व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘बांधवांच्या मदतीसाठी हातभार लावण्याच्या बहुमानाचा’ तुम्हाला आनंद होतो का?

‘बांधवांच्या मदतीसाठी हातभार लावण्याच्या बहुमानाचा’ तुम्हाला आनंद होतो का?

‘बांधवांच्या मदतीसाठी हातभार लावण्याच्या बहुमानाचा’ तुम्हाला आनंद होतो का?

फिलिप्पै येथील आरंभीचे ख्रिस्ती, खऱ्‍या उपासनेला सढळ हाताने मदत करणारे म्हणून नावाजलेले होते. प्रेषित पौलाने देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या पत्रात त्यांना म्हटले: “मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानितो; पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची सहभागिता तिच्यामुळे तसे करितो; आणि तुम्हा सर्वांसाठी नेहमी प्रत्येक विनंतीच्या वेळेस आनंदाने विनंती करितो.” (फिलिप्पै. १:३-५) लुदिया आणि तिच्या घरातील इतर सदस्यांनी सत्य स्वीकारून बाप्तिस्मा कसा घेतला आणि तिने पौलाला व त्याच्या सोबत प्रचार कार्य करणाऱ्‍यांना तिच्या घरात राहण्याचा कसा आग्रह केला हे पौलाला अजूनही आठवत होते.—प्रे. कृत्ये १६:१४, १५.

या घटनेनंतर काही दिवसांतच, फिलिप्पै येथे स्थापन झालेल्या नवीन मंडळीने, तेथून जवळजवळ १६० किलोमीटर दूर असलेल्या थेस्सलनीका येथील बांधवांबरोबर कित्येक आठवड्यांपासून राहत असलेल्या पौलाला दोन वेळा अन्‍नसामग्री पाठवली होती. (फिलिप्पै. ४:१५, १६) काही वर्षांनंतर, फिलिप्पै व मासेदोनियातील इतर बांधवांवर “कमालीचे दारिद्र्‌य” आल्यामुळे ते अतिशय हलाखीच्या परिस्थितीत होते तरीपण त्यांनी, जेरुसलेम येथे छळ होत असलेल्या ख्रिस्ती बंधुभगिनींना आर्थिक साहाय्य हवे असल्याचे ऐकले तेव्हा त्यांना मदत करण्याची इच्छा व्यक्‍त केली. हे त्यांच्या ‘शक्‍तीपलीकडे’ होते तरीपण ते ‘बांधवांच्या मदतीसाठी हातभार लावण्याचा आम्हालाही बहुमान’ मिळावा असा त्याला आग्रह करीत होते, असे पौलाने म्हटले.—२ करिंथ. ८:१-४, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर; रोम. १५:२६.

फिलिप्पै येथील बांधवांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारून दहा वर्षे उलटल्यानंतरही त्यांची अशीच उदार मनोवृत्ती होती. पौल रोममधील तुरुंगात असल्याचे ऐकल्यावर त्यांनी पौलाला लागणारी सामग्री एपफ्रदीतच्या हातून पाठवली. पौलापर्यंत पोहचण्याकरता, एपफ्रदीतला रस्त्यावरून आणि समुद्रातून जवळजवळ १,२८७ किलोमीटरचा प्रवास करावा लागला होता. पौल तुरुंगात होता तरीसुद्धा त्याने बांधवांचे मनोधैर्य असेच वाढवत राहावे, प्रचार कार्य करीत राहावे म्हणून फिलिप्पै येथील बांधवांनी पौलासाठी हे सर्व पाठवले होते.—फिलिप्पै. १:१२-१४; २:२५-३०; ४:१८.

आज राज्याच्या प्रचार कार्याला व शिष्य बनवण्याच्या कार्याला हातभार लावणे हा एक बहुमान आहे, असे खरे ख्रिस्ती समजतात. (मत्त. २८:१९, २०) ते आपला वेळ, आपली शक्‍ती आणि आर्थिक साहाय्य देऊन या कामाला हातभार लावत आहेत. देवाने दिलेल्या या कार्याला कोणकोणत्या मार्गांनी तुम्हीदेखील हातभार लावू शकता ते सोबत दिलेल्या चौकटीत सांगण्यात आले आहे.

[२२, २३ पानांवरील चौकट]

दान देण्यासाठी काही जण निवडत असलेले मार्ग

जगभरात चाललेल्या कार्यासाठी दान

“जगभरात चाललेल्या कार्यासाठी” असे लिहिलेल्या दानपेटीत दान टाकण्यासाठी बरेच लोक ठराविक रक्कम बाजूला ठेवतात.

दर महिन्याला मंडळ्या ही रक्कम संबंधित देशातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाला पाठवतात. पैशाचे स्वेच्छिक दानदेखील सरळ या शाखा कार्यालयांना पाठवले जाऊ शकते. (खालील मार्गांनी द्यावयाचे स्वेच्छिक दानदेखील तुमच्या देशातील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयाला पाठवले जाऊ शकते.) चेक असतील तर ते “वॉच टावर”ला * देय असावेत. याशिवाय, दागदागिने किंवा इतर मोलवान वस्तुसुद्धा दान केल्या जाऊ शकतात. विशिष्ट वस्तू देणगी म्हणून दिल्या जात आहेत असा उल्लेख केलेले एक संक्षिप्त पत्रही त्यासोबत पाठवणे आवश्‍यक आहे.

सशर्त-दान योजना *

काही देशांमध्ये पैसे अशा खास योजनेत दान केले जाऊ शकतात ज्यामध्ये दात्याला ते हवे असल्यास परत केले जाऊ शकतात. अधिक माहितीसाठी तुमच्या देशात कार्य करणाऱ्‍या स्थानिक शाखा कार्यालयाशी कृपया संपर्क साधावा.

धर्मादाय योजना *

पैशांची देणगी आणि पैशांची सशर्त देणगी यांव्यतिरिक्‍त जगभरातील राज्य सेवेच्या लाभाकरता तुम्ही राहता त्या देशानुसार देण्याचे इतरही मार्ग आहेत. ते असे आहेत:

विमा: वॉच टावर संस्थेला जीवन विमा पॉलिसीचे किंवा रिटायर्मेन्ट/पेन्शन योजनेचे हिताधिकारी बनवले जाऊ शकते.

बँक खाते: बँक खाते, जमा प्रमाण-पत्र किंवा वैयक्‍तिक निवृत्ती खाते स्थानिक बँकेच्या नियमांनुसार वॉच टावर संस्थेला ट्रस्ट म्हणून तुम्ही देऊ शकता किंवा मग मृत्यूनंतर ते संस्थेला मिळेल अशी व्यवस्था करू शकता.

स्टॉक्स आणि बाँड्‌स: स्टॉक्स आणि बाँड्‌सदेखील वॉच टावर संस्थेला थेट दान केले जाऊ शकतात किंवा मृत्यूनंतर हस्तांतर करण्यासाठी हिताधिकारी म्हणून वॉच टावर संस्थेला नामनिर्देशित केले जाऊ शकते.

जमीन-जुमला: विकाऊ जमीन-जुमला थेट दानाच्या स्वरूपात दिला जाऊ शकतो; किंवा निवासी संपत्ती असल्यास, ती संस्थेच्या नावावर करून, जिवंत असेपर्यंत तिचा वापर केला जाऊ शकतो. आपला जमीन-जुमला संस्थेच्या नावावर करण्याआधी तुमच्या देशातील शाखा कार्यालयाशी संपर्क साधा.

दानाची वार्षिक नेमणूक: दानाची वार्षिक नेमणूक ही अशी व्यवस्था आहे ज्यात पैसे किंवा सुरक्षितता वॉच टावर संस्थेच्या नावावर केली जाते. त्याच्या बदल्यात, दात्याला किंवा दात्याने ठरवलेल्या एका व्यक्‍तीला आयुष्यभर दर वर्षाला एक नेमलेली रक्कम मिळते. दानाची वार्षिक नेमणूक ज्या वर्षी ठरवली जाते त्या वर्षी दात्याला आय-करात काही सूट मिळते.

इच्छा-पत्र आणि ट्रस्ट: कायदेशीर इच्छा-पत्रामार्फत तुम्ही तुमची संपत्ती किंवा पैसा कायद्याने वॉच टावर संस्थेच्या नावावर करू शकता किंवा वॉच टावर * संस्थेला ट्रस्ट ॲग्रीमेंटचे हिताधिकारी बनवून आपले इच्छा-पत्र तयार करू शकता. काही देशांत एखादी धार्मिक संस्था ट्रस्टची हिताधिकारी असल्यास करात काही सवलती प्राप्त होऊ शकतात पण भारताच्या बाबतीत हे लागू होत नाही.

“धर्मादाय योजना” या शब्दांवरून सूचित होते त्याप्रमाणे अशा प्रकारच्या दानाकरता दात्याला काही प्रमाणात योजना करावी लागते. यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक कार्याला धर्मादाय योजनेद्वारे साहाय्य करू इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तींची मदत करण्यासाठी इंग्रजी व स्पॅनिश भाषेत चॅरिटेबल प्लॅनिंग टू बेनेफिट किंगडम सर्व्हिस वर्ल्डवाईड * हे माहितीपत्रक तयार करण्यात आले आहे. एखादी व्यक्‍ती आता किंवा मृत्यूनंतर आपल्या मृत्यूपत्रानुसार आपली मालमत्ता भेट म्हणून कोणकोणत्या प्रकारे देऊ शकेल, याबाबतीत अधिक माहिती पुरवण्यासाठी हे माहितीपत्रक लिहिण्यात आले होते. माहितीपत्रक वाचल्यानंतर आणि स्वतःच्या कायदा किंवा कर सल्लागारांचा आणि धर्मादाय योजना कार्यालयाचा सल्ला घेऊन अनेकांना जगभरात यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला हातभार लावता आला आहे आणि त्याच वेळी असे केल्याने मिळणारे कर फायदेदेखील वाढवता आले आहेत.

अधिक माहितीसाठी, तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांशी पत्रव्यवहाराद्वारे किंवा टेलिफोनद्वारे खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा तुमच्या देशाचा कारभार पाहणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

Jehovah’s Witnesses of India,

Post Box ६४४०,

Yelahanka,

Bangalore ५६० ०६४,

Karnataka, India

Telephone: (०८०) २८४६८०७२

[तळटीपा]

^ भारतात हे चेक “द वॉच टावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया”ला देय असावेत.

^ भारताला हे लागू होत नाही

^ सूचना: कराच्या बाबत असलेले नियम विविध देशांत वेगवेगळे असतील. कराच्या नियमांविषयी व योजनेविषयी मत घेण्यासाठी कृपया तुमच्या अकाऊंटंटशी किंवा वकिलाशी संपर्क साधावा. शेवटचा निर्णय घेण्याआधी कृपया स्थानिक शाखा कार्यालयाशीदेखील संपर्क साधावा.

^ भारतात “द वॉच टावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया” हे नाव वापरावे

^ भारतात उपलब्ध नाही