अभ्यास लेख १५
येशूचं अनुकरण करा आणि मनाची शांती टिकवून ठेवा
“सर्व समजशक्तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती . . . तुमच्या मनाचे” रक्षण करेल.—फिलिप्पै. ४:७.
गीत ३९ शांतीचा ठेवा
सारांश *
१-२. येशू चिंतित का होता?
पृथ्वीवर येशूची शेवटची रात्र होती. लवकरच दुष्ट लोक त्याला क्रुरपणे ठार मारणार होते. पण येशूला फक्त आपल्या मृत्यूची चिंता नव्हती, तर त्यापेक्षाही एका जास्त महत्त्वाच्या गोष्टीची चिंता होती. त्याचं आपल्या पित्यावर खूप प्रेम होतं आणि त्याला आपल्या पित्याचं मन आनंदित करायचं होतं. त्याला माहीत होतं, की तो जर येणाऱ्या कठीण परीक्षेत विश्वासू राहिला तर यहोवाच्या नावाला लागलेला कलंक मिटवण्यात त्याचा हातभार असेल. येशूचं लोकांवरसुद्धा प्रेम होतं. तो आपल्या मृत्यूपर्यंत यहोवाला विश्वासू राहिला तरच मानवांना कायमस्वरूपी जगण्याची आशा मिळेल याचीही त्याला जाणीव होती.
२ परिस्थिती जरी खूप तणावपूर्ण होती तरी येशूचं मन शांत होतं. त्याने आपल्या शिष्यांना म्हटलं होतं: “मी माझी शांती तुम्हाला देतो.” (योहा. १४:२७) येशूकडे “देवाची शांती” होती. यहोवासोबत असलेल्या घनिष्ठ नात्यामुळे अशी शांती मिळणं शक्य होतं. देवाच्या शांतीमुळे येशूचं मन स्थिर होतं आणि त्याला चिंतेपासून दूर राहायला मदत झाली.—फिलिप्पै. ४:६, ७.
३. या लेखात आपण कोणत्या गोष्टींचं परीक्षण करणार आहोत?
३ येशूने ज्या दबावांचा सामना केला त्या दबावांचा आपल्यापैकी कोणालाही सामना करावा लागणार नाही. पण येशूचे अनुयायी या नात्याने आपल्याला परीक्षांचा सामना नक्की करावा लागेल. (मत्त. १६:२४, २५; योहा. १५:२०) तसंच, येशूसारखं आपल्यालाही काही वेळा चिंतांचाही सामना करावा लागेल. पण नैराश्याला आपल्यावर हावी न होऊ देण्यासाठी आणि मनाची शांती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होईल? आपल्या सेवाकार्यादरम्यान येशूने कोणत्या तीन गोष्टी केल्या आणि आपल्यासमोर परीक्षा आल्यावर आपण त्याचं अनुकरण कसं करू शकतो, याचं आता आपण परीक्षण करू या.
येशूने अनेकदा प्रार्थना केली
४. १ थेस्सलनीकाकर ५:१७ या वचनानुसार येशूने आपल्या मृत्यूच्या शेवटच्या दिवशी अनेकदा प्रार्थना केल्याची काही उदाहरणं द्या.
४ १ थेस्सलनीकाकर ५:१७ वाचा. येशूने पृथ्वीवर असताना आपल्या शेवटच्या दिवशी अनेकदा प्रार्थना केली. त्याच्या मृत्यूच्या स्मरणार्थ कोणत्या गोष्टी केल्या जाव्यात हे त्याने शिष्यांना दाखवलं तेव्हा त्यांना भाकर आणि द्राक्षारस देण्याआधी त्याने प्रार्थना केली. (१ करिंथ. ११:२३-२५) तसंच, ज्या ठिकाणी शेवटचा वल्हांडणाचा सण साजरा करण्यात आला तिथून निघण्याआधीही येशूने आपल्या शिष्यांसोबत प्रार्थना केली. (योहा. १७:१-२६) नंतर रात्री तो आपल्या शिष्यांसोबत गेथशेमाने इथे पोचला, तेव्हादेखील त्याने बऱ्याचदा प्रार्थना केली. (मत्त. २६:३६-३९, ४२, ४४) इतकंच काय तर येशूचे शेवटचे शब्ददेखील एक प्रार्थनाच होती. (लूक २३:४६) पृथ्वीवर असताना शेवटच्या दिवशी ज्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी घडल्या त्यांबद्दल येशूने यहोवाला प्रार्थना केली.
५. शिष्यांचं धैर्य का खचलं?
५ येशू परीक्षेचा सामना करू शकला याचं एक कारण म्हणजे तो प्रार्थनेद्वारे यहोवावर विसंबून राहिला. पण याउलट, त्याचे शिष्य त्या रात्री सतत प्रार्थना करण्यात कमी पडले. याचा काय परिणाम झाला? त्या रात्री जेव्हा त्यांना परीक्षांचा सामना करावा लागला तेव्हा त्यांचं धैर्य खचलं. (मत्त. २६:४०, ४१, ४३, ४५, ५६) यावरून आपल्याला समजतं, की आपण येशूचं अनुकरण केलं आणि ‘प्रार्थना करत राहिलो’ तरच परीक्षेच्या वेळी आपण विश्वासात टिकून राहू शकू. पण आपण कोणत्या गोष्टींबद्दल प्रार्थना करू शकतो?
६. विश्वासामुळे आपल्याला शांती टिकवून ठेवायला कशी मदत होऊ शकते?
६ “आमचा विश्वास वाढव” अशी प्रार्थना आपण यहोवाला करू शकतो. (लूक १७:५; योहा. १४:१) पण आपल्या सर्वांना विश्वासाची गरज का आहे? कारण जो कोणी येशूचा शिष्य बनतो त्याच्यावर सैतान परीक्षा आणतो. (लूक २२:३१) आपल्याला एका मागोमाग एक समस्यांचा सामना करावा लागतो तेव्हा विश्वासामुळे आपल्याला शांती टिकवून ठेवायला कशी मदत होऊ शकते? हे खरं आहे की परीक्षेत आपण आपल्या परीने शक्य ते करू. पण त्यानंतर विश्वासामुळेच सर्व चिंता यहोवावर सोपवण्यासाठी आपल्याला मदत होते. आपल्या क्षमतेपलीकडे असलेली गोष्ट यहोवा चांगल्या प्रकारे हाताळू शकतो याची आपण पक्की खात्री बाळगली तर आपलं मन शांत राहू शकेल.—१ पेत्र ५:६, ७.
७. बंधू रॉबर्ट यांच्या शब्दांवरून तुम्हाला काय शिकायला मिळतं?
७ आपल्यावर कोणतीही परीक्षा आली तरी प्रार्थना केल्यामुळे आपल्याला मनाची शांती टिकवून ठेवायला मदत होते. रॉबर्ट नावाचे वडील ८० वर्षांचे आहेत आणि ते विश्वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत. ते म्हणतात: “फिलिप्पैकर ४:६, ७ या वचनांमुळे मला जीवनातल्या अनेक समस्यांना तोंड द्यायला मदत झाली आहे. मला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला आणि काही वेळासाठी मी वडील असण्याची जबाबदारीही गमावली होती.” मग रॉबर्ट यांना मनाची शांती टिकवून ठेवायला कुठून मदत मिळाली? ते म्हणतात: “मला चिंता वाटू लागल्यावर मी लगेच प्रार्थना करायचो. माझ्या मते, मी जितक्या जास्त वेळा आणि कळकळीने प्रार्थना करायचो तितकं माझं मन शांत असल्याचं मी अनुभवायचो.”
येशूने आवेशाने प्रचार केला
८. योहान ८:२९ या वचनानुसार येशू आणखी एका कोणत्या कारणामुळे मनाची शांती अनुभवू शकला?
८ योहान ८:२९ वाचा. येशूचा छळ झाला तेव्हाही त्याचं मन शांत होतं, कारण त्याला माहीत होतं की तो यहोवाचं मन आनंदित करत आहे. यहोवाची आज्ञा पाळणं कठीण वाटत असलं तरी तो आज्ञाधारक राहिला. त्याचं आपल्या पित्यावर प्रेम होतं आणि त्याने जीवनात यहोवाच्या सेवेला सर्वात जास्त महत्त्व दिलं. पृथ्वीवर येण्याआधी तो देवासोबत “कुशल कारागीर” म्हणून काम करत होता. (नीति. ८:३०) आणि पृथ्वीवर असताना त्याने आवेशाने इतरांना आपल्या पित्याबद्दल शिकवलं. (मत्त. ६:९; योहा. ५:१७) हे कार्य केल्यामुळे येशूला खूप आनंद झाला.—योहा. ४:३४-३६.
९. प्रचारकार्यात व्यस्त राहिल्याने आपल्याला मनाची शांती टिकवून ठेवायला कशी मदत होते?
९ यहोवाची आज्ञा पालन केल्याने आणि “प्रभूचे काम जास्तीत जास्त प्रमाणात करत” राहिल्याने आपण येशूचं अनुकरण करतो. (१ करिंथ. १५:५८) आपण जेव्हा प्रचारकार्यात “स्वतःला पूर्णपणे वाहून” घेतो तेव्हा समस्यांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. आपण नकारात्मक विचार करत नाही. (प्रे. कार्ये १८:५) उदाहरणार्थ, सेवाकार्यात भेटणाऱ्या लोकांच्या जीवनात आपल्यापेक्षाही मोठ्या समस्या असतात. ते यहोवावर प्रेम करायला शिकतात आणि त्याचे सल्ले लागू करतात तेव्हा त्यांचं जीवन सुधारतं आणि ते आनंदी बनतात. हे जेव्हा आपण प्रत्येक वेळी पाहतो तेव्हा आपल्याला पक्की खात्री पटते की यहोवाला आपली काळजी आहे. तसंच, भक्कम विश्वासामुळे आपल्याला मनाची शांती टिकवून ठेवायलाही मदत होते. हीच गोष्ट एका बहिणीच्या बाबतीत कशी खरी ठरली याचं आपण एक उदाहरण पाहू या. आयुष्यभर तिला वाटायचं की तिचं काहीच मोल नाही आणि ती खूप निराश होती. ती म्हणते: “सेवाकार्यात व्यस्त राहिल्याने मला भावनिक रीत्या स्थिर व्हायला आणि आनंदी व्हायला मदत झाली. मला वाटतं की मी जेव्हा प्रचारात असते तेव्हा मी यहोवाच्या खूप जवळ असते.”
१०. ब्रेंडाच्या उदाहरणावरून आपल्याला काय शिकायला मिळतं?
१० ब्रेंन्डा नावाच्या बहिणीचाही विचार करा. तिला आणि तिच्या मुलीला एक गंभीर स्वरूपाचा आजार आहे. ब्रेंन्डाला चालणं शक्य नसल्यामुळे ती व्हिलचेयरचा आधार घेते. आजारपणामुळे ती खूप कमजोर झाली आहे. जेव्हा कधी शक्य असेल तेव्हा ती घरोघरचं प्रचारकार्य करते. पण पत्र लिहून साक्षकार्य करण्यात ती जास्त वेळ घालवते. ती म्हणते: “जेव्हा या गोष्टीचा मी स्वीकार केला की माझा आजार या जगात बरा होऊ शकत नाही, तेव्हा मला माझ्या सेवाकार्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायला मदत झाली. खरंतर, मी प्रचार करते तेव्हा मी माझ्या चिंतांबद्दल जास्त विचार करत बसत नाही. यामुळे प्रचारकार्यात भेटणाऱ्या लोकांना कशी मदत करता येईल यावर जास्त विचार करण्याची मला प्रेरणा मिळते. तसंच, प्रचारकार्य करत राहिल्यामुळे मी नेहमी नवीन जगाच्या आशेबद्दल विचार करत राहते.”
येशूने आपल्या मित्रांची मदत स्वीकारली
११-१३. (क) प्रेषितांनी आणि इतरांनी कशा प्रकारे दाखवलं की ते येशूचे खरे मित्र होते? (ख) आपल्या मित्रांचा येशूवर काय परिणाम झाला?
११ येशूच्या संपूर्ण सेवाकार्यादरम्यान त्याला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला. पण अशा परिस्थितीत विश्वासू प्रेषितांनी त्याला जडून राहण्याद्वारे दाखवून दिलं की ते त्याचे खरे मित्र आहेत. मैत्रीच्या बाबतीत त्यांनी एक जिवंत उदाहरण मांडलं. याबद्दल नीतिसूत्रे या पुस्तकात म्हटलं आहे: “एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणास धरून राहतो.” (नीति. १८:२४) अशा प्रकारचे मित्र येशूच्या नजरेत खूप मौल्यवान होते. आपल्या संपूर्ण सेवाकार्यादरम्यान त्याच्या भावांपैकी एकानेही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. (योहा. ७:३-५) त्याच्या नातेवाइकांनीही त्याच्याबद्दल असा विचार केला की त्याला वेड लागलं आहे. (मार्क ३:२१) पण याच्या अगदी उलट, पृथ्वीवर आपल्या शेवटच्या रात्री येशू प्रेषितांना म्हणू शकला: “माझ्या परीक्षांमध्ये मला जडून राहिलेले तुम्हीच आहात.”—लूक २२:२८.
१२ येशूच्या प्रेषितांनी काही वेळा त्याला निराश केलं. पण येशूने त्यांच्या चुकांवर लक्ष न देता, त्यांचा आपल्यावर किती विश्वास आहे यावर लक्ष दिलं. (मत्त. २६:४०; मार्क १०:१३, १४; योहा. ६:६६-६९) आपल्या शेवटच्या रात्री येशूने या विश्वासू प्रेषितांना म्हटलं: “मी तर तुम्हाला मित्र म्हटलं आहे, कारण माझ्या पित्यापासून ऐकलेल्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत.” (योहा. १५:१५) येशूला त्याच्या मित्रांमुळे बरंचसं प्रोत्साहन मिळालं यात काहीच शंका नाही. प्रचारकार्यात आपल्या मित्रांनी केलेल्या मदतीमुळे येशूला खूप आनंद झाला.—लूक १०:१७, २१.
१३ प्रेषित तर येशूचे मित्र होतेच पण इतर स्त्री-पुरुषही लूक १०:३८-४२; योहा. १२:१, २) इतर काहींनी त्याच्यासोबत प्रवास केला आणि आपल्या संपत्तीतून काही गोष्टी त्याला दिल्या. (लूक ८:३) येशूचे चांगले मित्र होते कारण तो स्वतः एक चांगला मित्र होता. येशूने त्यांच्यासाठी बऱ्याचशा चांगल्या गोष्टी केल्या आणि त्याने त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षा केली नाही. येशू परिपूर्ण होता पण तरी त्याच्या अपरिपूर्ण मित्रांनी केलेल्या मदतीची त्याला कदर होती. यात काहीच शंका नाही की त्याच्या मित्रांमुळे त्याला मनाची शांती टिकवून ठेवायला नक्कीच मदत झाली.
त्याचे मित्र होते. त्यांनी त्याला प्रचारकार्यात आणि इतर व्यावहारिक मार्गांनी मदत केली. त्याच्या खाण्यापिण्याची सोय होईल म्हणून काहींनी त्याला आपल्या घरी जेवायला बोलवलं. (१४-१५. आपण चांगले मित्र कसे बनवू शकतो आणि ते आपल्याला कशी मदत करू शकतात?
१४ यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी चांगले मित्र आपल्याला मदत करतात. चांगले मित्र बनवण्यासाठी आधी आपण स्वतः एक चांगला मित्र असणं गरजेचं आहे. (मत्त. ७:१२) उदाहरणार्थ, बायबल सांगतं की आपण आपला वेळ आणि शक्ती इतरांना मदत करण्यासाठी आणि खासकरून जे “गरजू” आहेत अशांना मदत करण्यासाठी वापरावी. (इफिस. ४:२८) तुमच्या मंडळीत अशी एखादी व्यक्ती आहे का जिला मदतीची गरज आहे? घरातून बाहेर पडणं शक्य नसलेल्या वृद्ध किंवा आजारी बंधुभगिनींना बाहेरून काही वस्तू हव्या असल्यास ते आणून देण्यास तुम्ही मदत करू शकता का? पैशांची अडचण असलेल्या एखाद्या कुटुंबाला तुम्ही जेवायला बोलवू शकता का? तुम्हाला jw.org® वेबसाईट आणि JW Library® ॲप वापरता येत असेल, तर मंडळीत ज्यांना ते वापरता येत नाही अशांना ते वापरायला तुम्ही शिकवू शकता का? आपण जेव्हा आपलं लक्ष इतरांना मदत करण्यावर केंद्रित करतो तेव्हा आपण जास्त आनंदी राहू शकतो.—प्रे. कार्ये २०:३५.
ईयो. ३२:४) मित्रांनी आपल्यासाठी निर्णय घ्यावेत अशी आपण अपेक्षा करणार नाही, तर त्यांनी दिलेल्या बायबलच्या सल्ल्याचं पालन करून आपण सुज्ञता दाखवू शकतो. (नीति. १५:२२) दावीदने नम्रता दाखवत आपल्या मित्रांकडून मदत स्वीकारली. त्याच प्रकारे, आपणही गर्व न बाळगता गरजेच्या वेळी मित्रांनी पुरवलेली मदत नम्रतेने स्वीकारली पाहिजे. (२ शमु. १७:२७-२९) खरे मित्र यहोवाकडून मिळालेली एक देणगीच आहे!—याको. १:१७.
१५ समस्यांचा सामना करण्यासाठी आपले मित्र आपल्याला मदत करतात आणि यामुळे आपल्याला मनाची शांती टिकवून ठेवायला मदत होते. ईयोब आपल्या समस्यांबद्दल बोलत असताना जसं अलीहूने त्याचं ऐकलं, तसंच आपण आपल्या चिंता व्यक्त करतो तेव्हा आपले मित्रही धीराने ऐकतात. (मनाची शांती टिकवून ठेवा
१६. फिलिप्पैकर ४:६, ७ या वचनांनुसार मनाची शांती मिळवण्याचा एकमेव मार्ग कोणता आहे? स्पष्ट करा.
१६ फिलिप्पैकर ४:६, ७ वाचा. यहोवाकडून मिळणारी शांती “ख्रिस्त येशूद्वारे” मिळू शकते असं यहोवा का म्हणतो? कारण यहोवाच्या उद्देशात येशूची काय भूमिका आहे हे समजल्यावर आणि त्यावर विश्वास ठेवल्यावरच आपण मनाची शांती अनुभवू. उदाहरणार्थ, येशूच्या खंडणी बलिदानामुळे आपल्या सर्व पापांची क्षमा होते. (१ योहा. २:१२) या गोष्टीवर विचार केल्याने खरंच खूप सांत्वन मिळतं. येशू देवाच्या राज्याचा राजा या नात्याने सैतान आणि त्याच्या व्यवस्थेमुळे झालेलं नुकसान भरून काढेल. (यश. ६५:१७; १ योहा. ३:८; प्रकटी. २१:३, ४) खरंच, यामुळे आपल्याला एक सुंदर आशा मिळते. येशूने सोपवलेलं काम जरी कठीण असलं, तरी तो आपल्यासोबत आहे आणि या जगाच्या व्यवस्थेच्या शेवटापर्यंत तो आपल्याला मदत करत राहील. (मत्त. २८:१९, २०) यामुळे आपल्याला खूप धैर्य मिळतं. सांत्वन, आशा आणि धैर्य या गोष्टी मनाची शांती टिकवून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.
१७. (क) एक ख्रिस्ती व्यक्ती मनाची शांती कशी टिकवून ठेवू शकते? (ख) योहान १६:३३ या वचनातल्या अभिवचनानुसार आपल्याला काय करणं शक्य होईल?
१७ कठीण परीक्षा येतात तेव्हा आपण मनाची शांती कशी टिकवून ठेवू शकतो? यासाठी येशूने ज्या गोष्टी केल्या त्या आपण केल्या पाहिजेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे, परिस्थिती कशीही असो नेहमी प्रार्थना करत राहा. दुसरी गोष्ट, कठीण वाटत असलं तरी यहोवाच्या आज्ञांचं पालन करा आणि आवेशाने प्रचार करत राहा. तिसरी गोष्ट, परीक्षेचा सामना करत असताना आपल्या मित्रांची मदत स्वीकारा. या गोष्टी केल्याने देवाची शांती तुमच्या मनाचे रक्षण करेल आणि तुम्हीसुद्धा कुठल्याही परीक्षेत येशूप्रमाणे विजयी ठराल!—योहान १६:३३ वाचा.
गीत ६ देवाच्या सेवकाची प्रार्थना
^ परि. 5 आपल्या सर्वांना समस्यांचा सामना करावा लागतो आणि यामुळे आपली शांती हिरावली जाऊ शकते. आपली शांती टिकवून ठेवण्यासाठी येशूने केलेल्या तीन गोष्टींवर आपण या लेखात चर्चा करणार आहोत. यामुळे कठीण परीक्षेदरम्यान येशूसारखंच आपणही मनाची शांती गमावणार नाही.