बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?
हर्मगिदोन म्हणजे काय?
काही लोक विश्चास करतात की . . .
हर्मगिदोन हा अणूयुद्धामुळे होणारा जागतिक विनाश किंवा पर्यावरणाचा नाश आहे. तुम्हाला काय वाटतं?
बायबलमध्ये काय सांगितलं आहे?
हर्मगिदोन हे एक लाक्षणिक ठिकाण आहे. इथे दुष्टतेच्या विरोधात सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाचं युद्ध लढलं जाईल.—प्रकटीकरण १६:१४, १६.
बायबलमधून आपण आणखीन काय शिकू शकतो?
पृथ्वीचा नाश करण्यासाठी नाही, तर तिला मानवजातीकडून होणाऱ्या नाशापासून वाचवण्यासाठी देव हर्मगिदोनाचं युद्ध लढणार आहे.—प्रकटीकरण ११:१८.
हर्मगिदोनाचं युद्ध सर्व युद्धांचा अंत करेल.—स्तोत्र ४६:८, ९.
हर्मगिदोनाच्या युद्धातून वाचणं शक्य आहे का?
तुम्ही काय म्हणाल?
हो
नाही
कदाचित
बायबल काय म्हणतं?
सर्व राष्ट्रांतल्या लोकांचा “एक मोठा लोकसमुदाय” “मोठ्या संकटातून” वाचेल. मोठ्या संकटाचा शेवट हर्मगिदोनाच्या युद्धाने होईल.—प्रकटीकरण ७:९, १४.
बायबलमधून आपण आणखीन काय शिकू शकतो?
देवाची इच्छा आहे, की हर्मगिदोनाच्या युद्धातून जास्तीत जास्त लोकांचा बचाव व्हावा. जेव्हा कोणताच पर्याय नसतो, फक्त तेव्हाच तो दुष्टांचा नाश करतो.—यहेज्केल १८:३२.
हर्मगिदोनाच्या युद्धातून वाचण्यासाठी बायबल आपल्याला मार्गदर्शन देतं.—सफन्या २:३.