व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

टेहळणी बुरूजचे अलीकडील अंक तुम्ही वाचले आहेत का? मग, पुढील प्रश्‍नांद्वारे स्वतःचे परीक्षण करून पाहा:

यशया ६५:१७-१९ येथे “नवे आकाश व नवी पृथ्वी” या भविष्यवाणीची पूर्णता फक्‍त यहुद्यांच्या सुटकेसंबंधी नव्हती असे आपण ठामपणे का म्हणू शकतो?

कारण पहिल्या शतकातील प्रेषित पेत्र आणि योहान भविष्यातील पूर्णतेविषयी बोलत होते; त्या भविष्यवाणीचे आशीर्वाद अद्याप मिळायचे आहेत. (२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:१-४)—४/१५, पृष्ठे १०-१२.

हिंसात्मक गंधर्वांच्या प्राचीन ग्रीक दंतकथा कोठून आल्या असाव्यात?

प्रलयापूर्वी काही देवदूतांनी मानवी शरीरे धारण करून व्यभिचार आणि लोकांवर अत्याचार केला होता. त्यात आणखी भर घालून या दंतकथा तयार करण्यात आल्या असाव्यात. (उत्पत्ति ६:१, २)—४/१५, पृष्ठ २७.

विवाह समारंभांमध्ये प्रौढ ख्रिस्ती कोणत्या गोष्टींबद्दल दक्षता घेतील?

अशाप्रसंगी, खूप पिऊन मौजमजा करण्याचा प्रकार घडू नये हे महत्त्वाचे आहे. मद्यावर काही नियंत्रण नसले आणि बेभान नाचगाणे चालले असले तर असा प्रसंग येऊ शकतो. रिसेप्शनसाठी सर्वांना आमंत्रण आहे असे स्पष्टपणे सांगितले असेल तरच जावे नाहीतर आमंत्रण न दिलेल्यांनी तेथे जाऊ नये. रिसेप्शन योग्य समयी संपेपर्यंत काही जबाबदार ख्रिस्ती उपस्थित असतील याची वराने खात्री केली पाहिजे.—५/१, पृष्ठे १९-२२.

एखाद्या मेजाभोवती त्याची मुले “जैतुनाच्या रोपासारखी” होतील असे स्तोत्र १२८:३ मध्ये म्हटले आहे, त्याचा काय अर्थ होतो?

सहसा जैतुनाच्या झाडाच्या खोडाला खालूनच नवीन रोपटी येतात. जुन्या वृक्षाच्या मुख्य खोडाला फळे यायची बंद होतात तेव्हा त्याच्या अवतीभोवतीने नवीन रोपटी झपाट्याने वाढू लागतात. त्याचप्रमाणे, मुलेसुद्धा आपल्या पालकांसोबत यहोवाची सेवा करण्यात फलदायी असतील तर पालकांना किती आनंद होईल.—५/१५, पृष्ठे २७.

कुटुंबातील हितकर वातावरणामुळे मुलांना कोणते फायदे होऊ शकतात?

अधिकारपदाबद्दल योग्य दृष्टिकोन राखावा, उचित नीतिमूल्यांबद्दल कदर बाळगावी आणि इतरांसोबत चांगले नातेसंबंध ठेवावेत याबाबतीत त्यांना शिक्षण मिळू शकते. घरातल्या हितकर वातावरणामुळे देवासोबत त्यांची मैत्रीही होऊ शकते.—६/१, पृष्ठ १८.

दूरच्या पौर्वात्य देशांमधील एका देशात, सगळे ख्रिस्ती भाऊ भाऊ आहेत असा सर्वांनी विचार करावा म्हणून काय करण्यात आले होते?

मंडळीत कोणासाठीही आदरार्थी शब्द न वापरता सगळ्यांना समानतेने बांधव म्हणावे असे सगळ्यांना सांगण्यात आले.—६/१५, पृष्ठे २१, २२.

यहोवाचे साक्षीदार रक्‍तापासून तयार केलेली औषधे घेतात का?

आपल्या विश्‍वासानुसार ‘रक्‍त वर्ज्य करावे’ या बायबलच्या आज्ञेप्रमाणे संपूर्ण रक्‍त किंवा त्याचे मुख्य घटक (प्लाझमा, लाल पेशी, पांढऱ्‍या पेशी आणि रक्‍त बिंबिका) घेतले जाऊ शकत नाहीत. (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) पण मुख्य घटकांपासून तयार केलेले पदार्थ घ्यावेत की नाहीत हा निर्णय प्रत्येक ख्रिश्‍चनाने स्वतंत्रपणे घ्यावा; फक्‍त, बायबल याविषयी काय म्हणते आणि देवासोबतचा आपला व्यक्‍तिगत नातेसंबंध या गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवाव्यात.—६/१५, पृष्ठे २९-३१.

आजच्या काळात मनःशांती मिळवणे खरेच शक्य आहे का?

निश्‍चितच शक्य आहे. बायबलद्वारे येशू ख्रिस्त लोकांना शुद्ध उपासनेकडे आणि यशया ३२:१८ येथे सांगितलेल्या शांतीकडे नेत आहे. शिवाय, अशी शांती मिळवणाऱ्‍यांना स्तोत्र ३७:११, २९ नुसार पृथ्वीवर कायमच्या शांतीचा आनंद लुटण्याची भावी आशा आहे.—७/१, पृष्ठ ७.

आधुनिक ईश्‍वरशासित इतिहासात जॉर्ज यंग यांची काय भूमिका होती?

एकोणीशे सतरापासून त्यांनी अनेक देशांमध्ये राज्याच्या सुवार्तेचा प्रकाश पसरवण्याचे काम केले. या सेवाकार्यामुळे ते कॅनडा, कॅरिबियन बेटे, ब्राझील आणि दक्षिण अमेरिकातील इतर देश, मध्य अमेरिका, स्पेन, पोर्तुगल, पूर्वीचे सोव्हिएत युनियन आणि संयुक्‍त संस्थाने अशा वेगवेगळ्या ठिकाणी गेले.—७/१, पृष्ठे २२-७.

“मेलेल्यांखातर जे बाप्तिस्मा घेतात” असे १ करिंथकर १५:२९ मध्ये म्हटले आहे त्याचा काय अर्थ होतो?

त्याचा अर्थ असा होतो की, पवित्र आत्म्याने ख्रिश्‍चनांचा अभिषेक होतो तेव्हा आधी मरण आणि नंतर लगचेच स्वर्गातल्या जीवनासाठी पुनरुत्थान अशा जीवनासाठी त्यांचा बाप्तिस्मा होतो.—७/१५, पृष्ठ १७.

पौलाच्या तथाकथित अज्ञात वर्षांदरम्यान तो काय करत होता?

कदाचित त्याने सिरिया आणि किलिकिया येथील मंडळ्या स्थापन करण्यासाठी किंवा मजबूत करण्यासाठी हातभार लावला असावा. याच दरम्यान, २ करिंथकर ११:२३-२७ मध्ये सांगितलेल्या अनेक हालअपेष्टा त्याने सहन केल्या असाव्यात. यावरून दिसून येते की, तो सक्रियतेने सेवाकार्यात भाग घेत होता.—७/१५, पृष्ठे २६, २७.

आपण वाजवी अपेक्षा कशा बाळगू शकतो?

आपण हे लक्षात ठेवावे की, यहोवा आपली स्थिती समजू शकतो. त्याला प्रार्थना केल्याने आपण योग्य विचार करू शकतो आणि त्यावरून आपली नम्रता दिसून येते. दुसरी एक मदत म्हणजे, एखाद्या प्रौढ मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या मदतीने आपण आपला दृष्टिकोन बदलू शकतो.—८/१, पृष्ठे २९, ३०.