तुम्हाला आठवते का?
तुम्हाला आठवते का?
तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? पुढील प्रश्नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:
• ख्रिस्ती सचोटी राखणे इतके महत्त्वाचे का आहे?
यहोवावर आपले प्रेम आहे व सैतानाला आपण खोटे ठरवू इच्छितो म्हणून सचोटी दाखवून आपण यहोवाच्या सार्वभौमत्वाची बाजू घेतो. आपल्या सचोटीच्या आधारावर देव आपला न्याय करतो. तेव्हा आपल्या भविष्याच्या आशेसाठी सचोटी राखणे महत्त्वाचे आहे.—१२/१५, पृष्ठे ४-६.
• देवाचा उद्देश पूर्ण करण्यात येशूची भूमिका काय आहे हे सूचित करणारी विशेषणे कोणती?
देवाचा एकुलता एक पुत्र. वचन. आमेन. नवीन कराराचा मध्यस्थ. महायाजक. वचनयुक्त संतती.—१२/१५, पृष्ठे १५.
• पाऊस पडावा म्हणून संदेष्टा एलिया प्रार्थना करत असताना त्याने त्याच्या सेवकास समुद्राकडे दृष्टी लावण्यास का सांगितले? (१ राजे १८:४३-४५)
यावरून एलियाने त्याला जलचक्राचे ज्ञान असल्याचे दाखवून दिले. समुद्रावर तयार झालेले ढग देशावरून वाहत जायचे तेव्हा तेथे पाऊस पडायचा.—१/१, पृष्ठे १५-१६.
• आपल्या सेवेतील आनंद आपण द्विगुणित कसा करू शकतो?
होता होईल तितक्या लोकांना मदत कशी करता येईल हे लक्षात ठेवून आपण आपल्या मनाची तयारी करू शकतो. प्रचार कार्य करत असताना बायबल अभ्यास सुरू करण्याचे ध्येय आपण ठेवू शकतो. लोक उदासीन मनोवृत्ती दाखवतात तेव्हा क्षेत्रातील लोकांना कोणत्या विषयात आवड आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार आपण त्यांच्याशी चर्चा सुरू करू शकतो.—१/१५, पृष्ठे ८-१०.
• अंत्यविधीसंबंधी बायबलमधील सत्य लक्षात घेता यहोवाच्या साक्षीदारांचे अंत्यविधी कसे असले पाहिजेत?
आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा ख्रिश्चन शोक करत असले तरी मृतजन बेशुद्ध अवस्थेत असतात हे त्यांना माहीत असते. यहोवाचे साक्षीदार नसलेले लोक त्यांची टीका करत असले तरीही, मृत लोक जीवित असलेल्या लोकांवर प्रभाव पाडतात या विश्वासाशी निगडित असलेल्या सर्व प्रथा ते टाळतात. काही ख्रिश्चन आपल्या अंत्यविधीच्या व्यवस्थेसंबंधित सर्व तपशील लिहून ठेवतात जेणेकरून पुढे काही समस्या उद्भवणार नाहीत.—२/१५, पृष्ठे २९-३१.
• ‘याशाराचा ग्रंथ’ व ‘परमेश्वराचे संग्राम नावाचा ग्रंथ’ ही दोन पुस्तके बायबलमधून हरवली आहेत का? (यहो. १०:१३; गण. २१:१४)
नाही. बायबलच्या काळात उपलब्ध असलेली ही लिखाणे ईश्वरप्रेरित लिखाणे नसून बायबल लेखकांनी कदाचित त्यांचा संदर्भ घेतला असावा.—३/१५, पृष्ठे ३२.