व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

द्वेष फैलावणारी आग

द्वेष फैलावणारी आग

द्वेष फैलावणारी आग

“द्वेष करणारे ज्यांचा द्वेष करतात त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत.”जेम्स रस्सल लोवल, एक निबंधकार व राजकारणी.

आज जगभरात पाहावे तिथे द्वेषाची आग भडकलेली आहे. त्यामुळे द्वेषाचा विषय निघताच ईस्ट पूर्व टीमर, कॉसोवो, लायबीरिया, लिटलटन आणि सारायेवोसारख्या देशांची; तसेच नियो-नात्झी, स्किनहेड, व्हाइट सुप्रिमसिस्टसारख्या गटांचा विचार मनात येतो. रंग-रुपाच्या आणि जाती-पातीच्या नावावरून यांनी इतरांचा भयंकर द्वेष केला आहे. जळून अक्षरशः कोळसा झालेल्या हजारो मानवी शवांचे भयानक चित्र आपल्या डोळ्यांसमोर येते.

अशी एक वेळ होती जेव्हा लोक द्वेष, लढाया आणि हिंसेचा लवलेश नसलेल्या जगाची वाट पाहत होते. पण, लोकांची घोर निराशा झाली. फ्रान्सच्या दिवंगत राष्ट्रपतींची पत्नी डॅनियल मिट्टरंड आपल्या तारुण्याच्या दिवसांबद्दल अर्थात दुसऱ्‍या महायुद्धाआधीच्या काळाबद्दल सांगते: “त्या काळी आम्ही एका सुखद जगात जीवन जगण्याची स्वप्नं पाहत होतो. आम्हाला पूर्ण खात्री होती की अशी वेळ लवकरच येईल जेव्हा लोक एकमेकांसोबत गुण्यागोविंदानं राहातील, एकमेकांवर विश्‍वास ठेवतील, सगळीकडे आनंदी आनंद असेल, कुणालाही कशाचीच कमतरता भासणार नाही आणि कुठल्याच गोष्टीची भीती वाटणार नाही.” पण, त्यांच्या या स्वप्नाचं काय झालं? ती अतिशय दुःखाने म्हणते की, “आमच्या त्या गोड स्वप्नाच्या केव्हाच चिंधड्या झाल्या.”

आज लोकांच्या मनात इतका द्वेष आहे की तो चटकन आपल्या लक्षात येतो. आता लोक अगदी उघड-उघड द्वेष करतात. असे करण्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही. ज्या ठिकाणी द्वेषाचा गंधही नसेल असे लोकांना वाटत होते त्या ठिकाणीही आता द्वेषामुळे इतके भयंकर अपराध घडले आहेत की ते ऐकून मन अक्षरशः सुन्‍न होते. परंतु तुम्ही कदाचित विचार कराल की मी माझ्या घरात किंवा देशांत अगदी सुरक्षित आहे. पण, वास्तविकता ही आहे की आज जगाच्या कानाकोपऱ्‍यात द्वेषाची आग भडकत आहे. हे चित्र आपण आपल्या डोळ्यांनी टीव्हीवर पाहतो. टीव्हीवरच काय, आता तर इंटरनेटवरही द्वेषाची आग पसरली आहे. तेव्हा द्वेषाच्या निरनिराळ्या पैलूंचा आपण आता विचार करू या.

मागील दशकाच्या काळापासून लोकांच्या मनात एकाएकी देश-प्रेमाची भावना जागी झाली आहे. हावर्ड सेंटर फॉर इंटरनॅशनल अफेयर्सचे अधिकारी जोसेफ एस. नाइ यांनी म्हटले: “असे म्हटले जाते, की वैज्ञानिक प्रगतीमुळे सारे जगच जणू एकत्र आले आहे. पण, एकमेकांवर प्रेम करण्याऐवजी जातीच्या व देशाच्या नावाने लोक अधिकाधिक भेद-भाव करू लागले आहेत. परिणामी, लढाई-संघर्षांना आणखीन खतपाणी मिळत राहते.”

द्वेषाची आग केवळ राष्ट्रा-राष्ट्रांत अथवा शेजारील राष्ट्रांतच नव्हे तर देशांतर्गत देखील भडकत आहे. कॅनडाचेच उदाहरण घ्या. या देशाविषयी लोक असे गुणगान गायचे की तिथल्या लोकांना भेद-भाव काय हेच माहीत नाही. पण, नंतर त्याच देशात पाच श्‍वेतवर्णीय लोकांनी मिळून एका वृद्ध माणसाची निघृणपणे हत्या केली तेव्हा हे जगजाहीर झाले की जगात अशी कुठलीच जागा नाही जिथे द्वेषाची काळी सावली पडलेली नाही. जर्मनीत एकेकाळी जाती-पातीच्या नावावरून फार किरकोळ भांडणे व्हायची. पण १९९७ साली अचानक अशा भांडणांमध्ये २७ टक्के वाढ झाली. तिथल्या मानफ्रेट कान्थर या मंत्र्याने म्हटले: “अशा बातम्या ऐकल्या की मन फार उदास होतं.”

जगात आणखीन एक प्रकारचा द्वेष आहे ज्याला “खानदानी द्वेष” असे म्हटले जाऊ शकते. खानदानी द्वेष म्हणजे कुटुंबात बरेच काळापासून चालत आलेली दुश्‍मनी. उत्तरी अल्बेनियामध्ये “अशा प्रकारच्या खानदानी द्वेषामुळे हजारो कुटुंबे विस्कटली आहेत.” एका अहवालानुसार तिथे ६,००० हून अधिक मुले स्वतःच्याच घरात एक प्रकारे कैद्यांचे जीवन जगत आहेत. आईवडील त्यांच्यावर कडक लक्ष देऊन असतात. कारण आपले वैरी आपल्या मुलांवर हल्ला करतील की काय याची भीती त्यांना सतत असते. फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनला मिळालेल्या अहवालानुसार अमेरिकेत “१९९८ सालापासून द्वेषाचे ७,७५५ अपराध घडले आणि त्यांपैकी निम्मेअधिक अपराध जातीपातीच्या नावावरून घडल्याचे समजते.” आणि बाकीचे अपराध धर्म आणि देश यावरून तर काही अपराध विकलांग लोकांविषयी असलेल्या द्वेषामुळे घडले.

या शिवाय शरणार्थींकडे देखील द्वेषाच्या नजरेनेच पाहिले जाते. आज जगभरात शरणार्थींची संख्या जवळजवळ २.१ कोटी आहे. आणि दुःखाची गोष्ट अशी की यांचा द्वेष करण्यात युवा पीढी सगळ्यात पुढे आहे. अशा कामात राजकीय पुढारी व इतर मोठ-मोठे लोक या तरुणांचा कळसूत्री बाहुल्यांसारखा वापर करून घेतात. बहुतेक वेळा शरणार्थींबद्दलचा असलेला द्वेष बाहेरून दिसत नसला तरी तो लोकांच्या मनात खदखदत असतो. त्यांना असे वाटते की परदेशातले लोक भरवशालायक नसतात. त्यामुळे लोक त्यांच्या जाती-धर्माला व संस्कृतीला तुच्छ लेखतात आणि त्यांच्याविषयी गैरसमज बाळगतात.

पण, प्रश्‍न आहे की लोकांच्या मनात द्वेषाची आग इतकी का भडकत आहे? द्वेषाची ही आग कशी शमवता येईल? पुढच्या लेखात याच विषयावर चर्चा केली जाईल.

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

Daud/Sipa Press