अभ्यास लेख ८
ईर्ष्येवर मात करून शांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा
“शांतीसाठी आणि एकमेकांच्या उन्नतीसाठी आपण होईल तितका प्रयत्न करू या.”—रोम. १४:१९.
गीत ३९ शांतीचा ठेवा
सारांश *
१. योसेफच्या भावांनी त्याच्याबद्दल मनात ईर्ष्या बाळगल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर काय परिणाम झाला?
याकोबचं आपल्या सगळ्याच मुलांवर प्रेम होतं, पण योसेफवर त्याचा सर्वात जास्त जीव होता. यामुळे योसेफच्या भावांना कसं वाटलं? ते त्याच्यावर जळू लागले आणि त्याचा द्वेष करू लागले. पण योसेफच्या भावांनी त्याचा द्वेष करावा असं त्याने काहीच केलं नव्हतं. तरीपण त्यांनी योसेफला गुलाम म्हणून विकलं आणि आपल्या वडिलांना खोटं सांगितलं, की एका जंगली प्राण्याने त्यांच्या आवडत्या मुलाला मारून टाकलं. योसेफच्या भावांनी मनात ईर्ष्या बाळगल्यामुळे त्यांच्या कुटुंबातली शांती भंग झाली आणि त्यांनी त्यांच्या वडिलांना खूप दुःख दिलं.—उत्प. ३७:३, ४, २७-३४.
२. गलतीकर ५:१९-२१ या वचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे ईर्ष्या इतकी घातक का आहे?
२ बायबलमध्ये अशा वाईट गुणांचा उल्लेख आहे, ज्यांना “शरीराची कामे” म्हणण्यात आलं आहे. आणि या वाईट गुणांमुळे एक व्यक्ती देवाच्या राज्याची वारस बनू शकत नाही. याच गुणांमध्ये ईर्ष्येचासुद्धा * समावेश आहे. (गलतीकर ५:१९-२१ वाचा.) ईर्ष्या ही एका अशा झाडासारखी आहे ज्याला वैर, भांडणं आणि रागाने भडकणं ही विषारी फळं लागतात.
३. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
३ योसेफच्या भावांच्या उदाहरणातून आपल्याला समजतं की ईर्ष्येमुळे कुटुंबातली चांगली नाती तुटू शकतात आणि शांतीसुद्धा भंग होऊ शकते. हे खरं आहे की आपण योसेफच्या भावांसारखं कधीही वागणार नाही, पण आपण सगळे अपरिपूर्ण आहोत आणि आपलं मन धोका देणारं आहे. (यिर्म. १७:९) यामुळे कधीकधी आपल्या मनात ईर्ष्येची भावना येऊ शकते. आता आपण बायबलमधल्या काही उदाहरणांवर चर्चा करू या. त्यांमुळे आपल्याला हे समजायला मदत होईल, की आपल्या मनात ईर्ष्येची भावना का येऊ शकते. त्यानंतर आपण ईर्ष्येवर मात करण्याचे आणि शांती टिकवून ठेवण्याचे काही व्यावहारिक मार्गही पाहू या.
कोणत्या कारणांमुळे आपल्या मनात ईर्ष्या येऊ शकते?
४. पलिष्टी लोक इसहाकचा हेवा का करायचे?
४ दुसऱ्यांच्या श्रीमंतीमुळे. इसहाक श्रीमंत होता, म्हणून पलिष्टी लोक त्याचा हेवा करायचे. (उत्प. २६:१२-१४) इसहाक ज्या विहिरींवर आपल्या कळपांना आणि गुराढोरांना पाणी पाजायचा त्या विहिरीसुद्धा त्यांनी बुजवून टाकल्या. (उत्प. २६:१५, १६, २७) पलिष्टी लोकांप्रमाणे, आजही काही लोक त्यांच्यापेक्षा जास्त संपत्ती असलेल्यांचा हेवा करतात. त्यांना दुसऱ्यांकडे असलेल्या गोष्टींचा मोह होतो. तसंच, इतरांकडे असलेल्या गोष्टी त्यांनी गमवाव्यात असंही या लोकांना वाटतं.
५. यहुदी धर्मगुरू येशूचा हेवा का करायचे?
५ दुसऱ्यांच्या प्रशंसेमुळे. बरेच लोक येशूची प्रशंसा करायचे म्हणून यहुदी धर्मगुरू त्याचा हेवा करायचे. (मत्त. ७:२८, २९) येशू देवाच्या वतीने बोलायचा आणि तो सत्य शिकवायचा. तरीही हे यहुदी धर्मगुरू येशूबद्दल अफवा पसरवायचे आणि त्याची बदनामी करायचे. (मार्क १५:१०; योहा. ११:४७, ४८; १२:१२, १३, १९) या अहवालातून आपण कोणता धडा शिकू शकतो? मंडळीतल्या भाऊबहिणींच्या चांगल्या गुणांमुळे सगळे त्यांच्यावर प्रेम करतात, तेव्हा आपण त्यांच्याबद्दल मनात ईर्ष्या बाळगणं टाळलं पाहिजे. याउलट, आपण त्यांच्या चांगल्या गुणांचं अनुकरण केलं पाहिजे.—१ करिंथ. ११:१; ३ योहा. ११.
६. दियत्रफेसच्या मनात ईर्ष्या आहे हे कसं दिसून आलं?
६ दुसऱ्यांना मंडळीत जबाबदाऱ्या मिळाल्यामुळे. पहिल्या शतकातल्या मंडळीत जे बांधव पुढाकार घ्यायचे, त्यांचा दियत्रफेस हेवा करायचा. त्याला मंडळीत सगळ्यांपेक्षा “वरचढ” व्हायचं होतं म्हणून तो प्रेषित योहानची आणि इतर जबाबदार बांधवांची बदनामी करत होता. (३ योहा. ९, १०) आपण कदाचित दियत्रफेससारखं वागणार नाही. पण आपल्याला हवी असलेली जबाबदारी इतरांना मिळते तेव्हा आपल्या मनात त्यांच्याबद्दल ईर्ष्या येऊ शकते. कदाचित आपल्याला असं वाटत असेल की ही जबाबदारी आपण त्यांच्यापेक्षा चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो.
७. ईर्ष्येचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो?
७ ईर्ष्या ही एका विषारी रोपट्याप्रमाणे आहे. एकदा का ईर्ष्येचं बी आपल्या मनात रूजलं तर ते काढून टाकणं कठीण जाऊ शकतं. हेवा, गर्व आणि स्वार्थ अशा नकारात्मक भावनांमुळे ईर्ष्येला खतपाणी मिळतं. तसंच, ईर्ष्येमुळे प्रेम, दया आणि करूणा यांसारख्या चांगल्या गुणांची वाढ खुंटते. म्हणूनच जेव्हा ईर्ष्या आपल्या मनात मूळ धरू लागते तेव्हाच आपण ती उपटून टाकली पाहिजे. हे आपल्याला कसं करता येईल?
नम्र आणि समाधानी राहा
८. कोणत्या गुणांमुळे आपण ईर्ष्येवर मात करू शकतो?
८ नम्र आणि समाधानी राहून आपण ईर्ष्येवर मात करू शकतो. आपल्या मनात हे गुण असतील तर ईर्ष्येला जागा राहणार नाही. आपल्यात नम्रता असेल तर आपण स्वतःला जास्त महत्त्व देणार नाही. ‘माझ्यात इतरांपेक्षा जास्त योग्यता आहे’ असा विचार एक नम्र व्यक्ती कधीच करणार नाही. (गलती. ६:३, ४) एक समाधानी व्यक्ती तिच्याजवळ जे आहे त्यातच संतुष्ट असते आणि ती स्वतःची तुलना इतरांबरोबर करत नाही. (१ तीम. ६:७, ८) जेव्हा इतरांचं चांगलं होतं तेव्हा एक नम्र आणि समाधानी व्यक्ती त्यांच्या आनंदात सहभागी होते.
९. गलतीकर ५:१६ आणि फिलिप्पैकर २:३, ४ या वचनांप्रमाणे पवित्र आत्मा आपल्याला काय करायला मदत करू शकतो?
९ ईर्ष्येवर मात करण्यासाठी आणि नम्र व समाधानी राहण्यासाठी आपल्याला देवाच्या पवित्र आत्म्याची गरज आहे. (गलतीकर ५:१६; फिलिप्पैकर २:३, ४ वाचा.) यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीने आपण आपल्या मनातल्या खोल भावनांचं आणि हेतूंचं परीक्षण करू शकतो. देवाच्या मदतीने आपण चुकीचे विचार आणि भावना आपल्या मनातून काढून त्या जागी चांगले विचार आणि भावना विकसित करू शकतो. (स्तो. २६:२; ५१:१०) आता आपण मोशे आणि पौल यांच्या उदाहरणावर चर्चा करू या. त्यांनी ईर्ष्येच्या भावनेवर यशस्वीपणे मात केली.
१०. कोणत्या परिस्थितीमुळे मोशेच्या नम्रतेची परीक्षा झाली? (मुखपृष्ठावरचं चित्र पाहा.)
१० देवाने मोशेला आपल्या लोकांवर मोठा अधिकार गण. ११:२४-२९) आपण मोशेकडून काय शिकू शकतो?
दिला होता, पण तो अधिकार त्याच्याजवळच असावा असा त्याने विचार केला नाही. उदाहरणार्थ, एकदा यहोवाने मोशेला दिलेल्या पवित्र आत्म्यातून काही काढून, दर्शनमंडपाजवळ उभे असलेल्या इस्राएली वडीलजनांना दिला. मग थोड्याच वेळात मोशेला कळलं की दोन वडीलजन दर्शनमंडपाजवळ गेले नव्हते, पण त्यांनाही पवित्र आत्मा मिळाला होता आणि ते संदेष्ट्यांप्रमाणे वागू लागले होते. ही गोष्ट पाहिल्यावर यहोशवाने मोशेला सांगितलं की त्याने त्यांना संदेश सांगण्यापासून थांबवावं. तेव्हा मोशेने काय केलं? यहोवाने या दोन वडिलांना हा बहुमान दिला म्हणून मोशेने त्यांचा हेवा केला नाही. उलट, त्याने नम्रता दाखवली आणि त्यांना बहुमान मिळाल्यामुळे तो आनंदी झाला. (११. मंडळीतले वडील मोशेचं अनुकरण कसं करू शकतात?
११ कदाचित तुम्ही मंडळीत वडील म्हणून सेवा करत असाल आणि एखादी जबाबदारी किंवा काम तुम्हाला खूप आवडत असेल. तुम्हाला कधी या जबाबदारीसाठी दुसऱ्या एका बांधवाला प्रशिक्षण द्यायला सांगण्यात आलं आहे का? उदाहरणार्थ, दर आठवडी तुम्हाला टेहळणी बुरूज अभ्यास घ्यायला आवडत असेल. पण जर तुम्ही मोशेप्रमाणे नम्र असाल, तर तुम्ही दुसऱ्या बांधवाला ही जबाबदारी हाताळण्यासाठी प्रशिक्षण द्यायला कचरणार नाही. तसंच, यामुळे तुमचं महत्त्व कमी होईल असाही तुम्ही विचार करणार नाही. उलट आपल्या बांधवाला मदत करण्यात तुम्हाला आनंदच होईल.
१२. आज बरेचसे ख्रिस्ती नम्रता आणि समाधानी वृत्ती कशी दाखवत आहेत?
१२ आता आपण अशा एका परिस्थितीवर चर्चा करू या, ज्याचा सामना बऱ्याच वयस्क बांधवांना करावा लागत आहे. कित्येक वर्षांपर्यंत ज्यांनी वडील वर्गाचे संयोजक म्हणून सेवा केली आहे त्यांना ऐंशी वर्षांचे झाल्यावर आपली जबाबदारी इतरांना सोपवावी लागते. पण ते आनंदाने हा बदल स्वीकारतात. तसंच, विभागीय पर्यवेक्षक सत्तर वर्षांचे होतात तेव्हा ते आपली नेमणूक नम्रपणे सोडायला तयार असतात. त्यांना सेवाकार्यात जी दुसऱ्या प्रकारची नेमणूक दिली जाते ती ते आनंदाने स्वीकारतात. अलीकडच्या काही वर्षांत, जगभरातल्या बऱ्याचशा बेथेल कुटुंबाच्या सदस्यांना प्रचार क्षेत्रात नेमणूक मिळाली आहे. या विश्वासू भाऊबहिणींची नेमणूक इतरांना दिली जाते तेव्हा त्यांच्याबद्दल या भाऊबहिणींच्या मनात कोणतीच नाराजी नसते.
१३. पौल बारा प्रेषितांबद्दल हेवा का बाळगू शकला असता?
१३ नम्रता आणि समाधानी वृत्ती दाखवण्याच्या बाबतीत आणखी एक चांगलं उदाहरण म्हणजे प्रेषित पौल. पौलने आपल्या मनात कधीच ईर्ष्या बाळगली नाही. त्याने सेवाकार्यात खूप मेहनत केली होती पण तो नम्रपणे म्हणाला की, “प्रेषितांमध्ये माझी योग्यता सगळ्यात कमी आहे; इतकेच काय, तर प्रेषित म्हणवून घेण्याचीसुद्धा माझी लायकी नाही.” (१ करिंथ. १५:९, १०) येशू जेव्हा या पृथ्वीवर होता तेव्हा त्याचे बारा प्रेषित सतत त्याच्या सोबत होते. पण पौल मात्र येशूच्या पुनरुत्थानानंतर ख्रिस्ती बनला. पौलला जरी पुढे ‘विदेश्यांसाठी प्रेषित’ म्हणून नेमण्यात आलं, तरी बारा प्रेषितांपैकी एक असण्याचा खास बहुमान त्याला मिळाला नाही. (रोम. ११:१३; प्रे. कार्ये १:२१-२६) त्या बारा प्रेषितांनी येशूसोबत जो वेळ घालवला त्याबद्दल त्यांचा हेवा करत बसण्यापेक्षा, पौल त्याच्याजवळ जे होतं त्यात समाधानी राहिला.
१४. आपण नम्र आणि समाधानी असलो तर आपण काय करू?
१४ आपण जर समाधानी आणि नम्र असलो तर आपण पौलसारखं असू. यहोवाने ज्यांना नेमणूक दिली त्यांचा पौलने जसा आदर केला तसा आपणही करू. (प्रे. कार्ये २१:२०-२६) यहोवाने ख्रिस्ती मंडळीत पुढाकार घेण्यासाठी वडिलांना नियुक्त केलं आहे. त्यांच्यात कमतरता आहेत तरी यहोवा त्यांना “माणसांच्या रूपात देणग्या” समजतो. (इफिस. ४:८, ११) या नियुक्त बांधवांचा आपण जेव्हा आदर करतो आणि त्यांनी दिलेलं मार्गदर्शनाचं नम्रपणे पालन करतो, तेव्हा यहोवासोबतची आपली मैत्री घनिष्ठ होते. तसंच, आपल्या भाऊबहिणींसोबत आपल्याला शांतीने राहायला मदत होते.
आपण शांतीसाठी होईल तितका प्रयत्न करू या
१५. आपल्याला काय करण्याची गरज आहे?
१५ ईर्ष्येच्या भावनेमुळे आपसातली शांती टिकून राहत नाही. आपण आपल्या मनातून ईर्ष्येची भावना मुळासकट काढून टाकली पाहिजे. तसंच, इतरांच्या मनात ईर्ष्येचं बी रुजेल असं काहीही करण्याचं आपण टाळलं पाहिजे. आपण जर ही महत्त्वाची पावलं उचलली तरच आपल्याला रोम. १४:१९) इतरांना ईर्ष्येवर मात करण्यासाठी मदत व्हावी म्हणून आपण नेमकं काय करू शकतो? आणि आपण शांती कशी टिकवून ठेवू शकतो?
यहोवाने दिलेल्या आज्ञेचं पालन करता येईल. ती आज्ञा म्हणजे, “शांतीसाठी आणि एकमेकांच्या उन्नतीसाठी” होईल तितका प्रयत्न करत राहणं. (१६. आपण इतरांना ईर्ष्येवर मात करायला कशी मदत करू शकतो?
१६ आपल्या मनोवृत्तीचा आणि वागण्याबोलण्याचा इतरांवर मोठा प्रभाव पडू शकतो. आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा आपण “दिखावा” करावा असं जगाला वाटतं. (१ योहा. २:१६) पण अशा मनोवृत्तीमुळे ईर्ष्येला बढावा मिळतो. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत किंवा आपण ज्या गोष्टी विकत घेण्याचा विचार करत आहोत त्यांबद्दल आपण सतत इतरांशी बोलण्याचं टाळलं पाहिजे. असं केल्याने आपण इतरांच्या मनात ईर्ष्येची भावना येण्यापासून रोखू शकतो. आणखी एका मार्गाने आपण ईर्ष्येच्या भावनेला इतरांच्या मनात वाढण्यापासून रोखू शकतो. तो म्हणजे, मंडळीत आपल्याला ज्या जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत त्यांबद्दल आपण फुशारकी मारणार नाही. जर आपण आपल्या जबाबदाऱ्यांबद्दल सतत बोलत असू तर एका अर्थी, आपण इतरांच्या मनात ईर्ष्येचं रोपटं वाढण्यासाठी सुपीक जमीन तयार करत असू. याउलट, आपण जेव्हा इतरांमध्ये मनापासून आवड घेतो आणि ते करत असलेल्या चांगल्या कामांबद्दल त्यांची प्रशंसा करतो, तेव्हा आपण त्यांना समाधानी राहायला मदत करतो. तसंच, यामुळे मंडळीत एकता आणि शांती बहरते.
१७. योसेफचे भाऊ काय करू शकले आणि का?
१७ आपण ईर्ष्येवर नक्कीच मात करू शकतो! योसेफच्या भावांबद्दल पुन्हा एकदा विचार करा. त्यांनी योसेफला गुलाम म्हणून विकल्यानंतर, बऱ्याच वर्षांनी त्यांची इजिप्तमध्ये पुन्हा भेट झाली. योसेफने स्वतःची ओळख करून देण्याआधी आपल्या भावांची परीक्षा घेतली की ते उत्प. ४३:३३, ३४) पण तरीही बाकीच्या भावांनी बन्यामिनचा हेवा केला नाही. याउलट, बन्यामिनबद्दल आणि त्यांच्या वडिलांबद्दल त्यांना मनापासून काळजी होती हे दिसून आलं. (उत्प. ४४:३०-३४) योसेफच्या भावांनी आपल्या मनातून ईर्ष्या काढून टाकल्यामुळे ते त्यांच्या कुटुंबात पुन्हा शांती आणू शकले. (उत्प. ४५:४, १५) त्याचप्रमाणे, जर आपण आपल्या मनातून ईर्ष्या मुळासकट काढून टाकली तर आपल्याला आपल्या कुटुंबात आणि मंडळीत शांती टिकवून ठेवता येईल.
खरंच बदलले आहेत की नाही. त्यासाठी त्याने आपल्या सगळ्या भावांना जेवायला बोलवलं आणि सर्वात लहान भावाला, बन्यामिनला इतरांपेक्षा जास्त जेवण दिलं. (१८. याकोब ३:१७, १८ या वचनांनुसार आपण शांतीमय वातावरण तयार केलं तर काय होऊ शकतं?
१८ यहोवाची इच्छा आहे की आपण ईर्ष्येवर मात करावी आणि शांती टिकवून ठेवावी. आपण या दोन्ही गोष्टी करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, कारण या लेखात चर्चा केल्यानुसार आपल्यात ईर्ष्येची प्रवृत्ती आहे. (याको. ४:५) आणि आपण अशा जगात राहत आहोत जिथे ईर्ष्येच्या भावनेला बढावा दिला जात आहे. पण आपण जर नम्र आणि समाधानी राहिलो व इतरांबद्दल कदर बाळगली तर आपल्या मनात ईर्ष्येला जागाच उरणार नाही. याउलट, नीतिमत्त्वाचं फळ येण्यासाठी म्हणजेच चांगले गुण उत्पन्न करण्यासाठी आपण शांतीमय वातावरण तयार करत असू.—याकोब ३:१७, १८ वाचा.
गीत ३५ देवाच्या धीराबद्दल कृतज्ञता
^ परि. 5 यहोवाच्या संघटनेत शांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. पण आपण जर इतरांबद्दल मनात ईर्ष्या बाळगली तर ही शांती भंग होऊ शकते. आपण या लेखात चर्चा करणार आहोत की आपल्या मनात ईर्ष्या का येऊ शकते. तसंच, या वाईट गुणावर आपण कशी मात करू शकतो आणि शांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न कसा करू शकतो हेसुद्धा आपण या लेखात पाहणार आहोत.
^ परि. 2 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: बायबलमध्ये सांगितलं आहे की एका व्यक्तीने ईर्ष्या बाळगल्यामुळे तिला दुसऱ्यांकडे असलेल्या गोष्टींचा मोह होऊ शकतो. तसंच, इतरांकडे असलेल्या गोष्टी त्यांच्याकडे नसाव्यात असंही तिला वाटू शकतं.
^ परि. 61 चित्रांचं वर्णन: वडील वर्गाची सभा सुरू असताना, टेहळणी बुरूज चा अभ्यास घेणाऱ्या वयस्क वडिलांना सांगितलं जातं की त्यांनी त्या जबाबदारीसाठी एका तरुण वडिलाला प्रशिक्षण द्यावं. त्या वयस्क बांधवाला टेहळणी बुरुज अभ्यास घेण्याची आपली जबाबदारी आवडत असली तरी वडील वर्गाने घेतलेल्या निर्णयाचं ते मनापासून समर्थन करतात. तसंच, त्या तरुण बांधवाला त्याची नवीन जबाबदारी पार पाडण्यासाठी ते त्याला व्यावहारिक सल्ले देतात आणि मनापासून त्याचं कौतुकही करतात.