आव्हानांचा सामना करताना तुम्ही फीनहासाचे अनुकरण करू शकता का?
आव्हानांचा सामना करताना तुम्ही फीनहासाचे अनुकरण करू शकता का?
मंडळीचे वडील या नात्याने सेवा करणे हा एक मोठा सुहक्क आहे. असे असले, तरी देवाचे वचन हे कबूल करते की वडिलांना आव्हानांचा सामना करावा लागतो. वडिलांना काही वेळा, चूक करणाऱ्यांची प्रकरणे हाताळावी लागतात तेव्हा ते ‘परमेश्वरासाठी न्याय’ करतात. (२ इति. १९:६) किंवा एखाद्या पर्यवेक्षकाला नेमणूक मिळते तेव्हा मोशेप्रमाणे त्यालाही असे वाटू शकते की त्यासाठी आपण तयार नाही. मोशेला एक नेमणूक देण्यात आली तेव्हा त्याने नम्रपणे असे विचारले: “फारोकडे जाऊन इस्राएलवंशजांस मिसरातून काढून आणणारा असा मी कोण?”—निर्ग. ३:११
ज्या कार्यकारी शक्तीद्वारे वडिलांना नेमले जाते त्याच शक्तीद्वारे शास्त्रवचने लिहिण्यात आली होती व या शास्त्रवचनांत अशा काही पर्यवेक्षकांची जिवंत उदाहरणे नमूद करण्यात आली आहेत ज्यांनी परीक्षांचा यशस्वी रीत्या सामना केला. फीनहास हा एलाजाराचा मुलगा व अहरोनाचा नातू असल्यामुळे पुढे तो महायाजक बनणार होता. फीनहासाच्या जीवनात घडलेल्या तीन घटनांवरून दिसून येते की आज वडिलांनी आव्हानांचा सामना करताना धैर्य व समजूतदारपणा दाखवणे आणि यहोवावर भरवसा ठेवणे जरुरीचे आहे.
तो लगेच ‘उठला’
इस्राएल लोकांनी मवाबाच्या मैदानात तळ दिला तेव्हा फीनहास तरुण होता. इस्राएल लोकांविषयी बायबल म्हणते: “ते मवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले; . . . तेथे ते भोजन करून त्यांच्या देवांना नमन करू लागले.” (गण. २५:१, २) अपराध करणाऱ्या लोकांवर यहोवाने भयानक मरी आणली. या अपराधाबद्दल व मरीबद्दल फीनहासाने ऐकले तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय होती याची तुम्ही कल्पना करू शकता का?
तो अहवाल पुढे म्हणतो: “त्यावेळेस, पाहा, मोशेसमोर व दर्शनमंडपाच्या दाराशी इस्राएलाची सर्व मंडळी जमून रडत असताना एका इस्राएली पुरुषाने एक मिद्यानी बाई त्यांच्यासमक्ष आपल्या भाऊबंदांकडे आणिली.” (गण. २५:६) फीनहास याजक काय करणार होता? तो वयाने लहान होता, आणि अपराध करणारा तो इस्राएली पुरुष देवाची उपासना करण्यात पुढाकार घेणारा एक सरदार होता.—गण. २५:१४.
पण, फीनहासाला मनुष्याचे नव्हे, तर यहोवाचे भय होते. त्याने त्या दोघांना पाहिले तेव्हा त्याने लगेच हातात बरची घेतली आणि त्या इस्राएली पुरुषाच्या पाठोपाठ त्याच्या तंबूत जाऊन त्याने त्या दोघांना बरचीने आरपार भोसकले. फीनहासाने दाखवलेले धैर्य आणि त्याने उचललेले निर्णायक पाऊल पाहून यहोवाला कसे वाटले? यहोवाने लगेच ती मरी थांबवली आणि फीनहासासोबत एक करार केला. या करारानुसार, याजकपद ‘निरंतर’ त्याच्या वंशात राहणार होते. अशा रीतीने यहोवाने त्याला प्रतिफळ दिले.—गण. २५:७-१३.
अर्थात, आज ख्रिस्ती वडील हिंसेचा मार्ग अवलंबत नाहीत. पण, फीनहासाप्रमाणे वडिलांनी धैर्य आणि निर्णायकपणा दाखवण्यास तयार असले पाहिजे. उदाहरणार्थ, गिलेर्मा केवळ काही महिन्यांपासूनच एक वडील म्हणून मंडळीत सेवा करू लागला होता व तेव्हाच त्याला न्यायदान समितीवर काम करण्यास सांगण्यात आले. या प्रकरणात, अपराध करणारी व्यक्ती मंडळीतील एक वडील असून गिलेर्मा तरुण असताना त्यांनी त्याला मदत केली होती. गिलेर्मा म्हणतो: “मला खूप अवघडल्यासारखं वाटलं. रात्री मला झोपही येत नसे. भावनांच्या आहारी न जाता मला देवाच्या दर्जांनुसार हे प्रकरण कसं हाताळता येईल याचाच मी सतत विचार १ तीम. ४:११, १२.
करायचो. मी बऱ्याच दिवसांपर्यंत प्रार्थना केली व बायबल प्रकाशनांमध्ये संशोधन केलं.” यामुळे, गिलेर्माला ही कठीण परिस्थिती हाताळण्याचे धैर्य मिळाले व अपराध करणाऱ्या बांधवाला आध्यात्मिक रीत्या साहाय्य करणे शक्य झाले.—मंडळीत यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यास वडील धैर्य व निर्णायकपणा दाखवतात तेव्हा ते विश्वास व एकनिष्ठेच्या बाबतीत उत्तम उदाहरण मांडतात. अर्थात, एखाद्याने गंभीर अपराध केला आहे असे मंडळीतील इतर ख्रिश्चनांना समजते तेव्हा त्यांनीसुद्धा याबद्दल वडिलांना कळवण्याद्वारे धैर्य दाखवले पाहिजे. त्याच प्रकारे, बहिष्कृत केलेल्या मित्रासोबत किंवा नातेवाइकासोबत सहवास न ठेवण्यासाठी एकनिष्ठेची गरज असते.—१ करिंथ. ५:११-१३.
समजूतदारपणामुळे संकट टळते
तरुण लोक सहसा अविचारीपणे वागतात. पण, फीनहासाने धैर्याने जे कार्य केले ते अविचारीपणाचे नव्हते. फीनहासाने आणखी एका गोष्टीविषयी ऐकले तेव्हा सुज्ञपणे व विचारशीलपणे वागून त्याने समजूतदारपणा कसा प्रदर्शित केला याचा विचार करा. रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी यार्देनेच्या जवळ एक वेदी बांधली, तेव्हा ही वेदी खोटी उपासना करण्यासाठी बांधली गेली आहे असा इतर इस्राएली लोकांनी निष्कर्ष काढला आणि ते त्यांच्यावर चढाई करण्यास तयार झाले.—यहो. २२:११, १२.
फीनहासाने कशी प्रतिक्रिया दाखवली? फीनहासाने इतर इस्राएली सरदारांसोबत मिळून वेदी बांधणाऱ्यांशी सुज्ञपणे बोलणी केली. ज्या वंशांवर दोष लावण्यात आला होता त्यांनी आपली स्थिती स्पष्ट करून सांगितली. त्यांनी सांगितले की ती वेदी खरेतर “परमेश्वरासमोर उपासना” करण्यासाठी बांधण्यात आली होती. अशा प्रकारे एक संकट टळले.—यहो. २२:१३-३४.
एक ख्रिस्ती व्यक्ती, यहोवाच्या एखाद्या सेवकावर लावण्यात आलेल्या दोषाविषयी अथवा त्याच्याबद्दल काही नकारात्मक गोष्टीविषयी ऐकते तेव्हा फीनहासाचे अनुकरण करणे किती सुज्ञपणाचे ठरेल! आपण समजूतदार असल्यास इतरांचे बोलणे मनाला लावून घेणार नाही किंवा आपल्या बांधवांच्या उणिवांबद्दल इतरांना सांगणार नाही.—नीति. १९:११.
समजूतदारपणा वडिलांना फीनहासाप्रमाणे कार्य करण्यास कशी मदत करू शकतो? दहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून मंडळीत वडील म्हणून सेवा करणारे हायमे म्हणतात: “जेव्हा एक प्रचारक मला, दुसऱ्या व्यक्तीसोबत असलेल्या त्याच्या वैयक्तिक मतभेदाविषयी सांगू लागतो तेव्हा कोणाचीही बाजू न घेता मला त्या प्रचारकाला शास्त्रातून मार्गदर्शन देता यावे म्हणून मी लगेच यहोवाला मदत मागतो. एकदा एक बहीण, दुसऱ्या मंडळीतील एका जबाबदार बांधवानं तिला जी वागणूक दिली होती त्याबद्दल तिची वैयक्तिक समस्या घेऊन माझ्याकडे आली. हा बांधव माझा खास मित्र असल्यामुळे याविषयी मी त्याच्याशी सहजपणे बोलू शकलो असतो. त्याऐवजी, मी आणि ती बहीण आम्ही दोघांनी अनेक बायबल तत्त्वांवर तर्क केला आणि ती स्वतः त्या बांधवासोबत बोलण्यास तयार झाली. (मत्त. ५:२३, २४) असं केल्यावरही, लगेच शांती प्रस्थापित झाली नाही. मग, मी तिला शास्त्रवचनातील दुसऱ्या तत्त्वांचा विचार करण्याचा आर्जव केला. त्या समस्येबद्दल तिने परत प्रार्थना करण्याचे व त्या बांधवाला क्षमा करण्याचे ठरवले.”
याचा परिणाम काय झाला? हायमे आठवून सांगतात: “अनेक महिन्यांनंतर ती बहीण माझ्याकडे आली. ज्या नीति. २५:८, NW) समजूतदार वडील, व्यक्तिगत मतभेद असलेल्या ख्रिश्चनांना शांतीचे संबंध वाढीस लावण्यासाठी व शांती प्रस्थापित करण्यासाठी बायबलची तत्त्वे लागू करण्याचे सुज्ञपणे प्रोत्साहन देतात.
बांधवानं तिला वाईट वागणूक दिली होती त्याला नंतर पस्तावा झाला असल्याचं तिनं मला सांगितलं. त्या बांधवानं तिच्यासोबत सेवेत काम करण्याची योजना केली; तो तिच्याशी प्रेमळपणे बोलला व तिच्या चांगल्या गुणांबद्दल त्यानं तिची प्रशंसा केली. अशा प्रकारे हे प्रकरण मिटलं. पण, मी जर स्वतःला उगाचच त्या प्रकरणात गोवलं असतं, तर मी पक्षपाती आहे असं कदाचित वाटलं असतं आणि हे प्रकरण इतक्या सहजासहजी मिटलं नसतं.” बायबल असा सल्ला देते: “न्यायिक प्रकरण हाताळण्याची घाई करू नको.” (त्याने यहोवाला विचारले
फीनहासाला यहोवाच्या निवडलेल्या लोकांचा याजक म्हणून सेवा करण्याचा सुहक्क होता. आधी पाहिल्याप्रमाणे, लहान वयातसुद्धा त्याच्याजवळ असामान्य धैर्य आणि समजबुद्धी होती. पण, यहोवावरील त्याच्या भरवशामुळेच तो आव्हानांना यशस्वी रीत्या तोंड देऊ शकला.
गिब्यातल्या बन्यामीन वंशातील पुरुषांनी एका लेव्याच्या उपपत्नीवर बलात्कार करून तिचा खून केला, तेव्हा इतर वंशातील लोक बन्यामीन वंशजांविरुद्ध युद्ध लढण्यास जमा झाले. (शास्ते २०:१-११) लढाईला जाण्याआधी त्यांनी मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली, पण दोनदा ते हरले आणि त्यात त्यांचे भारी नुकसान झाले. (शास्ते २०:१४-२५) यावरून, आपल्या प्रार्थना निरर्थक होत्या असा निष्कर्ष त्यांनी काढला का? जे घोर कृत्य करण्यात आले होते त्याच्याविरुद्ध त्यांनी पाऊल उचलावे अशी खरोखर यहोवाची इच्छा होती का?
इस्राएलाचा महायाजक फीनहास पुन्हा एकदा आत्मविश्वासाने पुढे आला. त्याने प्रार्थना केली: “आमचे भाऊबंद बन्यामिनी ह्यांच्याशी लढावयाला पुन्हा एकदा जावे काय? किंवा लढण्याचे सोडून द्यावे?” यहोवाने बन्यामिनी लोकांना त्यांच्या हाती दिले आणि त्यांनी गिब्याला जाळून बेचिराख केले. अशा प्रकारे यहोवाने त्याच्या प्रार्थनेचे उत्तर दिले.—शास्ते २०:२७-४८.
यावरून आपण कोणता धडा शिकू शकतो? मंडळीतील समस्या हाताळण्यास वडील जन फार प्रयत्न करतात व देवाच्या मदतीसाठी प्रार्थनाही करतात. तरीसुद्धा काही समस्या तशाच राहतात. असे घडल्यास, वडिलांनी येशूचे पुढील शब्द लक्षात ठेवावेत: “मागा [किंवा प्रार्थना करत राहा] म्हणजे तुम्हास दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हास सापडेल; ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल.” (लूक ११:९) आपल्या प्रार्थनेचे उत्तर मिळण्यास वेळ लागत आहे असे वाटत असले, तरी यहोवा त्याच्या नियुक्त समयी आपल्या प्रार्थनेचे उत्तर देईल याची खातरी वडील बाळगू शकतात.
उदाहरणार्थ, आयर्लंडमधील एका मंडळीला राज्य सभागृहाची अत्यंत गरज होती, पण त्यासाठी त्यांना स्थानिक नियोजन अधिकाऱ्याची मंजुरी मिळाली नाही. ज्या ठिकाणी राज्य सभागृह बांधायचे होते त्याचे बांधवांनी सादर केलेले सर्व प्रस्ताव त्याने नामंजूर केले. आता केवळ एकच अधिकारी, म्हणजे त्या संपूर्ण विभागाचा मुख्य नियोजन अधिकारीच केवळ हे प्रस्ताव मंजूर करू शकत होता. फीनहासाच्या काळात जशी प्रार्थना सहायक ठरली तशी आता ठरणार होती का?
त्या भागातील एक वडील सांगतात: “खूप प्रार्थना व विनंत्या केल्यानंतर आम्ही मुख्य नियोजन अधिकाऱ्याच्या कार्यालयात गेलो. मला असं सांगण्यात आलं की कितीतरी आठवडे मुख्य अधिकाऱ्याला भेटणं शक्य नाही. पण, केवळ पाच मिनिटांसाठी त्याला भेटणं आम्हाला शक्य झालं. आम्ही पुन्हा आखलेल्या योजना त्यानं पाहिल्यानंतर त्यानं लगेच आम्हाला बांधकाम सुरू करण्याची परवानगी दिली. आणि तेव्हापासून स्थानिक नियोजन अधिकाऱ्यानं आम्हाला हरतऱ्हेनं मदत केली. प्रार्थनेत किती सामर्थ्य असतं हे या अनुभवावरून आम्हाला दिसून आलं.” होय, यहोवावर विसंबून राहणाऱ्या वडिलांच्या प्रामाणिक प्रार्थनांचे उत्तर तो नक्कीच देईल.
प्राचीन इस्राएलमध्ये फीनहासावर मोठी जबाबदारी होती. पण, धैर्य, समजबुद्धी आणि यहोवावरील भरवसा यांमुळे तो आव्हानांचा यशस्वी रीत्या सामना करू शकला. आणि त्याने ज्या प्रकारे देवाच्या मंडळीची काळजी घेतली, त्यावरून त्याला यहोवाची मंजुरी मिळाली. याच्या सुमारे हजार वर्षांनंतर, एज्राने देवाच्या प्रेरणेने असे लिहिले: “पूर्वीच्या काळी फिनहास बिन एलाजार हा त्यांचा सरदार असे; परमेश्वर त्याच्याबरोबर असे.” (१ इति. ९:२०) आज देवाच्या लोकांमध्ये पुढाकार घेणाऱ्यांच्या बाबतीत, किंबहुना देवाच्या सर्व विश्वासू ख्रिश्चनांच्या बाबतीत हे शब्द खरे ठरोत.