तरुणांनो, यहोवाला शोभेल असे चाला
तरुणांनो, यहोवाला शोभेल असे चाला
काही ख्रिस्ती तरुणांना आपल्या कुटुंबापासून व मंडळीपासून काही काळ दूर राहावे लागते. काहींना आपले सेवाकार्य वाढवण्याच्या उद्देशाने असे करावे लागले आहे. तर इतरांना जगाच्या कारभारांत तटस्थ राहिल्यामुळे आपले घर सोडावे लागले आहे. (यशया २:४; योहान १७:१६) काही देशांत ‘कैसराने’ विश्वासू तरुणांना तुरुंगवासाची किंवा समाजोपयोगी श्रमदान करण्याची शिक्षा दिली आहे. *—मार्क १२:१७; तीत ३:१, २.
तटस्थ भूमिकेमुळे तुरुंगवास भोगत असताना या तरुणांना बराच काळ गुन्हेगार तरुणांसोबत राहणे भाग पडू शकते. त्याचप्रकारे इतर कारणांमुळे घरापासून दूर राहिल्यामुळे काही तरुणांना अनैतिक वातावरणात उठणेबसणे भाग पडते. अशा परिस्थितीत राहण्याशिवाय ज्यांना पर्याय नाही अशा ख्रिस्ती तरुणांना आणि इतर बांधवांना ‘देवाला शोभेल असे चालण्याकरता’ बऱ्याच दबावांवर मात कशी करता येईल व या परिस्थितीला तोंड कसे देता येईल? (१ थेस्सलनीकाकर २:१२) तसेच, उद्भवू शकणाऱ्या संभाव्य समस्यांना तोंड देण्याकरता आईवडील त्यांना कशाप्रकारे सुसज्ज करू शकतात?—नीतिसूत्रे २२:३.
आगळीवेगळी आव्हाने
३७ महिने घरापासून दूर राहावे लागलेला २१ वर्षीय टॉकेस म्हणतो: “आईवडिलांच्या छत्रछायेतून आणि मला चांगल्याप्रकारे ओळखणाऱ्या वडिलांच्या प्रेमळ देखरेखीपासून दूर राहणे एक कठीण व भीतिदायक अनुभव होता.” * तो पुढे म्हणतो: “कधीकधी, मला अगदी असहाय वाटायचे.” वीस वर्षांच्या पेत्रोसला दोन वर्षांपेक्षा अधिक काळ घरापासून दूर राहावे लागले. तो कबूल करतो: “जीवनात पहिल्यांदा मला करमणूक व सोबती निवडण्यासंबंधीचे निर्णय एकट्याने घेण्याची पाळी आली आणि माझे निर्णय नेहमीच योग्य नव्हते.” तो सांगतो: “पूर्वीपेक्षा अधिक स्वातंत्र्य मिळाल्याने अर्थातच जबाबदारीही वाढली, त्यामुळे कधीकधी मला खूप मनःस्ताप व्हायचा.” टासोस नावाच्या एका ख्रिस्ती वडिलांचा सहसा अशा परिस्थितीत असणाऱ्या ख्रिस्ती तरुणांशी संपर्क येतो; ते म्हणतात: “विश्वासात नसलेल्या समवयीनांची गलिच्छ भाषा, त्यांची बंडखोर वृत्ती आणि हिंसक वर्तन या सर्वांचा या बेसावध व कमजोर तरुणांवर अनिष्ट परिणाम होतो.”
बायबलमधील तत्त्वांबद्दल पुरेसा आदर नसलेल्या लोकांमध्ये वावरताना ख्रिस्ती तरुणांना या सोबत्यांच्या अनैतिक व गैरशास्त्रीय वर्तनाचे अनुकरण करण्याचा मोह आवर्जून टाळावा लागतो. (स्तोत्र १:१; २६:४; ११९:९) नियमितरित्या वैयक्तिक अभ्यास करणे, सभांना उपस्थित राहणे व क्षेत्र सेवेत सहभाग घेणे सोपे जात नाही. (फिलिप्पैकर ३:१६) तसेच आध्यात्मिक ध्येये जोपासणेही सोपे नसते.
विश्वासू ख्रिस्ती तरुण निश्चितच आपल्या वागण्याबोलण्याने यहोवाचे मन आनंदित करू इच्छितात. “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यास मी प्रत्युत्तर देईन,” या आपल्या स्वर्गीय पित्याच्या विनंतीवजा निमंत्रणाला ते एकनिष्ठपणे प्रतिसाद देऊ इच्छितात. (नीतिसूत्रे २७:११) आपल्या आचारविचारांमुळे व वर्तणुकीमुळे यहोवा व त्याच्या लोकांबद्दलच्या इतरांच्या दृष्टिकोनावर प्रभाव पडतो याची त्यांना जाणीव आहे.—१ पेत्र २:१२.
कलस्सैकर १:९-११) बायबलमध्ये अशा कित्येक देवभीरू तरुणांची उदाहरणे आहेत जे एका परक्या, द्वेषपूर्ण व मूर्तिपूजक वातावरणात देवाला शोभेल असे वागण्यात यशस्वी ठरले.—फिलिप्पैकर २:१५.
पण प्रशंसनीय गोष्ट म्हणजे, यांपैकी बहुतेक तरुण त्या पहिल्या शतकातील बांधवांसारखे होण्याचा कसोशीने प्रयत्न करतात ज्यांच्याविषयी प्रेषित पौलाने अशी प्रार्थना केली होती: “तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे . . . सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ति ही तुम्हास आनंदासह प्राप्त व्हावी.” (यहोवा “परमेश्वर योसेफाबरोबर होता”
कोवळ्या वयातच याकोब व राहेल यांचा लाडका पुत्र योसेफ याच्यावर आपल्या देवभीरू पित्याच्या छत्रछायेपासून दूर जीवन कंठण्याची पाळी आली. त्याला ईजिप्तमध्ये गुलाम म्हणून विकण्यात आले. मेहनतीपणा, विश्वासूपणा व नैतिकता यांच्या बळावर आपण एक आदर्श तरुण असल्याचे योसेफाने सिद्ध केले. यहोवाची सेवा न करणाऱ्या पोटीफरच्या घरात तो एक साधा सेवक होता; पण तो अतिशय कर्तव्यदक्ष व मेहनती असल्यामुळे त्याच्या मालकाने शेवटी त्याला सबंध घरादाराचा कारभारी म्हणून नेमले. (उत्पत्ति ३९:२-६) योसेफ यहोवाला विश्वासू राहिला आणि यामुळे त्याला तुरुंगात जावे लागले तेव्हा, “सारे काही करून काय उपयोग?” असा निष्कर्ष त्याने काढला नाही. तुरुंगातसुद्धा त्याने उत्तम गुण प्रदर्शित केले आणि त्यामुळे लवकरच त्याला तुरुंगातील कारभारांवरही देखरेख करण्यासाठी नेमण्यात आले. (उत्पत्ति ३९:१७-२२) देवाने त्याला आशीर्वादित केले; उत्पत्ति ३९:२३ येथे सांगितल्यानुसार, यहोवा “परमेश्वर योसेफाबरोबर होता.”
आपल्या देवभीरू कुटुंबापासून दूर असताना योसेफाला त्याच्या अवतीभवती राहणाऱ्या मूर्तिपूजक लोकांचे अनुकरण करणे, ईजिप्तच्या अनैतिक जीवनशैलीनुसार स्वतःला जुळवून घेणे किती सहज शक्य होते! पण तो देवाच्या तत्त्वांना जडून राहिला आणि अतिशय प्रबळ मोहपाशांना तोंड देऊनही निष्कलंक राहिला. पोटीफरच्या पत्नीने वारंवार त्याला आपल्यासोबत अनैतिक संभोग करण्याची गळ घातली तेव्हा त्याने तिला असे उत्तर दिले: “एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?”—उत्पत्ति ३९:७-९.
आज, साक्षीदार तरुणांनी वाईट संगत, अनैतिक करमणूक, अश्लील साहित्य आणि हीन दर्जाचे संगीत यांविरुद्ध बायबलमध्ये दिलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांना जाणीव आहे की “परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत. ते बरेवाईट पाहत असतात.”—नीतिसूत्रे १५:३.
मोशेने “क्षणिक सुख” धिक्कारले
मोशे फारोच्या दरबारातील मूर्तिपूजक व सुखविलासी वातावरणात लहानाचा मोठा झाला. बायबल त्याच्याविषयी असे म्हणते: “[मोशेने] आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले; पापाचे क्षणिक इब्री लोकांस ११:२४, २५.
सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले.”—जगासोबत मैत्री केल्याने काही फायदे मिळू शकतात पण ही मैत्री अतिशय अल्पकालीन आहे. जास्तीतजास्त या जगाच्या नाशाला जो मर्यादित काळ उरला आहे तोपर्यंत ती टिकेल. (१ योहान २:१५-१७) त्यापेक्षा मोशेच्या उदाहरणाचे अनुकरण करणेच चांगले ठरणार नाही का? बायबल म्हणते की “जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.” (इब्री लोकांस ११:२७) त्याने आपले मन आपल्या देवभीरू पूर्वजांच्या आध्यात्मिक वतनावर केंद्रित ठेवले. त्याने यहोवाच्या उद्देशाला आपल्या जीवनाचा उद्देश बनवला आणि देवाची इच्छा पूर्ण करण्याचे ध्येय पत्करले.—निर्गम २:११; प्रेषितांची कृत्ये ७:२३, २५.
देवभीरू तरुणांना अधार्मिक व द्वेषपूर्ण वातावरणात राहणे भाग पडते, तेव्हा ते वैयक्तिक अभ्यासाद्वारे “जो अदृश्य आहे” त्याच्याविषयी अधिकाधिक ज्ञान घेऊन यहोवासोबत आपला वैयक्तिक नातेसंबंध अधिक दृढ करू शकतात. ख्रिस्ती कार्यांत व्यस्त राहणे, अर्थात सभांना नियमित उपस्थित राहणे व सेवेत सहभाग घेणे त्यांना आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष केंद्रित ठेवण्यास मदत करेल. (स्तोत्र ६३:६; ७७:१२) त्यांनी मोशेइतकाच आपला विश्वास व आशा दृढ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले विचार व कृती यहोवावर केंद्रित ठेवून त्याच्या मैत्रीत आनंदी होणे हेच त्यांच्याकरता श्रेयस्कर ठरेल.
तिने आपल्या मुखाने देवाची स्तुती केली
घरापासून दूर असूनही अनुकरणीय वर्तन राखणाऱ्या तरुणांच्या उदाहरणांत आणखी एक उदाहरण एका इस्राएली मुलीचे आहे जिला देवाचा संदेष्टा अलीशा याच्या काळात सिरियन लोकांनी बंदिवान बनवून नेले होते. सिरीयाचा सेनापती नामान या कोडी माणसाच्या पत्नीची ती दासी बनली. तिने आपल्या मालकिणीला म्हटले: “शोमरोनातल्या संदेष्ट्यांशी माझ्या धन्याची गाठ पडती तर किती बरे होते? त्याने त्याचे कोड बरे केले असते.” तिच्या या साक्षीमुळे नामान इस्राएलला अलीशाकडे गेला आणि त्याचा कोड बरा झाला. शिवाय नामान यहोवाचा उपासक बनला.—२ राजे ५:१-३, १३-१९.
आईवडिलांपासून दूर असतानाही, तरुणांनी आपल्या वाचेचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करणे किती महत्त्वाचे आहे हे या इस्राएली मुलीच्या उदाहरणावरून दिसून येते. समजा, त्या मुलीला “बाष्कळ गोष्टी” किंवा “टवाळी” करण्याची सवय असती तर संधी मिळाल्यावर तिने इफिसकर ५:४; नीतिसूत्रे १५:२) नुकतेच विशीत पदार्पण केलेल्या निकोस नावाच्या एका तरुणाला तटस्थ भूमिकेमुळे तुरुंगवास झाला, तेव्हाचा अनुभव तो सांगतो: “एका कृषी तुरुंगात मी इतर काही बांधवांसोबत, आईवडिलांच्या व मंडळीच्या अधिकारापासून दूर होतो; पण काही दिवसांतच आमच्या संभाषणाचा दर्जा खालावल्याचे मला आढळले. यहोवाची स्तुती होईल अशाप्रकारचे ते नक्कीच नव्हते.” पण आनंदाची गोष्ट म्हणजे, निकोस व इतर बांधवांना पौलाच्या पुढील सल्ल्याचे पालन करण्यासाठी मदत देण्यात आली आहे: “पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे, जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये.”—इफिसकर ५:३.
ज्याप्रकारे आपल्या मुखाने देवाचे गौरव केले तसे तिला निःसंकोचपणे करता आले असते का? (यहोवा त्यांच्याकरता वास्तविक होता
प्राचीन बॅबिलोन येथे दानीएलाच्या तीन इब्री सोबत्यांना आलेल्या अनुभवावरून, जो थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्काळाविषयीहि विश्वासू राहील या येशूच्या विधानाची सत्यता पटते. (लूक १६:१०) मोशेच्या नियमशास्त्रानुसार निषिद्ध असलेल्या खाद्यांचा प्रश्न आला तेव्हा, आपण बंदिवान आहोत त्यामुळे आपला नाईलाज आहे, असा तर्क ते सहज करू शकले असते. पण क्षुल्लक भासणाऱ्या गोष्टीविषयी देखील त्यांनी गांभीर्याने पाऊल उचलले तेव्हा त्यांना किती मोठा आशीर्वाद मिळाला! राजाच्या मेजावरील मिष्टान्नांतून खातपीत असलेल्या इतर बंदिवानांपेक्षा ते अधिक आरोग्यवान व बुद्धिमान ठरले. या लहान गोष्टींत विश्वासू राहिल्यामुळे निश्चितच त्यांना धैर्य मिळाले; जेव्हा एका मूर्तीसमोर दंडवत करण्याची मोठी परीक्षा आली तेव्हा त्यांनी निडरतेने नकार दिला.—दानीएल १:३-२१; ३:१-३०.
या तीन तरुणांकरता यहोवा अगदी वास्तविक होता. आपल्या कुटंबांपासून व देवाच्या उपासनेच्या केंद्रस्थानापासून दूर असूनही जगापासून निष्कलंक राहण्याचा त्यांचा दृढ संकल्प होता. (२ पेत्र ३:१४) यहोवासोबतचा नातेसंबंध त्यांना इतका मोलवान होता की त्यासाठी ते आपला जीवही गमावण्यास तयार होते.
यहोवा तुम्हाला सोडणार नाही
आपल्या प्रिय व भरवशाच्या माणसांपासून दूर असताना साहजिकच तरुणांना असुरक्षित, अनिश्चित व घाबरल्यासारखे वाटेल. पण ‘परमेश्वर आपला त्याग करणार नाही’ या आत्मविश्वासाने ते सर्व परीक्षांना व समस्यांना तोंड देऊ शकतात. (स्तोत्र ९४:१४) ‘नीतिमत्त्वामुळे त्यांना दुःख जरी सोसावे लागले’ तरीसुद्धा “नीतिमार्गाने” चालत राहण्याकरता मदत करण्यासाठी यहोवा सदोदित त्यांच्या पाठीशी आहे.—१ पेत्र ३:१४; नीतिसूत्रे ८:२०.
योसेफ, मोशे, इस्राएली दासी व तीन विश्वासू इब्री तरुणांना यहोवा उत्तरोत्तर सामर्थ्य देत गेला व त्यांना त्याने विपूल आशीर्वाद दिले. आज जे ‘विश्वासासंबंधीचे सुयुद्ध’ करतात त्यांचा संभाळ करण्याकरता तो त्याचा पवित्र आत्मा, त्याचे वचन आणि त्याच्या संघटनेचा उपयोग करत आहे व त्यांच्यासमोर त्याने ‘सार्वकालिक जीवनाचे’ प्रतिफळ ठेवले आहे. (१ तीमथ्य ६:११, १२) होय, यहोवाला शोभेल असे वागणे शक्य आहे आणि हाच बुद्धिमत्तेचा मार्ग आहे.—नीतिसूत्रे २३:१५, १९.
[तळटीपा]
^ परि. 2 टेहळणी बुरूज मे १, १९९६ पृष्ठे १८-२० पाहा.
^ परि. 5 काही नावे बदलण्यात आली आहेत.
[२५ पानांवरील चौकट]
पालकांनो—आपल्या मुलांना तयार करा!
“तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातांतील बाणांप्रमाणे आहेत.” (स्तोत्र १२७:४) बाण आपोआप निशाणावर लागू शकत नाहीत. त्यांना कौशल्याने नेम धरून सोडावे लागते. त्याचप्रकारे मुलांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन न मिळाल्यास, घरापासून दूर राहताना येणाऱ्या वास्तविक समस्यांना ते तोंड देऊ शकणार नाहीत.—नीतिसूत्रे २२:६.
तरुण सहसा उतावीळपणे वागतात किंवा ‘तरुणपणाच्या वासनांना’ स्वतःवर प्रबळ होऊ देतात. (२ तीमथ्य २:२२) म्हणूनच बायबल ताकीद देते: “छडी व वाग्दंड ज्ञान देतात, पण मोकळे सोडिलेले पोर आपल्या आईला खाली पाहावयास लावते.” (नीतिसूत्रे २९:१५) मुलांच्या तारुण्यसुलभ वागणुकीवर निर्बंध न लावल्यास घरापासून दूर असताना येणाऱ्या समस्यांना व दबावांना तोंड देण्याकरता ते तयार होऊ शकणार नाहीत.
स्पष्ट व जबाबदार पद्धतीने ख्रिस्ती पालकांनी आपल्या मुलांना या व्यवस्थीकरणातील जीवनाच्या वास्तविकता, अडथळे व दबाव यांविषयी जागरूक केले पाहिजे. घरापासून दूर राहण्याची यदाकदाचित पाळी आलीच तर कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते याविषयी त्यांनी आपल्या मुलांना निराशावादी अथवा नकारात्मक वृत्ती न बाळगता समजावून सांगितले पाहिजे. हे प्रशिक्षण तसेच देवाकडून येणारी बुद्धी पदरी असल्यास, “भोळ्यांस चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण प्राप्त” होईल.—नीतिसूत्रे १:४.
आपल्या मुलांच्या हृदयात देवाची नीतिमूल्ये व नैतिक तत्त्वे बिंबवणारे आईवडील त्यांना जीवनाच्या आव्हानांशी दोन हात करण्याची ताकद मिळवून देतात. नियमित कौटुंबिक बायबल अभ्यास, मनमोकळा सुसंवाद आणि आपल्या अपत्याच्या कल्याणाची मनस्वी काळजी हीच यशाची गुरूकिल्ली आहे. आईवडिलांनी संतुलित पण तरीसुद्धा सकारात्मक व वाजवी पद्धतीने आपल्या मुलांना देवाच्या मार्गांचे प्रशिक्षण दिले पाहिजे जेणेकरून जीवनात स्वतःच्या पायांवर उभे राहण्यास ते समर्थ ठरतील. स्वतःच्या आदर्शातून आईवडील मुलांना शिकवू शकतात की या जगात राहूनही त्याचा भाग न बनणे शक्य आहे.—योहान १७:१५, १६.
[२३ पानांवरील चित्र]
काही ख्रिस्ती तरुणांना आपले घर सोडावे लागले आहे
[२४ पानांवरील चित्रे]
मोहांचा प्रतिकार करण्याद्वारे अनेक तरुण, योसेफाच्या उदाहरणानुसार वागून नैतिकरित्या शुद्ध राहू शकतात
[२६ पानांवरील चित्रे]
आपल्या मुखाने यहोवाची स्तुती करणाऱ्या इस्राएली दासीचे अनुकरण करा