ख्रिस्ती मेंढपाळांनो, ‘आपले अंतःकरण विशाल करा!’
ख्रिस्ती मेंढपाळांनो, ‘आपले अंतःकरण विशाल करा!’
“यहोवा माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही.” या शब्दांत दावीदाने देवावरील आपला भरवसा व्यक्त केला. यहोवाने त्याला आध्यात्मिक अर्थाने ‘हिरव्यागार कुरणांकडे व संथ पाण्याकडे’ नेले तसेच ‘नीतिमार्गांनी चालविले.’ विरोधकांमध्ये असताना त्याला यहोवाचा पाठिंबा मिळाला, उत्तेजन मिळाले. त्यामुळे तो यहोवाला असे म्हणावयास प्रवृत्त झाला: “मी . . . कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस.” अशा सर्वश्रेष्ठ मेंढपाळाची साथ लाभल्यामुळे दावीदाने ‘परमेश्वराच्या घरात चिरकाल राहण्याचा निश्चय केला.’—स्तोत्र २३:१-६.
येशू ख्रिस्तानेही यहोवा देवाच्या प्रेमळ काळजीचा अनुभव घेतला. आणि त्याने आपल्या शिष्यांची देखील तशीच काळजी घेतली. म्हणूनच शास्त्रवचनांत त्याला “उत्तम मेंढपाळ,” “महान मेंढपाळ” आणि “मुख्य मेंढपाळ” असे म्हटले आहे.—योहान १०:११; इब्री लोकांस १३:२०; १ पेत्र ५:२-४.
यहोवा आणि येशू ख्रिस्त, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांची काळजी घेतात. ख्रिस्ती मंडळ्यांमधील प्रेमळ सहमेंढपाळांच्या व्यवस्थेद्वारे देखील त्यांचे प्रेम दिसून येते. सहमेंढपाळांना उद्देशून पौल असे म्हणतो: “तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्यासाठी की, देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळविली तिचे पालन तुम्ही करावे.”—प्रेषितांची कृत्ये २०:२८.
कळपाची काळजी घेण्याबाबत यहोवा देव आणि येशू ख्रिस्ताने घालून दिलेल्या उदाहरणाचे तंतोतंत पालन करणे ही काही तोंडची गोष्ट नाही. शिवाय पहिल्यापेक्षा आज ते जास्त महत्त्वाचे आहे. कारण गेल्या तीन वर्षांत दहा लाखाहून अधिक जणांनी बाप्तिस्मा घेतला. हे सर्व लोक सत्यात नवीनच आहेत. शिवाय मंडळीत लहान व किशोरावस्थेतील साक्षीदार देखील आहेत. या सर्वांच्या आध्यात्मिक गरजेकडे फक्त त्यांच्या पालकांनीच नव्हे तर मंडळीतील सहमेंढपाळांनीही लक्ष देणे जरूरीचे आहे.
प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला जगाकडून तसेच समवयस्कांकडून येणाऱ्या दबावाचा सामना करावा लागतो. भोगासक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी आपल्याला खेचले जाते तेव्हाही आपल्याला प्रतिकार करावा लागतो. काही राष्ट्रांत सुवार्तेला चांगला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे देखील अनेक राज्य प्रचारक निराश होत असतील. काहींना गंभीर आजार असतील. तर काहींना आर्थिक समस्या असतील. या सर्व कारणांमुळे ते कदाचित राज्यप्रचार कार्याला प्रथम स्थान देऊ शकत नसतील. तसे पाहायला गेल्यास, नवोदितांना तसेच सत्यात अनेक वर्षांपासून असलेल्यांनाही प्रेमळ मेंढपाळांची गरज ही लागतेच.
योग्य प्रेरणा
‘आपले अंतःकरण विशाल करा,’ असे पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांना आर्जवण्यात आले होते. (२ करिंथकर ६:११-१३) आपल्या कळपाची काळजी घेण्याची जबाबदारी पार पाडताना ख्रिस्ती वडील या सल्ल्याचे अनुकरण करतात. हे ते कसे करतात? तसेच आज ना उद्या मेंढपाळ होतील अशा सेवा सेवकांविषयी काय?
ख्रिस्ती वडील कळपाला एक आशीर्वाद ठरू इच्छित असल्यास, त्यांना आपली जबाबदारी फक्त एक ड्यूटी म्हणून नव्हे तर पूर्ण मनाने केली पाहिजे. “तुम्हांमधील देवाच्या कळपाचे पालन करा; करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने [स्वेच्छेने] त्याची देखरेख करा; द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा,” असा त्यांना सल्ला देण्यात आला आहे. (तिरपे वळण आमचे.) (१ पेत्र ५:२) यास्तव, प्रभावकारी मेंढपाळ होण्याकरता, इतरांची सेवा करण्याची स्वेच्छा आणि उत्सुकता असणे महत्त्वाचे आहे. (योहान २१:१५-१७) याचा अर्थ, मेंढरांना हवी असणारी मदत लागलीच देऊ करणे आणि इतरांबरोबर व्यवहार करताना, उत्तम ख्रिस्ती गुण अर्थात देवाच्या आत्म्याची फळे प्रदर्शित करणे.—गलतीकर ५:२२, २३.
कळपाची काळजी घेण्यामध्ये, बांधवांच्या घरी जाऊन त्यांना भेटणे समाविष्ट आहे. * ‘आपले अंतःकरण विशाल करणारे’ मेंढपाळ यासाठी आपला वेळ, आपली शक्ती, आपल्या क्षमतांचा उपयोग करतात. म्हणजे, ते फक्त केव्हातरी आपल्या कळपातील लोकांना जाऊन भेटत नाहीत. तर मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा ते फायदा घेतात.
इतरांना मेंढपाळ होण्याचे प्रशिक्षण देणे
‘अध्यक्षाचे काम करू पाहणारा’ कोणत्याही वयाचा बांधव ‘चांगल्या कामाची आकांक्षा धरणारा’ आहे. (१ तीमथ्य ३:१) अनेक सेवा सेवक अधिक जबाबदारीसाठी स्वेच्छेने पुढे येतात. म्हणूनच, मंडळीतील वडील जन अशा इच्छुक बांधवांना ‘अध्यक्षाचे काम’ करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यासाठी आनंदाने मदत करतात. ते त्यांना प्रभावशाली मेंढपाळ होण्याचे प्रशिक्षण देतात.
यहोवाच्या उच्च दर्जांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळेच त्याची ख्रिस्ती मंडळी सुदृढ राहते. खोट्या मेंढपाळांमुळे मंडळी दुर्बळ बनल्याचे उदाहरण आपल्याला यहेज्केल ३४:२-६ वचनांमध्ये पाहायला मिळते. यहोवाला या खोट्या मेंढपाळांचा वीट होता; आणि हे उचितच होते. कारण, कळपाला आध्यात्मिकरित्या भरवण्याऐवजी ते स्वतःचेच पोट भरत होते. आध्यात्मिक अर्थाने आजारी असलेल्यांना त्यांनी बरे केले नाही, खचून गेलेल्यांना त्यांनी सांत्वन दिले नाही, भरकटलेल्यांना किंवा हरवलेल्यांना त्यांनी पुन्हा कळपात आणले नाही. मेंढपाळांऐवजी ते लांडग्यांप्रमाणे वागले. त्यांनी मेंढरांवर जुलूम केले. ही दुर्लक्षित मेंढरे भरकटत गेली, कोणालाही त्यांची पर्वा नव्हती.—यिर्मया २३:१, २; नहूम ३:१८; मत्तय ९:३६.
पण ख्रिस्ती मेंढपाळ या खोट्या मेंढपाळांसारखे नाहीत. ते यहोवाचे अनुकरण करतात. ते मेंढरांना आध्यात्मिक अर्थाने ‘हिरव्यागार कुरणांकडे, संथ पाण्याकडे’ नेतात. यहोवाचे वचन नीट समजून घेऊन आपल्या जीवनात त्याचे अनुकरण करण्यास मदत करण्याद्वारे ते मेंढरांना “नीतिमार्गांनी” चालण्याकरता त्यांना मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करतात. “निपुण शिक्षक” असल्यामुळे ते हे अतिशय प्रभावीपणे करू शकतात.—१ तीमथ्य ३:२.
मंडळीतील वडील अधिकतर शिक्षण सभांमधील भाषणांद्वारे देतात. पण ते व्यक्तिगतरीत्या देखील मदत करतात. अर्थातच, काही वडील कदाचित वैयक्तिकपणे शिकवण्यात निपुण असतील; तर इतर काहींकडे उत्तम भाषण देण्याची कला असेल. याचा अर्थ असा होत नाही, की उत्तम किंवा प्रभावशाली भाषण देणारे वडील शिक्षक होऊ शकत नाहीत, किंवा उत्तम शिक्षण देऊ शकणारे वडील उत्तम भाषण देऊ शकत नाहीत. प्रत्येक वडिलांची आपापली क्षमता असते; आपापली पद्धत असते. त्या क्षमतांनुसार किंवा पद्धतीनुसार सर्व वडील शिकवण्याचे आणि कळपातील लोकांची काळजी घेण्याचे काम करतात. काही वेळा, काही वडील बांधवांच्या किंवा भगिनींच्या घरी भेट देण्याची व्यवस्था करतील. कळपातील मेंढरांची काळजी घेण्याचा तोही एक मार्ग आहे. आणि हा मार्ग खूप फायदेकारक ठरला आहे.
सर्व प्रसंगी मेंढपाळ आणि शिक्षक
एखाद्या डॉक्टरला काम करण्यासाठी ज्ञान आणि अनुभवाची गरज असते. पण तो जेव्हा त्याच्या रुग्णांना प्रेम, दया, ममता आणि काळजी दाखवील तेव्हाच त्याचे रुग्ण त्याची प्रशंसा करतील. हे गुण त्याच्या स्वभावात असणे फार महत्त्वाचे आहे. तसेच, जे वडील प्रेमळ असतात, ज्यांना लोकांबद्दल काळजी असते तेच चांगले शिक्षक आणि चांगले मेंढपाळ होऊ शकतात. ते इतरांना शिकवायला नेहमी तत्पर असतात. नीतिसूत्रे १५:२३ म्हणते: “समयोचित बोल किती उत्तम!” वडिलांना बोलण्यासाठी अनेक वेळा ‘उचित समय’ मिळतो. जसे की, व्यासपीठावरून, घरोघरी प्रचार कार्य करताना किंवा राज्य सभागृहात अथवा टेलिफोनवरून संभाषण करताना. आणि चांगला मेंढपाळ, फक्त मेंढपाळकत्वाच्या भेटी करतानाच नव्हे तर प्रत्येक प्रसंगी उत्तम गुण दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपले अंतःकरण विशाल केल्यामुळे, मेंढरांची काळजी घेण्याच्या प्रत्येक संधीचा तो फायदा घेईल. यामुळे त्याच्या कळपातील सर्व मेंढरे त्याची प्रशंसा करतील, त्याच्यावर प्रेम करतील.—मार्क १०:४३.
आता ख्रिस्ती मंडळीत वडील असलेल्या वुल्फगँन यांना, त्यांच्या घरी एका सेवा सेवकाने आणि त्याच्या पत्नीने
दिलेली भेट आठवते. ते म्हणतात: “ती दोघं आमच्या घरी आल्यावर आमची मुलं तर इतकी खूष झाली होती की विचारूच नका. अजूनही त्यांच्या तोंडात त्यांची नावं असतात.” या सेवा सेवकाने त्याला कळपातील मेंढरांची काळजी आहे हे दाखवून दिले. तो आपले “अंतःकरण विशाल” करत होता.आणखी एका प्रकारे तुम्ही ‘आपले अंतःकरण विशाल’ करू शकता. आजाऱ्यांना भेटून, त्यांना एखादं उत्तेजनात्मक कार्ड पाठवून किंवा एखादा फोन करून तुम्ही त्यांना दाखवू शकता की तुम्हाला त्यांची काळजी आहे. त्यांना हवी ती मदत तुम्ही देऊ शकता. त्यांना तुमच्याशी बोलायचे असते तेव्हा त्यांचे लक्षपूर्वक ऐका. मंडळीतल्या किंवा बाहेरच्या सकारात्मक, मनोरंजक ईश्वरशासित गोष्टींविषयी बोला. यहोवावर प्रेम करणाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या उज्ज्वल भवितव्यावर आपले लक्ष केंद्रित ठेवण्यास त्यांना मदत करा.—२ करिंथ. ४:१६-१८.
मेंढपाळकत्वाच्या भेटींव्यतिरिक्त
बांधवांच्या घरी जाऊन मेंढपाळकत्वाच्या भेटी करणे महत्त्वाचे तर आहेच. पण इतक्यावरच त्यांचे कार्य थांबत नाही. प्रेमळ वडिलांनी नेहमी आपले ‘अंतःकरण विशाल’ ठेवले पाहिजे; लोकांना त्यांच्याकडे यायला केव्हाही भीती वाटू नये. यामुळे मग, बांधवांना ही हमी मिळते, की संकटाच्या काळात काळजी वाहणारे आपले प्रेमळ ख्रिस्ती मेंढपाळ आपल्या पाठीशी आहेत.—स्तोत्र २३:४.
कलस्सैकर १:२३) आपले ‘अंतःकरण विशाल’ केलेले ख्रिस्ती मेंढपाळ असल्यावर मेंढरांना कसलीही कमी भासणार नाही. तेही मग दावीदाप्रमाणे आयुष्यभर यहोवाच्या घरात सेवा करण्याचा निश्चय करतील. (स्तोत्र २३:१, ६) प्रेमळ मेंढपाळांना याव्यतिरिक्त आणखी काय हवे आहे?
तेव्हा, सर्व ख्रिस्ती मेंढपाळांनो, आपले ‘अंतःकरण विशाल करा.’ आपल्या बांधवांबद्दल खरे प्रेम दाखवा—तुम्हाला शक्य असेल त्या मार्गाने त्यांना उत्तेजन द्या, त्यांना तजेला द्या आणि आध्यात्मिकरीत्या त्यांना उभारा. विश्वास मजबूत होण्यास त्यांना साहाय्य करा. ([तळटीप]
^ परि. 10 मेंढपाळकत्वाच्या भेटी कशा करता येतील याविषयी काही सूचना हव्या असतील तर, टेहळणी बुरूज सप्टेंबर १५, १९९३ पृष्ठे २०-३ (इंग्रजी) आणि मार्च १५, १९९६ पृष्ठे २४-७ पाहा.
[३० पानांवरील चौकट]
ख्रिस्ती मेंढपाळ
•उत्सुकतेने व स्वेच्छेने कार्य करतात
• आध्यात्मिक अन्न देऊन कळपाचे भरण-पोषण करतात
• इतरांनाही उत्तम मेंढपाळ होण्यास मदत करतात
• आजाऱ्यांना भेट देतात; त्यांची काळजी घेतात
• आपल्या बांधवांना मदत करण्यास नेहमी तत्पर असतात
[३१ पानांवरील चित्रे]
क्षेत्र सेवा, सभा किंवा इतर कोणत्याही प्रसंगी वडीलजन कळपाची काळजी घेण्यास तत्पर असतात