व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचे वचन प्रिय मानणारा एक विनम्र आफ्रिकन माणूस

देवाचे वचन प्रिय मानणारा एक विनम्र आफ्रिकन माणूस

देवाचे वचन प्रिय मानणारा एक विनम्र आफ्रिकन माणूस

आफ्रिकेला पहिल्यांदाच आलेल्यांना, इथल्या लोकांसोबत बायबलच्या विषयांवर संभाषण सुरू करणे किती सोपे आहे हे पाहून आश्‍चर्य वाटते. “देवाचे राज्य म्हणजे काय?” किंवा “दुष्काळ, रोगराई, युद्धे, व गुन्हेगारी यांसारख्या समस्यांवर कायमचा उपाय आहे का?” यांसारखी प्रश्‍ने विचारताच लोक उत्सुकतेने तुमचे बोलणे ऐकू लागतात. एखाद्या अनोळखी व्यक्‍तीकडून या प्रश्‍नांची बायबलमधून उत्तरे जाणून घेण्यास बहुतेक जणांची हरकत नसते. यामुळे बरेचदा नियमित बायबल अभ्यासास सुरूवात होते. हे बायबल विद्यार्थी आध्यात्मिक प्रगती करू लागतात व कालांतराने ख्रिस्ती या नात्याने बाप्तिस्मा घेतात.

हे पाऊल उचलणाऱ्‍या अगदी पहिल्या आफ्रिकन लोकांपैकी एकाविषयी, बायबलमध्ये प्रेषितांची कृत्ये ८:२६-४० यात उल्लेख केला आहे. हा मनुष्य कुशी (इथियोपियन) होता व तो खरा देव, यहोवा याची उपासना करण्याकरता जेरूसलेमला गेला होता.

खालच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे, हा कुशी मनुष्य आपल्या रथात बसून घरी परतत असताना, एक गुंडाळी उघडून काहीतरी वाचत होता. तेव्हा एका अनोळखी माणसाने येऊन त्याला विचारले: “आपण जे वाचीत आहा ते आपल्याला समजते काय?” कुशी माणसाने नम्रपणे कबूल केले की कोणाच्या मदतीशिवाय आपण वाचत असलेला मजकूर आपल्याला समजणार नाही. मग त्याने त्या अनोळखी माणसाला, अर्थात ख्रिस्ती सुवार्तिक फिलिप्प याला रथात येऊन बसण्याचे निमंत्रण दिले. मग त्याने नुकताच जो शास्त्रवचनातील उतारा वाचला होता, त्याचा अर्थ समजवण्याची फिलिप्पला विनंती केली. फिलिप्पने खुलासा केला की ही मशीहाच्या, अर्थात येशू ख्रिस्ताच्या अलीकडेच झालेल्या मृत्यूशी संबंधित भविष्यवाणी आहे. फिलिप्पने ‘येशूविषयीच्या सुवार्तेशी’ संबंधित असलेल्या इतर बाबींवरही प्रकाश टाकला; यात येशूच्या पुनरुत्थानाचाही निश्‍चितच समावेश असावा.

ही अद्‌भूत सत्ये ऐकल्यावर कुशी माणसाने येशूचा शिष्य होण्याची इच्छा व्यक्‍त केली व म्हणाला: “मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?” बाप्तिस्मा झाल्यावर हा आफ्रिकन मनुष्य आनंदाने आपल्या वाटेने निघून गेला व त्यानंतर बायबलमध्ये त्याच्याविषयी आणखी काही सांगितलेले नाही.

आज यहोवाचे साक्षीदार जगभरात कोट्यवधी लोकांना त्याच ‘सुवार्तेविषयी’ माहिती घेण्यास मदत करत आहेत. जवळजवळ ६० लाख बायबल अभ्यास सध्या चालवले जात आहेत. (w०५ ४/१)