व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आदराने बोलणं हे सिमेंट-रेतीच्या मिश्रणासारखं आहे जे विवाहबंधन मजबूत करतं

विवाहित जोडप्यांसाठी

३: आदर

३: आदर

याचा काय अर्थ होतो?

एकमेकांचा आदर करणारे पती-पत्नी नेहमी एकमेकांची काळजी घेतात, त्यांच्यात मतभेद झाले तरीही. टेन लेसन्स टू ट्रान्सर्फाम युअर मॅरेज हे पुस्तक म्हणतं: “एकमेकांचा आदर करणारी जोडपी स्वतःच्या मतांवर अडून बसत नाहीत, तर ते त्यांच्यात असलेल्या मतभेदांवर चर्चा करतात. आपल्या सोबत्याचं म्हणणं ते आदरपूर्वक ऐकून घेतात आणि दोघांना मान्य असलेल्या तडजोडी करतात.”

बायबल तत्त्व: प्रेम “स्वार्थ पाहत नाही, लगेच चिडत नाही.”—१ करिंथकर १३:४, ५.

“माझ्या मते पत्नीची कदर करणं म्हणजे तिचा आदर करणं. आणि मला असं काही करायचं नाही ज्यामुळे तिला किंवा आमच्या विवाहाला हानी पोचेल.”—माईक.

हे का महत्त्वाचं?

एकमेकांचा अनादर करणाऱ्‍या जोडप्यांच्या संभाषणात टीका करणं, टोमणा मारणं, एकमेकांचा अपमान करणंही सामील असतं. संशोधकांच्या मते ही अशी धोक्याची लक्षणं आहेत ज्यामुळे पुढे जाऊन घटस्फोट होऊ शकतो.

“आपल्या पत्नीशी अपमानास्पद, खोचकपणे बोलल्यामुळे किंवा तिच्यावर विनोद केल्यामुळे तिच्या स्वाभिमानाचा चुराडा होईल. यामुळे पतीवरचा तिचा भरवसा नाहीसा होईल आणि त्यांचा विवाहसुद्धा धोक्यात येईल.”—ब्रायन.

तुम्ही काय करू शकता?

स्वतःचं परीक्षण करा

तुम्ही जे बोलता आणि करता त्याकडे आठवडाभर लक्ष द्या. मग स्वतःला पुढील प्रश्‍न विचारा:

  • ‘मी माझ्या सोबत्याची किती वेळा टीका केली आणि किती वेळा स्तुती केली?’

  • ‘मी कोणत्या ठरावीक मार्गांनी माझ्या सोबत्याला आदर दाखवला?’

तुमच्या जोडीदाराशी खालील प्रश्‍नांवर चर्चा करा

  • कशा प्रकारे वागल्याने आणि बोलल्याने आपल्या दोघांना आदर मिळाल्यासारखं वाटेल?

  • कशा प्रकारे वागल्याने आणि बोलल्याने आपल्या दोघांना आपला अपमान झाल्यासारखा वाटेल?

सल्ले

  • जोडीदाराने आपल्याला वागण्या-बोलण्यातून आदर दाखवावा, अशा तीन गोष्टींची एक यादी बनवा. तुमच्या जोडीदारालाही अशीच यादी तयार करायला सांगा. मग यादींची अदलाबदल करा. एकमेकांना आदर दिला पाहिजे असं एखादं क्षेत्र आढळल्यास त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा.

  • तुमच्या सोबत्याचे जे गुण तुम्हाला आवडतात त्यांची यादी बनवा. त्या गुणांची तुम्ही किती कदर करता हे त्याला सांगा.

“माझ्या मते पतीला आदर देणं म्हणजे कार्यांद्वारे हे दाखवणं की मला त्याची कदर आहे. त्याने आनंदी राहावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. यासाठी मला नेहमीच काहीतरी मोठं करावं लागत नाही, तर छोट्या-छोट्या गोष्टी करूनही मी मनापासून त्याला आदर दाखवते.”—मिना.

शेवटी, आपला आदर केला जात आहे हे जास्त महत्त्वाचं नाही तर आपल्या जोडीदाराला आदर मिळत आहे की नाही हे जास्त महत्त्वाचं आहे.

बायबल तत्त्व: “करुणा, दयाळूपणा, प्रेमळपणा, नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता परिधान करा.”—कलस्सैकर ३:१२.