अभ्यास करण्यासाठी एक टीप
“उपासनेची गीतं” तोंडपाठ करा
“जेव्हा मला कमीपणाची भावना सतावते, तेव्हा यहोवा मला JW ब्रॉडकास्टिंगच्या गीतांनी प्रोत्साहन देतो.”—लॉरेन, अमेरिका.
खूप पूर्वीपासून आपण उपासनेसाठी ‘उपासनेच्या गीतांचा’ वापर करत आलो आहोत. (कलस्सै. ३:१६) ही गीतं तोंडपाठ केल्यामुळे तुमच्याकडे गीत पुस्तक नसलं किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण नसलं, तरी तुम्हाला फायदा होईल. ही गीतं तोंडपाठ करण्यासाठी खाली दिलेल्या काही गोष्टी करून पाहा.
गीताचा अर्थ समजून घेण्यासाठी त्यातले बोल लक्ष देऊन वाचा. एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घेतल्यामुळे ती आठवायला सोपी जाते. jw.org वर या सगळ्या गीतांचे बोल उपलब्ध आहेत. यांमध्ये खास गीतं आणि लहान मुलांसाठी असलेली गीतंसुद्धा येतात. यासाठी तुम्ही लायब्ररी विभागात संगीत या शीर्षकाखाली या गीतांचे बोल पाहू शकता.
गीतांचे बोल लिहून काढा. यामुळे गीतांचे बोल तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे लक्षात राहतील.—अनु. १७:१८.
मोठ्याने सराव करा. गीतं पुन्हापुन्हा वाचा किंवा गा.
तुम्हाला किती आठवतं ते पाहा. गीतांचे बोल न बघता ते आठवायचा प्रयत्न करा आणि तुम्हाला कितपत आठवतंय ते तपासून पाहा.