सात्विकतेने चाला
सात्विकतेने चाला
“मी तर सात्विकपणे वागेन.”—स्तोत्र २६:११.
१, २. (अ) देवाच्या सार्वभौमत्वाच्या वादविषयात मनुष्याचा सात्विकपणा एक महत्त्वाचा मुद्दा का आहे? (ब) आपण यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करतो हे बुद्धिमान प्राणी कशाप्रकारे दाखवू शकतात?
सैतानाने एदेन बागेत विद्रोह केला, तेव्हा त्याने एक विश्वव्यापी वादविषय उभा केला; देवाला त्याच्या सर्व प्राणीमात्रांवर सार्वभौमत्व गाजवण्याचा अधिकार आहे किंवा नाही याविषयी हा वादविषय होता. काही काळानंतर सैतानाने असे आव्हान केले की मानवांना देवाकडून काही लाभ प्राप्त होईल तोपर्यंतच ते त्याची सेवा करतील. (ईयोब १:९-११; २:४) अशारितीने, यहोवाच्या विश्वव्यापी सार्वभौमत्वाच्या वादविषयात मनुष्याचा सात्विकपणा एक महत्त्वाचा मुद्दा बनला.
२ अर्थात, देवाचे सार्वभौमत्व हे त्याच्या प्राणीमात्रांच्या सात्विकतेवर अवलंबून नाही. पण यामुळे देवाच्या मानवी व आत्मिक पुत्रांना, या वादविषयात आपली भूमिका काय आहे ते दाखवण्याची संधी मिळते. ती कशी? तर सात्विकपणे चालण्याचा अथवा न चालण्याचा निर्णय घेण्याद्वारे. अशारितीने, प्रत्येक व्यक्तीच्या सात्विकपणाच्या आधारावर तिचा यथार्थ न्याय केला जाऊ शकतो.
३. (अ) यहोवाने कशाची परीक्षा करावी अशी ईयोबाची व दाविदाची इच्छा होती? (ब) सात्विकपणाविषयी कोणते प्रश्न उभे राहतात?
३ ईयोब आत्मविश्वासाने म्हणाला: “[यहोवाने] मला न्यायाच्या ताजव्यात तोलावे; देवाला माझी सात्विकता कळून येऊ द्या.” (ईयोब ३१:६) प्राचीन इस्राएलच्या राजा दाविदानेही आपल्या सात्विकतेची परीक्षा करण्याची यहोवाला विनंती केली. त्याने म्हटले: “हे परमेश्वरा, माझा न्याय कर, कारण मी सात्विकपणे वागलो आहे, आणि परमेश्वरावर भरवसा ठेविला आहे; मी घसरणार नाही.” (स्तोत्र २६:१) खरोखर, आपणही सात्विकपणे वागावे हे किती महत्त्वाचे आहे! पण सात्विकपणा म्हणजे काय आणि सात्विकपणे वागणे म्हणजे काय? शिवाय, सात्विकपणे चालण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल?
“मी सात्विकपणे वागलो आहे”
४. सात्विकपणा म्हणजे काय?
४ सात्विकपणा हा शब्द प्रामाणिक, निर्दोष, नीतिमान आणि निरपराध असणे यास सूचित करतो. पण सात्विकपणा यात केवळ जे योग्य ते करणे इतकेच समाविष्ट नाही. तर नैतिक सुदृढता किंवा देवाविषयी मनःपूर्वक भक्तिभाव असणे यात समाविष्ट आहे. सैतानाने ईयोबाच्या मनातील हेतूंविषयी शंका व्यक्त केली व देवाला म्हटले: “तू आपला हात पुढे करून त्याच्या हाडामांसास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.” (ईयोब २:५) सात्विकपणे वागण्याकरता, योग्य कृतीसोबतच मनातील हेतू व प्रेरणा योग्य असणे गरजेचे आहे.
५. सात्विकपणे वागण्याकरता परिपूर्णतेची आवश्यकता नाही हे कशावरून दिसून येते?
५ पण सात्विकपणे चालण्याकरता एक व्यक्ती परिपूर्ण असली पाहिजे असे नाही. राजा दावीद अपरिपूर्ण होता आणि आपल्या जीवनात त्याने अनेक गंभीर चुका केल्या होत्या. तरीसुद्धा बायबल त्याच्याविषयी असे म्हणते की तो “खऱ्या मनाने” म्हणजेच सात्विकतेने चालला. (१ राजे ९:४) का? कारण दाविदाचे यहोवावर प्रेम होते. त्याचे मन पूर्णपणे देवाच्या भक्तिला वाहिलेले होते. त्याने नम्रपणे आपल्या चुका कबूल केल्या, ताडन स्वीकारले आणि आपले मार्ग सुधारले. होय, दाविदाने आपला देव यहोवा याच्याविषयी दाखवलेला मनःपूर्वक भक्तिभाव व प्रीती यातून त्याचा सात्विकपणा दिसून येतो.—अनुवाद ६:५, ६.
६, ७. सात्विकपणे चालण्यात कशाचा समावेश आहे?
६ सात्विकपणाचा संबंध, हा मनुष्याच्या वर्तनाच्या कोणत्याही एका विशिष्ट पैलूशी उदाहरणार्थ केवळ त्याच्या धार्मिक भक्तीशी नाही. तर सात्विकपणा यात आपल्या सबंध जीवनशैलीचा अंतर्भाव आहे. दावीद सात्विकपणे “वागला.” मूळ भाषेत येथे “चालणे” या अर्थाचे क्रियापद वापरलेले असून द न्यू इंटरप्रेटर्स बायबल यानुसार ते ‘जीवन मार्ग’ अथवा ‘जीवनशैली’ यास सूचित करते. ‘ज्यांचे वर्तन चोख आहे’ अशांविषयी स्तोत्रकर्त्याने एका भजनात असे म्हटले: स्तोत्र ११९:१-३) त्याअर्थी, सात्विकपणे चालण्याकरता सतत देवाच्या इच्छेप्रमाणे करण्याचा व त्याच्या मार्गात चालण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
“जे [परमेश्वराचे] निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करितात ते धन्य. ते काही अनीतीचे आचरण करीत नाहीत; तर त्याच्या मार्गाने चालतात.” (७ सात्विकपणे चालण्याकरता, प्रतिकूल परिस्थितीतही आपण देवाला एकनिष्ठपणे जडून राहिले पाहिजे. जेव्हा आपण परीक्षांना तोंड देतो, संकटे येऊनही खंबीर राहतो, किंवा या अधार्मिक जगाकडून येणाऱ्या मोहांचा प्रतिकार करतो तेव्हा आपला सात्विकपणा दिसून येतो. आपण यहोवाचे ‘मन आनंदित करतो’ कारण त्याची निंदा करणाऱ्यास तो प्रत्युत्तर देऊ शकतो. (नीतिसूत्रे २७:११) म्हणूनच आपणही ईयोबाप्रमाणे आपल्या मनाशी निश्चय केला पाहिजे: “माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्वसमर्थन सोडणार नाही.” (ईयोब २७:५) सात्विकपणे चालण्याकरता कोणती गोष्ट आपली मदत करेल हे २६ व्या स्तोत्रात सांगितले आहे.
“माझे गुरदे व माझे हृदय शुद्ध कर”
८. दाविदाने आपले गुरदे व हृदय पारखण्यास यहोवाला विनंती केली त्यावरून तुम्हाला काय शिकायला मिळाले?
८ दाविदाने प्रार्थना केली: “हे यहोवा, मला कसास लाव, माझी पारख कर; माझे गुरदे व माझे हृदय शुद्ध कर.” (स्तोत्र २६:२, NW) गुरदे शरीरात अगदी अंतर्यामी असतात. म्हणूनच लाक्षणिक अर्थाने ते एका व्यक्तीच्या सर्वात आतील विचारांना व भावनांना सूचित करतात. आणि लाक्षणिक हृदय हे संपूर्ण आंतरिक व्यक्तीला—त्या व्यक्तीच्या प्रेरणा, भावना आणि बुद्धीला सूचित करतात. दाविदाने, माझी पारख कर अशी यहोवाला प्रार्थना केली तेव्हा तो अशी विनंती करत होता, की यहोवाने त्याच्या सर्वात आतील विचारांची व भावनांची अतिशय सूक्ष्मतेने पारख करावी.
९. यहोवा आपले लाक्षणिक गुरदे व हृदय कशारितीने शुद्ध करतो?
९ दाविदाने प्रार्थना केली की देवाने त्याचे गुरदे व हृदय शुद्ध करावे. आपल्या अंतर्यामास यहोवा कशाप्रकारे शुद्ध करतो? दाविदाने स्तोत्रात म्हटले: “यहोवाने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करितो; माझे गुरदे मला रात्री शिक्षण देतात.” (स्तोत्र १६:७, NW) याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ, दाविदाला यहोवाने दिलेला उपदेश त्याच्या अगदी अंतर्यामी पोचला आणि स्थिरावला जेणेकरून त्याच्या आंतरिक विचारांना व भावनांना तो सुधारू शकला. हेच आपल्या बाबतीतही घडू शकते. पण त्यासाठी आपण देवाच्या वचनातून, त्याच्या नियुक्त पुरुषांकडून आणि त्याच्या संघटनेकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञपणे मनन केले पाहिजे आणि ते आपल्या मनात अगदी खोलपर्यंत उतरू दिले पाहिजे. यारितीने आपल्याला शुद्ध करण्याची नियमितरित्या यहोवाला आपण प्रार्थना केल्यास, सात्विकपणे चालत राहण्यास आपल्याला मदत मिळेल.
“तुझे वात्सल्य माझ्या दृष्टीपुढे आहे”
१०. देवाच्या सत्य मार्गात चालण्याकरता दाविदाला कशामुळे मदत मिळाली?
१० “तुझे वात्सल्य माझ्या दृष्टीपुढे आहे; तुझ्या सत्यमार्गाने मी चाललो आहे.” (स्तोत्र २६:३) देवाच्या वात्सल्याची अर्थात प्रेमदयेची कृत्ये दावीदाला चांगली ठाऊक होती आणि यांविषयी तो कृतज्ञतेने मनन करत असे. त्याने म्हटले: “हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको.” देवाच्या ‘उपकारांपैकी’ एकाची आठवण करून दावीद पुढे म्हणाला: “जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्ये करितो; त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्राएलाच्या वंशजांना विदित केली.” (स्तोत्र १०३:२, ६, ७) कदाचित मोशेच्या काळात ईजिप्शियन लोकांनी कशाप्रकारे इस्राएलांना जाचले याविषयी दावीद विचार करत असावा. जर हेच त्याच्या मनात असेल, तर मग यहोवाने कशाप्रकारे इस्राएलांना सोडवून आपले मार्ग मोशेला विदित केले याविषयी मनन केल्यावर दाविदाचे मन भरून आले असेल आणि देवाच्या सत्य मार्गात चालण्याचा त्याचा संकल्प अधिकच दृढ झाला असेल.
११. सात्विकपणे चालण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल?
११ देवाच्या वचनाचा नियमितरित्या अभ्यास केल्याने आणि आपण जे शिकतो त्याविषयी मनन केल्यानेही आपल्याला सात्विकपणे चालण्यास साहाय्य मिळेल. उदाहरणार्थ, पोटिफरच्या पत्नीने अनैतिक कृत्य करण्याची गळ घातली तेव्हा योसेफ कशाप्रकारे तेथून पळून गेला हे आठवणीत ठेवल्यास, आपल्यासमोर कामाच्या ठिकाणी, शाळेत अथवा इतर ठिकाणी अशाप्रकारचे अनैतिक प्रस्ताव ठेवले जातात तेव्हा योसेफाप्रमाणेच तेथून पळ काढण्याचे आपल्याला प्रोत्साहन मिळेल. (उत्पत्ति ३९:७-१२) या जगात भौतिक संपत्ती, प्रतिष्ठा किंवा सत्ता मिळवण्याच्या संधी चालून येतात तेव्हा या मोहांना आपण कशाप्रकारे तोंड देऊ शकतो? आपल्याजवळ मोशेचे उदाहरण आहे ज्याने ईजिप्तच्या वैभवाकडे पाठ फिरवली. (इब्री ११:२४-२६) ईयोबाने कशाप्रकारे धीर धरला हे आठवणीत ठेवल्यास, आजारपण व इतर संकटांतही यहोवाला एकनिष्ठ राहण्याचा दृढ निश्चय करण्याचे निश्चितच आपल्याला साहाय्य मिळेल. (याकोब ५:११) आपल्याला छळ सोसावा लागला तर? तर, सिंहांच्या गुहेतील दानीएलाच्या अनुभवामुळे आपल्याला धैर्य मिळेल!—दानीएल ६:१६-२२.
“अधम लोकात मी बसलो नाही”
१२, १३. आपण कोणत्याप्रकारची संगती टाळली पाहिजे?
१२ दाविदाने असे आणखी एक कारण सांगितले की ज्यामुळे त्याला सात्विकतेने चालण्यास प्रोत्साहन मिळाले: “अधम लोकात मी बसलो नाही; कपटी लोकांची संगत मी धरणार नाही. दुष्कर्म्यांच्या सभेचा मी द्वेष करितो; दुर्जनांबरोबर मी बसणार नाही.” (स्तोत्र २६:४, ५) दावीदाला दुष्टांसोबत बसण्याचीही इच्छा नव्हती. दुर्जनांच्या संगतीचा त्याने द्वेष केला.
१३ आपल्याविषयी काय? टीव्ही कार्यक्रम, व्हिडिओ, चित्रपट, इंटरनेट साईट्स किंवा इतर माध्यमांद्वारे अधम लोकांसोबत बसण्यास आपण नकार देतो का? जे आपले खरे रूप लपवतात अशा कपटी लोकांपासून आपण दूर राहतो १ करिंथकर १५:३३) अनुचित संगती टाळणे खरोखर किती महत्त्वाचे आहे!
का? शाळाकॉलेजांत किंवा आपल्या नोकरीच्या ठिकाणी काहीजण कदाचित फसवणुकीच्या उद्देशाने आपल्याशी मैत्रीचे ढोंग करतील. जे देवाच्या सत्यानुसार चालत नाहीत अशा लोकांसोबत खरोखरच आपल्याला घनिष्ठ मैत्री करायची आहे का? धर्मत्यागी व्यक्ती देखील प्रामाणिकपणाचा आव आणून, आपल्याला यहोवाच्या सेवेपासून परावृत्त करण्याचा त्यांचा खरा हेतू लपवू शकतात. ख्रिस्ती मंडळीतच काहीजण दुटप्पी जीवन जगत असल्यास काय घडू शकते? हे लोक देखील आपले खरे रूप लपवण्याचा प्रयत्न करतात. जेसन, हा आज एक सेवासेवक आहे, पण तरुणपणी त्याला अशाचप्रकारचे काही मित्र होते. त्यांच्याविषयी तो सांगतो: “एकदा त्यांच्यापैकी एकजण मला म्हणाला: ‘आता आपण काहीही केले तरी फरक पडत नाही कारण नवे जग येईल तेव्हा आपण मेलेले असू. आणि मेल्यावर, आपण काय गमवले हे आपल्याला थोडेच कळणार आहे.’ त्याचे हे बोलणे ऐकले तेव्हा मला खाड्कन कोणीतरी झोपेतून जागे केल्यासारखे झाले. नवे जग येईल तेव्हा मेलेले असण्याची माझी निश्चितच इच्छा नाही.” जेसनने अशा तरुणांसोबत संबंध तोडून टाकण्याचा सुज्ञ निर्णय घेतला. प्रेषित पौलाने बजावून सांगितले आहे: “फसू नका, कुसंगतीने नीति बिघडते.” (‘मी तुझी सर्व आश्चर्यकर्में वर्णींन’
१४, १५. आपण कोणत्या अर्थाने यहोवाच्या ‘वेदीला फेरा घालू शकतो’?
१४ दाविदाने पुढे म्हटले: “हे परमेश्वरा, मी निर्दोषतेने आपले हात धुईन आणि तुझ्या वेदीला फेरा घालीन.” असे तो का करू इच्छित होता? “म्हणजे मी प्रगटपणे तुझे उपकारस्मरण करीन व तुझी सर्व आश्चर्यकर्मे वर्णीन.” (स्तोत्र २६:६, ७) यहोवाची उपासना करण्यासाठी व त्याच्याप्रती आपला भक्तिभाव व्यक्त करण्यासाठी दाविदाला नैतिकरित्या शुद्ध राहण्याची इच्छा होती.
१५ निवासमंडपात आणि नंतर मंदिरात खऱ्या उपासनेच्या संबंधाने केल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी “स्वर्गीय वस्तूचे प्रतिरूप व छाया” होत्या. (इब्री लोकांस ८:५; ९:२३) वेदी ही मानवजातीच्या सुटकेकरता येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा स्वीकार करण्याच्या यहोवाच्या इच्छेला सूचित करत होती. (इब्री लोकांस १०:५-१०) या बलिदानावर विश्वास प्रगट करण्याद्वारे आपण आपले हात निर्दोषतेने धुतो आणि यहोवाच्या ‘वेदीला फेरा घालतो.’—योहान ३:१६-१८.
१६. देवाच्या आश्चर्यकर्मांविषयी इतरांना सांगितल्याने आपल्याला कशाप्रकारे फायदा होतो?
१६ खंडणीच्याद्वारे जे काही शक्य झाले आहे त्याचा आपण विचार करतो तेव्हा यहोवाबद्दल आणि त्याच्या एकुलत्या एका पुत्राबद्दल आपले मन कृतज्ञतेने भरून येत नाही का? तर मग याच मनःपूर्वक कृतज्ञतेने आपण इतरांना—एदेन बागेत मनुष्याच्या निर्मितीपासून नव्या जगात सर्व काही पुन्हा नवे केले जाईल तोपर्यंतच्या देवाच्या सर्व आश्चर्यकर्मांविषयी सांगू या. (उत्पत्ति २:७; प्रेषितांची कृत्ये ३:२१) राज्याच्या प्रचाराचे आणि शिष्य बनवण्याचे हे कार्य आध्यात्मिक अर्थाने आपले केवढे संरक्षण करते! (मत्तय २४:१४; २८:१९, २०) या कार्यात व्यग्र राहिल्याने आपल्याला भविष्याची आपली आशा मनात अगदी ज्वलंत ठेवण्यास, देवाच्या प्रतिज्ञांवर आपला विश्वास मजबूत ठेवण्यास आणि यहोवाबद्दल व सहमानवांबद्दल आपले प्रेम जिवंत ठेवण्यास मदत मिळेल.
‘तुझे वसतिस्थान मला प्रिय आहे’
१७, १८. ख्रिस्ती सभांविषयी आपली मनोवृत्ती कशी असावी?
१७ अर्पणांकरता असलेली वेदी जेथे होती, तो निवासमंडप इस्राएलात यहोवाच्या उपासनेचे केंद्रस्थान होते. या ठिकाणाची आपल्याला किती ओढ आहे हे दाविदाने आपल्या प्रार्थनेत व्यक्त केले: “हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत.”—स्तोत्र २६:८.
१८ जेथे यहोवाबद्दल शिकायला मिळेल अशा ठिकाणी एकत्रित होण्याची आपल्यालाही ओढ आहे का? प्रत्येक राज्य सभागृहात आध्यात्मिक मार्गदर्शनाचा नियमित कार्यक्रम चालवला जातो आणि त्या त्या परिसरात हे सभागृह खऱ्या उपासनेचे क्रेंद्रस्थान ठरते. शिवाय आपली वार्षिक अधिवेशने, विभागीय संमेलने आणि खास संमेलन दिवसही असतात. या सभांमध्ये यहोवाच्या ‘निर्बंधांविषयी’ चर्चा केली जाते. जर आपण या सभांना “अत्यंत प्रिय” मानण्यास शिकलो तर आपण त्यांना उपस्थित राहण्यास उत्सुक असू आणि तेथे गेल्यावर लक्षपूर्वक ऐकू. (स्तोत्र ११९:१६७) ज्यांना आपल्याविषयी कळकळ वाटते, आणि जे सात्विकपणे चालत राहण्यास आपल्याला मदत करतात, अशा सहविश्वासू बांधवांच्या सहवासात असणे किती आनंददायक आहे!—इब्री लोकांस १०:२४, २५.
‘माझा प्राण नेऊ नको’
१९. कोणत्या पापांकरता दोषी ठरवले जाण्याची दाविदाची इच्छा नव्हती?
१९ देवाच्या सत्यापासून विचलित झाल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची पूर्ण कल्पना असल्यामुळे दाविदाने अशी याचना केली: “पातक्यांबरोबर माझा जीव आणि पातकी मनुष्यांबरोबर माझा प्राण काढून नेऊ नको; त्यांचे हात उपद्रवाने [स्वैराचाराने] भरलेले आहेत, त्यांचा उजवा हात लाचलुचपतीनी भरलेला आहे.” (स्तोत्र २६:९, १०) स्वैराचार व लाचलुचपत करणाऱ्या अधार्मिक माणसांसोबत आपली गणती व्हावी अशी दाविदाची इच्छा नव्हती.
२०, २१. कोणत्या गोष्टी आपल्याला अधार्मिकांच्या मार्गात नेऊ शकतात?
२० आजच्या जगात अनैतिक गोष्टींना तोटा नाही. टीव्ही, नियतकालिके, व चित्रपटांतून अनैतिकता—“जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा” यांना प्रोत्साहन दिले जाते. (गलतीकर ५:१९) काहीजण अश्लील चित्रे पाहण्याच्या वाईट सवयीच्या आहारी गेले आहेत; अशी चित्रे पाहिल्यामुळे सहसा कालांतराने ते अनैतिक कृत्ये करतात. अशा कुप्रभावांना विशेषतः तरुण मुलेमुली बळी पडतात. काही देशांत मुलामुलींच्या संकेतभेटी (डेटिंग) सर्वसामान्य आहेत; किशोरवयीन मुलामुलींना असे वाटू लागते की प्रत्येकाला प्रियकर किंवा प्रेयसी असलीच पाहिजे. या दबावामुळे अनेक मुलेमुली, लग्नाचे वय नसतानाही ‘प्रेमात पडतात.’ तरुण वयातील वाढत्या लैंगिक इच्छा तृप्त करण्याकरता, लवकरच ते अनैतिक कृत्ये आणि शेवटी व्यभिचार देखील करून बसतात.
२१ अशाप्रकारचे वाईट प्रभाव प्रौढांवर पडणार नाहीत असे म्हणता येणार नाही. व्यापारातील अप्रामाणिक व्यवहार आणि स्वतःचे स्वार्थ साधण्याकरता घेतलेले निर्णय देखील सात्विकतेच्या अभावाची चिन्हे आहेत. जगिक मार्गांनी वाटचाल केल्याने आपण यहोवापासून दूर जाऊ. म्हणूनच आपण ‘वाइटाचा द्वेष करावा, बऱ्याची आवड धरावी’ आणि सतत सात्विकपणे चालत राहावे.—आमोस ५:१५.
“माझा उद्धार कर, माझ्यावर दया कर”
२२-२४. (अ) स्तोत्र २६ च्या शेवटल्या शब्दांत कोणते उत्तेजन दिले आहे? (ब) पुढील लेखात कोणत्या पाशाविषयी चर्चा केली आहे?
२२ दाविदाने देवाला केलेल्या या प्रार्थनेत शेवटी म्हटले: स्तोत्र २६:११, १२) सात्विकपणे चालण्याचा निर्धार करण्यासोबतच दावीद देवाला आपला उद्धार करण्याची विनंती करतो. हा किती प्रोत्साहनदायक विचार आहे! आपण पापपूर्ण अवस्थेत असलो तरीसुद्धा, जर आपण सात्विकपणे चालण्याचा निर्धार केला तर यहोवा आपल्याला मदत करेल.
“मी तर सात्विकपणे वागेन; माझा उद्धार कर, माझ्यावर दया कर. माझा पाय प्रशस्त स्थळी स्थिर आहे; जनसभांत मी परमेश्वराचा धन्यवाद करीन.” (२३ देवाच्या सार्वभौमत्वाचा आपण आदर करतो आणि त्यास प्रिय मानतो हे आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात दिसून आले पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकजण यहोवाला आपल्या मनातील सर्वात आंतरिक विचारांचे व भावनांचे परीक्षण करून त्यांस शुद्ध करण्याची प्रार्थनापूर्वक विनंती करू शकतो. देवाच्या वचनाचा मनःपूर्वक अभ्यास केल्यास आपल्याला त्याचे सत्य सदोदीत आपल्या डोळ्यापुढे ठेवण्यास मदत मिळेल. तेव्हा, आपण वाईट संगती टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावा आणि जनसभांत त्याचा महिमा वर्णावा. राज्य प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यात आपण आवेशाने सहभाग घ्यावा आणि जगातल्या गोष्टींकडे आकर्षित होऊन कधीही देवासोबतचा आपला मोलवान नातेसंबंध धोक्यात आणू नये. सात्विकपणे चालण्याचा आपण मनःपूर्वक प्रयत्न करतो तेव्हा यहोवा आपल्याला दया दाखवेल याची आपण खात्री बाळगू शकतो.
२४ सात्विकपणाचा संबंध जीवनाच्या सर्व बाबींशी असल्यामुळे आपण एका अत्यंत घातक पाशापासून सांभाळून राहण्याची गरज आहे, तो पाश म्हणजे मद्याचा दुरुपयोग. याविषयी पुढील लेखात चर्चा केली आहे.
तुम्हाला आठवते का?
• बुद्धिवंत प्राण्यांचा न्याय त्यांच्या सात्विकपणाच्या आधारावर केला जावा हे योग्य का आहे?
• सात्विकपणा म्हणजे काय आणि सात्विकपणे चालण्याचा काय अर्थ होतो?
• कोणती गोष्ट आपल्याला सात्विकपणे चालण्यास मदत करू शकते?
• सात्विकपणे चालत राहण्याकरता आपण कोणत्या धोक्यांपासून सावध राहावे व त्यांना टाळावे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१४ पानांवरील चित्र]
तुमच्या अगदी मनातील विचार पारखण्याची तुम्ही वेळोवेळी यहोवाला विनंती करता का?
[१४ पानांवरील चित्र]
यहोवाच्या प्रेमदयेची कृत्ये तुम्ही सदोदीत आपल्या डोळ्यांपुढे ठेवता का?
[१५ पानांवरील चित्रे]
परीक्षांना तोंड देताना आपला सात्विकपणा टिकवून ठेवल्याने आपण यहोवाचे मन आनंदित करतो
[१७ पानांवरील चित्रे]
सात्विकपणे चालण्याकरता आपली मदत करण्यासाठी यहोवाने ज्या तरतुदी केल्या आहेत त्यांचा तुम्ही फायदा घेता का?