवते. माझ्या मुली जेव्हा बोलू लागल्या तेव्हा मी त्यांना मोठ्या आवाजात प्रार्थना करायला सांगायचो. त्यामुळे आपल्या मनातील भावना आणि विचार त्या यहोवाला कशा सांगतात हे मी ऐकू शकलो. आणि त्यांच्या मनात डोकावण्याची संधी मला मिळाली. मग प्रभूच्या प्रार्थनेतील महत्त्वाचे मुद्दे आपल्या प्रार्थनेत कसे आणायचे हे मी त्यांना प्रेमळपणे शिकवू शकलो. त्यामुळे, त्या आपल्या प्रार्थनांचा दर्जा वाढवू शकल्या.”
६ या बांधवाच्या मुली जसजशा मोठ्या होत गेल्या तसतसं यहोवासोबतचं त्यांचं नातं मजबूत होत गेलं. त्यांचं आता लग्न झालं आहे आणि आपआपल्या पतीसोबत मिळून त्या दोघीही यहोवाची पूर्णवेळ सेवा करत आहेत. यहोवा एक खरीखुरी व्यक्ती आहे आणि आपण त्याचे मित्र बनू शकतो असं आपल्या मुलांना शिकवणं जणू त्यांना एक मौल्यवान भेट देण्यासारखंच आहे. पण, पुढं यहोवासोबतची मैत्री टिकवून ठेवणं हे मुलांच्याच हातात असतं.—स्तो. ५:११, १२; ९१:१४.
“तुझे नाव पवित्र मानले जावो”
७. आपल्याला कोणता बहुमान मिळाला आहे, आणि आपण काय केलं पाहिजे?
७ देवाचं नाव माहीत असणं आणि ‘त्याच्या नावाकरता निवडलेले लोक’ असणं हा आपल्याकरता खरंच खूप मोठा बहुमान आहे. प्रे. कृत्ये १५:१४; यश. ४३:१०) म्हणून, देवाचं नाव “पवित्र मानले जावो” अशी विनंती आपण प्रार्थनेत करत असतो. तसंच, आपल्या वागण्या-बोलण्यातून त्याच्या नावाला कोणताही कलंक लागू नये म्हणून आपल्याला मदत करावी अशी विनंतीही आपण यहोवाला करतो. पण, पहिल्या शतकातील काही लोक असे नव्हते. ते जे शिकवत होते त्याप्रमाणे वागत नव्हते. त्यामुळे पौलानं त्यांच्याविषयी लिहिलं, “तुम्हामुळे परराष्ट्रीयांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे.”—रोम. २:२१-२४.
(८, ९. यहोवाच्या नावाचा गौरव करण्याची इच्छा असलेल्यांना तो कशी मदत करतो?
८ यहोवाच्या नावाचा गौरव व्हावा म्हणून जे काही करता येईल, ते करण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो. नॉर्वेमध्ये राहणाऱ्या एका बहिणीच्या उदाहरणावर विचार करा. तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. शिवाय, दोन वर्षांच्या तिच्या मुलाची जबाबदारी आता तिच्या एकटीवरच पडली होती. ती म्हणते, “माझ्या आयुष्यातले ते सर्वात वाईट दिवस होते. मी दररोज यहोवाला प्रार्थना करायचे. माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मी अगदी प्रत्येक तासाला यहोवाकडे मदत मागायचे. कारण, माझ्या एखादा चुकीच्या निर्णयामुळे सैतानानं यहोवाला टोमणे मारावेत हे मला नको होतं. मला नेहमी यहोवाच्या नावाचा गौरव करायचा होता. माझ्या मुलानं सत्यात टिकून राहावं अशी माझी इच्छा होती. कारण, नंदनवनात आपल्या वडिलांना पुन्हा पाहण्याची संधी त्याला मिळावी असं मला मनापासून वाटत होतं.”—नीति. २७:११.
९ यहोवानं या बहिणीच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं का? हो नक्कीच दिलं. सतत आपल्या बंधुभगिनींच्या सहवासात असल्यामुळे तिला या प्रसंगातून सावरायला खूप मदत झाली. पुढं पाच वर्षांनंतर मंडळीतील एका वडिलाशी तिचं लग्न झालं. आणि त्यामुळे आपल्या मुलाला सत्यात वाढवण्यासाठी तिला मदत झाली. आता तिचा मुलगा २० वर्षांचा आहे. शिवाय त्याचा बाप्तिस्माही झाला आहे. ती म्हणते, “मुलाला सत्यात वाढवण्यासाठी माझ्या पतीनं मला खरंच खूप मदत केली आहे.”
१०. यहोवा कशा प्रकारे त्याच्या नावाला खऱ्या अर्थानं पवित्र करेल?
१० यहोवा लवकरच त्याच्या नावाला खऱ्या अर्थानं पवित्र करेल. जे त्याच्या नावाला कलंक लावतात आणि त्याला शासक म्हणून स्वीकारत नाहीत, अशांचा समूळ नाश करण्याद्वारे तो असं करेल. (यहेज्केल ३८:२२, २३ वाचा.) त्यानंतर संपूर्ण मानवजात परिपूर्ण होईल. स्वर्गात व पृथ्वीवर असलेले सर्व जण यहोवाची उपासना करतील आणि नेहमीच त्याच्या पवित्र नावाचा गौरव करतील. खरंच त्या वेळेची आपण किती आतुरतेनं वाट पाहत आहोत, जेव्हा आपला प्रेमळ पिता “सर्वांना सर्वकाही” होईल!—१ करिंथ. १५:२८.
“तुझे राज्य येवो”
११, १२. सन १८७६ मध्ये यहोवानं आपल्या लोकांना काय समजण्यास मदत केली?
११ येशू स्वर्गात जाण्याआधी त्याच्या शिष्यांनी त्याला विचारलं, “प्रभूजी, याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?” येशूनं त्यांना जे उत्तर दिलं त्यावरून हेच दिसून येतं की देवाचं राज्य केव्हा स्थापित होईल हे जाणून घेण्याची ती वेळ नव्हती; तर प्रचारकार्य करण्याकडे जास्त लक्ष देण्याची ती वेळ होती. (प्रेषितांची कृत्ये १:६-८ वाचा.) पण, त्यासोबतच त्यानं देवाचं राज्य येण्यासाठी प्रार्थना करायला त्यांना शिकवलं आणि त्या काळाची वाट पाहत राहण्यासही त्यानं सांगितलं. म्हणून, आज आपणही “तुझे राज्य येवो” अशी प्रार्थना करतो.
१२ स्वर्गात येशू ख्रिस्ताचं राज्य सुरू होण्याआधी यहोवानं आपल्या लोकांना ते राज्य नेमकं कोणत्या वर्षी सुरू होईल हे समजण्यास मदत केली. १८७६ मध्ये चार्ल्झ टेझ रस्सल यांनी “परराष्ट्रीयांची सद्दी केव्हा संपते?” हा लेख लिहिला. दानीएलानं ‘सात काळाविषयी’ केलेली भविष्यवाणी *—दानी. ४:१६; लूक २१:२४.
आणि “परराष्ट्रीयांची सद्दी संपेल” याविषयी येशूनं केलेली भविष्यवाणी या दोन्ही सारख्याच आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्या लेखात हे स्पष्ट करण्यात आलं की हा काळ १९१४ मध्ये संपेल.१३. सन १९१४ मध्ये काय घडलं, आणि यामुळे काय सिद्ध झालं?
१३ सन १९१४ मध्ये युरोपात युद्ध सुरू झालं आणि लवकरच सर्व राषट्रं त्यात सामील झाली. युद्धामुळे अन्न-धान्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला. आणि १९१८ साली युद्ध संपलं तेव्हा एक भयंकर मरी पसरली. युद्धात मेलेल्यांच्या तुलनेत या मरीमुळे दगावलेल्या लोकांची संख्या जास्त होती. या सर्व घटना येशूनं दिलेल्या चिन्हांचाच भाग होत्या. या चिन्हांवरून हे सिद्ध झालं, की १९१४ साली येशू स्वर्गात राजा बनला आहे. (मत्त. २४:३-८; लूक २१:१०, ११) त्या वर्षी “तो विजय मिळवत मिळवत आणखी विजयावर विजय मिळवण्यास निघून गेला.” (प्रकटी. ६:२) येशूनं सैतानाला आणि दुरात्म्यांना स्वर्गातून खाली पृथ्वीवर टाकून दिलं. त्यानंतर पुढील भविष्यवाणी पूर्ण होण्यास सुरवात झाली: “पृथ्वी व समुद्र यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.”—प्रकटी. १२:७-१२.
१४. (क) देवाचं राज्य येण्यासाठी आजही प्रार्थना करणं गरजेचं का आहे? (ख) कोणतं काम करणं आज अत्यंत महत्त्वाचं आहे?
१४ येशू राजा झाला तेव्हा पृथ्वीवर इतक्या मत्त. २४:१४.
भयंकर गोष्टी का होऊ लागल्या हे समजण्यासाठी, प्रकटीकरणाच्या १२ व्या अध्यायातील भविष्यवाणी आपल्याला मदत करते. येशू स्वर्गात राज्य करत असला तरी पृथ्वीवर आजदेखील सैतानाचंच राज्य आहे. पण, लवकरच येशू पृथ्वीवरून दुष्ट लोकांना काढून टाकेल आणि पूर्णपणे ‘विजय मिळवेल.’ तोपर्यंत आपण देवाचं राज्य येण्यासाठी प्रार्थना करत राहू या आणि त्याच्या राज्याबद्दल इतरांना सांगण्यात व्यस्त राहू या. कारण या कार्यामुळे येशूनं केलेली भविष्यावाणी पूर्ण होण्यास मदत होते. त्यानं म्हटलं होतं: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—“पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो”
१५, १६. यहोवाची इच्छा या पृथ्वीवर पूर्ण व्हावी म्हणून केवळ प्रार्थना करणंच पुरेसं आहे का? स्पष्ट करा.
१५ जवळजवळ ६,००० वर्षांआधी या पृथ्वीवर सर्वकाही देवाच्या इच्छेप्रमाणे होतं. म्हणून हे “सर्व फार चांगले आहे,” असं यहोवानं म्हटलं. (उत्प. १:३१) पण, त्यानंतर सैतानानं बंड केलं आणि तेव्हापासून बरेच लोक देवाच्या इच्छेविरुद्ध जीवन जगू लागले. पण, आज जवळजवळ ऐंशी लाख लोक यहोवाची उपासना करतात. देवाची इच्छा या पृथ्वीवर पूर्ण व्हावी यासाठी ते प्रार्थना करतात. तसंच, त्याच्या इच्छेनुसार ते जीवन जगतात. शिवाय, ते देवाच्या राज्याविषयी इतरांना अगदी आवेशानं शिकवतात. यामुळे यहोवाचं मन आनंदित होतं.
१६ सन १९४८ पासून सत्यात असलेल्या ८० वर्षांच्या एका मिशनरी बहिणीचं उदाहरण लक्षात घ्या. आफ्रिकेत राहणारी ही बहीण म्हणते, “अंत येण्याआधी, नम्र अंतःकरणाच्या सर्व लोकांना यहोवाची ओळख व्हावी म्हणून मी नेहमी प्रार्थना करते. कोणालाही साक्ष देताना त्या व्यक्तीच्या मनापर्यंत पोचता यावं म्हणून मी आधीच यहोवाकडे प्रार्थना करते. आणि सत्याबद्दल आवड दाखवणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी मी जे काही कष्ट घेत आहे त्यावरही यहोवाचे आशीर्वाद मी मागते.” या बहिणीनं अनेकांना सत्यात येण्यासाठी मदत केली आहे. तुम्हालाही असे काही वृद्ध भाऊ-बहीण आठवतात का, जे अगदी आवेशानं यहोवाची सेवा करत आहेत?—फिलिप्पैकर २:१७ वाचा.
१७. भविष्यात यहोवा जे करणार आहे त्याविषयी तुम्हाला कसं वाटतं?
१७ जोपर्यंत यहोवा या पृथ्वीवरून त्याच्या शत्रूंना काढून टाकत नाही, तोपर्यंत त्याची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण प्रार्थना करत राहिलं पाहिजे. त्यानंतर, पृथ्वीचं एका सुंदर नंदनवनात रूपांतर करण्यात येईल आणि कोट्यावधी लोकांना पुन्हा जिवंत केलं जाईल. येशूनं म्हटलं, “कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील” आणि “पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.” (योहा. ५:२८, २९) नवीन जगात, आपल्या प्रियजनांचं स्वागत करताना आपल्याला किती आनंद होईल याची कल्पना करा! देव आपल्या “डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल.” (प्रकटी. २१:४) ज्यांचं पुनरुत्थान होईल त्यांच्यापैकी बहुतेक जण अशा ‘अनीतिमानांपैकी’ असतील, ज्यांना यहोवा आणि येशूविषयी शिकून घेण्याची संधी कधीच मिळाली नव्हती. देवाच्या उद्देशांबद्दल त्यांना शिकवताना आपल्याला तर आनंद होईलच, पण यामुळे त्यांनाही “सार्वकालिक जीवन” जगण्याची संधी मिळेल.—प्रे. कृत्ये २४:१५; योहा. १७:३.
१८. मानवांना कशाची सर्वात जास्त गरज आहे?
१८ देवाच्या राज्याद्वारे त्याचं नाव पवित्र केलं जाईल. स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्व जण एकत्र मिळून यहोवाची उपासना करतील. शिवाय प्रभूच्या प्रार्थनेतील पहिल्या तीन विनंत्या यहोवा पूर्ण करेल, तेव्हा मानवांना आवश्यक त्या सर्व गोष्टी पुरवल्या जातील. येशूनं आणखी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींविषयी आपल्याला प्रार्थनेत विनंती करण्यास सांगितलं आहे? याविषयी आपण पुढच्या लेखात पाहणार आहोत.
^ परि. 12 ही भविष्यवाणी १९१४ साली पूर्ण झाली हे आपण कशावरून सांगू शकतो हे जाणून घेण्यासाठी बायबल काय शिकवते? या पुस्तकातील पृष्ठे २१५-२१८ पाहा.