मुलांनो—बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्ही कशी तयारी करू शकता?
“हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे.”—स्तो. ४०:८.
१, २. (क) बाप्तिस्मा एक गंभीर पाऊल का आहे हे स्पष्ट करा. (ख) बाप्तिस्मा घेण्याआधी एका व्यक्तीला कोणत्या गोष्टीची खात्री असली पाहिजे, आणि का?
मुलांनो तुम्हालाही बाप्तिस्मा घ्यायची इच्छा आहे का? जर असेल, तर याहून मोठा असा दुसरा कोणताच बहुमान तुमच्या जीवनात असू शकत नाही. मागच्या लेखात सांगितल्यानुसार बाप्तिस्मा ही एक गंभीर गोष्ट आहे. तुम्ही यहोवाला तुमचं जीवन समर्पित केलं आहे हे त्यावरून दिसून येतं. म्हणजेच, सदासर्वकाळ त्याची सेवा करण्याची तुमची इच्छा आहे आणि त्याच्या इच्छेलाच तुमच्या आयुष्यात सर्वात पहिलं स्थान आहे, असं वचन तुम्ही त्याला देत असता. तुम्ही देवाला देत असलेलं हे अतिशय गंभीर वचन आहे. त्यामुळे तुम्ही बाप्तिस्म्याचा निर्णय तेव्हाच घेतला पाहिजे, जेव्हा तो निर्णय घेण्याइतपत तुम्ही प्रौढ असता, समर्पणाचा अर्थ तुम्हाला पूर्णपणे समजलेला असतो आणि असं करण्याची तुमची व्यक्तिगत इच्छा असते.
२ पण, बाप्तिस्म्यासाठी मी अजून तयार नाही असं तुम्हाला वाटत असेल, किंवा तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तयार आहात पण तुमच्या पालकांना तसं वाटत नसेल. उलट, तुम्ही अजून थांबावं आणि आणखी अनुभव प्राप्त करून घ्यावा अशी त्यांची इच्छा असेल. अशा वेळी तुम्ही काय कराल? अशा वेळी निराश होऊ नका. उलट, बाप्तिस्मा घेण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही पात्र व्हावं म्हणून या वेळेचा चांगला उपयोग करा. ही गोष्ट लक्षात घेऊन तुम्ही पुढील तीन क्षेत्रांमध्ये आपलं ध्येय
निश्चित करू शकता: (१) तुम्हाला असलेली खात्री किंवा तुमचा विश्वास, (२) तुमची कार्यं, आणि (३) तुम्हाला असलेली कदर.तुम्हाला असलेली खात्री
३, ४. तीमथ्याच्या उदाहरणावरून तरुण काय शिकू शकता?
३ पुढील प्रश्नांची तुम्ही कशी उत्तरं द्याल याचा विचार करा: देव अस्तित्वात आहे असं मी का मानतो? बायबल हे देवाचं वचन आहे असं मी का मानतो? जगातील नैतिक स्तरांनुसार जीवन जगण्याऐवजी मी देवाच्या आज्ञांचं पालन का करतो? या प्रश्नांमुळे तुम्हाला प्रेषित पौलानं दिलेल्या सल्ल्याचं पालन करण्यास मदत होईल. त्यानं म्हटलं: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे.” (रोम. १२:२) असं करणं महत्त्वाचं का आहे?
४ तीमथ्याच्या उदाहरणावरून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तीमथ्याला शास्त्रवचनांची चांगली समज होती. कारण, त्याच्या आईनं आणि आजीनं त्याला शास्त्रातूनच शिकवलं होतं. तरीसुद्धा, पौलानं तीमथ्याला असा सल्ला दिला: “तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या धरून राहा.” (२ तीम. ३:१४, १५) यावरून कळतं की तीमथ्याला याची खात्री होती की तो जे काही शिकला आहे ते सत्य आहे. त्याच्या आईकडून आणि आजीकडून त्याला सत्य मिळालं होतं म्हणून नव्हे, तर शिकलेल्या गोष्टींवर विचार केल्यामुळे आणि तर्क केल्यामुळे त्याची खात्री पटली होती आणि म्हणून त्यानं सत्य स्वीकारलं होतं.—रोमकर १२:१ वाचा. [1]
५, ६. तरुण असतानाच आपल्या “विचारशक्तीचा” वापर करण्यास शिकून घेणं का महत्त्वाचं आहे?
५ तुमच्या बाबतीत काय? कदाचित तुम्हालाही बऱ्याच वर्षांपासून सत्य माहीत असेल. पण, ते सत्य का आहे याच्या कारणांवर विचार करण्याचं ध्येय तुम्ही ठेवू शकता. यामुळे तुम्हाला तुमचा विश्वास आणखी भक्कम करण्यास मदत होईल. आणि सोबत्यांच्या दबावामुळे, जगाच्या विचारसरणीमुळे किंवा तुमच्या स्वतःच्या भावनांमुळे चुकीचा निर्णय घेण्यापासून तुमचं संरक्षण होईल.
६ तुम्ही जर तरुण असतानाच आपल्या “विचारशक्तीचा” वापर करण्यास शिकला, तर तुमचे सोबती विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं तुम्हाला शक्य होईल. ते कदाचित असं विचारतील, “देव खरंच आहे असं तुला का वाटतं? देवाचं जर आपल्यावर प्रेम आहे तर मग तो वाईट गोष्टी का होऊ देतो? देवाला सुरवात नाही, हे कसं शक्य आहे?” तुमची चांगली तयारी असेल तर या प्रश्नांबद्दल तुमच्या मनात कधीच शंका येणार नाही. उलट, तुम्ही बायबलचा आणखी काळजीपूर्वकपणे अभ्यास करण्यास प्रवृत्त व्हाल.
७-९. वेबसाईटवरील, “बायबल नेमकं काय शिकवतं?” या लेखमालिकेमुळे आपली खात्री आणखी पक्की करण्यास आपल्याला कशी मदत होते हे स्पष्ट करा.
७ काळजीपूर्वकपणे व्यक्तिगत अभ्यास केल्यास तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी, आपल्या शंका काढून टाकण्यासाठी आणि आपली खात्री पक्की करण्यासाठी मदत होईल. (प्रे. कृत्ये १७:११) आपल्याकडे अशी बरीच प्रकाशनं आहेत ज्यांमुळे तुम्हाला मदत होऊ शकते. अनेकांना जीवन की शुरूआत पाँच सवाल—जवाब पाना ज़रूरी या माहितीपत्रकाचा तसंच इज देअर अ क्रिएटर हू केअर्स अबाऊट यू? (तुमची काळजी करणारा एक निर्माणकर्ता खरंच अस्तित्वात आहे का?) या पुस्तकाचा अभ्यास केल्यामुळे खूप फायदा झाला आहे. तसंच, अनेक जण आपल्या वेबसाईटवरील “बायबल नेमकं काय शिकवतं?” या इंग्रजी लेखमालिकेचाही अगदी आवडीनं अभ्यास करतात आणि त्याचा फायदाही त्यांना झाला आहे. ही लेखमाला तुम्हाला jw.org या वेबसाईटवरील बायबल टिचिंग्स या टॅबखाली मिळेल. या लेखमालिकेतील प्रत्येक लेख, बायबल विषयांवरील तुमची खात्री आणखी वाढवण्यासाठी खासकरून तयार करण्यात आला आहे.
८ तुम्ही बायबलचा अभ्यास करत असल्यामुळे या लेखमालिकेतील काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आधीच माहीत असतील. पण, ही माहिती बरोबर आहे अशी तुम्हाला पूर्ण खात्री आहे का? यासाठी ही लेखमाला तुम्हाला मदत करेल. यात वेगवेगळ्या शास्त्रवचनांचं बारकाईनं परीक्षण करण्यास आणि आपल्या विश्वासाची कारणं लिहून काढण्यास उत्तेजन देण्यात आलं आहे. यामुळे, आपल्या विश्वासाबद्दल इतरांना चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण देण्यास तुम्हाला मदत होईल. इंटरनेटवर
उपलब्ध असलेली “बायबल नेमकं काय शिकवतं?” ही लेखमाला पाहणं तुम्हाला शक्य असेल, तर आपला विश्वास आणखी वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या व्यक्तिगत अभ्यासात त्याचा वापर करू शकता.९ आपण शिकत असलेल्या गोष्टी सत्य आहेत याची खात्री आपण स्वतःला करून दिली पाहिजे. त्यामुळे बाप्तिस्म्याची तयारी करण्यास तुम्हाला मदत होईल. एक किशोरवयीन बहीण असं म्हणते: “बाप्तिस्मा घेण्याआधी मी बायबलचा चांगला अभ्यास केला. आणि हाच खरा धर्म आहे याची खात्री करून घेतली. त्यामुळे, माझा विश्वास दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.”
तुमची कार्यं
१०. बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिस्ती व्यक्तीनं तिच्या विश्वासानुसार कार्य केलं पाहिजे, असं का म्हणता येईल?
१० बायबल म्हणतं की “विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे.” (याको. २:१७) तुम्हाला जर शास्त्रवचनांवर पक्का विश्वास असेल, तर तो तुमच्या कार्यांतून दिसून आला पाहिजे. मग ही कोणत्या प्रकारची कार्यं आहेत? ही ‘पवित्र वर्तणुकीची’ आणि ‘सुभक्तीची कार्यं’ आहेत असं बायबल म्हणतं.—२ पेत्र ३:११ वाचा.
११. ‘पवित्र वर्तणूक’ म्हणजे काय?
११ ‘पवित्र वर्तणूक’ काय आहे? ‘पवित्र वर्तणूक’ म्हणजे नैतिक रीत्या शुद्ध राहून केलेली कार्यं. गेल्या सहा महिन्यांचा विचार करा: तुम्हाला एखादी चुकीची गोष्ट करण्याचा मोह झाला, तेव्हा योग्य काय आणि अयोग्य काय याचा काळजीपूर्वक विचार तुम्ही केला होता का? (इब्री ५:१४) मोहाला किंवा सोबत्यांकडून येणाऱ्या दबावाला यशस्वी रीत्या तोंड दिल्याचा एखादा प्रसंग तुम्हाला आठवतो का? शाळेत तुम्ही एक चांगलं उदाहरण आहात का? शाळेत मुलांनी तुमची टिंगल करू नये म्हणून तुम्ही त्यांच्यासारखंच राहण्याचा प्रयत्न करता, की यहोवाला विश्वासू राहता? (१ पेत्र ४:३, ४) हे खरं आहे की आपण सर्वच अपरिपूर्ण आहोत. कधीकधी तर अनेक वर्षांपासून यहोवाची सेवा करणाऱ्यांनाही संकोच वाटत असल्यामुळे इतरांना प्रचार करणं त्यांना कठीण जातं. पण, यहोवाला आपलं जीवन समर्पित केलेल्यांना, यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक असण्याचा गर्व असतो आणि हे आपल्या चांगल्या वागणुकीतून दाखवून देण्याचा ते प्रयत्न करतात.
१२. सुभक्तीची कार्यं कोणती आहेत आणि त्यांच्याप्रती आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे?
१२ ‘सुभक्तीची कार्यं’ काय आहेत? तुम्ही ख्रिस्ती मंडळीत जी कार्यं करता त्यांचा यात समावेश होतो. जसं की सभांना आणि प्रचारकार्याला जाणं. पण, त्यासोबतच इतरांना दिसणार नाहीत अशा कार्यांचाही यात समावेश होतो. जसं की, आपल्या वैयक्तिक प्रार्थना आणि व्यक्तिगत अभ्यास. यहोवाला आपलं जीवन समर्पित केलेल्या लोकांना या गोष्टी ओझ्यासमान वाटत नाहीत. उलट त्यांनाही दाविदानं म्हटल्याप्रमाणेच वाटतं: “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.”—स्तो. ४०:८.
१३, १४. ‘सुभक्तीची कार्यं’ करण्यासाठी तुम्हाला कोणत्या साधनाची मदत होईल आणि काही तरुणांना याचा कसा फायदा झाला आहे?
१३ क्वेश्चन्स यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क, व्हॉल्यूम २ या पुस्तकातील पृष्ठे ३०८ आणि ३०९ यांत एक वर्कशीट दिली आहे. त्या वर्कशीटमुळे तुम्हाला काही ध्येयं ठेवण्यास मदत होऊ शकते. या वर्कशीटमध्ये दिलेल्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहू शकता. जसं की: “तुमच्या प्रार्थनेत तुम्ही विशिष्ट गोष्टींचा उल्लेख करता का, आणि त्यावरून यहोवाप्रती असलेल्या तुमच्या प्रेमाबद्दल काय दिसून येतं?” “वैयक्तिक अभ्यासाकरता तुम्ही कोणते विषय निवडता?” “तुमचे आईवडील सेवाकार्यात जात नसले तरीही तुम्ही जाता का?” शिवाय तुमच्या प्रार्थनांविषयी, व्यक्तिगत अभ्यासाविषयी आणि प्रचारकार्याविषयी तुम्हाला काही ध्येयं ठेवायची असतील तर ती लिहिण्यासाठीदेखील या वर्कशीटमध्ये जागा देण्यात आली आहे.
१४ बाप्तिस्मा घेण्याची इच्छा असणाऱ्या अनेक तरुणांना ही वर्कशीट एक उपयुक्त साधन असल्याचं दिसून आलं आहे. टिल्डा नावाच्या एका तरुण बहिणीनं असं म्हटलं: “मी या वर्कशीटचा वापर काही ध्येयं ठेवण्यासाठी केला. आणि त्यात लिहिलेली ध्येयं मी एका नंतर एक गाठली; आणि मग जवळजवळ एका वर्षानंतर मी बाप्तिस्मा घेण्यासाठी तयार झाले.” पॅट्रिक नावाच्या एका तरुण बांधवाचाही असाच अनुभव आहे. तो म्हणतो: “माझी ध्येयं
मी आधीच ठरवली होती. पण लिहून ठेवल्यामुळे ती साध्य करण्यासाठी मला जास्त परिश्रम घेण्याची प्रेरणा मिळाली.”१५. समर्पण हा तुमचा व्यक्तिगत निर्णय का असला पाहिजे? स्पष्ट करा.
१५ या वर्कशीटमध्ये असाही एक प्रश्न आहे, की “तुमच्या आईवडिलांनी किंवा मित्रांनी यहोवाची सेवा करण्याचं सोडून दिलं तेव्हादेखील तुम्ही यहोवाची सेवा करणार का?” तुम्ही जेव्हा यहोवाला आपलं जीवन समर्पित कराल आणि बाप्तिस्मा घ्याल तेव्हा त्याच्यासोबत तुमचा एक व्यक्तिगत नातेसंबंध असेल. त्यामुळे तुमचे पालक किंवा इतर कोणीही यहोवाची सेवा करोत न् करोत, पण तुम्ही मात्र यहोवाची सेवा करत राहिलं पाहिजे. तुमच्या पवित्र आणि सुभक्तीच्या कार्यांमुळे हे दिसून येईल, की तुम्हाला मिळालेलं सत्यच खरं असल्याची पूर्ण खात्री तुम्हाला झाली आहे आणि देवाच्या स्तरांचं पालन करण्याची तुमची मनापासून इच्छा आहे. साहजिकच, बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्ही लवकरच पात्र व्हाल!
तुम्हाला असलेली कदर
१६, १७. (क) बाप्तिस्मा घेण्यासाठी एक व्यक्ती कोणत्या गोष्टीमुळे प्रवृत्त झाली पाहिजे? (ख) खंडणीबद्दल कदर असल्याचं कसं दाखवता येईल, हे उदाहरण देऊन स्पष्ट करा.
१६ नियमशास्त्राची चांगली माहिती असलेल्या एका माणसानं एकदा येशूला विचारलं: “नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे?” येशूनं त्याला उत्तर दिलं: “तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर.” (मत्त. २२:३५-३७) येशूनं समजावून सांगितलं की यहोवाप्रती असलेल्या प्रेमामुळेच एखाद्यानं बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती बनलं पाहिजे. हे प्रेम आणखी गहिरं करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे, यहोवानं मानवांना दिलेल्या खंडणीच्या मौल्यवान देणगीवर काळजीपूर्वक विचार करणे. (२ करिंथकर ५:१४, १५; १ योहान ४:९, १९ वाचा.) असं केल्यास, देवाच्या या महान देणगीबद्दल तुम्हाला कदर असल्याचं तुम्ही दाखवत असता.
१७ खंडणीबद्दल तुम्हाला असलेली कदर पुढील उदाहरणावरून स्पष्ट करता येईल: असा विचार करा की तुम्ही बुडत आहात आणि कोणीतरी येऊन तुमचा जीव वाचवला. पण तुम्ही मात्र घरी जाऊन केवळ आपले कपडे बदलून मोकळे झाला, आणि त्यानं केलेली गोष्ट विसरून गेला, तर ते योग्य असेल का? नक्कीच नाही! उलट तुमचा जीव वाचवणाऱ्या त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात नेहमीच कदर असेल! त्याच प्रकारे खंडणी बलिदानामुळे, यहोवा आणि येशूप्रती आपल्याही मनात कदर असली पाहिजे. आपल्या जीवनावर त्यांचा पूर्ण अधिकार आहे! त्यांनी पाप आणि मृत्यूपासून आपली सुटका केली आहे. आपल्यावर असलेल्या त्यांच्या प्रेमामुळेच पृथ्वीवरील नंदनवनात सदासर्वकाळ जगण्याची आशा आपल्याला मिळाली आहे!
१८, १९. (क) यहोवाला समर्पण करण्यासाठी आपल्याला संकोच बाळगण्याची गरज का नाही? (ख) यहोवाची सेवा केल्यामुळे तुमचं जीवन आणखी चांगलं कसं बनतं?
१८ यहोवानं तुमच्यासाठी जे काही केलं, त्याची तुम्हाला इब्री ११:६) शिवाय, तुम्ही आपलं जीवन देवाला समर्पित करून बाप्तिस्मा घ्याल तेव्हा तुमचं जीवन कठीण नव्हे तर आणखी चांगलं होईल. लहानपणी बाप्तिस्मा घेतलेला, २४ वर्षांचा एक बांधव म्हणतो: “मी आणखी थोडा मोठा झाल्यानंतर यहोवाला माझं जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला असता तर कदाचित तोपर्यंत मला वचनांची आणखी चांगली समज मिळाली असती; पण लहानपणीच हा निर्णय घेतल्यामुळे, जगातील गोष्टींमागं लागण्यापासून माझा बचाव झाला आहे.”
कदर आहे का? असेल तर समर्पण करणं आणि बाप्तिस्मा घेणं तुमच्यासाठी एक योग्य पाऊल ठरेल. कारण त्याद्वारेच तुम्ही यहोवाला, सदासर्वकाळ त्याची सेवा करण्याचं वचन देत असता. असं वचन देताना तुम्ही संकोच बाळगावा का? नक्कीच नाही! कारण आपल्यासाठी सर्वोत्तम तेच करण्याची यहोवाची इच्छा आहे आणि त्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण जे काही करतो त्याचं प्रतिफळ तो आपल्याला नक्कीच देईल. (१९ तुमच्यासाठी सर्वोत्तम ते करण्याची यहोवाची इच्छा आहे. पण, दुसरीकडे पाहता सैतान हा स्वार्थी आहे आणि त्याला आपली जराही फिकीर नाही. त्याचं अनुकरण केल्यामुळे तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. कारण, तो तुम्हाला चांगलं असं काहीच देऊ शकत नाही. त्याच्याजवळ ना चांगला संदेश आहे, ना आपल्याला देण्यासाठी कोणती आशा. तुम्हाला त्याच्याकडून केवळ निराशाच मिळेल. कारण त्याचं स्वतःचंच भविष्य अंधारात आहे.—प्रकटी. २०:१०.
२०. समर्पण आणि बाप्तिस्मा घेण्याइतपत प्रगती करण्यासाठी तरुणांना काय करता येईल? (“ आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यासाठी...” ही चौकटदेखील पाहा.)
२० यहोवाला आपलं जीवन समर्पित करणं हा तुमच्या आयुष्यातला सर्वात चांगला निर्णय असेल. मग हा निर्णय घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का? जर असाल, तर देवाला वचन देण्यासाठी मागंपुढं पाहू नका. पण, समजा तुम्हाला वाटत असेल की तुम्ही अजून तयार नाही तर या लेखातील सल्ल्यांचा वापर करून प्रगती करत राहा. पौलानं फिलिप्पैमधील बांधवांना प्रगती करत राहण्याचं उत्तेजन दिलं. (फिलिप्पै. ३:१६) तुम्ही या सल्ल्याचं पालन केलं तर तुम्हालाही लवकरच यहोवाला आपलं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घ्यावा, असं वाटेल.
^ [१] (परिच्छेद ४) रोमकर १२:१ (NW): “म्हणून बांधवांनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला अशी विनंती करतो, की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला स्वीकारयोग्य यज्ञ अशी अर्पण करावी; अशा प्रकारे तुम्ही आपल्या विचारशक्तीचा वापर करून देवाची पवित्र सेवा करू शकाल.”