तुम्हाला माहीत होतं का?
प्राचीन इस्राएलात दैनंदिन जीवनामध्ये होणारे कायदेशीर वादविवाद सोडवण्यासाठी मोशेच्या नियमशास्त्रातल्या तत्त्वांचा वापर केला जायचा का?
हो. एका उदाहरणाचा विचार करा. अनुवाद २४:१४, १५ यांत म्हटलं आहे: “तुझ्या बांधवांपैकी अथवा देशातील तुझ्या गावात राहणाऱ्या उपऱ्यांपैकी एखादा मजूर दीन व कंगाल असला तर त्याच्यावर जुलूम करू नको.” वचनांत पुढे म्हटलं आहे, नाहीतर “तो तुझ्याविरुद्ध परमेश्वराकडे गाऱ्हाणे करेल आणि तुला पाप लागेल.”
या संबंधीत असलेला असा एक इ.स.पू. सातव्या शतकातला लेखी अहवाल अश्दोद जवळ सापडला. हा एक अर्ज होता. हा अर्ज कदाचित शेतात काम करणाऱ्या एका मजुरासाठी असून तो मडक्याच्या खापरावर लिहिलेला आढळला. त्याला दिवसभरात जेवढं धान्य पोहोचवायचं होतं, ते तो पोहोचवू शकला नाही. त्या खापरावर असं लिहिलं होतं: “काही दिवसांपूर्वी तुमच्या सेवकाने [अर्जदाराने] कापणी केलेलं धान्य साठवण्याचं काम संपवलं. त्यानंतर शोबेचा मुलगा होशायाहु आला आणि त्याने तुमच्या सेवकाचे कपडे नेले. . . . माझ्यासोबत उन्हातान्हात कापणी करणारे माझे सोबती या गोष्टीचे साक्षीदार आहेत की मी जे काही बोललो ते खरं आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही; मी निर्दोष आहे. . . . राज्यपाल यांना वाटत असलं, की त्यांच्या सेवकाचे कपडे परत मिळवून देण्याची जबाबदारी त्यांची नाही, तरी त्यांनी दया दाखवून ते परत मिळवून द्यावेत. तुमच्या सेवकाकडे त्याचे कपडे नाहीत, मग अशा वेळी तुम्ही शांत राहू नये.”
या अर्जातून “सेवकाला त्याचे कपडे परत मिळवण्याची फक्त काळजी होती एवढंच नाही, तर आणखीन खूपकाही दिसून येतं” असं इतिहासकार सायमन शामा म्हणतात. “या माहितीतून असंही कळतं, की अर्जदाराला बायबलच्या नियमांबद्दल थोडी तरी माहिती असावी. खासकरून गरिबांना दिलेल्या कठोर वागण्याबद्दल लेवीय आणि अनुवाद यांमध्ये दिलेले नियम.”