तुम्हाला आठवते का?
तुम्हाला आठवते का?
तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? मग, पुढील प्रश्नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:
• जर्मनीच्या संघीय संविधान कोर्टामुळे धर्माच्या बाबतीत कोणता कायदेशीर विजय प्राप्त झाला?
एका कोर्टाने यहोवाचे साक्षीदार आणि सार्वजनिक कायदा निगम म्हणून त्यांना मिळालेली मान्यता यांविरुद्ध दिलेला नकारात्मक निर्णय या संघीय संविधान कोर्टाने फेटाळून लावला. विजयी निकालानुसार, धार्मिक स्वातंत्र्याच्या चौकटीत राहून एखादा राज्याच्या मागण्यांपेक्षा ‘आपल्या धार्मिक विश्वासांचे पालन’ करू शकतो.—८/१५, पृष्ठ ८.
• ईयोबावर आलेले संकट किती काळापर्यंत होते?
ईयोबाने अनेक वर्षांपर्यंत संकटाचा सामना केल्याचे ईयोबाचे पुस्तक सुचवत नाही. त्याच्यावर आलेल्या पीडा आणि या पीडांपासून मुक्ती मिळण्यासाठी केलेली व्यवस्था हे सर्व काही महिन्यांत, कदाचित एक वर्षाच्या आत संपुष्टात आले असावे.—८/१५, पृष्ठ ३१.
• दियाबल केवळ एक अंधविश्वास नाही हे आपण इतक्या खात्रीने कसे सांगू शकतो?
दियाबल खरा आहे हे येशू ख्रिस्ताला माहीत होते. येशूची परीक्षा, त्याच्यामधील दुष्ट प्रवृत्तीने घेतली नव्हती तर एका खऱ्या व्यक्तीने त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला होता. (मत्तय ४:१-११; योहान ८:४४; १४:३०)—९/१, पृष्ठे ५-६.
• नीतिसूत्रे १०:१५ म्हणते: “धनवानाचे धन हे त्याचे बळकट नगर होय, परंतु गरिबांचा नाश त्यांच्या दारिद्र्यांत आहे” हे शब्द खरे कसे ठरतात?
तटबंदीच्या नगरातील रहिवाशांना काही प्रमाणात सुरक्षा मिळते त्याचप्रमाणे जीवनातल्या काही अनिश्चित क्षणी धन सुरक्षा देऊ शकते. आणि अनपेक्षित प्रसंग ओढवतात तेव्हा गरिबी नाशकारक ठरू शकते.—९/१५, पृष्ठ २४.
• कोणत्या अर्थाने अनोशच्या काळातील “लोक यहोवाचे नाव घेऊ लागले”? (उत्पत्ति ४:२६, NW)
देवाच्या नावाचा उपयोग मनुष्याच्या इतिहासाच्या अगदी सुरवातीपासूनच केला जात होता. त्याअर्थी, अनोशच्या काळापासून लोक विश्वासाने, यहोवाचे नाव घेऊ लागले असे म्हणता येणार नाही. कदाचित त्या काळात लोकांनी स्वतःला किंवा ज्यांच्याद्वारे ते देवाची उपासना करण्याचा दावा करत होते अशा इतर मानवांना यहोवाचे नाव देण्यास सुरवात केली असावी.—९/१५, पृष्ठ २९.
• बायबलमध्ये वापरण्यात आलेल्या “शिस्त” या शब्दाचा नेमका काय अर्थ होतो?
“शिस्त” या शब्दावरून कोणत्याही प्रकारचा दुर्व्यवहार किंवा क्रूर वागणूक सूचित होत नाही. (नीतिसूत्रे ४:१३; २२:१५) “शिस्त” याकरता असलेल्या ग्रीक शब्दाचा मुख्यतः मार्गदर्शन, शिक्षण, सुधारणूक आणि कधीकधी कडक पण प्रेमळपणे शिक्षा करण्याशी संबंध आहे. एका महत्त्वपूर्ण मार्गाने पालक यहोवाचे अनुकरण करू शकतात. ते आपल्या मुलांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करू शकतात. (इब्री लोकांस १२:७-१०)—१०/१, पृष्ठे ८, १०.
• आजचे खरे ख्रिस्ती कशाप्रकारे दाखवून देतात, की ते देवाच्या राज्याला पाठिंबा देतात?
देवाच्या राज्याला पाठिंबा देताना यहोवाचे साक्षीदार राजकारणात भाग घेत नाहीत किंवा जगिक सरकारांविरुद्ध बंड करत नाहीत—बंदी असलेल्या देशांमध्येही. (तीत ३:१) येशूने आणि त्याच्या पहिल्या शतकातील शिष्यांनी केल्याप्रमाणे ते प्रामाणिकपणा, नैतिक शुद्धता आणि कामासूपणा अशी बायबलची हितकर मूल्ये शिकायला लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतात.—१०/१५, पृष्ठ ६.
• अँडीजमध्ये जीवन-रक्षक पाणी कसे वाहत आहे?
यहोवाचे साक्षीदार बायबलमधील सत्य लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहेत; क्वेचुआ किंवा आयमारा या दोन स्थानिक भाषांत ते लोकांना सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. साक्षीदार, तितिकाका सरोवराच्या द्वीपावरील आणि सरोवराच्या पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतीने तयार केलेल्या ‘तंरगत्या’ द्वीपांवरील लोकांप्रत सुवार्ता पोहंचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.—१०/१५, पृष्ठे ८-१०.
• आपल्या मार्गदर्शनासाठी देवाने असे काय दिले आहे ज्याची तुलना आधुनिक प्रवासी विमानांत असलेल्या संगणक मार्गदर्शन व्यवस्थेशी करता येऊ शकते?
देवाने मानवांमध्ये नैतिक मार्गदर्शनासाठी, एक आंतरिक नैतिक भावनेची क्षमता दिली आहे. यालाच विवेकबुद्धी म्हणतात. (रोमकर २:१४, १५)—११/१, पृष्ठे ३-४.
• येशूचा मृत्यू बहुमुल्य का आहे?
परिपूर्ण मनुष्य आदाम याने पाप केले तेव्हा त्याने स्वतःचे आणि त्याच्या संततीचे जीवन गमावले. (रोमकर ५:१२) परिपूर्ण मनुष्य येशूने आपल्या मानवी जीवनाचे बलिदान दिले; या खंडणीद्वारे त्याने विश्वासू मानवांना सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याची संधी पुन्हा दिली.—११/१५, पृष्ठे ५-६.
• कलस्सैकर ३:११ येथे उल्लेखलेले स्कुथी [सिथियन] लोक कोण होते?
सिथियन लोक भटक्या जमातीचे लोक होते. युरेशियातील स्टेप गवताळ प्रदेशावर सा.यु.पू. ७०० ते ३०० पर्यंत या लोकांचा अंमल होता. ते तरबेज घोडेस्वार होते. कलस्सैकर ३:११ या वचनात त्यांचा उल्लेख कोणत्याही विशिष्ट राष्ट्राच्या लोकांच्या संदर्भात नव्हे तर असंस्कृत लोकांच्या संदर्भात करण्यात आला असावा.—११/१५, पृष्ठे २४-५.
• सुवर्ण नियमाची शिकवण सतत आपल्या लक्षात असली पाहिजे असे आपण का म्हणू शकतो?
हे नीतिवचन यहुदी धर्म, बौद्ध धर्म आणि ग्रीक तत्त्वज्ञान या सर्वांमध्ये अनेक पद्धतींनी समजावण्यात आले आहे. परंतु, डोंगरावरील प्रवचनात येशूने दिलेल्या सुवर्ण नियमानुसार इतरांचे चांगले करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे. आणि ही विश्वव्यापी शिकवण कोणत्याही कालखंडात, कोठेही राहत असलेल्या व्यक्तीच्या जीवनाला लागू होते. (मत्तय ७:१२)—१२/१, पृष्ठ ३.