धार्मिक छळ का?
धार्मिक छळ का?
धर्मासाठी लोकांचा छळ केला जावा असे तुम्हाला वाटते का? कदाचित नाही—निदान इतरांच्या हक्कांचे उल्लंघन होत नाही तोपर्यंत तरी नाही. तरीपण, धार्मिक छळ अनेक वर्षांपासून चालत आला आहे आणि आजही तो आहे. उदाहरणार्थ, २० व्या शतकादरम्यान, युरोपमधील पुष्कळशा आणि जगाच्या इतर भागांतील यहोवाच्या साक्षीदारांना अनेकदा त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले आणि त्यांना क्रूर वागणूकही देण्यात आली.
त्या काळादरम्यान, युरोपच्या प्रमुख अधिकेंद्रित शासनांखाली यहोवाच्या साक्षीदारांचा क्रूर, पद्धतशीर आणि दीर्घकाळापर्यंत छळ करण्यात आला. त्यांच्या अनुभवावरून धार्मिक छळाविषयी काय शिकायला मिळते? शिवाय त्यांनी ज्या पद्धतीने छळाला तोंड दिले त्यावरून आपण काय शिकू शकतो?
“जगाचे नाहीत”
यहोवाचे साक्षीदार नियमांचे पालन करायचा, शांतिप्रिय असण्याचा आणि नीतितत्त्वांना धरून चालण्याचा प्रयत्न करतात. ते सरकारांचा विरोध करत नाहीत किंवा त्यांच्याशी झगडण्याचा प्रयत्न करत नाहीत तसेच हुतात्मे बनण्यासाठी ते छळाला उत्तेजन देत नाहीत. हे ख्रिस्ती राजकीय मामल्यांत तटस्थ असतात. हे येशूच्या शब्दांच्या एकवाक्यतेत आहे: “जसा मी जगाचा नाही तसे [माझे अनुयायीही] जगाचे नाहीत.” (योहान १७:१६) बहुतेक सरकारे साक्षीदारांच्या तटस्थ भूमिकेला मान्य करतात. परंतु, ख्रिश्चनांनी जगाचे भाग असू नये या बायबलच्या नियमाची अधिकेंद्रित शासकांना मुळीच पर्वा नाही.
हाईडेल्बर्ग विद्यापीठ, जर्मनी येथे नोव्हेंबर २०००
साली भरवलेल्या एका परिषदेत याचे कारण समजावण्यात आले. या परिषदेचा विषय होता, “दडपण आणि स्वप्रतिपादन: राष्ट्रीय समाजवादी आणि कम्युनिस्टवादी हुकूमशाही शासनांखाली यहोवाचे साक्षीदार.” अधिकेंद्रित शासनांवरील हॉनॉ-ऑरेंट संशोधन संस्थेचे डॉ. क्लेमन्स फोल्नहॉल्स यांनी असे निरीक्षण केले: “अधिकेंद्रित शासनांची मर्यादा केवळ राजनीतीपर्यंतच नसते. ते एका व्यक्तीकडून संपूर्ण अधीनतेची अपेक्षा करतात.”खरे ख्रिस्ती आपले ‘संपूर्ण व्यक्तित्व’ कोणा मानवी सरकाराच्या अधीन करू शकत नाहीत कारण त्यांनी केवळ यहोवा देवाला आपले सर्वस्व अर्पण केले आहे. अधिकेंद्रित हुकूमशाही शासनांखाली राहणाऱ्या साक्षीदारांना सरकारांचे नियम त्यांच्या विश्वासाच्या अपेक्षेच्या विरोधात असल्याचे आढळले आहे. असा विरोध निर्माण होतो तेव्हा त्यांनी काय केले आहे? गतकाळात, यहोवाच्या साक्षीदारांनी येशू ख्रिस्ताच्या शिष्यांप्रमाणे पुढील तत्त्वाचे पालन केले: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”—प्रेषितांची कृत्ये ५:२९.
हजारो साक्षीदार, क्रूर छळ असतानाही आपल्या विश्वासाला निष्ठावान राहून राजकीय मामल्यांमध्ये तटस्थ राहिले आहेत. ते कसे टिकून राहू शकले? तग धरून राहण्याची ताकद त्यांना कोठून मिळाली? हे त्यांच्याकडूनच ऐकून घ्या. शिवाय, त्यांच्या अनुभवातून साक्षीदार आणि साक्षीदार नसलेले काय शिकू शकतात तेही आपण पाहू या.
[४ पानांवरील संक्षिप्त आशय]
जर्मनीतील यहोवाच्या साक्षीदारांना २० व्या शतकातील दोन्ही अधिकेंद्रित शासनांमध्ये दीर्घकाळापर्यंत क्रूर छळ सहन करावा लागला
[४ पानांवरील संक्षिप्त आशय]
“अधिकेंद्रित शासनांची मर्यादा केवळ राजनीतीपर्यंतच नसते. ते संपूर्ण व्यक्तीवर अधिकार गाजवतात.”—डॉ. क्लेमन्स फोल्नहॉल्स
[४ पानांवरील चित्र]
कुसरो कुटुंब आपल्या विश्वासाची हातमिळवणी करण्यास तयार नसल्यामुळे त्यांना त्यांच्या स्वातंत्र्यापासून वंचित ठेवण्यात आले
[४ पानांवरील चित्र]
योहानस हार्म्झ याला आपल्या विश्वासाकरता नात्सी तुरुंगात मृत्यूदंड देण्यात आला