‘ख्रिस्ताला’ का अनुसरावे?
‘ख्रिस्ताला’ का अनुसरावे?
“जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व . . . मला अनुसरावे.”—लूक ९:२३.
१, २. आपण ‘ख्रिस्ताला’ का अनुसरावे यावर विचार करणे महत्त्वाचे का आहे?
यहोवा जेव्हा पृथ्वीवरील आपल्या उपासकांच्या मंडळ्यांमध्ये एकत्रित होणाऱ्यांना पाहतो, तेव्हा त्यांच्यामध्ये तुम्हा नवीन लोकांना व तरुणांना पाहून त्याला अतिशय आनंद होतो! तुम्ही बायबलचा अभ्यास करत असाल, ख्रिस्ती सभांना नियमित उपस्थित राहत असाल व देवाच्या वचनात आढळणाऱ्या जीवनदायक सत्याचे ज्ञानही घेत असाल. पण, यासोबतच येशूच्या पुढील आमंत्रणाकडे तुम्ही गंभीरतेने लक्ष दिले पाहिजे: “जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.” (लूक ९:२३) येशू येथे असे म्हणतो, की तुम्ही आत्मत्याग करून त्याचे अनुयायी बनले पाहिजे. म्हणूनच, ‘ख्रिस्ताला’ का अनुसरावे हा प्रश्न विचारात घेणे महत्त्वाचे आहे.—मत्त. १६:१३-१६.
२ पण, जे आधीपासूनच येशूच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत त्यांच्याविषयी काय? “तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी” असे आपल्याला सांगण्यात आले आहे. (१ थेस्सलनी. ४:१, २) आपल्यापैकी काहींनी अलीकडेच खऱ्या उपासनेचा स्वीकार केलेला आहे, तर काहींनी अनेक दशकांपूर्वी. पण ख्रिस्ताला आपण का अनुसरावे याच्या कारणांचा विचार केल्यास आपल्या सर्वांनाच, पौलाच्या वरील सल्ल्यानुसार आपल्या दैनंदिन जीवनात ख्रिस्ताला अनुसरण्यात उत्तरोत्तर प्रगती करणे शक्य होईल. तर मग, ख्रिस्ताला का अनुसरावे याच्या पाच कारणांविषयी आता आपण चर्चा करू या.
यहोवाच्या आणखी जवळ येण्याकरता
३. कोणत्या दोन मार्गांनी आपण यहोवाविषयी जाणून घेऊ शकतो?
३ पौल “अरीयपगाच्या मध्यभागी उभा राहून” अथेनैकरांना उद्देशून असे म्हणाला: “[माणसांचे] नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा [देवाने] ठरविल्या आहेत; अशासाठी की, त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. प्रे. कृत्ये १७:२२, २६, २७) याचा अर्थ, आपण देवाचा शोध घेऊन त्याला खऱ्या अर्थाने जाणून घेऊ शकतो. उदाहरणार्थ, सृष्टीकडे पाहून आपल्याला देवाच्या गुणांबद्दल व तो काय काय करण्यास समर्थ आहे याबद्दल बरेच काही शिकायला मिळते. सृष्टीतील निरनिराळ्या गोष्टींबद्दल कृतज्ञ मनोवृत्तीने जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपल्या निर्माणकर्त्याबद्दल आपल्याला खूप काही जाणून घेता येते. (रोम. १:२०) त्याचबरोबर, यहोवाने त्याचे लिखित वचन बायबल यातही स्वतःबद्दल बरीच माहिती प्रकट केली आहे. (२ तीम. ३:१६, १७) आपण यहोवाच्या ‘कृत्यांचे मनन’ करतो आणि त्याच्या ‘महत्कृत्यांचा विचार’ करतो तेव्हा आपल्याला यहोवाची आणखी जवळून ओळख घडते.—स्तो. ७७:१२.
तो आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही.” (४. ख्रिस्ताचे अनुसरण केल्याने आपल्याला यहोवाच्या आणखी जवळ येणे कशा प्रकारे शक्य होईल?
४ यहोवाच्या आणखी जवळ येण्याचा एक अतिशय चांगला मार्ग म्हणजे ख्रिस्ताला अनुसरणे. “जग होण्यापूर्वी” येशूला त्याच्या पित्याजवळ जे गौरव होते त्याचा जरा विचार करा. (योहा. १७:५) तो “देवाच्या सृष्टीचे आदिकारण” आहे. (प्रकटी. ३:१४) “सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ” असल्यामुळे तो आपला पिता, यहोवा याच्यासोबत अनेक युगे स्वर्गात राहिला. पृथ्वीवर मानवरूपात येण्याअगोदर आपल्या पित्याच्या सहवासात असताना, येशू सतत त्याच्यासोबत कार्य करत होता. आणि यामुळेच इतर कोणत्याही मनुष्याच्या तुलनेत यहोवासोबत त्याचा अतिशय घनिष्ट व प्रेमळ असा नातेसंबंध जुळला. येशूने आपल्या पित्याच्या कार्य करण्याच्या पद्धतीचे, त्याच्या भावभावनांचे व गुणांचे केवळ निरीक्षणच केले नाही तर त्याच्या पित्याकडून त्याला जे काही शिकायला मिळाले ते सर्व त्याने आत्मसात केले व स्वीकारले. परिणामस्वरूप हा आज्ञाधारक पुत्र अगदी आपल्या पित्यासारखा बनला—इतका, की बायबलमध्ये त्याला “अदृश्य देवाचे प्रतिरूप” म्हणण्यात आले आहे. (कलस्सै. १:१५) त्यामुळेच, ख्रिस्ताचे जवळून अनुसरण केल्याने आपण यहोवाच्या आणखी जवळ येऊ शकतो.
यहोवाचे आणखी चांगल्या प्रकारे अनुकरण करण्यासाठी
५. यहोवाचे आणखी चांगल्या प्रकारे अनुकरण करण्यास कोणती गोष्ट आपल्याला साहाय्य करेल आणि का?
५ आपल्याला देवाच्या ‘प्रतिरूपाचे व त्याच्याशी सदृश असे’ निर्माण करण्यात आले असल्यामुळे आपल्यामध्ये देवाच्या गुणांचे अनुकरण करण्याची कुवत आहे. (उत्प. १:२६) ‘देवाची प्रिय मुले ह्या नात्याने त्याचे अनुकरण’ करण्याचे प्रेषित पौलाने ख्रिश्चनांना प्रोत्साहन दिले. (इफिस. ५:१) ख्रिस्ताला अनुसरल्यामुळे आपल्याला आपल्या स्वर्गीय पित्याच्या गुणांचे अनुकरण करण्यास साहाय्य मिळेल. कारण, इतर कोणाहीपेक्षा येशूने देवाची विचारसरणी, त्याच्या भावना व त्याचे व्यक्तिमत्त्व उत्तमरित्या प्रदर्शित केले. तसेच, यहोवाविषयी त्याने जितक्या स्पष्टपणे शिकवले तितके इतर कोणीही शिकवले नाही. पृथ्वीवर असताना, येशूने लोकांना केवळ यहोवाचे नावच सांगितले नाही. तर या नावामागील व्यक्तीचीही त्याने लोकांना खऱ्या अर्थाने ओळख करून दिली. (मत्तय ११:२७ वाचा.) ती कशी? आपल्या वागण्याबोलण्यातून, शिकवणींतून व उदाहरणातून.
६. येशूच्या शिकवणींतून यहोवाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळते?
६ देवाला आपल्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत आणि त्याच्या उपासकांकडे तो कोणत्या दृष्टिकोनाने पाहतो हे येशूने त्याच्या शिकवणींतून स्पष्ट केले. (मत्त. २२:३६-४०; लूक १२:६, ७; १५:४-७) उदाहरणार्थ, “व्यभिचार करू नको” या दहा आज्ञांपैकी असलेल्या एका आज्ञेचा येशूने उल्लेख केला. पण, व्यभिचाराचे कृत्य घडण्यापूर्वी मनुष्याच्या अंतःकरणात जे विचार येतात त्यांबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे याचाही खुलासा येशूने केला. त्याने म्हटले: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” (निर्ग. २०:१४; मत्त. ५:२७, २८) नियमशास्त्रातील एका विधानाचा परूशांनी असा अर्थ लावला होता, की आपण ‘आपल्या शेजाऱ्यावर प्रीति करावी व आपल्या वैऱ्याचा द्वेष करावा.’ येशूने मात्र याविषयी यहोवाचा काय दृष्टिकोन आहे हे सांगितले. तो म्हणाला: “तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीति करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.” (मत्त. ५:४३, ४४; निर्ग. २३:४; लेवी. १९:१८) देवाचे विचार व त्याचा दृष्टिकोन, तसेच आपल्याकडून त्याच्या कोणत्या अपेक्षा आहेत हे आपण जितक्या चांगल्या प्रकारे समजून घेऊ, तितकेच त्याचे अनुकरण करणे आपल्याला सोपे जाईल.
७, ८. येशूच्या उदाहरणावरून आपल्याला यहोवाबद्दल काय शिकायला मिळते?
७ आपला पिता कसा आहे हे येशूने स्वतःच्या उदाहरणातूनही दाखवले. येशूला गरजू लोकांबद्दल करुणा होती. दुःखीकष्टी लोकांबद्दल त्याने सहानुभूती व्यक्त केली. लहान मुलांना दटावणाऱ्या आपल्या शिष्यांवर तो रागावला. या सर्व गोष्टी जेव्हा आपण शुभवर्तमानातील वृत्तान्तांत वाचतो, तेव्हा त्याच्या पित्याच्या भावनांचीच झलक आपल्याला मिळत नाही का? (मार्क १:४०-४२; १०:१३, १४; योहा. ११:३२-३५) येशूच्या कार्यांतून देवाचे प्रमुख गुण कशा प्रकारे दिसून येतात याचा विचार करा. ख्रिस्ताने केलेल्या चमत्कारांतून त्याच्याजवळ असलेले असीम सामर्थ्य दिसून येत नाही का? पण या सामर्थ्याचा त्याने कधीही स्वतःच्या फायद्याकरता किंवा इतरांना इजा करण्याच्या हेतूने उपयोग केला नाही. (लूक ४:१-४) लोभी व्यापाऱ्यांना त्याने मंदिरातून हाकलून लावले तेव्हा त्याची न्यायबुद्धी किती स्पष्टपणे दिसून आली! (मार्क ११:१५-१७; योहा. २:१३-१६) त्याच्या शिकवणी व लोकांच्या मनाचा ठाव घेणारी त्याची कृपावचने यांवरून त्याची बुद्धी “शलमोनापेक्षा थोर” असल्याचे दिसून आले. (मत्त. १२:४२) आणि इतरांसाठी आपल्या जिवाचे बलिदान देऊन येशूने जे प्रेम व्यक्त केले त्याविषयी जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा “ह्यापेक्षा कोणाची प्रीति मोठी नाही” हेच शब्द आपल्या मनात येत नाहीत का?—योहा. १५:१३.
८ देवाच्या पुत्राने त्याच्या प्रत्येक शब्दातून व कृतीतून यहोवाचे गुण इतके हुबेहूब प्रतिबिंबित केले की तो असे म्हणू शकला: “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.” (योहान १४:९-११ वाचा.) त्याअर्थी, ख्रिस्ताला अनुसरणे हे यहोवाचे अनुकरण करण्यासारखेच आहे.
येशू यहोवाचा अभिषिक्त आहे
९. येशू देवाचा अभिषिक्त केव्हा व कशा प्रकारे बनला?
९ सा.यु. २९ मध्ये ३० वर्षीय येशू, बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाजवळ आला तेव्हा काय घडले? “बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला आणि पाहा, आकाश उघडले तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला.” त्या क्षणी तो ख्रिस्त किंवा मशीहा बनला. त्याच वेळी, येशू आपला अभिषिक्त असल्याचे यहोवाने स्वतः जाहीर केले. तो म्हणाला: “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” (मत्त. ३:१३-१७) ख्रिस्ताला अनुसरण्याचे हे देखील एक चांगले कारण नाही का?
१०, ११. (क) “ख्रिस्त” या पदवीचा येशूच्या संदर्भात कोणकोणत्या पद्धतीने वापर करण्यात आला आहे? (ख) आपण येशू ख्रिस्ताला का अनुसरावे?
१० बायबलमध्ये येशूच्या संदर्भात “ख्रिस्त” ही पदवी वेगवेगळ्या पद्धतींनी वापरण्यात आली आहे. प्रथम, “येशू ख्रिस्त” म्हणजेच आधी त्याचे नाव आणि मग त्याची पदवी. येशूने स्वतः पहिल्यांदा अशा रीतीने स्वतःला संबोधले होते. आपल्या पित्याला प्रार्थनेत तो असे म्हणाला: “सार्वकालिक योहा. १७:३) येशू ख्रिस्त या संज्ञेवरून ज्याला देवाने पाठवले होते व जो त्याचा अभिषिक्त बनला त्या येशूकडे लक्ष वेधले जाते. याउलट, “ख्रिस्त येशू” या संज्ञेत नावाच्या आधी पदवी लावली जाते. या संबोधनात येशू या व्यक्तीपेक्षा त्याच्या पदवीवर किंवा त्याच्या अधिकारावर भर दिला जातो. (२ करिंथ. ४:५) त्याच प्रकारे, काही ठिकाणी येशूला फक्त “ख्रिस्त” म्हटलेले आहे. यातूनही मशीहा या नात्याने येशूच्या अधिकाराकडे लक्ष वेधले जाते.—प्रे. कृत्ये ५:४२.
जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (११ “ख्रिस्त” या पदवीचा येशूच्या संदर्भात वरीलपैकी कोणत्याही पद्धतीने वापर केला तरीसुद्धा त्यावरून हेच महत्त्वाचे सत्य पुढे येते: देवाच्या पुत्राने पृथ्वीवर मनुष्याच्या रूपात येऊन आपल्या पित्याची इच्छा प्रकट केली असली, तरीसुद्धा तो केवळ एक सर्वसामान्य मनुष्य किंवा फक्त एक संदेष्टा नव्हता; तर, त्याला यहोवाने अभिषिक्त केले होते. देवाच्या या अभिषिक्ताला आपण नक्कीच अनुसरले पाहिजे.
फक्त येशूद्वारेच तारण शक्य आहे
१२. मृत्यूच्या थोड्याच काळाआधी येशूने प्रेषित थोमाच्या प्रश्नाचे उत्तर देताना कोणते महत्त्वाचे विधान केले होते?
१२ मशीहाला अनुसरण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण, येशूने आपल्या मृत्यूच्या केवळ काही तासांपूर्वी आपल्या विश्वासू प्रेषितांना जे म्हटले त्यावरून समजते. स्वर्गात आपल्या प्रेषितांकरता जागा तयार करण्याविषयी येशूने सांगितले तेव्हा थोमाने त्याला एक प्रश्न विचारला होता. त्यावर येशूने असे म्हटले: “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.” (योहा. १४:१-६) त्यावेळी येशू आपल्या ११ विश्वासू प्रेषितांशी बोलत होता. त्याने त्यांना स्वर्गात जागा देण्याचे वचन दिले होते. पण येशूचे शब्द पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेल्यांकरताही अर्थपूर्ण आहेत. (प्रकटी. ७:९, १०; २१:१-४) ते कसे?
१३. येशू हाच “मार्ग” आहे असे का म्हणता येते?
१३ येशू ख्रिस्त हाच “मार्ग” आहे. याचा अर्थ, केवळ त्याच्याचद्वारे आपण देवाजवळ येऊ शकतो. उदाहरणार्थ, प्रार्थनेच्या बाबतीत विचार करा. जर आपण येशूच्या नावाने प्रार्थना केली तरच पिता त्याच्या इच्छेनुसार मागितलेल्या आपल्या विनंत्या पूर्ण करेल असे बायबल आपल्याला सांगते. (योहा. १५:१६) पण, येशू हाच “मार्ग” आहे असे म्हणण्याचे आणखी एक कारण आहे. पापामुळे मानवजात देवापासून दुरावली होती. (यश. ५९:२) म्हणूनच, येशूने “पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण” केला. (मत्त. २०:२८) परिणामस्वरूप बायबल सांगते, ‘येशूचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करिते.’ (१ योहा. १:७) अशा रीतीने, पुत्राने देवासोबत समेट होण्याचा मार्ग आपल्यासाठी खुला केला. (रोम. ५:८-१०) तेव्हा, येशूवर विश्वास ठेवल्याने व त्याच्या आज्ञांचे पालन केल्यानेच आपल्याला देवासोबत चांगला संबंध राखणे शक्य आहे.—योहा. ३:३६.
१४. येशूच “सत्य” आहे असे का म्हणता येते?
१४ मीच “सत्य” आहे असेही येशूने म्हटले. तो नेहमी सत्य बोलला आणि सत्यानुसारच जगला हे खरे आहे. पण, येशूच “सत्य” आहे असे म्हणण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. ते म्हणजे, मशीहाविषयी ज्या अनेक भविष्यवाण्या करण्यात आल्या होत्या, त्या सर्व येशूमध्ये पूर्ण झाल्या. प्रेषित पौलाने लिहिले: “देवाची वचने कितीहि असोत, त्याच्या ठायी होय हे आहे.” (२ करिंथ. १:२०) मोशेच्या नियमशास्त्रात ‘पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींची जी छाया’ होती, तिला देखील ख्रिस्त येशूनेच वास्तविक स्वरूप दिले. (इब्री १०:१; कलस्सै. २:१७) सर्व भविष्यवाण्या येशूवरच केंद्रित आहेत आणि यहोवाचा उद्देश पूर्ण होण्यात त्याच्या मुख्य भूमिकेवर त्या प्रकाश टाकतात. (प्रकटी. १९:१०) त्याअर्थी, देवाने आपल्याकरता जे काही उद्देशिले आहे त्याचा फायदा मिळवण्याकरता आपण मशीहाला अनुसरले पाहिजे.
१५. येशूच “जीवन” आहे असे का म्हणता येते?
रोम. ६:२३) ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्याकरताही येशू “जीवन” आहे. (योहा. ५:२८, २९) शिवाय, येशूच्या हजार वर्षांच्या राज्यात तो मुख्य याजकाच्या भूमिकेत काय करेल याचा विचार करा. पृथ्वीवरील आपल्या प्रजेला तो पाप व मृत्यूपासून कायमचे मुक्त करेल!—इब्री ९:११, १२, २८.
१५ येशूच “जीवन” आहे कारण त्याने आपल्या रक्ताने मानवजातीला विकत घेतले. आणि ‘प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे’ देव आपल्याला सार्वकालिक जीवनाचे कृपादान देतो. (१६. येशूला अनुसरण्याचे कोणते कारण आपल्याजवळ आहे?
१६ अशा रीतीने, येशूने थोमाला दिलेले उत्तर आपल्याकरता अतिशय अर्थपूर्ण आहे. येशूच मार्ग, सत्य व जीवन आहे. जगाचे तारण व्हावे म्हणून देवाने त्यालाच पाठविले. (योहा. ३:१७) आणि त्याच्याकडे आल्याशिवाय कोणीही पित्याजवळ येऊ शकत नाही. बायबल अगदी स्पष्टपणे सांगते, “तारण दुसऱ्या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेहि नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.” (प्रे. कृत्ये ४:१२) तेव्हा, पूर्वी आपण काहीही मानत असलो, तरी यापुढे येशूवर विश्वास ठेवून त्याला अनुसरणेच सुज्ञतेचे ठरेल कारण असे केल्यानेच आपल्याला जीवन मिळू शकते.—योहा. २०:३१.
ख्रिस्ताचे ऐकण्याची आपल्याला आज्ञा देण्यात आली आहे
१७. देवाच्या पुत्राचे ऐकणे इतके महत्त्वाचे का आहे?
१७ येशूचे रूपांतर झाले तेव्हा पेत्र, योहान व याकोब तेथे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी स्वर्गातून ही वाणी होताना ऐकली: “हा माझा पुत्र, माझा निवडलेला आहे; ह्याचे तुम्ही ऐका.” (लूक ९:२८, २९, ३५) मशीहाचे ऐकण्याविषयीच्या या आज्ञेचे पालन करणे ही एक गांभीर्याने घेण्याजोगी गोष्ट आहे.—प्रेषितांची कृत्ये ३:२२, २३ वाचा.
१८. आपण येशू ख्रिस्ताचे कशा प्रकारे ऐकू शकतो?
१८ येशूचे ऐकणे याचा अर्थ, ‘त्याच्याकडे पाहणे, व त्याच्या उदाहरणावर विचार करणे.’ (इब्री १२:२, ३) म्हणूनच, बायबलमध्ये तसेच ‘विश्वासू व बुद्धिमान दासाने’ पुरवलेल्या प्रकाशनांत आपण येशूबद्दल जे वाचतो आणि ख्रिस्ती सभांतून त्याच्याबद्दल जे ऐकतो, त्याकडे आपण “विशेष लक्ष लाविले पाहिजे.” (इब्री २:१; मत्त. २४:४५) त्याची मेंढरे या नात्याने आपण त्याचे ऐकण्यास व त्याने दाखवलेल्या मार्गावर चालण्यास उत्सुक असले पाहिजे.—योहा. १०:२७.
१९. ख्रिस्ताला अनुसरत राहण्यास कोणती गोष्ट आपल्याला साहाय्य करेल?
१९ आपल्यासमोर कितीही कठीण परिस्थिती आली तरीसुद्धा आपण ख्रिस्ताला अनुसरत राहू शकतो का? हो, निश्चितच आपण असे करू शकतो. पण त्याकरता, आपण जे काही शिकतो त्याचे ‘ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या आपल्या विश्वासाने व प्रीतीने’ पालन करण्याद्वारे, आपण ‘सुवचनांचा नमुना दृढपणे राखला’ पाहिजे.—२ तीम. १:१३.
तुम्हाला काय शिकायला मिळाले?
• ‘ख्रिस्ताला’ अनुसरल्यामुळे आपण कशा प्रकारे यहोवाच्या आणखी जवळ येतो?
• येशूचे अनुकरण करणे हे यहोवाचे अनुकरण करण्यासारखेच का आहे?
• येशूच “मार्ग, सत्य व जीवन” आहे असे का म्हणता येते?
• यहोवाच्या अभिषिक्ताचे आपण का ऐकले पाहिजे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२९ पानांवरील चित्र]
येशूच्या शिकवणींतून यहोवाचे उच्च विचार व दृष्टिकोन प्रकट झाले
[३० पानांवरील चित्र]
यहोवाच्या अभिषिक्ताचे आपण विश्वासूपणे अनुसरण केले पाहिजे
[३२ पानांवरील चित्र]
यहोवाने म्हटले: ‘हा माझा पुत्र आहे, याचे ऐका’