व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

टीव्हीवरच्या बातम्या बातम्या कमी जाहिरातीच जास्त!

टीव्हीवरच्या बातम्या बातम्या कमी जाहिरातीच जास्त!

टीव्हीवरच्या बातम्या बातम्या कमी जाहिरातीच जास्त!

टीव्ही कार्यक्रमांच्या लोकप्रियतेविषयी संशोधन करणाऱ्‍या एका ग्रूपने अमेरिकेतल्या ५२ शहरांत वेगवेगळ्या चॅनल्सवर दाखवल्या जाणाऱ्‍या एकूण १०२ न्यूज कार्यक्रमांचा अभ्यास केला. बातम्यांच्या नावाखाली प्रत्यक्षात काय आणि कशा पद्धतीने दाखवले जाते याचा अभ्यास केल्यावर त्यांना दिसून आले की सदर कार्यक्रमांत केवळ ४१.३ टक्के खरोखर बातम्या असतात. मग बातम्यांच्या नावाखाली या कार्यक्रमांत काय दाखवले जाते?

बातम्यांच्या वेळापैकी सरासरी ३०.४ टक्के वेळ जाहिरातींना दिला जातो. काही चॅनल्सवर तर बातम्या कमी आणि जाहिरातीच जास्त दाखवल्या जातात. शिवाय, या अभ्यासाच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, बातम्यांच्या वेळात बरीच अनावश्‍यक माहिती दर्शकांना दाखवली जाते. * निवेदकांच्या आपसातील गप्पा, ब्रेकनंतर दाखवल्या जाणाऱ्‍या मुख्य बातम्यांची पूर्वझलक आणि जाहिरात, लोकप्रिय हस्तींच्या खासगी जीवनाबद्दल अर्थहीन बातम्या इत्यादींचा यात समावेश असतो. अशा काही अनावश्‍यक बातम्यांची उदाहरणे देखील सदर रिपोर्टमध्ये देण्यात आली होती. “सर्वात उंच स्वरात गाण्याची पुरुषांची स्पर्धा,” “एका रिपोर्टरने घेतलेली चित्तथरारक रोलर कोस्टर राईड,” “सुपरमार्केटमध्ये सँडविच स्प्रेडची वाढती लोकप्रियता” ही काही उदाहरणे आहेत.

बातम्यांचे मुख्य विषय कोणते असतात? २९.९ टक्के वेळ क्राईम स्टोरीज म्हणजेच हिंसाचाराच्या घटनांना दिला जातो. टीव्ही न्यूजचे एक समीकरण आहे . . . “जितका हिंसाचार तितकी लोकप्रियता. सबंध अमेरिकेत मागच्या काही वर्षांत गुन्हेगारीचे प्रमाण घटले आहे पण टीव्ही न्यूजवर मात्र नाही.” असे का? या रिपोर्टच्या लेखकांनुसार, “गुन्हे व हिंसाचाराच्या बातम्या सर्वात लक्षवेधक असतात.”

क्राईम स्टोरीजच्या पाठोपाठ दुर्घटनांचा नंबर लागतो; उदाहरणार्थ आग लागणे, कार दुर्घटना, पूर आणि बॉम्बस्फोट (१२.२ टक्के), आणि त्यानंतर खेळ समाचार (११.४ टक्के). खेळविषयक बातम्यांनंतर आरोग्यविषयक (१०.१ टक्के), राजकारण (८.७ टक्के), आणि अर्थव्यवस्था (८.५ टक्के). शिक्षण, पर्यावरण, कला व विज्ञान यांसारख्या विषयांना फार कमी वेळ दिला जातो (१.३ ते ३.६ टक्के). पण हवामानासंबंधी बातम्यांना मात्र जवळजवळ सगळ्याच न्यूज कार्यक्रमांत १० टक्के वेळ दिला जातो. संशोधकांच्या मते, “हवामान हा सर्वांचा आवडता विषय आहे, टीव्ही देखील याला अपवाद नाही. हवामान चांगले, वाईट, उष्ण, थंड, पावसाळी, कोरडे, कसेही असो, टीव्ही न्यूजमध्ये त्याचे लांबलचक विवरण हमखास केले जाते.”

पण सदर रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार आनंदाची बाब ही की, बऱ्‍याच पत्रकारांना आणि दर्शकांना देखील आता वाटू लागले आहे की हे बदलले पाहिजे. अर्थात, सहजासहजी यात काही बदल घडू शकत नाही कारण “व्यापार आणि अर्थकारणासाठी आदर्शांचा बळी दिला जाण्याचा प्रकार पूर्वीपासूनच घडत आला आहे.”

[तळटीपा]

^ नॉट इन पब्लिक इंटरेस्ट—लोकल टीव्ही न्यूज इन अमेरिका नावाचा हा रिपोर्ट बातम्यांचे संशोधन करण्याकरता घेतलेल्या चवथ्या राष्ट्रीय सर्व्हेवर आधारित होता. रॉकी माउंटन मिडिया वॉच नावाच्या गटाचे डॉ. पॉल क्लाइट, डॉ. रॉबट ए. बाडवेल, आणि जेसन सॅल्झमन यांनी हा रिपोर्ट तयार केला.