त्यांनी अभिवचनांवर दृष्टी लावली
“त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली.”—इब्री ११:१३.
१. न पाहिलेल्या गोष्टींची कल्पना करण्याच्या क्षमतेमुळे आपल्याला काय फायदा होतो? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)
यहोवानं आपल्याला एक अद्भुत देणगी दिली आहे. ती म्हणजे न पाहिलेल्या गोष्टींचं चित्र डोळ्यांपुढे उभं करण्याची क्षमता. या क्षमतेमुळे आपल्याला भविष्यात होणाऱ्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत होते. तसंच, येणाऱ्या समस्यांचा अंदाज घेऊन, त्या वेळीच टाळणंही शक्य होतं. यहोवा भविष्यात होणाऱ्या घटना पाहू शकतो, आणि त्यांपैकी काही गोष्टी घडण्यापूर्वीच आपल्याला सांगतो. आपण त्या पाहू शकत नसलो, तरी आपल्या कल्पना शक्तीचा वापर करून त्यांचं चित्र डोळ्यांपुढे उभं करू शकतो. आणि त्या नक्कीच घडतील असा विश्वास आपण बाळगू शकतो.—२ करिंथ. ४:१८.
२, ३. (क) कल्पना शक्तीचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो? (ख) या लेखात आपण कोणत्या दोन प्रश्नांचा विचार करणार आहोत?
२ पण कधीकधी आपण अशा काही गोष्टींची कल्पना करत असतो, ज्या घडणं शक्यच नसतं. उदाहरणार्थ, एक लहान मुलगी जर फुलपाखरावर बसून उडण्याची कल्पना करत असेल, तर हे फक्त कल्पनेच्या जगातच पूर्ण होण्यासारखं आहे. नाही का? पण शमुवेलाच्या आईचा, म्हणजे हन्नाचा विचार करा. तिनं निवासमंडपात यहोवाच्या सेवेसाठी आपल्या मुलाला अर्पण करण्याचं वचन दिलं होतं. पण तो दिवस १ शमु. १:२२) आपणदेखील जेव्हा यहोवानं दिलेल्या अभिवचनांची कल्पना करतो, तेव्हा त्या केवळ कल्पना नसतात तर खरोखर पूर्ण होणाऱ्या गोष्टी असतात.—२ पेत्र १:१९-२१.
येईपर्यंत ती नेहमी त्या दिवसाचा विचार करत राहिली. ही गोष्ट केवळ तिची एक कल्पना नव्हती तर तिनं असं करण्याचा निश्चय केला होता. पण, त्या दिवसाचं चित्र आपल्या मनात सतत ताजं ठेवल्यामुळे यहोवाला दिलेलं वचन पूर्ण करण्याची ताकद तिला मिळाली. (३ बायबल काळातही यहोवाच्या बऱ्याच सेवकांनी, त्यानं दिलेल्या अभिवचनांची कल्पना केली होती. पण, असं केल्यानं त्यांना काय फायदा झाला? आणि देवाची अभिवचनं पूर्ण होतील तेव्हा आपलं जीवन कसं असेल, याची कल्पना करणं आपल्यासाठीही फायद्याचं का आहे?
भविष्याची कल्पना केल्यानं त्यांचा विश्वास दृढ झाला
४. भविष्यात पुन्हा चांगले दिवस येतील अशी कल्पना करणं हाबेलाला का शक्य झालं?
४ यहोवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवणारा, हाबेल हा पहिला पुरूष होता. आदाम आणि हव्वेनं पाप केल्यानंतर यहोवानं सापाला काय म्हटलं हे त्याला माहीत होतं. यहोवानं म्हटलं, “तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यांमध्ये मी परस्पर वैर स्थापेन; ती तुझे डोके फोडेल, व तू तिची टाच फोडशील.” (उत्प. ३:१४, १५) हे नेमकं कसं पूर्ण होईल हे हाबेलाला माहीत नव्हतं. पण, देवानं जे म्हटलं त्यावर त्यानं खूप विचार केला असावा. कदाचित त्याच्या मनात असा प्रश्नही आला असेल, ‘साप ज्याची टाच फोडेल आणि जो मानवांना पुन्हा परिपूर्ण होण्यास मदत करेल, तो कोण असेल?’ हाबेलानं नेमका काय विचार केला असेल हे आपल्याला माहीत नाही. पण त्याला याची पक्की खात्री होती, की यहोवानं जे काही अभिवचन दिलं होतं ते तो नक्की पूर्ण करेल. म्हणूनच जेव्हा त्यानं यहोवासाठी अर्पण आणलं तेव्हा यहोवानं ते मान्य केलं.—उत्पत्ति ४:३-५; इब्री लोकांस ११:४ वाचा.
५. भविष्याविषयी विचार केल्यानं हनोखाला कसा फायदा झाला?
५ देवावर भक्कम विश्वास असणारी आणखी एक व्यक्ती म्हणजे हनोख. तो दुष्ट लोकांमध्ये राहात होता. ते लोक देवाची निंदा करायचे. पण तरी, त्यानं धैर्यानं देवाचा संदेश त्यांना सांगितला. यहोवा दुष्टांचा नाश करणार आहे असं त्यानं लोकांना सांगितलं. (यहू. १४, १५) असं करण्याकरता त्याला कशामुळे मदत झाली? जिथं प्रत्येक जण यहोवाचा उपासक असेल अशा जगाची कल्पना कदाचित त्यानं केली असावी.—इब्री लोकांस ११:५, ६ वाचा.
६. जलप्रलयानंतर नोहानं कोणत्या गोष्टींचा विचार केला असेल?
६ नोहाचादेखील यहोवावर विश्वास होता. त्यामुळेच जलप्रलयातून त्याचा बचाव झाला. (इब्री ११:७) आणि त्याच्या या विश्वासामुळेच त्यानं यहोवाला प्राण्यांचं अर्पण केलं. (उत्प. ८:२०) पण, जलप्रलयानंतर पुन्हा एकदा जगात दुष्टाई पसरली. त्या वेळी निम्रोदाचं राज्य होतं. आणि सर्वांनी यहोवाविरुद्ध बंड करावं अशी निम्रोदाची इच्छा होती. (उत्प. १०:८-१२) पण अशा परिस्थितीतही नोहाचा विश्वास डळमळला नाही. हाबेलाप्रमाणेच त्यालाही याची खात्री होती, की एक ना एक दिवस पाप आणि मृत्यू यांना देव कायमचा काढून टाकेल. शिवाय, एकही क्रूर शासक नसेल अशा काळाचं स्वप्नही त्यानं पाहिलं असेल. आपणही नोहाप्रमाणे, लवकरच येणाऱ्या अशा सुंदर काळाची कल्पना करू शकतो.—रोम. ६:२३.
देवाची अभिवचनं पूर्ण होतील त्या काळाची स्वप्नं त्यांनी पाहिली
७. अब्राहाम, इसहाक आणि याकोब कोणत्या काळाची कल्पना करू शकले?
७ अब्राहाम, इसहाक आणि याकोब हेदेखील एका सुंदर भविष्याची कल्पना करू शकले. कारण, त्यांच्या “संततीच्या” द्वारे सर्व राष्ट्रांना आशीर्वादित केलं जाईल असं अभिवचन यहोवानं त्यांना दिलं होतं. (उत्प. २२:१८; २६:४; २८:१४) त्यांच्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण होईल आणि वचन दिलेल्या एका सुंदर देशात ते राहतील असंही अभिवचन यहोवानं त्यांना दिलं. (उत्प. १५:५-७) यहोवानं दिलेली ही सर्व अभिवचनं नक्कीच पूर्ण होतील असा विश्वास त्यांना होता. म्हणूनच त्या देशात आपलं कुटुंब जणू राहतच आहे अशी कल्पना ते करू शकले. खरंतर आदाम व हव्वेनं पाप केलं तेव्हापासूनच, मानवाला परिपूर्ण जीवन कसं मिळेल हे समजण्यासाठी यहोवानं आपल्या विश्वासू सेवकांना मदत केली आहे.
८. भक्कम विश्वास दाखवण्यासाठी आणि आज्ञाधारक राहण्यासाठी अब्राहामाला कशामुळे मदत झाली?
८ भक्कम विश्वासामुळेच, अगदी कठीण परिस्थितीतही अब्राहाम यहोवाला आज्ञाधारक राहू शकला. अब्राहाम आणि त्याच्यासारखे इतर एकनिष्ठ सेवक आपल्या आयुष्यात यहोवाच्या अभिवचनांना पूर्ण होताना पाहू शकले नाहीत. पण तरी, या अभिवचनांचं स्पष्ट चित्र त्यांच्या मनात होतं. म्हणूनच बायबल त्यांच्याविषयी म्हणतं, “त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले.” (इब्री लोकांस ११:८-१३ वाचा.) गतकाळात यहोवानं आपलं प्रत्येक अभिवचन पूर्ण केलं आहे हे अब्राहामाला माहीत होतं. आणि पुढेही त्यानं दिलेलं प्रत्येक अभिवचन तो नक्कीच पूर्ण करेल याचीही त्याला खात्री होती.
९. यहोवाच्या अभिवचनांवर विश्वास असल्यामुळे अब्राहामाला कशी मदत मिळाली?
९ यहोवानं अब्राहामाला जे अभिवचन दिलं होतं त्यावर त्याचा विश्वास होता. म्हणूनच यहोवानं जे काही त्याला करण्यासाठी सांगितलं ते सर्व तो करत राहिला. उदाहरणार्थ, ऊर शहरातलं आपलं राहतं घर त्यानं सोडलं आणि नंतर तो कधीच एका ठिकाणी, एका शहरात राहिला नाही. त्याला माहीत होतं, की त्याच्या आजूबाजूच्या शहरांमधले शासक यहोवाचे उपासक नसल्यामुळे ही शहरं जास्त काळ टिकू शकणार नाहीत. (यहो. २४:२) तसंच, यहोवा त्याच्या शासनाद्वारे पृथ्वीवर कायमस्वरूपी राज्य करेल त्या काळाचीदेखील तो वाट पाहत होता. या शासनालाच ‘मजबूत पाया असलेले व देवाने योजलेले व बांधलेले नगर’ म्हटले आहे. (इब्री ११:१०) अब्राहाम व त्यासोबतच हाबेल, हनोख, नोहा आणि अशा कित्येक विश्वासू सेवकांनी पुनरुत्थानावर आपला विश्वास दाखवला. त्यामुळे, जेव्हा जेव्हा सुंदर पृथ्वीवर सदासर्वकाळ जीवन जगण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं, तेव्हा तेव्हा त्यांचा यहोवावरील विश्वास आणखी भक्कम होत गेला.—इब्री लोकांस ११:१५, १६ वाचा.
१०. यहोवाच्या अभिवचनांवर विचार केल्यानं सारेला कसा फायदा झाला?
१० अब्राहामाच्या पत्नीचा म्हणजे सारेचादेखील यहोवाच्या अभिवचनांवर पक्का विश्वास होता. ती ९० वर्षांची होती व तिला एकही मूल नव्हतं. पण तरी, तिला मूल होईल त्या दिवसाची वाट ती पाहत राहिली. इतकंच नव्हे, तर आपल्या संततीचं मोठं राष्ट्र बनलं आहे अशी कल्पनाही ती करू शकली. (इब्री ११:११, १२) तिला या सर्व गोष्टींची इतकी पक्की खात्री कशामुळे होती? कारण यहोवानं अब्राहामाला म्हटलं होतं, “मी तिला आशीर्वादित करेन, एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन; मी तिला आशीर्वादित करेन, तिच्यापासून राषट्रे उद्भवतील, तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपजतील.” (उत्प. १७:१६) यहोवानं अभिवचन दिल्याप्रमाणे सारेला इसहाक झाला. या चमत्कारामुळे, यहोवाची इतर अभिवचनंही नक्की पूर्ण होतील अशी खात्री तिला पटली. यहोवानं दिलेल्या सुंदर अभिवचनांचा विचार करण्याद्वारे आपणही आपला विश्वास भक्कम करू शकतो.
त्याची दृष्टी प्रतिफळावर होती
११, १२. मोशेचं यहोवावरील प्रेम कशामुळे वाढत गेलं?
११ मोशेचादेखील यहोवाच्या अभिवचनांवर विश्वास होता. इजिप्तमध्ये एक राजकुमार म्हणून तो लहानाचा मोठा झाला. पण इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा यहोवावर जास्त प्रेम असल्यामुळे, त्यानं सत्तेकडे आणि वैभवाकडे पाहिलं नाही. त्याच्या इब्री पालकांकडून त्याला यहोवाबद्दल शिकायला मिळालं. इस्राएलांना दास्यातून सोडवून वचन दिलेल्या देशात नेण्याचं अभिवचन यहोवानं दिलं आहे, असं त्याच्या पालकांनी त्याला सांगितलं. (उत्प. १३:१४, १५; निर्ग. २:५-१०) या अभिवचनांचा मोशे जितका जास्त विचार करत राहिला, तितकंच यहोवावरील त्याचं प्रेम आणखी वाढत गेलं.
१२ देवाच्या अभिवचनांवर विचार करताना, नेमक्या कोणत्या गोष्टी त्याच्या मनात होत्या? बायबल आपल्याला सांगतं: “मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले; पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर इब्री ११:२४-२६.
दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले; ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे ही मिसर देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले; कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती.”—१३. यहोवाच्या अभिवचनांवर विचार करत राहिल्यामुळे मोशेला कसा फायदा झाला?
१३ यहोवानं, इस्राएलांना दिलेल्या अभिवचनावर मोशेनं नक्कीच खोलवर विचार केला असावा. यहोवाच्या इतर सेवकांप्रमाणेच मोशेलादेखील माहीत होतं, की यहोवा सर्व मानवजातीला मृत्यूपासून सोडवणार आहे. (ईयो. १४:१४, १५; इब्री ११:१७-१९) त्यामुळे मानवजातीवर यहोवाचं खूप प्रेम आहे हे मोशे समजू शकला. याचा परिणाम म्हणजे, यहोवावरील त्याचं प्रेम आणखी वाढत गेलं आणि विश्वासही मजबूत झाला. शिवाय, तो आयुष्यभर यहोवाची सेवा करू शकला. (अनु. ६:४, ५) फारो आपल्याला ठार मारणार आहे हे माहीत असूनही मोशे घाबरला नाही. कारण भविष्यात यहोवा आपल्याला प्रतिफळ देईल याची त्याला पूर्ण खात्री होती.—निर्ग. १०:२८, २९.
नवीन जगाविषयी नेहमी विचार करत राहा
१४. भविष्याविषयी लोक काय विचार करतात?
१४ बरेच लोक भविष्याविषयी विचार करताना अशी काही स्वप्न रंगवतात, जी कधीच पूर्ण होण्यासारखी नसतात. जसं की, काही गरीब लोक श्रीमंत होऊन ऐशआरामात जीवन जगण्याचं स्वप्न पाहतात. पण बायबल सांगतं, की सैतानाच्या या जगात जीवन नेहमीच “कष्टमय व दुःखमय” असेल. (स्तो. ९०:१०) काही लोक असाही विचार करतात, की मानवी सरकारच जगातील समस्यांना काढून टाकेल. पण, केवळ देवाचं राज्यच हे साध्य करेल असं बायबल सांगतं. (दानी. २:४४) हे जग कधीच बदलणार नाही असंही काहींना वाटतं. पण, देव या दुष्ट जगाचा नाश करेल असं बायबल सांगतं. (सफ. १:१८; १ योहा. २:१५-१७) त्यामुळे, यहोवानं सांगितलेल्या गोष्टींच्या विरोधात स्वतःच्या कल्पना लढवणाऱ्या लोकांची शेवटी निराशाच होईल.
१५. (क) नवीन जगाची कल्पना करणं आपल्यासाठी फायद्याचं का आहे? (ख) नवीन जगात तुम्हाला काय करायला आवडेल?
१५ पण, यहोवानं मात्र एका सुंदर भविष्याचं अभिवचन आपल्याला दिलं आहे. त्या काळाचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं केल्यामुळे आनंदी राहण्यास आपल्याला मदत होते. शिवाय, यहोवाची सेवा करत राहण्यासाठी लागणारं धैर्यदेखील आपल्याला मिळतं. आपली आशा स्वर्गीय जीवनाची असो किंवा पृथ्वीवरील, भविष्याबद्दल कल्पना करणं खरोखरंच फायद्याचं ठरू शकतं. देवाचं राज्य आलं आहे, त्याची सर्व अभिवचनं पूर्ण झाली आहेत, आणि तुमच्या आवडीचं काम तुम्ही तिथं करत आहात अशी कल्पना तुम्ही करू शकता का? पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची कल्पना करून पाहा. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मिळून पृथ्वीचं सुंदर बागेत रूपांतर करत आहात. या कामाची देखरेख करणाऱ्यांना तुमची काळजी आहे, त्यामुळे तुम्ही अगदी आनंदानं आणि उत्साहानं काम करत आहात. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येकाचं, तुमच्याप्रमाणेच यहोवावर प्रेम आहे. तुमचं आरोग्य अगदी उत्तम आहे. तुम्हाला आता कशाचीच चिंता नाही. यहोवाच्या स्तुतीसाठी आणि इतरांच्या मदतीसाठी तुम्ही तुमच्या कौशल्यांचा व क्षमतांचा वापर करत आहात. यामुळे तुम्हाला खूप आनंद होत आहे. ज्यांचं पुनरुत्थान झालं आहे त्यांना यहोवाबद्दल जाणून घेण्यास तुम्ही मदत करत आहात. (योहा. १७:३; प्रे. कृत्ये २४:१५) जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टींची कल्पना करता तेव्हा ते केवळ एक स्वप्न नसतं; कारण या सर्व गोष्टी खरोखरच पूर्ण होतील अशी खात्री बायबल आपल्याला देतं.—यश. ११:९; २५:८; ३३:२४; ३५:५-७; ६५:२२.
नवीन जगाविषयी इतरांशी बोलत राहा
१६, १७. भविष्याबद्दल इतरांशी बोलत राहिल्यानं काय फायदा होतो?
१६ नवीन जगात आपल्याला काय करायला आवडेल याविषयी आपण आपल्या बांधवांसोबत बोललं पाहिजे. असं करण्याद्वारे, सुंदर भविष्याबद्दल विचार करत राहण्यास रोम. १:११, १२.
आपण एकमेकांना मदत करत असतो. हे खरं आहे की तिथं आपण नेमकं काय करणार हे आपल्याला माहीत नाही. पण, ज्या भविष्याची आपण वाट पाहत आहोत, त्याविषयी बोलत राहिल्यानं यहोवाच्या अभिवचनांवर आपला विश्वास असल्याचं आपण दाखवून देतो. शिवाय, पौल व रोममधील बांधवांप्रमाणे आपण एकमेकांना कठीण परिस्थितीतही यहोवाची सेवा करत राहण्याचं उत्तेजन देतो.—१७ तुम्ही जेव्हा भविष्याबद्दल विचार करता तेव्हा तुमच्या व्यक्तिगत समस्यांचा तुम्हाला विसर पडतो. एके प्रसंगी पेत्र खूप चिंतित होता. त्यानं येशूला विचारलं, “पाहा, आम्ही सर्व सोडून आपल्यामागे आलो आहो, तर आम्हाला काय मिळणार?” येशूची इच्छा होती, की पेत्र आणि इतर शिष्यांनी भविष्याबद्दल विचार करावा. म्हणूनच त्यानं पेत्राला म्हटलं, “मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल तेव्हा माझ्यामागे आलेले तुम्हीही बारा राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्यायनिवाडा कराल. आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरता सोडली आहेत त्याला अनेकपटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल.” (मत्त. १९:२७-२९) येशूच्या या उत्तरामुळेच, पेत्र आणि इतर शिष्य स्वतः येशूसोबत स्वर्गात राज्य करत आहेत अशी कल्पना करू शकले. शिवाय, पृथ्वीवरील आज्ञाधारक मानवजातीला परिपूर्ण होण्यास ते मदत करत आहेत अशीही कल्पना ते करू शकले.
१८. देवानं अभिवचन दिलेल्या काळाचा विचार करत राहणं आपल्यासाठी फायद्याचं का आहे?
१८ यहोवाच्या सेवकांना आपला विश्वास मजबूत करण्यासाठी कशामुळे मदत मिळाली हे आपण पाहिलं. यहोवाच्या अभिवचनानुसार हाबेलानं एका सुंदर भविष्याची कल्पना केली. त्याच्या या विश्वासामुळेच त्यानं यहोवाचं मन आनंदित केलं. ‘संततीबद्दल’ यहोवानं दिलेल्या अभिवचनाच्या पूर्णतेवर अब्राहामानं आपली दृष्टी लावली. त्यामुळे कठीण असूनही यहोवाची आज्ञा पाळणं त्याला शक्य झालं. (उत्प. ३:१५) मोशेनंही प्रतिफळावर आपली नजर ठेवली, आणि त्यामुळे यहोवावर प्रेम करण्यास व विश्वासू राहण्यास त्याला मदत झाली. (इब्री ११:२६) या विश्वासू सेवकांप्रमाणे आपणही यहोवानं अभिवचन दिलेल्या काळाचं चित्र नेहमी आपल्या डोळ्यांसमोर ठेवू या. यामुळे, यहोवाप्रती आपलं प्रेम आणि विश्वास आणखी वाढत जाईल. आपल्या कल्पना शक्तीचा वापर आणखी कोणत्या मार्गानं करता येईल, याविषयी आपण पुढील लेखात पाहू या.