धीराने यहोवाच्या दिवसाची वाट पाहणे
धीराने यहोवाच्या दिवसाची वाट पाहणे
‘आपल्या विश्वासात . . . धीराची भर घाला.’—२ पेत्र १:५, ६.
१, २. धीराचा काय अर्थ होतो, आणि ख्रिश्चनांनी तो का दाखवला पाहिजे?
यहोवाचा दिवस अतिशय जवळ येऊन ठेपला आहे. (योएल १:१५; सफन्या १:१४) ख्रिस्ती या नात्याने आपण देवाशी एकनिष्ठ राहण्याचा निश्चय केला आहे; तसेच यहोवाच्या सार्वभौमत्त्वाचे समर्थन होईल त्या काळाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. पण तोपर्यंत आपल्याला आपल्या विश्वासामुळे द्वेष, थट्टा, छळ आणि कदाचित मृत्यूला देखील तोंड द्यावे लागेल. (मत्तय ५:१०-१२; १०:२२; प्रकटीकरण २:१०) यासाठी धीराची गरज आहे. धीर या शब्दाचा अर्थ संकटाचा सामना करण्याची ताकद असा होतो. प्रेषित पेत्र आपल्याला असे आर्जवतो: ‘आपल्या विश्वासात . . . धीराची भर घाला.’ (२ पेत्र १:५, ६) आपल्याला धीर दाखवणे महत्त्वाचे आहे, कारण येशूने म्हटले: “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.”—मत्तय २४:१३.
२ आपल्याला, आजारपण, शोक आणि इतर परीक्षांचा देखील सामना करावा लागतो. आपण जर आपला विश्वास कमकुवत केला तर सैतानाला किती आनंद होईल, याची कल्पना करा! (लूक २२:३१, ३२) पण यहोवाच्या मदतीने आपण विविध परीक्षांना तोंड देऊ शकतो. (१ पेत्र ५:६-११) आपण धीराने व अढळ विश्वासाने यहोवाच्या दिवसाची वाट पाहत राहणे शक्य आहे, हे सिद्ध करणाऱ्या काही सत्य घटनांचा विचार करा.
आजारपणातही त्यांनी हार मानली नाही
३, ४. आपण आजारी असलो तरीसुद्धा यहोवाची सेवा करू शकतो हे दाखवणारे उदाहरण द्या.
३ देव आज आपल्याला चमत्कारिकरीत्या आजारातून बरे करत नाही पण आजारपण सहन करण्याची तो आपल्याला शक्ती देतो. (स्तोत्र ४१:१-३) शॅरन म्हणते: “मला आठवते तेव्हापासून ही व्हीलचेअर माझी सोबती बनली आहे. सेरेब्रल पाल्सी या विकारानं माझं बालपण माझ्याकडून हिरावून घेतलं; कारण जन्मतःच मला हा विकार होता.” पण यहोवाविषयी आणि परिपूर्ण आरोग्य देण्याबद्दल त्याने दिलेल्या आशेविषयी शिकल्यावर शॅरनला जगण्याची एक उमेद मिळाली. बोलताना आणि चालताना खूप त्रास होत असला तरी, ख्रिस्ती सेवेत भाग घेतल्यामुळे तिला आनंद होतो. सन १९९३ मध्ये तिने असे म्हटले होते: “माझी प्रकृती कदाचित खालावत जाईल, पण देवावरील माझा भरवसा आणि त्याच्यासोबतचा माझा नातेसंबंध या दोन गोष्टी माझ्या जीवनरेखा आहेत. मी यहोवाच्या लोकांच्या मध्ये आहे आणि मला यहोवाचा अखंड आधार आहे म्हणून मी खूप आनंदी आहे.”
४ प्रेषित पौलाने थेस्सलनीकामधील ख्रिश्चनांना, “जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या,” असा बोध केला. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) घोर निराशा, यासारख्या कारणांमुळे एखाद्या व्यक्तीला डिप्रेशनचा विकार होऊ शकतो. सन १९९३ मध्ये शॅरनने असे लिहिले: ‘आपल्या जीवनात काहीच अर्थ उरला नाही या भावनेनं मला ग्रासून टाकलं; त्यामुळे तीन वर्षांपर्यंत मला खूप डिप्रेशन झालं. पण मंडळीतल्या वडिलांनी मला सांत्वन आणि सल्ला दिला. टेहळणी बुरूज मासिकातून यहोवानं, अतिशय कोमलतेने, तीव्र डिप्रेशन या विकाराविषयीची सखोल माहिती दिली. होय, त्याला आपल्या लोकांची काळजी आहे आणि त्याला आपल्या भावना समजतात.’ (१ पेत्र ५:६, ७) शॅरन आजही देवाची विश्वासूपणे सेवा करत आहे व ती यहोवाच्या महान दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे.
५. तीव्र मानसिक त्रास होऊनही ख्रिस्ती धीर धरू शकतात, हे कशावरून म्हणता येते?
५ जीवनातील गत अनुभवांमुळे काही ख्रिश्चनांना तीव्र मानसिक त्रासाचा सामना करावा लागला. हार्ली यांनी, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी चाललेला भयंकर हिंसाचार आपल्या डोळ्यांनी पाहिला होता व त्यांना युद्धाची वाईट स्वप्ने पडायची. कधीकधी झोपेत ते अचानक ओरडायचे: “ए, सांभाळ! ए अरे, ते बघ!” त्यांना खडबडून जाग यायची तेव्हा ते घामाने ओलेचिंब झालेले असायचे. परंतु, ते देवाच्या सल्ल्यानुसार आपले जीवन व्यतीत करू शकले आणि हळूहळू त्यांना अशी भयानक स्वप्ने पडायची कमी झाली.
६. एका ख्रिस्ती बांधवाने मानसिक समस्यांचा सामना कसा केला?
६ बायपोलर डिसऑर्डर नावाचा विकार झाल्याचे निदान १ तीमथ्य ४:१६) कधीकधी तर त्यांना दारावरची बेल वाजवण्याचे देखील धैर्य व्हायचे नाही. तरीपण ते म्हणतात: “थोड्या वेळानं मी माझ्या भावनांवर नियंत्रण मिळवल्यानंतर पुढच्या दारी जाऊन पुन्हा राज्य संदेश सांगायचा प्रयत्न करायचो. मी सेवेत जात राहिलो त्यामुळे माझं आध्यात्मिक आरोग्य चांगलं आहे.” सभांना जाणे देखील या बांधवाला कठीण होते तरीपण ते सभांना जात राहिले कारण, सभांमध्ये मिळणारा आध्यात्मिक सहवास किती मोलाचा असतो, याची त्यांना खात्री होती. त्यामुळे त्यांना खूप त्रास होत असूनही ते सभांना हजर राहण्याचा प्रयत्न करतात.—इब्री लोकांस १०:२४, २५.
करण्यात आलेल्या एका ख्रिस्ती बांधवाला घरोघरच्या प्रचार कार्यात भाग घेणे कठीण वाटत होते. तरीपण त्यांनी या कार्यात भाग घेणे थांबवले नाही कारण या सेवेमुळे स्वतःला आणि जे राज्य संदेशाला उत्तम प्रतिसाद देतील त्या लोकांना जीवन मिळेल, याची त्यांना जाणीव होती. (७. काही बंधूभगिनींना लोकांसमोर उभे राहून बोलण्यास किंवा सभेला उपस्थित राहण्यास भीती वाटते तरीपण ते कशाप्रकारे धीर दाखवतात?
७ काही ख्रिस्ती बंधूभगिनींना वेगवेगळ्या गोष्टींचे भयगंड असते—विशिष्ट परिस्थितींची किंवा वस्तुंची त्यांना कमालीची भीती वाटते. जसे की, त्यांना लोकांसमोर उभे राहून बोलण्याची किंवा सभेला उपस्थित राहायला भीती वाटते. अशा बंधूभगिनींना, ख्रिस्ती सभांमध्ये उत्तर देणे किंवा ईश्वरशासित सेवा प्रशालेत एखादे भाषण द्यायला किती जड जात असावे, याची कल्पना करा! तरीपण ते धीराने हे सर्व करत आहेत आणि ते सभांना उपस्थित राहतात व त्यांमध्ये भाग घेतात म्हणून आपण त्यांची मनापासून कदर करतो.
८. मानसिक समस्यांचा सामना करतेवेळी कोणती गोष्ट जास्त फायदेकारक ठरते?
८ मानसिक समस्या असलेल्या व्यक्तीने पुरेसा आराम व पुरेशी झोप घेतली तर तिला धीर धरण्यास मदत मिळेल. तिला कदाचित वैद्यकीय मदतीची देखील गरज लागेल. परंतु, प्रार्थनांद्वारे देवावर विसंबून राहणे हे सर्वात जास्त फायदेकारक आहे. स्तोत्र ५५:२२ मध्ये म्हटले आहे: “तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. नीतिमानाला तो कधीहि ढळू देणार नाही.” तेव्हा, “आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव” ठेवा.—नीतिसूत्रे ३:५, ६.
शोक सहन करणे
९-११. (क) आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा कोणती गोष्ट आपल्याला आपले दुःख सहन करण्यास मदत करेल? (ख) हन्नाचे उदाहरण आपल्याला, मृत्यूने झालेला वियोग सहन करण्यास कशाप्रकारे मदत करू शकते?
९ कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू होतो तेव्हा कुटुंबाची ताटातूट होते; या हानीमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. अब्राहामाची प्रिय पत्नी सारा हिचा मृत्यू झाला तेव्हा तो रडला. (उत्पत्ति २३:२) परिपूर्ण मनुष्य येशू देखील त्याचा मित्र लाजर मरण पावला तेव्हा “रडला.” (योहान ११:३५) तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा दुःखित होणे अगदी स्वाभाविक आहे. परंतु, ख्रिश्चनांना पुनरुत्थानाची आशा आहे. (प्रेषितांची कृत्ये २४:१५) त्यामुळे ‘ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा ते खेद करत नाहीत.’—१ थेस्सलनीकाकर ४:१३.
१० आपण शोक कसा सहन करू शकतो? कदाचित एक उदाहरण तुम्हाला हे समजायला मदत करेल. आपला एखादा मित्र जेव्हा प्रवासाला जातो तेव्हा त्याच्या जाण्याने आपल्याला सहसा दीर्घकाळपर्यंत दुःख होत नाही कारण आपण त्याला पुन्हा भेटणार असतो. हाच दृष्टिकोन, एखाद्या विश्वासू ख्रिस्ती बंधू अथवा बहिणीचा मृत्यू झाल्यावर बाळगल्यास आपले दुःख कमी होऊ शकेल. कारण या व्यक्तीचे निश्चित पुनरुत्थान होईल, अशी आपल्याला खात्री असते.—उपदेशक ७:१.
११ “सर्व सांत्वनदाता देव” याच्यावर पूर्ण विसंबून राहिल्यास आपल्याला दुःखातून सावरायला मदत मिळेल. (२ करिंथकर १:३, ४) तसेच, पहिल्या शतकातील हन्नाने जे काही केले त्यावर मनन केल्याने देखील आपल्याला मदत मिळू शकते. हन्ना तिचे लग्न झाल्यावर ती केवळ सातव्या वर्षीच विधवा झाली. परंतु, चौऱ्याऐंशी वर्षांच्या वयातही ती यहोवाच्या मंदिरात त्याची सेवा करत होती. (लूक २:३६-३८) देवाच्या सेवेत मग्न असल्यामुळेच तिला तिचे दुःख आणि तिचा एकाकीपणा सहन करता आला. ख्रिस्ती कार्यांत तसेच राज्याच्या प्रचारकार्यात नियमित भाग घेतल्याने आपल्याला मृत्यूने झालेला वियोग सहन करण्याची शक्ती मिळेल.
विविध परीक्षांचा सामना करणे
१२. काही ख्रिश्चनांना कौटुंबिक जीवनाशी संबंधित कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो?
१२ काही ख्रिश्चनांना कौटुंबिक जीवनाशी संबंधित असलेल्या समस्यांचा सामना करावा लागतो. जसे की, विवाह जोडीदारापैकी एकाने जारकर्म केले असेल तर संपूर्ण कुटुंबावर त्याचे किती हानीकारक परिणाम उद्भवतात! धक्का बसल्यामुळे व अत्यंत दुःख झाल्यामुळे, विश्वासघात झालेल्या विवाह जोडीदाराला रात्रीची झोप लागत नसेल व अश्रू आवरत नसतील. कधीकधी अगदी लहानसहान कामे करणे देखील इतके जड वाटते, की त्यामुळे चुका किंवा अपघात होतात. विश्वासघात झालेल्या जोडीदाराला अन्न गोड लागत नाही, त्याचे वजन घटू लागते आणि त्याला मानसिक यातना होत असतात. त्याला ख्रिस्ती कार्यांमध्ये
भाग घेणे कठीण वाटते. मुलांच्या मनावर देखील किती मोठा आघात होतो!१३, १४. (क) मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी शलमोनाने केलेल्या प्रार्थनेवरून तुम्हाला कोणत्या प्रकारचे उत्तेजन मिळते? (ख) आपण पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना का करतो?
१३ आपल्याला जेव्हा अशा परीक्षांचा सामना करावा लागतो तेव्हा यहोवा आपल्याला आवश्यक ती मदत पुरवतो. (स्तोत्र ९४:१९) देव आपल्या लोकांच्या प्रार्थना ऐकतो, हे राजा शलमोनाने यहोवाच्या मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी जी प्रार्थना केली होती त्यात दिसून येते. शलमोनाने अशी प्रार्थना केली: “इस्राएलातील एखादा माणूस किंवा तुझे सगळे इस्राएल लोक आपल्या जीवाला होणारा क्लेश ओळखून जी प्रार्थना किंवा विनवणी या मंदिराकडे आपले हात पसरून करितील, ती तू स्वर्गातील आपल्या निवासस्थानातून ऐक, त्यांना क्षमा कर, त्याप्रमाणे घडवून आण, प्रत्येकाचे मन ओळखून त्याच्या सर्व वर्तनानुसार त्यास फळ दे; कारण सर्व मानवजातीची मने ओळखणारा केवळ तूच आहेस म्हणजे जो देश तू आमच्या पूर्वजास दिला त्यात ते राहतील तितके दिवस ते तुझे भय बाळगितील.”—१ राजे ८:३८-४०.
१४ पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना केल्याने आपल्याला खासकरून अधिक मदत मिळू शकते. (मत्तय ७:७-११) आत्म्याच्या फळात आनंद आणि शांती यासारख्या गुणांचा समावेश होतो. (गलतीकर ५:२२, २३) आपल्या स्वर्गीय पित्याने आपल्या प्रार्थनांचे उत्तर दिले असे जेव्हा आपल्याला जाणवते तेव्हा आपल्याला किती आनंद होतो, नाही का? आपले दुःख आणि चिंता कुठल्या कुठे निघून जातात आणि त्याऐवजी आपण आनंदित होतो, आपल्याला मानसिक शांती लाभते!
१५. कोणती शास्त्रवचने आपल्याला आपल्या चिंता कमी करण्यास मदत करतात?
१५ आपल्याला जेव्हा अनेक संकटांचा सामना करावा लागतो तेव्हा आपण चिंतित होतो. पण आपण जर येशूने उद्गारलेले शब्द लक्षात ठेवले तर काहीप्रमाणात चिंता कमी होऊ शकते; त्याने असे म्हटले: “आपल्या जीवाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे; आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, ह्याची चिंता करीत बसू नका. . . . तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्तय ६:२५, ३३, ३४) प्रेषित पेत्र आपल्याला असे आर्जवतो: ‘देवावर आपल्या सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.’ (१ पेत्र ५:६, ७) एखादी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे योग्य आहे. परंतु आपण सर्व प्रयत्न करूनही जेव्हा समस्या सुटत नाही तेव्हा चिंता केल्याने फायदा होत नाही; प्रार्थना केल्याने होतो. स्तोत्रकर्त्याने असे गायिले: “आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे; त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धि करील.”—स्तोत्र ३७:५.
१६, १७. (क) आपण चिंतांपासून शंभर टक्के मुक्त का नाही? (ख) आपण जर फिलिप्पैकर ४:६, ७ या वचनांचा आपल्या जीवनात अवलंब केला तर आपल्याला काय लाभेल?
१६ पौलाने असे लिहिले: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पैकर ४:६, ७) आदामाची अपरिपूर्ण संतती चिंतांपासून शंभर टक्के मुक्त नाही. (रोमकर ५:१२) एसावाच्या हित्ती बायका, इसहाक व रिबका “यांच्या मनास दुःखदायक झाल्या.” (उत्पत्ति २६:३४, ३५) तीमथ्य व त्रफिम हे ख्रिस्ती बांधव आजारपणामुळे कदाचित चिंताक्रांत झाले असतील. (१ तीमथ्य ५:२३; २ तीमथ्य ४:२०) पौलाला सहविश्वासू बंधूभगिनींची चिंता होती. (२ करिंथकर ११:२८) परंतु ‘प्रार्थना ऐकणारा’ देव त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांच्या मदतीसाठी केव्हाही हजर असतो.—स्तोत्र ६५:२.
१७ यहोवाच्या दिवसाची वाट पाहत असताना “शांतिदाता देव” आपल्या पाठीशी आहे आणि तो आपल्याला सांत्वन देखील देतो. (फिलिप्पैकर ४:९) यहोवा “दयाळू व कृपाळू देव” आहे; तो “उत्तम व क्षमाशील” आहे तसेच ‘आपण केवळ माती आहो हे तो आठवितो.’ (निर्गम ३४:६; स्तोत्र ८६:५; १०३:१३, १४) तेव्हा, आपण ‘आपल्या मागण्या देवाला कळवू या.’ यामुळे आपल्याला “देवाने दिलेली शांती” अर्थात मानवाच्या आकलनापलिकडे असलेले शांतचित्त लाभेल.
१८. ईयोब ४२:५ मध्ये म्हटल्याप्रमाणे आपण देवाला कसे ‘पाहू’ शकतो?
१८ आपल्या प्रार्थनांचे उत्तर मिळाले आहे असे जेव्हा आपल्याला जाणवते तेव्हा देव आपल्याबरोबर आहे, हे आपल्याला कळते. ईयोब त्याच्यावर आलेल्या परीक्षांत टिकून राहिल्यानंतर असे म्हणाला: “मी तुजविषयी [यहोवाविषयी] कर्णोपकर्णी ऐकले होते. आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे.” (ईयोब ४२:५) आपल्या ज्ञान, विश्वास व कृतज्ञतेच्या चक्षूंनी आपण, देवाने आपल्याबरोबर केलेल्या व्यवहारांवर मनन करू शकतो आणि पूर्वी कधी नव्हे तसे त्याला ‘पाहू’ शकतो. या अशा जवळीकीमुळे आपले हृदय आणि मन शांत राहते!
१९. आपण जर ‘आपल्या सर्व चिंता यहोवावर टाकल्या’ तर काय होईल?
१९ आपण जर ‘आपल्या सर्व चिंता यहोवावर टाकल्या’ तर आपण शांतचित्ताने परीक्षांचा सामना करू ज्यामुळे आपल्या हृदयाचे आणि विचारशक्तीचे संरक्षण होईल. आणि यामुळे आपले लाक्षणिक हृदय, अस्वस्थपणा, भीती आणि चिंता यांपासून मुक्त असेल. चिंतेमुळे आपले मन चंचल मनस्थितीत नसेल.
२०, २१. (क) छळाचा सामना करतेवेळी आपण जी शांतचित्तवृत्ती अनुभवतो ते स्तेफनाच्या उदाहरणावरून कसे दिसते? (ख) परीक्षांचा सामना करताना आपल्या बांधवांनी कशाप्रकारे शांत चित्तवृत्ती अनुभवली त्याचे आधुनिक दिवसांतील उदाहरण सांगा.
२० शिष्य स्तेफन जेव्हा त्याच्या विश्वासाच्या कड्या परीक्षेचा सामना करत होता तेव्हा त्याने शांत चित्तवृत्ती दाखवली. त्याने शेवटची साक्ष देण्याआधी, न्यायसभेत बसलेल्या सर्वांनी त्याला पाहिले की ‘त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसत’ होते. (प्रेषितांची कृत्ये ६:१५) त्याच्या चेहऱ्यावरील भाव अतिशय शांत होते—एखाद्या देवदूतासारखे. स्तेफनाने जेव्हा त्यांचे अपराध उघडकीस आणले अर्थात येशूचा मृत्यू घडवून आणण्यात त्यांचा हात कसा होता हे जेव्हा त्यांना सांगितले तेव्हा त्याचे बोलणे त्यांच्या “अंतःकरणास इतके झोंबले की ते त्याच्यावर दांतओठ खाऊ लागले.” “पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन” स्तेफनाने “आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला.” या दृष्टान्ताने त्याला इतके बळ मिळाले, की त्याच्या मृत्यूपर्यंत तो देवाशी विश्वासू राहिला. (प्रेषितांची कृत्ये ७:५२-६०) आज आपल्याला दृष्टान्त दिसत नसले तरीसुद्धा आपला छळ होत असताना आपण देवाने दिलेली शांती अनुभवू शकतो.
२१ दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी नात्सींच्या हाती मरण पावलेल्या काही ख्रिश्चनांच्या भावना काय होत्या ते पाहा. कोर्टात आपला अनुभव सांगताना एकाने असे म्हटले: “मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली. मी ती ऐकली, आणि मग मी मनातल्या मनात, ‘मृत्यूपर्यंत विश्वासू राहा,’ असं आणि आपल्या प्रभूचे इतर काही शब्द पुटपुटलो; झालं. तरीपण त्याचा आता विचार करू नका. कारण, मला असं शांत मन लाभलं आहे ज्याची तुम्ही केव्हाही कल्पना करू शकणार नाही!” शिरच्छेद होण्यापूर्वी एका तरुण ख्रिस्ती बांधवाने आपल्या पालकांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले: “मध्यरात्र टळून गेली आहे. मला अजूनही माझं मन बदलण्याची संधी आहे. पण, आपल्या प्रभूला नाकारल्यानंतर मी या जगात पुन्हा एकदा आनंदी होईन का? मुळीच नाही! पण तुम्ही ही खात्री बाळगू शकता, की मी आनंदाने व शांतीने या जगाचा निरोप घेतला आहे.” यहोवा आपल्या एकनिष्ठ सेवकांना आधार देतो यात तीळमात्रही शंका नाही.
तुम्हीही धीर धरू शकता
२२, २३. यहोवाच्या दिवसाची धीराने वाट पाहत असताना तुम्ही कोणती खात्री बाळगू शकता?
२२ आता आपण ज्या ज्या आव्हानांची चर्चा केली त्यांचा कदाचित तुम्हाला सामना करावा लागणार नाही. तरीपण, देवाला भिऊन वागणाऱ्या ईयोबाने बरोबरच म्हटले: “स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो.” (ईयोब १४:१) कदाचित तुम्ही एक कर्तव्यदक्ष पालक आहात व आपल्या मुलांना आध्यात्मिक मार्गदर्शन देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहात. त्यांना शाळेत परीक्षांना तोंड द्यावे लागते, पण जेव्हा ते यहोवा आणि त्याच्या धार्मिक तत्त्वांना जडून राहतात तेव्हा तुम्हाला किती आनंद होत असेल, नाही का? कदाचित तुम्हाला कामाच्या ठिकाणी संकटांना व मोहांना तोंड द्यावे लागत असेल. परंतु या आणि इतर परिस्थिती आपण सहन करू शकतो कारण यहोवा “प्रतिदिनी आमचा भार वाहतो.”—स्तोत्र ६८:१९.
२३ तुम्ही स्वतःला अगदी क्षुल्लक लेखत असाल, परंतु यहोवा तुमचे कार्य आणि त्याच्या पवित्र नावासाठी तुम्ही दाखवलेली प्रीती कधीही विसरून जाणार नाही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. (इब्री लोकांस ६:१०) त्याच्या मदतीने तुम्ही विश्वासाच्या परीक्षांचा धीराने सामना करू शकता. तेव्हा, आपल्या प्रार्थनांद्वारे आणि आपल्या योजनांद्वारे नेहमी देवाची इच्छा पूर्ण करीत राहा. मग तुम्ही ही खात्री बाळगू शकाल, की यहोवाच्या दिवसाची धीराने वाट पाहत राहीपर्यंत तो तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करील आणि तुम्हाला आधार देईल. (w०७ ७/१५)
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• ख्रिश्चनांनी धीर दाखवणे का आवश्यक आहे?
• कोणती गोष्ट आपल्याला आजारपण आणि शोक सहन करण्यास मदत करते?
• प्रार्थना आपल्याला परीक्षांचा सामना करण्यास कशाप्रकारे मदत करते?
• यहोवाच्या दिवसाची धीराने वाट पाहणे शक्य का आहे?
[अभ्यासाचे प्रश्न]