तुम्ही ‘देवाच्या कृपेचे कारभारी’ आहात का?
तुम्ही ‘देवाच्या कृपेचे कारभारी’ आहात का?
“बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना.”—रोम. १२:१०.
१. देवाच्या वचनातून आपल्याला कोणती आश्वासने मिळतात?
आपण निराश किंवा दुःखी असल्यास यहोवा आपल्या पाठीशी राहून आपले साहाय्य करेल असे त्याचे वचन आपल्याला वारंवार आश्वासन देते. उदाहरणार्थ या सांत्वनदायक शब्दांकडे लक्ष द्या: “पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो, व वाकलेल्या सर्वांना उभे करितो.” “भग्नहृदयी जनांना तो बरे करितो; तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधितो.” (स्तो. १४५:१४; १४७:३) शिवाय आपला स्वर्गीय पिता स्वतः असे म्हणतो: “मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, ‘भिऊ नको, मी तुला साहाय्य करितो.’”—यश. ४१:१३.
२. यहोवा कशा प्रकारे आपल्या लोकांना साहाय्य पुरवतो?
२ पण यहोवा तर अदृश्य स्वर्गात राहतो, मग तो आपला ‘हात कसा काय धरतो’? आपण दुःखाने ‘वाकलेले’ असतो तेव्हा तो कशा प्रकारे आपल्याला ‘उभे करतो?’ यहोवा निरनिराळ्या मार्गांनी ही मदत पुरवतो. उदाहरणार्थ, त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे तो आपल्या लोकांना ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देतो. (२ करिंथ. ४:७; योहा. १४:१६, १७) तसेच, देवाचे प्रेरित वचन बायबल यातील सामर्थ्यशाली संदेशाद्वारेही त्याच्या सेवकांना उभारी मिळते. (इब्री ४:१२) आणखी एखाद्या मार्गाने यहोवा आपल्याला बळ देतो का? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पहिले पेत्र या पुस्तकात सापडते.
‘देवाची नानाविध कृपा’
३. (क) अभिषिक्त ख्रिश्चनांना तोंड द्याव्या लागणाऱ्या परीक्षांविषयी प्रेषित पेत्राने कोणते विधान केले? (ख) पेत्राच्या पहिल्या पत्रातील शेवटच्या भागात कशाविषयी चर्चा करण्यात आली आहे?
३ आत्म्याने अभिषिक्त बांधवांना उद्देशून लिहिताना प्रेषित पेत्र म्हणतो की त्यांच्याकरता स्वर्गात एक अद्भुत प्रतिफळ राखून ठेवलेले असल्यामुळे त्यांनी आनंद मानावा. मग तो असे म्हणतो: “तरी तुम्ही आता थोडा वेळ, भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षांमुळे दुःख सोसले.” (१ पेत्र १:१-६) “निरनिराळ्या” या शब्दाकडे लक्ष द्या. या ख्रिस्ती बांधवांना वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागेल असे या शब्दावरून सूचित होते. पण पेत्र इतकेच म्हणून थांबत नाही. या निरनिराळ्या प्रकारच्या परीक्षांचा आपल्याला सामना करता येईल किंवा नाही, अशी शंका तो बांधवांच्या मनात उत्पन्न होऊ देत नाही. उलट, पेत्र हे स्पष्ट करतो की त्यांच्यासमोर कोणत्याही प्रकारची परीक्षा आली तरीसुद्धा यहोवा त्यांना प्रत्येक परीक्षेला तोंड देण्यास साहाय्य करेल. हे आश्वासन पेत्राच्या पत्रातील शेवटल्या भागात देण्यात आले आहे, ज्यात तो सर्व गोष्टींच्या ‘शेवटाविषयी’ चर्चा करतो.—१ पेत्र ४:७.
४. पहिले पेत्र ४:१० यातील शब्द सांत्वनदायक का आहेत?
४ पेत्र म्हणतो: “प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा.” (१ पेत्र ४:१०) येथे पेत्र पुन्हा एकदा “निरनिराळ्या” याच अर्थाचा “नानाविध” हा शब्द वापरतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, तो असे म्हणतो, की ‘आपल्यावर निरनिराळ्या प्रकारच्या परीक्षा येऊ शकतात, पण देवाची कृपाही नानाविध किंवा निरनिराळ्या मार्गांनी व्यक्त होते.’ हे विधान सांत्वनदायक का आहे? कारण ते आपल्याला असे आश्वासन देते, की आपल्यावर आलेली परीक्षा कोणत्याही प्रकारची का असेना, देव कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याबद्दल त्याची कृपा व्यक्त करून त्या परीक्षेला तोंड देण्यास आपल्याला समर्थ करेल. पण, यहोवा त्याची कृपा नेमकी कशा प्रकारे व्यक्त करेल याबद्दल पेत्राने काय म्हटले याकडे तुम्ही लक्ष दिले का? देव त्याची कृपा आपल्या ख्रिस्ती बांधवांच्या माध्यमाने व्यक्त करेल असे पेत्राच्या शब्दांवरून दिसून येते.
कृपादान “एकमेकांच्या कारणी लावा”
५. (क) प्रत्येक ख्रिश्चनाने काय केले पाहिजे? (ख) कोणत्या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत?
५ ख्रिस्ती मंडळीच्या सगळ्याच सदस्यांना उद्देशून पेत्र म्हणतो: “मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीति करा.” मग तो पुढे असे म्हणतो: “प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा.” (१ पेत्र ४:८, १०) याचा अर्थ असा होतो की आपल्या ख्रिस्ती बांधवांना प्रोत्साहन देण्याकरता मंडळीतील प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. आपल्याला यहोवाच्या मालकीचे असलेले मौल्यवान असे काहीतरी देण्यात आले आहे आणि ते इतरांनाही देण्याचे आपले कर्तव्य आहे. आपल्याला काय देण्यात आले आहे? पेत्राने त्याला “कृपादान” म्हटले. हे कृपादान म्हणजे काय? आणि आपण ते “एकमेकांच्या कारणी” कसे लावू शकतो?
६. ख्रिश्चनांना मिळालेली काही कृपादाने कोणती आहेत?
६ देवाचे वचन म्हणते: “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे.” (याको. १:१७) खरोखरच, यहोवाने आपल्या लोकांना दिलेल्या सगळ्याच गोष्टींतून त्याची कृपा व्यक्त होते. यहोवाने आपल्याला दिलेले एक अतिशय विशेष असे कृपादान म्हणजे त्याचा पवित्र आत्मा. या आत्म्याद्वारे आपल्याला प्रीती, चांगुलपणा व सौम्यता यांसारखे देवाला आवडणारे गुण उत्पन्न करणे शक्य होते. हे गुण आपल्यामध्ये असल्यास आपण आपोआपच आपल्या बांधवांबद्दल आपुलकी व प्रेम व्यक्त करण्यास आणि आपणहून त्यांच्या मदतीला धावून येण्यास प्रवृत्त होतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला सुबुद्धी आणि ज्ञान यांसारख्या देणग्याही मिळवता येतात. (१ करिंथ. २:१०-१६; गलती. ५:२२, २३) खरे पाहता, आपल्याजवळ असलेली शक्ती, क्षमता व कौशल्ये ही सर्व कृपादानेच आहेत आणि आपण त्यांचा उपयोग आपल्या स्वर्गीय पित्याच्या गौरवाकरता केला पाहिजे. तसेच, आपले हे गुण व क्षमता आपल्या बांधवांप्रती देवाची कृपा व्यक्त करण्यासाठी उपयोगात आणण्याचेही आपले कर्तव्य आहे.
‘एकमेकांच्या कारणी लावणे’—ते कसे?
७. (क) “जसे” या शब्दावरून काय सूचित होते? (ख) आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत आणि का?
७ ख्रिश्चनांना मिळालेल्या कृपादानांबद्दल बोलताना पेत्र असेही म्हणतो: “प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे” ते त्याने उपयोगात आणावे. “जसे” या शब्दावरून हे सूचित होते की प्रत्येकाच्या ठायी असणाऱ्या गुणांचे व क्षमतांचे प्रकार व प्रमाण देखील वेगवेगळे असू शकते. तरीसुद्धा, “ते [म्हणजे, त्याला मिळालेले कोणतेही विशिष्ट कृपादान] एकमेकांच्या कारणी लावा” असे प्रत्येकाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. शिवाय, “चांगल्या कारभाऱ्यांप्रमाणे” आपले कृपादान “एकमेकांच्या कारणी लावा” अशी ख्रिश्चनांना आज्ञा देण्यात आली आहे. तेव्हा, आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला हे प्रश्न विचारले पाहिजेत: ‘मला देवाकडून मिळालेली कृपादाने मी माझ्या बांधवांच्या आध्यात्मिक उन्नतीकरता १ तीमथ्य ५:९, १० पडताळून पाहा.) ‘की, यहोवाने मला दिलेल्या क्षमतांचा मी प्रामुख्याने स्वतःच्याच फायद्याकरता, म्हणजे श्रीमंत होण्याकरता किंवा समाजात प्रतिष्ठा मिळवण्याकरता उपयोग करत आहे?’ (१ करिंथ. ४:७) जर आपण आपली कृपादाने ‘एकमेकांच्या कारणी लावली’ तर आपण यहोवाचे मन संतुष्ट करू.—नीति. १९:१७; इब्री लोकांस १३:१६ वाचा.
उपयोगात आणत आहे का?’ (८, ९. (क) जगभरातील ख्रिस्ती आपल्या बांधवांना कोणत्या काही मार्गांनी साहाय्य करतात? (ख) तुमच्या मंडळीतील भाऊ बहिणी कशा प्रकारे एकमेकांना मदत करतात?
८ पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी कशा प्रकारे निरनिराळ्या मार्गांनी आपली कृपादाने एकमेकांच्या कारणी लावली हे देवाच्या वचनात सांगण्यात आले आहे. (रोमकर १५:२५, २६; २ तीमथ्य १:१६-१८ वाचा.) त्याच प्रकारे आजही खरे ख्रिस्ती आपली कृपादाने आपल्या बांधवांच्या हिताकरता उपयोगात आणण्याच्या आज्ञेचे मनापासून पालन करत आहेत. ते कोणत्या काही मार्गांनी असे करत आहेत हे पाहू या.
९ अनेक बांधव सभांमध्ये सादर केल्या जाणाऱ्या भागांची तयारी करण्याकरता कित्येक तास खर्च करतात. त्यांच्या अभ्यासातून त्यांना सापडलेली बायबलमधील मौल्यवान सत्ये जेव्हा ते सभांमध्ये सादर करतात तेव्हा त्यांच्या अर्थभरीत शब्दांमुळे सर्वांना विश्वासात टिकून राहण्याचे प्रोत्साहन मिळते. (१ तीम. ५:१७) अनेक भाऊ बहिणींनी अतिशय प्रेमळ व सहानुभूतीशील असल्याचे नाव कमावले आहे. (रोम. १२:१५) काही जण मंडळीतील निराश व दुःखी असलेल्या बांधवांना नियमितपणे भेटी देतात व त्यांच्यासोबत प्रार्थना करतात. (१ थेस्सलनी. ५:१४) इतर जण, कठीण परिस्थितीतून जात असलेल्या बांधवांना प्रोत्साहनदायक पत्रे लिहितात. आणखी काही जण दुर्बल किंवा वृद्ध बांधवांना मंडळीच्या सभांना येण्यास मदत करतात. हजारो साक्षीदार आपत्तीग्रस्त भागांत मदत कार्यात सहभागी होतात आणि नुकसान झालेल्या घरांच्या पुनर्बांधणीत सहभाग घेतात. या बांधवांनी दाखवलेल्या प्रेमातून व त्यांनी दिलेल्या व्यावहारिक मदतीतून ‘देवाची कृपा नानाविध’ मार्गांनी व्यक्त होते.—१ पेत्र ४:११ वाचा.
जास्त महत्त्वाचे काय आहे?
१०. (क) देवाच्या सेवेत समाविष्ट असलेल्या कोणत्या दोन गोष्टींना पौलाने महत्त्व दिले? (ख) आज आपण पौलाचे अनुकरण कसे करू शकतो?
१० देवाच्या सेवकांना त्यांच्या बांधवांच्या हिताकरता उपयोगात आणता येण्याजोगे कृपादान देण्यात आले आहे. पण त्यासोबतच इतर लोकांना एक संदेश सांगण्याचे कार्यही त्यांच्यावर सोपवण्यात आलेले आहे. या दोन्ही गोष्टी देवाची सेवा करण्यात सामील आहेत हे प्रेषित पौलाने मान्य केले होते. इफिसस येथील मंडळीला लिहिताना त्याने त्यांच्या हिताकरता ‘देवाच्या कृपेचा कारभार’ त्याच्यावर सोपवण्यात आल्याविषयी उल्लेख केला. (इफिस. ३:२, पं.र.भा.) पण, त्यासोबतच त्याने असेही म्हटले: ‘सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हाला पारखून पसंत केले आहे.’ (१ थेस्सलनी. २:४) आपल्यावरही देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्याचे कार्य सोपवण्यात आले आहे, हे पौलाप्रमाणे आपणही ओळखतो. या प्रचाराच्या कार्यात उत्साही सहभाग घेण्याद्वारे आपण पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण करतो, ज्याने सुवार्तेच्या प्रचाराकरता अथक परीश्रम घेतले. (प्रे. कृत्ये २०:२०, २१; १ करिंथ. ११:१) राज्याच्या संदेशाची घोषणा केल्यामुळे आपण लोकांचे जीव वाचवू शकतो हे आपल्याला माहीत आहे. पण हे कार्य करण्यासोबतच आपण आपल्या ख्रिस्ती बांधवांना ‘काही आध्यात्मिक कृपादान देण्याच्या’ संधींकडेही दुर्लक्ष करत नाही. आणि याबाबतीतही आपण पौलाचे अनुकरण करतो.—रोमकर १:११, १२; १०:१३-१५ वाचा.
११. प्रचार करणे व बांधवांना प्रोत्साहन देणे या दोन जबाबदाऱ्यांकडे आपण कोणत्या दृष्टिकोनाने पाहावे?
११ या दोन ख्रिस्ती कार्यांपैकी जास्त महत्त्वाचे कोणते? हे एखाद्या पक्ष्याच्या दोन पंखांपैकी जास्त महत्त्वाचा कोणता असे विचारण्यासारखे आहे. उत्तर अगदी स्पष्ट आहे. आकाशात उडण्यासाठी पक्ष्याला दोन्ही पंखांची गरज असते. त्याच प्रकारे, ख्रिस्ती या नात्याने आपली जबाबदारी खऱ्या अर्थाने पूर्ण करण्यासाठी देवाच्या सेवेतील हे दोन्ही पैलू तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणूनच, सुवार्तेचा प्रचार करणे आणि आपल्या बांधवांना प्रोत्साहन देणे या आपल्यावर सोपवण्यात आलेल्या दोन जबाबदाऱ्या एकमेकांशी संबंधित नाहीत असा विचार आपण करू नये. उलट प्रेषित पेत्र व पौल यांच्याप्रमाणे, या दोन्ही जबाबदाऱ्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असा दृष्टिकोन आपण बाळगला पाहिजे. याचा काय अर्थ होतो?
१२. यहोवा कशा प्रकारे आपला उपयोग करतो?
१२ सुवार्तेचे प्रचारक या नात्याने, देवाच्या राज्याचा उभारणीकारक संदेश लोकांच्या हृदयाला भिडावा म्हणून आपल्याजवळ असलेली शिकवण्याची सगळी कौशल्ये आपण पणाला लावतो. असे करण्याद्वारे आपण नीति. ३:२७; १२:२५) आणि असे प्रोत्साहन देण्याद्वारे त्यांना ख्रिस्ताचे शिष्य म्हणून टिकून राहण्यास साहाय्य करण्याची आपली इच्छा असते. लोकांना सुवार्ता सांगणे आणि आपली कृपादाने ‘एकमेकांच्या कारणी लावणे’ ही दोन्ही कार्ये करणे हा आपल्याकरता एक मोठा बहुमान आहे, कारण त्यांद्वारे यहोवा त्याची कृपा व्यक्त करण्यासाठी आपला उपयोग करतो.—गलती. ६:१०.
त्यांना ख्रिस्ताचे शिष्य बनण्यास साहाय्य करू इच्छितो. पण त्याच प्रकारे, आपल्या बांधवांना प्रोत्साहन देण्याकरताही आपण आपल्याजवळ असलेल्या कौशल्यांचा, क्षमतांचा व इतर कृपादानांचा उपयोग करतो. आपल्या उभारणीकारक शब्दांतून व व्यावहारिक मदतीतून देवाची कृपा व्यक्त होते. (“एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा”
१३. आपली कृपादाने ‘एकमेकांच्या कारणी लावण्यापासून’ आपण मागे हटलो तर याचा काय परिणाम होईल?
१३ पौलाने आपल्या ख्रिस्ती बांधवांना असे आर्जवले: “बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना.” (रोम. १२:१०) बांधवांबद्दल स्नेहभाव असल्यास, देवाची कृपा त्यांच्याप्रती व्यक्त करण्यासाठी आपल्या कृपादानांचा उपयोग करण्याची आपल्याला आपोआपच प्रेरणा मिळेल. आपली कृपादाने ‘एकमेकांच्या कारणी लावण्यापासून’ आपल्याला परावृत्त करण्यात जर सैतानाला यश आले तर ख्रिस्ती बांधवांतील एकता भंग होईल याची आपल्याला जाणीव आहे. (कलस्सै. ३:१४) आणि असे घडल्यास, प्रचार कार्यातील आपला आवेश साहजिकच थंडावेल. आपल्या केवळ एका पंखाला इजा केली, तरी आपण आपोआपच निष्क्रिय होऊ हे सैतानाला चांगले माहीत आहे.
१४. आपली कृपादाने ‘एकमेकांच्या कारणी लावल्याने’ कोणाकोणाला फायदा होतो? याचे एक उदाहरण सांगा.
१४ ख्रिस्ती जेव्हा आपली कृपादाने ‘एकमेकांच्या कारणी लावतात’ तेव्हा देवाची कृपा ज्यांच्याबद्दल व्यक्त होते त्यांनाच नव्हे, तर ज्यांच्याद्वारे ती व्यक्त होते त्यांना देखील फायदा होतो. (नीति. ११:२५) अमेरिकेतील, इलिनोई येथे राहणाऱ्या रायन व रॉनी यांचे उदाहरण पाहा. कॅटरिना वादळामुळे शेकडो बांधवांची घरे जमीनदोस्त झाल्याचे कळले, तेव्हा बंधुप्रेमाने प्रेरित होऊन या जोडप्याने आपल्या नोकऱ्यांना राजीनामा दिला, आपले राहते घर सोडले आणि एक जुना ट्रेलर विकत घेऊन तो दुरुस्त केला व १,४०० किलोमीटरचा प्रवास करून लुइझिॲनाला आले. येथे एका वर्षापेक्षा जास्त काळ राहून त्यांनी आपला वेळ, शक्ती व साधने बांधवांच्या साहाय्याकरता कारणी लावली. २९ वर्षीय रायन म्हणतो, “मदत कार्यात सहभाग घेतल्यानं मला देवाच्या जवळ आल्यासारखं वाटतं. यहोवा आपल्या लोकांची किती प्रेमानं काळजी घेतो हे मला प्रत्यक्ष पाहायला मिळालं.” तो पुढे म्हणतो: “माझ्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या बांधवांसोबत काम करताना देवाच्या संघटनेतील बांधवांची काळजी कशी घ्यावी याबद्दल मला बरंच काही शिकायला मिळालं. तसंच, यहोवाच्या संघटनेत माझ्यासारख्या तरुणांकरता बरंच काम आहे याचीही मला जाणीव झाली.” २५ वर्षीय रॉनी म्हणते: “इतरांना मदत करण्यास सहभाग घेता आल्याबद्दल मी यहोवाची आभारी आहे. जीवनात पूर्वी कधीही मी इतकी आनंदी नव्हते. या अनोख्या अनुभवाचा, येणाऱ्या वर्षांतही मला फायदा होत राहील हे मला माहीत आहे.”
१५. आपली कृपादाने देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्यांप्रमाणे एकमेकांच्या कारणी लावण्याची आपल्याजवळ कोणकोणती कारणे आहेत?
१५ खरोखरच, सुवार्तेचा प्रचार करण्याच्या आणि बांधवांना प्रोत्साहन देण्याच्या देवाच्या आज्ञांचे पालन केल्यामुळे सर्वांनाच आशीर्वाद मिळतात. ज्यांना आपण मदत करतो त्यांची तर आध्यात्मिक रीत्या उन्नती होतेच, शिवाय आपल्यालाही निर्भेळ आनंद अनुभवण्यास मिळतो. हा आनंद केवळ इतरांकरता स्वार्थत्याग केल्यानेच मिळू शकतो. (प्रे. कृत्ये २०:३५) मंडळीतील बांधव एकमेकांबद्दल आस्था व्यक्त करतात तेव्हा आपसांतील प्रेम व आपुलकी वाढते. तसेच, आपण एकमेकांबद्दल दाखवत असलेल्या प्रेमामुळे, जिव्हाळ्यामुळे आपण खरे ख्रिस्ती आहोत हे स्पष्टपणे दिसून येते. कारण येशूने असे म्हटले होते: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहा. १३:३५) पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे आपला प्रेमळ पिता यहोवा याचे गौरव होते. कारण, त्याचे पृथ्वीवरील सेवक एकमेकांबद्दल काळजी व्यक्त करतात तेव्हा गरजू लोकांबद्दल त्याला स्वतःला वाटणारी कळकळ त्यातून व्यक्त होते. तेव्हा, आपल्याला मिळालेली कृपादाने ‘देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्यांप्रमाणे एकमेकांच्या कारणी लावण्याची’ आपल्याजवळ कितीतरी कारणे आहेत. तुम्ही असे करत राहणार का?—इब्री लोकांस ६:१० वाचा.
तुम्हाला आठवते का?
• यहोवा कोणकोणत्या मार्गांनी आपल्या सेवकांना मदत पुरवतो?
• आपल्याला काय देण्यात आले आहे?
• आपण कोणत्या काही मार्गांनी आपल्या बांधवांची सेवा करू शकतो?
• आपले कृपादान नेहमी ‘एकमेकांच्या कारणी लावण्याची’ प्रेरणा आपल्याला कशामुळे मिळेल?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१३ पानांवरील चित्रे]
तुम्ही आपल्या ‘कृपादानाचा’ उपयोग इतरांच्या हिताकरता करत आहात की स्वतःच्याच फायद्याकरता?
[१५ पानांवरील चित्रे]
आपण सुवार्तेचा प्रचार करतो आणि आपल्या बांधवांनाही साहाय्य करतो
[१६ पानांवरील चित्र]
मदत कार्यात सहभाग घेणाऱ्यांची स्वार्थत्यागी मनोवृत्ती खरोखर कौतुकास्पद आहे