आज देवाचा आत्मा कसा कार्य करतो?
आज देवाचा आत्मा कसा कार्य करतो?
तो जन्मतःच पांगळा होता. मंदिराच्या सुंदर नावाच्या दाराजवळ दररोज बसून तो मंदिरात येणाऱ्यांकडे भीक मागत असे. परंतु एकदा, या पांगळ्या भिकाऱ्याला एक असे बक्षीस मिळाले जे त्याने कधी स्वप्नातही पाहिले नसेल. त्याला बरे करण्यात आले!—प्रेषितांची कृत्ये ३:२-८.
खरे तर, प्रेषित पेत्र आणि योहान यांनी त्याला “उठविले” होते आणि “त्याची पावले व घोटे ह्यांत तत्काळ बळ आले” होते. परंतु त्याचे बरे होण्याचे श्रेय पेत्र आणि योहान यांनी स्वतःला घेतले नाही. का नाही? स्वतः पेत्र याचे उत्तर देतो: “अहो इस्राएल लोकांनो, ह्याचे आश्चर्य का करिता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने ह्याला चालावयास लाविले आहे असे समजून आम्हाकडे निरखून का पाहता?” म्हणजे, पेत्र आणि योहान या दोघांना समजले, की असे कार्य त्यांच्या शक्तीने नव्हे तर देवाच्या पवित्र आत्म्याच्या शक्तीनेच शक्य आहे.—प्रेषितांची कृत्ये ३:७-१६; ४:२९-३१.
नव्याने सुरू झालेल्या ख्रिस्ती मंडळीला देवाचा पाठिंबा आहे हे दाखवण्यासाठी त्या काळी असे “पराक्रम” केले जात असत. (इब्री लोकांस २:४) परंतु त्यांचा हा उद्देश पूर्ण झाल्यावर ते ‘समाप्त होणार’ होते असे प्रेषित पौलाने म्हटले. * (१ करिंथकर १३:८) म्हणूनच, आज आपण कोणत्याही खऱ्या ख्रिस्ती मंडळीत, कोणाला रोग बरे करताना, दुरात्मे काढताना किंवा भविष्यवाणी करताना पाहत नाही.
तर मग, देवाचा पवित्र आत्मा आज कसलेही कार्य करत नाही असा याचा अर्थ होतो का? नाही. त्याचा असा अर्थ होत नाही. पहिल्या शतकात देवाचा आत्मा कार्यरत कसा होता आणि आज कसा आहे याचा आपण विचार करू या.
“सत्याचा आत्मा”
देवाच्या पवित्र आत्म्याचे एक कार्य म्हणजे, माहिती देणे, आध्यात्मिक प्रबोधन देणे, सत्य प्रकट करणे. आपला मृत्यू व्हायच्या थोड्या काळाआधी येशूने आपल्या शिष्यांना सांगितले: “मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत; तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल.”—योहान १६:१२, १३.
सा.यु. ३३ च्या पेंटेकॉस्टच्या दिवशी, जेरुसलेममध्ये माडीवरच्या एका खोलीत जमलेल्या १२० शिष्यांवर “सत्याचा आत्मा” ओतण्यात आला व त्यांना पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देण्यात आला. (प्रेषितांची कृत्ये २:१-४) त्या वार्षिक सणासाठी उपस्थित असलेल्यांमध्ये प्रेषित पेत्र देखील होता. पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन पेत्र ‘उभा राहिला’ आणि येशूसंबंधी काही गोष्टींचे स्पष्टीकरण देऊ लागला. उदाहरणार्थ, ‘नासोरी येशूला देवाच्या उजव्या हाताकडे बसवून’ कसे उंचावण्यात आले ते त्याने सविस्तर समजावून सांगितले. (प्रेषितांची कृत्ये २:१४, २२, ३३) देवाच्या आत्म्याने पेत्रास आपल्या यहुदी श्रोत्यांना अगदी धैर्याने हे घोषित करायला प्रवृत्त केले, की “इस्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभु व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.” (प्रेषितांची कृत्ये २:३६) आत्म्याने प्रेरित होऊन पेत्राने दिलेल्या या संदेशामुळे, सुमारे तीन हजार माणसांनी “त्याच्या संदेशाचा स्वीकार केला,” व बाप्तिस्मा घेतला. अशाप्रकारे, देवाच्या पवित्र आत्म्याने त्यांना सत्याचा मार्ग दाखवला.—प्रेषितांची कृत्ये २:३७-४१.
देवाच्या पवित्र आत्म्याने शिकवण्याचे व आठवण करून देण्याचेही कार्य केले. येशूने म्हटले होते: “ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांस आठवण करून देईल.”—योहान १४:२६.
पवित्र आत्म्याने शिक्षक म्हणून कसे कार्य केले? येशूच्या शिष्यांनी पूर्वी येशूकडून अनेक गोष्टी ऐकल्या होत्या पण यांपैकी काही गोष्टी त्यांना समजल्या नव्हत्या. तर पवित्र आत्म्याने आता त्यांचे साहाय्य केले ज्यामुळे त्यांना त्या गोष्टी समजू लागल्या. उदाहरणार्थ, येशूची परीक्षा घेतली जात असताना त्याने यहुदियाचा रोमी शासक पंतय पिलात याला “माझे योहान १८:३६; प्रेषितांची कृत्ये १:६) यावरून हे स्पष्ट होते, की सा.यु. ३३ च्या पेंटेकॉस्ट दिवशी देवाचा पवित्र आत्मा त्यांच्यावर जोपर्यंत ओतण्यात आला नव्हता तोपर्यंत तरी प्रेषितगणाला येशूच्या शब्दांचा पूर्ण अर्थ समजलेला नव्हता.
राज्य ह्या जगाचे नाही,” असे सांगितल्याचे प्रेषितांना माहीत होते. तरीपण, ४० दिवसांनी येशूचे स्वर्गारोहण झाले तेव्हा देखील प्रेषितांचा असा चुकीचा समज होता, की देवाचे राज्य पृथ्वीवरच स्थापन होईल. (येशूच्या अनेक शिकवणींची पुन्हा एकदा आठवण करून देण्याकरताही पवित्र आत्म्याने मदत केली. उदाहरणार्थ, ख्रिस्ताचा मृत्यू आणि पुनरुत्थान यांविषयीच्या भविष्यवाणींचा अर्थ पवित्र आत्म्याच्या साहाय्याने अगदी स्पष्ट झाला. (मत्तय १६:२१; योहान १२:१६) येशूच्या शिकवणींची आठवण करून देण्यात आल्यामुळे प्रेषितांना, राजे, न्यायाधीश आणि धार्मिक नेते यांच्यापुढे आपली बाजू धैर्याने मांडता आली.—मार्क १३:९-११; प्रेषितांची कृत्ये ४:५-२०.
तसेच, आरंभीच्या ख्रिश्चनांना त्यांच्या प्रचार सेवेतून अधिकाधिक फळ मिळावे या दृष्टीने पवित्र आत्म्याने त्यांना कोणत्या क्षेत्रात जावे, कोणत्या क्षेत्रात जाऊ नये याविषयीचे मार्गदर्शन केले. (प्रेषितांची कृत्ये १६:६-१०) देवाच्या आत्म्याने आरंभीच्या ख्रिश्चनांना, सर्व मानवजातीच्या हितासाठी देवाचे वचन बायबल लिहिण्यासही प्रेरित केले. (२ तीमथ्य ३:१६) यावरून, पहिल्या शतकात केवळ चमत्कार करण्यासाठीच पवित्र आत्मा दिला जात नव्हता तर इतर अनेक प्रकारे तो कार्यशील होता हे स्पष्ट होते.
आपल्या दिवसांत पवित्र आत्म्याचे कार्य
आपल्या दिवसांतही पवित्र आत्मा खऱ्या ख्रिश्चनांसाठी कार्य करत आहे. १९ व्या शतकाच्या उर्वरित काळात, योहान ८:३२; १६:१३.
अमेरिकेतील पेन्सिल्व्हानियाच्या अलेघनी येथे बायबल विद्यार्थ्यांच्या एका लहानशा गटाला याची प्रचिती मिळाली. या अभ्यासू बायबल विद्यार्थ्यांना “सत्य” जाणण्याची उत्कट इच्छा होती.—या गटाचे एक सदस्य, चार्ल्स टेझ रस्सल यांनी शास्त्रवचनीय सत्याच्या शोधाविषयी असे म्हटले: “मी देवाला प्रार्थना केली, . . . की माझ्या मनातील कसलेही पूर्वग्रह असतील तर ते दूर कर नाहीतर ते कदाचित अडखळण ठरू शकतील आणि पवित्र आत्म्याकरवी मला योग्य समज दे.” देवाने त्यांची ही विनम्र प्रार्थना ऐकली.
रस्सल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शास्त्रवचनांचा कसोशीने शोध केला तेव्हा पुष्कळ गोष्टी त्यांना स्पष्ट समजू लागल्या. रस्सल म्हणतात: “अनेक शतकांपासून विविध पथांनी व गटांनी, आपल्याला पटतील ते सिद्धान्त उचलून त्यात स्वतःचे विचार आणि चुकीच्या गोष्टींची भेसळ केली हे आमच्या पाहण्यात आले.” यामुळे “सत्य जणू नाहीसेच झाले.” होय, ख्रिस्ती धर्माने इतक्या खोट्या शिकवणी आत्मसात केल्या आहेत की शास्त्रवचनातील सत्य त्यांना दिसलेच नाही. परंतु रस्सल यांनी सत्य जाणून घेण्याचा व ते सर्वांपुढे आणण्याचा जणू चंगच बांधला होता.
त्यांच्या अभ्यासातून त्यांना हे कळून आले, की आज जगातील सर्व धर्मांत मानले जाते त्याप्रमाणे आत्मा अमर नसतो, मृत्यूनंतर मनुष्य नरकात किंवा स्वर्गात जात नाही तर त्याच्या शरीराची माती होते, तसेच, यहोवाच एकमात्र खरा देव असल्यामुळे तो त्रैक्याचा भाग नाही. झायन्स वॉच टावर ॲण्ड हेरल्ड ऑफ ख्राईस्ट्स प्रेझेन्स या नियतकालिकाद्वारे रस्सल आणि त्यांच्या सहकर्म्यांनी लोकांची दिशाभूल करणारे हे खोटे धार्मिक सिद्धान्त निडरपणे नाकारले.
परंतु तुम्ही कल्पना करू शकाल, की अशाप्रकारे खोट्या धर्मांचे पितळ उघडे पाडल्यामुळे ख्रिस्ती धर्मजगताचा पाळकवर्ग कसा खवळला असेल. आपले स्थान, आपला अधिकार जास्त प्रिय असलेल्या अनेक कॅथलिक व प्रॉटेस्टंट पाळकांनी रस्सल यांची नाचक्की करण्याकरता अनेक मोहीमा हाती घेतल्या. परंतु रस्सल आणि त्यांच्या सहकर्म्यांनी हार मानली नाही. पूर्ण भरवशाने ते मार्गदर्शनाकरता देवाच्या आत्म्यावर अवलंबून राहिले. रस्सल म्हणाले: “प्रभूने आम्हाला आश्वासन दिले आहे की . . . आमचा तारक, मध्यस्थ व मस्तक असलेल्या येशूमुळे व त्याच्या विनंतीवरून पाठवला जाणारा पित्याचा पवित्र आत्मा आम्हाला शिकवील.” आणि पवित्र आत्म्याने खरोखरच त्यांना सत्याचे शिक्षण दिले! बायबलमधील सत्याच्या शुद्ध जलाने या प्रांजळ बायबल विद्यार्थ्यांनी स्वतःचीच नाही तर जगभरातल्या लाखो लोकांची आध्यात्मिक तहान भागवली.—प्रकटीकरण २२:१७.
यहोवाच्या साक्षीदारांची आधुनिक दिवसांतील संघटना, आता शंभराहून अधिक वर्षांपासून देवाच्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन आनंदाने स्वीकारत आहे. यहोवाच्या साक्षीदारांना पवित्र आत्म्याद्वारे जसजसे आध्यात्मिक प्रबोधन मिळत राहते तसतसे ते त्याचा आनंदाने स्वीकार करतात व त्या नवीन समजेनुसार जगण्याकरता आवश्यक तडजोडी करत राहतात.—नीतिसूत्रे ४:१८.
“तुम्ही माझे साक्षी व्हाल”
“परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि . . . पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल,” असे म्हणून येशूने आपल्या शिष्यांना देवाचा प्रेषितांची कृत्ये १:८) देवाने दिलेले काम पूर्ण करण्याकरता “सामर्थ्य” आणि “पवित्र आत्मा” पाठवण्याचे अभिवचन येशूने आपल्या शिष्यांना दिले होते आणि आजही तो आपल्याला तेच अभिवचन देतो.
पवित्र आत्मा आणखी कोणत्याप्रकारे कार्य करील हे दाखवले. (यहोवाच्या साक्षीदारांना त्यांच्या प्रचार कार्याबद्दल चांगले ओळखले जाते. (चौकोन पाहा.) ते २३० पेक्षा अधिक राष्ट्रांत आणि द्वीपांमध्ये सत्याचा संदेश सांगतात. आपल्याला कल्पना करता येतील अशा सर्व परिस्थितींत, कधीकधी तर आपला जीव धोक्यात घालूनसुद्धा ते धीटपणे देवाच्या राज्याचे समर्थन करतात. ख्रिस्ती सेवेतील त्यांचा आवेश एक जोरदार पुरावा आहे की पवित्र आत्मा आजही कार्यरत आहे. आणि यहोवा देव त्यांच्या प्रयत्नांना फळ देतो हेही स्पष्ट दिसते.
उदाहरणार्थ, गेल्या वर्षी देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यात शंभर कोटींपेक्षा अधिक तास खर्च करण्यात आले. परिणाम? ३,२३,४३९ लोकांनी पाण्यात बाप्तिस्मा घेऊन देवाला आपले जीवन समर्पित केले. शिवाय, आस्थेवाईक लोकांबरोबर ४४,३३,८८४ साप्ताहिक बायबल अभ्यास संचालित करण्यात आले. याशिवाय, एकूण २,४६,०७,७४१ पुस्तके, ६३,११,६२,३०९ नियतकालिके आणि ६,३४,९५,७२८ माहितीपत्रके व पुस्तिका यांचे वाटप करण्यात आले. देवाचा आत्मा कार्यरत आहे हे यावरून स्पष्टपणे दिसून येत नाही का?
देवाच्या आत्म्यामुळे तुम्हाला मिळणारे आशीर्वाद
एखादी व्यक्ती सुवार्तेला अनुकूल प्रतिसाद देते, देवाच्या दर्जांनुरुप जगण्याचा प्रयत्न करते, व खंडणीवर विश्वास प्रकट करते तेव्हा ती देवाच्या नजरेत शुद्ध ठरते. प्रेषित पौल म्हणतो, की याच लोकांना ‘देव आपला पवित्र आत्मा’ देतो.—१ थेस्सलनीकाकर ४:७, ८; १ करिंथकर ६:९-११.
देवाच्या आत्म्यामुळे अनेक आशीर्वाद मिळतात. कोणत्या प्रकारचे आशीर्वाद? एका आशीर्वादाबद्दल देवाचे प्रेरित वचन म्हणते: “आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे.” (गलतीकर ५:२२, २३) म्हणजेच, देवाचा पवित्र आत्मा शक्तिशाली आहे; तो तुम्हाला चांगली कृत्ये करण्याची, देवाच्या गुणांचे अनुकरण करण्याची प्रेरणा देतो.
शिवाय, तुम्ही बायबलचे वाचन केले आणि वाचलेल्या गोष्टींचे पालन केले तर देवाचा आत्मा तुम्हाला बुद्धी, ज्ञान, सूक्ष्मदृष्टी, तर्कशक्ती आणि विचार करण्याची क्षमता या गुणांत वृद्धी करायला मदत करील. राजा शलमोनाने मनुष्यांपेक्षा देवाला खूष करायचा प्रयत्न केल्यामुळे त्याला “अलोट शहाणपण व बुद्धी” मिळाली. (१ राजे ४:२९) यहोवाने शलमोनाला पवित्र आत्मा दिला; मग आज जे त्याला संतुष्ट करू पाहतात त्यांना तो आपला पवित्र आत्मा देणार नाही का?
सैतान आणि त्याचे दुरात्मे, हे दुष्ट जग आणि आपल्या शरीराच्या पापी प्रवृत्ती यांच्याविरुद्ध लढा देण्यासही देवाचा आत्मा खऱ्या ख्रिश्चनांना साहाय्य करतो. हे कसे शक्य आहे? प्रेषित पौल याचे उत्तर देतो: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.” (फिलिप्पैकर ४:१३) पवित्र आत्मा आपल्यावरील परीक्षा किंवा मोहपाश दूर करणार नाही; पण त्यात टिकून राहण्यास किंवा त्यांचा प्रतिकार करण्यास तो तुम्हाला मदत करील. आपण देवाच्या आत्म्यावर अवलंबून राहतो, तेव्हा कोणत्याही संकटाशी झुंज द्यायला आपल्याला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ प्राप्त होते.—२ करिंथकर ४:७; १ करिंथकर १०:१३.
देवाचा पवित्र आत्मा आज सर्वत्र कार्यरत आहे हे, सर्व पुराव्यांचा विचार केल्यावर तुम्हाला नक्कीच पटेल. यहोवाच्या महान उद्देशांबद्दल लोकांना सांगण्याकरता त्याचा आत्मा त्याच्या सेवकांना शक्ती देतो. शिवाय, पवित्र आत्मा आपल्याला आध्यात्मिक प्रकाश देत राहतो, आपला विश्वास दृढ करतो व आपल्या निर्माणकर्त्याशी एकनिष्ठ राहायला आपल्याला मदत करतो. आपल्या विश्वासू सेवकांना पवित्र आत्मा देऊन यहोवाने आजही आपले वचन पाळले आहे यासाठी आपण त्याचे कृतज्ञ आहोत!
[तळटीपा]
^ परि. 4 “आत्म्याची चमत्कारिक दाने आज का नाहीत?” हा टेहळणी बुरूज (इंग्रजी) ऑगस्ट १५, १९७१, पृष्ठे ५०१-५ वरील लेख पाहा.
[१० पानांवरील चौकट]
यहोवाच्या साक्षीदारांबद्दल लोक काय म्हणतात
“लोकांना चर्चकडे आकर्षित करण्यासाठी तसेच समलैंगिकता व गर्भपात यांसारख्या आधुनिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी काही चर्चेस सल्लागारांची मदत घेतात; मात्र यहोवाचे साक्षीदार या बदलत्या जगाशी कोणत्याही प्रकारची हातमिळवणी करत नाहीत. ते अजूनही संपूर्ण जगात आपले प्रचाराचे कार्य करण्यात दंग आहेत.”—अमेरिका, कॅलिफोर्निया, ऑरेंज काऊन्टीचे द ऑरेंज काऊन्टी रेजिस्टर.
‘फक्त यहोवाचे साक्षीदारच आपल्या विश्वासाचा प्रचार आवेशाने करतात, इतर पंथांना त्यात इतके स्वारस्य नाही.’—अमेरिका, इंडियाना, कोलंबसचे द रिपब्लिक.
“फक्त यहोवाचे साक्षीदारच घरोघरी जाऊन ‘सुवार्तेचा’ प्रचार करतात, आणि बायबल तत्त्वांचे पालन करतात.”—झके लितरात्सक्य, पोलंड.
“यहोवाच्या साक्षीदारांनी संपूर्ण जगभरात यहोवाच्या संदेशाचा प्रचार केला आहे. आजपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात कोणतीच प्रचाराची मोहीम हाती घेण्यात आलेली नाही.”—न्यूज-ऑब्झर्वर, तमाक्व, पेन्सिल्व्हानिया, अमेरिका
[९ पानांवरील चित्रे]
देवाचा पवित्र आत्मा आपल्याला आध्यात्मिक प्रबोधन देतो,
. . . उत्तम ख्रिस्ती गुण विकसित करण्यास मदत करतो
. . . व जगव्याप्त प्रचारकार्यात साहाय्य करतो