कायम टिकून राहणारे प्रेम विकसित करा
कायम टिकून राहणारे प्रेम विकसित करा
‘प्रेम सर्वकाही सहन करते. प्रेमाचा कधीही अंत होत नाही.’—१ करिंथ. १३:७, ८, NW.
१. (क) आज प्रेम सहसा कशा प्रकारे लोकांसमोर सादर केले जाते? (ख) आज अनेक लोक कोणावर व कशावर प्रेम करतात?
प्रेम या विषयावर आजवर बरेच काही लिहिण्यात आले आहे. अनेक गीतांतून प्रेमाचे गुणगान व स्तुती करण्यात आली आहे. प्रेम ही माणसाची मूलभूत गरज आहे. पण पुस्तकांमधून आणि चित्रपटांमधून सहसा काल्पनिक प्रेमकथांच्या स्वरूपात ते सादर केले जाते. आणि अशा साहित्याची बाजारात मुळीच कमी नाही. दुसरीकडे पाहता देवावरील व शेजाऱ्यांवरील खरे प्रेम अभावानेच पाहायला मिळते, ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. शेवटल्या दिवसांविषयी बायबलमध्ये जे काही भाकीत करण्यात आले होते ते आज प्रत्यक्षात पाहायला मिळते. माणसे ‘केवळ स्वतःवर, स्वतःच्या पैशावरच प्रेम करतात आणि देवाऐवजी सुखोपभोगावर प्रीती करतात.’—२ तीम. ३:१-५, सुबोध भाषांतर.
२. चुकीच्या धारणेवर आधारित असलेल्या प्रेमाविषयी बायबल काय ताकीद देते?
२ मानवांमध्ये मुळातच प्रेम व्यक्त करण्याची कुवत आहे. असे असले तरीसुद्धा बायबल, आपल्याला चुकीच्या धारणेवर आधारित असलेल्या प्रेमापासून सावध राहण्याची ताकीद देते. आणि अशा प्रकारचे प्रेम एखाद्याच्या अंतःकरणात मूळ धरते १ तीम. ६:९, १०) प्रेषित पौलाने देमासविषयी काय लिहिले होते ते तुम्हाला आठवते का? तो पौलाचा सहकारी असला तरीही त्याला जगातील गोष्टी प्रिय वाटू लागल्या होत्या. (२ तीम. ४:१०) याच धोक्यासंबंधी प्रेषित योहानाने ख्रिश्चनांना सावध केले. (१ योहान २:१५, १६ वाचा.) एखाद्याला जगावर अथवा जगातल्या क्षणभंगुर गोष्टींवर प्रेम करणे आणि त्याच वेळी देवावर व देवापासून येणाऱ्या गोष्टींवर प्रेम करणे शक्य नाही.
तेव्हा काय घडते याचेही बायबल वर्णन करते. (३. आपल्यासमोर कोणते आव्हान आहे आणि त्यामुळे कोणते प्रश्न उपस्थित होतात?
३ आपण या जगात राहत असलो तरी या जगाचे भाग नाही. त्यामुळे, प्रेमाविषयी असलेला जगाचा विकृत दृष्टिकोन टाळण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. जगाच्या या विकृत किंवा अनुचित प्रेमाच्या सापळ्यात आपण अडकू नये म्हणून दक्षता बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर मग, आपण कोणासाठी तत्त्वावर आधारित प्रेम विकसित व प्रदर्शित करावे? कायम टिकून राहणारे प्रेम विकसित करण्यास कोणत्या गोष्टी आपली मदत करतात? आणि असे केल्याने आज आणि भविष्यातही आपल्याला कोणते लाभ मिळतील? या प्रश्नांबद्दल देवाचा दृष्टिकोन जाणून घेणे जरुरीचे आहे, जेणेकरून त्यानुसार वागणे आपल्याला शक्य होईल.
यहोवासाठी प्रेम विकसित करणे
४. देवावरील प्रेम कशा प्रकारे वाढते?
४ यहोवासाठी प्रेम विकसित करण्याची तुलना शेतकऱ्याच्या कामाशी करता येईल. शेतकरी आधी जमीन तयार करतो, बी पेरतो आणि मग रोपांची वाढ होण्याची वाट पाहतो. (इब्री ६:७) त्याचप्रमाणे, देवावरील आपले प्रेमही सतत वाढले पाहिजे. त्यासाठी काय करण्याची गरज आहे? राज्याचे बी अंतःकरणात पेरले जाते. त्यामुळे आपल्या अंतःकरणाची जमीन आपण चांगल्या प्रकारे तयार केली पाहिजे. आणि त्यासाठी देवाच्या वचनाचा मनापासून अभ्यास करणे जरुरीचे आहे. असे केल्याने देवाबद्दलचे आपले ज्ञान वाढेल. (कलस्सै. १:१०) तसेच, नियमितपणे मंडळीच्या सभांना उपस्थित राहिल्याने आणि सभांमध्ये सहभाग घेतल्यानेसुद्धा आपल्या ज्ञानात वृद्धी होण्यास मदत मिळेल. तर मग, देवाच्या वचनाचे सखोल ज्ञान मिळवण्यासाठी आपण प्रत्येक जण सातत्याने प्रयत्न करत आहोत का?—नीति. २:१-७.
५. (क) यहोवाच्या प्रमुख गुणांविषयी आपण कसे शिकू शकतो? (ख) न्याय, बुद्धी आणि शक्ती या देवाच्या गुणांबद्दल तुम्ही काय सांगू शकता?
५ यहोवाने त्याच्या वचनातून मानवांना त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिली आहे. तेव्हा, शास्त्रवचनांचा अभ्यास केल्याने आणि सातत्याने देवाचे ज्ञान घेतल्याने आपल्याला त्याच्या गुणांविषयी अर्थात न्याय, शक्ती, बुद्धी आणि सर्वात मुख्य म्हणजे, प्रेम या त्याच्या सर्वश्रेष्ठ गुणाविषयी अधिक जाणून घेण्याची संधी मिळते. यहोवाच्या मार्गांतून आणि त्याच्या परिपूर्ण नियमांतून त्याचा न्याय दिसून येतो. (अनु. ३२:४; स्तो. १९:७) यहोवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींवर आपण मनन करतो तेव्हा त्याची बुद्धी किती अफाट आहे हे जाणून थक्क होतो. (स्तो. १०४:२४) तसेच, तो अमर्याद शक्ती-सामर्थ्याचा उगम आहे हे देखील विश्वातील अनेक गोष्टींतून सिद्ध होते.—यश. ४०:२६.
६. देवाने मानवजातीबद्दल प्रेम कसे व्यक्त केले आणि याचा तुमच्यावर कोणता प्रभाव पडला आहे?
६ देवाचा सर्वश्रेष्ठ गुण प्रेम याबद्दल काय म्हणता येईल? ते इतके व्यापक आहे की त्यात अखिल मानवजातीला सामावून घेण्याची ताकद आहे. मानवजातीच्या मुक्तीसाठी खंडणीची तरतूद करून देवाने आपले हे प्रेम व्यक्त केले. (रोमकर ५:८ वाचा.) देवाने केलेली ही तरतूद संपूर्ण मानवजातीसाठी उपलब्ध असली, तरी जे लोक देवाच्या प्रेमाला प्रतिसाद देतात आणि त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतात केवळ अशांनाच तिचा लाभ होतो. (योहा. ३:१६, ३६) आपल्या पापाच्या प्रायश्चित्तासाठी देवाने येशूचे बलिदान दिले त्याबद्दल आपल्याही मनात प्रेम दाटून आले पाहिजे.
७, ८. (क) देवावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? (ख) कोणत्या परिस्थितीतसुद्धा देवाचे उपासक चिकाटीने त्याच्या आज्ञा पाळतात?
७ देवाने आपल्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल आपण १ योहा. ५:३) खरोखर, यहोवा देवावरील आपले प्रेमच आपल्याला त्याच्या आज्ञांचे पालन करण्याची प्रेरणा देते. आणि त्यामुळेच आपण इतरांना त्याच्या नावाची व सर्वांच्या लाभासाठी असलेल्या त्याच्या राज्याची साक्ष देतो. हे पूर्ण अंतःकरणाने केल्यास आपण निःस्वार्थ हेतूने प्रेरित होऊन देवाच्या आज्ञा पाळतो हे दिसून येईल.—मत्त. १२:३४.
प्रेम कसे व्यक्त करू शकतो? याचे बायबलमध्ये दिलेले उत्तर लक्ष देण्याजोगे आहे: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” (८ राज्य संदेशाप्रती लोक थंड प्रतिसाद दाखवतात किंवा त्याचा उघडउघड विरोध करतात, तरीसुद्धा जगभरातील बंधुभगिनी चिकाटीने देवाच्या आज्ञा पाळतात. कोणत्याही गोष्टीमुळे ते आपले सेवा कार्य पूर्ण करण्यापासून माघार घेत नाहीत. (२ तीम. ४:५) त्याचप्रमाणे, आपणही इतरांना देवाचे ज्ञान देण्यास व देवाच्या इतर सर्व आज्ञा पाळण्यास प्रवृत्त होतो.
प्रभू येशू ख्रिस्तावर आपण प्रेम का करतो?
९. ख्रिस्ताने कायकाय सहन केले आणि त्याला कोणत्या गोष्टीमुळे प्रेरणा मिळाली?
९ देवावर प्रेम करण्यासोबतच त्याच्या पुत्रावरही प्रेम करण्याची अनेक कारणे आपल्याजवळ आहेत. आपण प्रत्यक्ष येशूला पाहिले नसले तरी आपण त्याच्याविषयीचे ज्ञान घेतो तेव्हा त्याच्याबद्दल आपले प्रेम आणखी गहिरे होते. (१ पेत्र १:८) येशूने कोणकोणत्या गोष्टी सोसल्या? तो आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करत असताना लोकांनी त्याचा विनाकारण द्वेष केला, त्याचा छळ केला, त्याच्यावर खोटे आरोप लावले, त्याची निर्भर्त्सना केली आणि इतर प्रकारेही त्याचा अपमान केला. (योहान १५:२५ वाचा.) पण, त्याच्या स्वर्गीय पित्यावरील प्रेमामुळे त्याने या सर्व गोष्टी सोसल्या. तसेच, प्रेमाने प्रवृत्त होऊन त्याने जे बलिदान दिले त्यामुळे पुष्कळांना खंडणी मिळाली.—मत्त. २०:२८.
१०, ११. ख्रिस्ताने आपल्यासाठी जे काही केले त्याच्या बदल्यात काय करण्याचे आपले लक्ष्य आहे?
१० येशूचे उदाहरण आपल्याला प्रेरणा देते. त्याने आपल्याकरता जे केले आहे त्यावर विचार केल्याने, त्याच्याबद्दल आपले प्रेम आणखी गहिरे होते. त्याचे अनुयायी असल्यामुळे आपणही ख्रिस्तासारखे प्रेम विकसित करण्याचे व ते सातत्याने दाखवत राहण्याचे लक्ष्य आपल्यासमोर ठेवले पाहिजे. असे केल्यामुळे राज्याविषयी साक्ष देण्याची व शिष्य बनवण्याची जी आज्ञा येशूने आपल्याला दिली आहे तिचे प्रामाणिकपणे पालन करत राहणे आपल्याला शक्य होईल.—मत्त. २८:१९, २०.
११ ख्रिस्ताने मानवजातीवर जे प्रेम केले त्याबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेमुळे, अंत येण्यापूर्वी आपल्यावर सोपवलेले कार्य पूर्ण करण्यास आपण प्रवृत्त होतो. (२ करिंथकर ५:१४, १५ वाचा.) ख्रिस्ताला मानवजातीसंबंधी असलेला देवाचा उद्देश पूर्ण करण्यास प्रामुख्याने प्रेमानेच प्रेरणा दिली. आणि ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून चालल्याने देवाचा तो उद्देश पूर्ण करण्यात आपल्या प्रत्येकाला सहभाग घेणे शक्य होते. त्यासाठी देवाबद्दलचे प्रेम विकसित करण्याचा आपण होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. (मत्त. २२:३७) येशूने जे काही शिकवले त्याकडे लक्ष देण्याद्वारे आणि त्याच्या आज्ञांचे पालन करण्याद्वारे आपले त्याच्यावर प्रेम असल्याचे व कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यावे लागले तरी देवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करण्याचा आपला पक्का निर्धार असल्याचे आपण दाखवतो.—योहा. १४:२३, २४; १५:१०.
प्रेमाच्या सर्वोत्कृष्ट मार्गाचे अनुसरण करा
१२. “एक सर्वोत्कृष्ट मार्ग” असे जे पौलाने म्हटले त्याचा काय अर्थ होतो?
१२ प्रेषित पौलाने स्वतः ख्रिस्ताचे अनुकरण केले होते. म्हणून, बांधवांनी आपले अनुकरण करावे असे तो त्यांना आर्जवू शकला. (१ करिंथ. ११:१) रोग्यांना बरे करणे, अन्य भाषांत बोलणे यांसारख्या पहिल्या शतकात अस्तित्वात असलेल्या आत्म्याच्या काही देणग्या प्राप्त करत राहण्याचे प्रोत्साहन त्याने करिंथच्या ख्रिश्चनांना दिले असले, तरी साध्य करण्यासारखे याहीपेक्षा चांगले काहीतरी असल्याचे त्याने त्यांना दाखवून दिले. १ करिंथकर १२:३१ मध्ये त्याने असा खुलासा केला: “एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हास दाखवितो.” पुढील वचनांवरून स्पष्ट होते, की हा सर्वोत्कृष्ट मार्ग प्रेमाचा मार्ग होता. कोणत्या अर्थाने तो सर्वोत्कृष्ट होता? पौलाने हे उदाहरणाच्या साह्याने स्पष्ट केले. (१ करिंथकर १३:१-३ वाचा.) त्याच्याजवळ काही उल्लेखनीय क्षमता असत्या आणि त्याने अनेक मोठमोठ्या गोष्टी साध्य केल्या असत्या, पण त्याच्याजवळ प्रेम नसते तर त्याचा काही उपयोग झाला असता का? मुळीच नाही. देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली त्याने हे महत्त्वपूर्ण सत्य स्पष्ट केले. खरोखर, पौलाने किती जोरदारपणे हा मुद्दा मांडला!
१३. (क) २०१० चे वार्षिक वचन काय आहे? (ख) कोणत्या अर्थाने प्रेमाचा कधीही अंत होत नाही?
१३ प्रेम नेमके काय आहे आणि काय नाही हे पौल आपल्याला पुढे सांगतो. (१ करिंथकर १३:४-८ वाचा.) प्रेमाची वैशिष्ट्ये लक्षात घेत असताना तुम्ही अशा प्रकारचे प्रेम दाखवत आहात किंवा नाही हे तपासून पाहा. ७ व्या वचनाच्या शेवटच्या व ८ व्या वचनाच्या पहिल्या भागावर विशेष लक्ष द्या जे म्हणते: ‘प्रेम सर्वकाही सहन करते. प्रेमाचा कधीही अंत होत नाही.’ हेच २०१० चे वार्षिक वचन असेल. पौलाने ८ व्या वचनात जे म्हटले ते लक्षात घ्या. ख्रिस्ती मंडळीची नव्याने स्थापना झाली तेव्हा अस्तित्वात असलेल्या आत्म्याच्या देणग्या अर्थात भविष्यवाणी करणे, अन्य भाषा बोलणे या सर्व संपतील किंवा त्यांचा अंत होईल असे त्याने म्हटले. पण, प्रेम मात्र कायम टिकून राहील. यहोवा स्वतः प्रेमाचे स्वरूप आहे आणि त्याला अंत नाही. तेव्हा, प्रेमाचासुद्धा कधीही अंत होणार नाही. सनातन देवाचा प्रमुख गुण असल्यामुळे प्रेमसुद्धा सदा सर्वकाळ अस्तित्वात राहील.—१ योहा. ४:८.
प्रेम सर्वकाही सहन करते
१४, १५. (क) प्रेम कशा प्रकारे परीक्षा सहन करण्यास आपल्याला मदत करते? (ख) एका तरुण बांधवाने आपल्या ख्रिस्ती विश्वासाशी तडजोड करण्यास का नकार दिला?
१४ जीवनात कोणतीही संकटे, अडीअडचणी किंवा समस्या आल्यास त्या सहन करण्यास कोणती गोष्ट ख्रिश्चनांना मदत करते? तत्त्वावर आधारित असलेले प्रेम. या प्रेमात काही भौतिक गोष्टींचा त्याग करणे इतकेच समाविष्ट नाही. तर, आपली निष्ठा टिकवून ठेवण्याची आणि वेळ पडल्यास ख्रिस्तासाठी मरणही पत्करण्याची तयारी दाखवणे समाविष्ट आहे. (लूक ९:२४, २५) दुसऱ्या महायुद्धादरम्यान व त्यानंतरच्या काळात साक्षीदारांना छळ छावण्यांमध्ये, श्रम शिबिरांमध्ये आणि तुरुंगांत यातना सहन कराव्या लागल्या तेव्हा त्यांनी जो विश्वासूपणा दाखवला त्याचा विचार करा.
१५ विल्हेल्म नावाच्या एका जर्मन साक्षीदाराच्या उदाहरणावरून हे आणखी स्पष्ट होते. त्याने नाझींच्या गोळीबार हल्ल्यात मरण पत्करले, पण आपली निष्ठा सोडली नाही. आपल्या कुटुंबाला लिहिलेल्या शेवटच्या पत्रात त्याने असे लिहिले: “सगळ्यात मुख्य म्हणजे आपला नेता येशू ख्रिस्त याने आज्ञा दिल्याप्रमाणे आपण देवावर प्रेम केले पाहिजे. आपण त्याला विश्वासू राहिलो, तर तो नक्कीच आपल्याला प्रतिफळ देईल.” पुढे त्याच्या कुटुंबातील एका सदस्याने एका टेहळणी बुरूज लेखात लिहिले: “खडतर काळातून जात असतानासुद्धा, आमच्या कुटुंबानं नेहमी देवाच्या प्रेमाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं.” हीच मनोवृत्ती सध्या आर्मीनिया, एरिट्रिया, दक्षिण कोरिया व इतर देशांत तुरुंगवासात असलेले आपले बांधव दाखवत आहेत. कठीण परिस्थितीतही यहोवावरील त्यांचे प्रेम कमी झालेले नाही.
१६. मलावीतील आपल्या बांधवांना कायकाय सहन करावे लागले?
१६ अनेक ठिकाणी आपल्या बांधवांना वेगळ्या प्रकारच्या परीक्षांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या विश्वासाची व सहनशक्तीची परीक्षा होते. उदाहरणार्थ, मलावीमध्ये तब्बल २६ वर्षांपर्यंत यहोवाच्या साक्षीदारांना सरकारी बंदी, प्रखर विरोध व क्रूर वागणूक सहन करावी लागली. पण, त्यांना त्यांच्या सहनशीलतेचे प्रतिफळ मिळाले. त्या देशात छळ सुरू झाला तेव्हा तेथे सुमारे १८,००० साक्षीदार होते. पण, तीस वर्षांनंतर त्यांची संख्या दुप्पटहून अधिक वाढून ३८,३९३ इतकी झाल्याचे दिसून आले. जगातल्या इतर भागांतही असेच परिणाम दिसून आले आहेत.
१७. काहींना सत्यात नसलेल्या कुटुंबीयांकडून कशा प्रकारची वागणूक सहन करावी लागली आणि ती सहन करणे त्यांना कशामुळे शक्य झाले?
मत्त. १०:३५, ३६) उदाहरणार्थ, काही किशोरवयीन तरुणांना सत्यात नसलेल्या पालकांचा विरोध सहन करावा लागला आहे. काहींना तर घरातून बाहेर घालवण्यात आले, पण प्रेमळ साक्षीदारांनी त्यांना आपल्या घरात आश्रय दिला. इतर काहींना त्यांच्या कुटुंबीयांनी परक्यासारखे वागवले. अशी वाईट वागणूक सहन करणे त्यांना कशामुळे शक्य झाले? केवळ आपल्या ख्रिस्ती बंधुभगिनींवरील प्रेमामुळेच नव्हे, तर सर्वात मुख्य म्हणजे यहोवावर व त्याच्या पुत्रावर असलेल्या प्रेमामुळे त्यांना हे शक्य झाले.—१ पेत्र १:२२; १ योहा. ४:२१.
१७ देवाच्या लोकांवर उघडपणे हल्ले होतात तेव्हा त्यांचा सामना करणे निश्चितच सोपे नसते. पण, काही ख्रिश्चनांना स्वतःच्या कुटुंबाकडूनच विरोधाला तोंड द्यावे लागते. अशा प्रकारच्या विरोधाला तोंड देणे अधिकच कठीण असते. कुटुंबातील सदस्यांकडून किंवा जवळच्या नातेवाइकांकडून विरोध होतो तेव्हा खूप मनस्ताप होतो. असे घडेल याबद्दल येशूने आधीच भाकीत केले होते का? होय, आणि अनेकांनी हे अनुभवलेही आहे. (१८. सर्वकाही सहन करणारे प्रेम ख्रिस्ती पतीपत्नींना कसे साहाय्यक ठरू शकते?
१८ सर्वकाही सहन करणारे प्रेम जीवनात आणखीनही अनेक बाबतींत दाखवण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, वैवाहिक जीवनात अशा प्रेमामुळेच पतीपत्नीला येशूच्या पुढील शब्दांचा आदर करणे शक्य होते: “देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” (मत्त. १९:६) ख्रिस्ती पतीपत्नींना वैवाहिक जीवनात “हालअपेष्टा” भोगाव्या लागतात, तेव्हा त्यांनी स्वतःला याची आठवण करून द्यावी की यहोवा हा त्यांच्या वैवाहिक जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. (१ करिंथ. ७:२८) देवाचे वचन म्हणते, की ‘प्रेम सर्वकाही सहन करते.’ ख्रिस्ती पतीपत्नी अशा प्रकारचे प्रेम दाखवतात तेव्हा एकमेकांना जडून राहण्याचे व आपले वैवाहिक बंधन टिकवून ठेवण्याचे मनोधैर्य त्यांना मिळते.—कलस्सै. ३:१४.
१९. नैसर्गिक संकटे ओढवतात तेव्हा देवाचे लोक काय करतात?
१९ नैसर्गिक आपत्ती कोसळते तेव्हा देखील प्रेमच आपल्याला सर्वकाही सहन करण्यास मदत करते. पेरूच्या दक्षिण भागात भूकंप झाला आणि कटरीना नावाच्या वादळाच्या तडाख्यामुळे अमेरिकेच्या आखातातील काही भाग उद्ध्वस्त झाला तेव्हा या प्रेमाचा प्रत्यय आला. या आपत्तींत आपले अनेक बांधव बेघर झाले, त्यांची बरीच वित्तहानी झाली. त्या वेळी जगभरातील अनेक ख्रिस्ती बांधवांनी प्रेमामुळे प्रवृत्त होऊन मदत सामग्री पुरवली. तसेच, अनेक स्वयंसेवक बांधवांनी आपत्तीत सापडलेल्या आपल्या बांधवांची घरे नव्याने बांधून दिली व राज्य सभागृहांची दुरुस्ती केली. अशा प्रेमळ कृत्यांवरून हेच सिद्ध होते, की आपले बांधव सर्व प्रसंगी एकमेकांवर प्रेम करतात व त्यांची काळजी घेतात.—योहा. १३:३४, ३५; १ पेत्र २:१७.
प्रेमाचा कधीही अंत होत नाही
२०, २१. (क) प्रेमाचा मार्ग सर्वश्रेष्ठ का आहे? (ख) तुम्ही प्रेमाचा मार्ग अनुसरण्याचा निर्धार का केला आहे?
२० प्रेमाचा सर्वोत्कृष्ट मार्ग अनुसरणे किती लाभदायक ठरते याची आज यहोवाच्या लोकांकडे पाहिल्यावर खातरी पटते. प्रेमाचा हा मार्ग खरोखर सर्व प्रसंगी व सर्व बाबतींत श्रेष्ठ ठरतो. प्रेषित पौलाने या गोष्टीवर कशा प्रकारे भर दिला याकडे लक्ष द्या. सर्वप्रथम त्याने सांगितले, की आत्म्याच्या देणग्या कालांतराने नाहीशा होतील आणि ख्रिस्ती मंडळी बाल्यावस्थेतून प्रौढतेपर्यंत प्रगती करेल. शेवटी त्याने म्हटले: “विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे.”—१ करिं १३:१३.
२१ आज ज्या गोष्टींविषयी आपण विश्वास बाळगतो त्या कालांतराने वास्तवात उतरतील. त्यामुळे त्या गोष्टींविषयी विश्वास बाळगण्याची गरज उरणार नाही. तसेच, देवाच्या अनेक प्रतिज्ञा पूर्ण होण्याची आपण आज आशा बाळगतो. पण, देवाच्या नव्या जगात या प्रतिज्ञा पूर्ण झाल्यानंतर त्यांविषयी आशा बाळगण्याची गरज राहणार नाही. पण, प्रेमाच्या बाबतीत काय म्हणता येईल? प्रेमाचा कधीही अंत होणार नाही. ते कायम टिकून राहील. आपल्यासमोर अनंत जीवन असल्यामुळे नक्कीच देवाच्या प्रेमाचे नित्य नवे पैलू पाहण्याची व समजून घेण्याची संधी आपल्याला लाभेल. कधीही अंत न होणाऱ्या प्रेमाचा सर्वोत्कृष्ट मार्ग अनुसरण्याद्वारे देवाची इच्छा पूर्ण करण्याचा तुम्ही सातत्याने प्रयत्न केल्यास तुम्हाला सर्वकाळचे जीवन मिळेल.—१ योहा. २:१७.
तुमचे उत्तर काय असेल?
• चुकीच्या धारणेवर आधारित असलेल्या प्रेमापासून आपण सावध का असले पाहिजे?
• प्रेम काय सहन करण्यास आपल्याला मदत करते?
• कोणत्या अर्थाने प्रेमाचा कधीही अंत होत नाही?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२७ पानांवरील संक्षिप्त आशय]
२०१० या सालासाठी वार्षिक वचन: ‘प्रेम सर्वकाही सहन करते. प्रेमाचा कधीही अंत होत नाही.’ —१ करिंथ. १३:७, ८, NW.
[२५ पानांवरील चित्र]
देवाबद्दलचे प्रेम आपल्याला साक्ष देण्याची प्रेरणा देते
[२६ पानांवरील चित्र]
अढळ प्रेमामुळेच मलावीतील आपले बंधुभगिनी परीक्षांचा सामना करू शकले