बायबल चांगल्या प्रकारे समजण्यासाठी साधनं
या भागात दिलेल्या वेगवेगळ्या माहितीमुळे बायबलबद्दलचं तुमचं ज्ञान आणखी वाढेल. आणि तुमचा बायबल अभ्यास आणखी मजेशीर होईल. आमच्या वेबसाईटवर ऑनलाईन बायबलही उपलब्ध आहे. बायबलबद्दलचं ज्ञान आणखी वाढवण्यासाठी तुम्ही बायबलवर आधारित व्हिडिओ, बायबल एन्साक्लोपीडिया, बायबलमधल्या ठिकाणांचे नकाशे, बायबलची शब्दार्थसूची आणि इतर मोफत साधनांचा वापर करू शकता.
ऑनलाईन बायबलचं वाचन करा
नवे जग भाषांतर याची वैशिष्ट्यं पाहा; हे बायबल वाचण्यासाठी सोपं आणि अचूक आहे.
बायबलचा अभ्यास करण्यासाठी व्हिडिओ
बायबल पुस्तकांची प्रस्तावना
बायबलमधल्या पुस्तकांविषयी थोडक्यात माहिती पाहा.
बायबलमधल्या महत्त्वाच्या शिकवणी
या छोट्या-छोट्या व्हिडिओंमध्ये काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आहेत. जसं की, देवाने पृथ्वी का बनवली? मृत लोकांची काय अवस्था आहे? आणि देवाने दुःख का राहू दिलं?
बायबलचा अभ्यास करण्यासाठी प्रकाशनं आणि इतर मदत
बायबल एन्सायक्लोपीडिया
इन्साइट ऑन द स्क्रिप्चर्स यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर सखोल माहिती दिली आहे. जसं की: बायबल काळातले लोक, ठिकाणं, झाडं-झुडपं, प्राणी, मुख्य घटना आणि बायबलमध्ये लिहिलेले खास शब्द. डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असलेल्या फाईलमध्ये नकाशे, चित्रं, तक्ते आणि वेगवेगळ्या विषयांवर माहिती आहे.
बायबलचा सारांश
बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते? या माहितीपत्रकात बायबलचा सारांश देण्यात आला आहे. यामुळे तुम्हाला बायबलचा मुख्य विषय समजायला मदत होईल.
बायबलमधल्या ठिकाणांचे नकाशे
“उत्तम देश को देख” या माहितीपत्रकात बायबल काळातल्या वेगवेगळ्या ठिकाणांचे, तसंच वचन दिलेल्या देशाचे वेगवेगळ्या काळातले नकाशे आणि तक्ते देण्यात आले आहेत.
आजच्या दिवसाचं वचन
शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा या पुस्तिकेत रोज वाचण्यासाठी बायबलचं एक वचन आणि त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण दिलेलं आहे.
बायबलमधून प्रश्नांची उत्तरं
देव, येशू, प्रार्थना, कुटुंब, दुःख आणि अशा बऱ्याच विषयांबद्दल असलेल्या प्रश्नांची उत्तरं बायबलमधून जाणून घ्या.
बायबलची वचनं शोधण्यासाठी
ख्रिस्ती जीवनासाठी उपयोगी शास्त्रवचनं, या प्रकाशनामुळे तुम्हाला बायबलची वचनं विषयानुसार शोधायला मदत होईल.
ऑनलाईन लायब्ररी (opens new window)
यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रकाशनांचा उपयोग करून बायबल विषयांवर ऑनलाईन संशोधन करा.
एखाद्या साक्षीदारासोबत वैयक्तिक बायबल अभ्यास करा
यहोवाच्या साक्षीदारांसोबत केला जाणारा बायबल अभ्यास कसा असतो?
यहोवाच्या साक्षीदारांसोबत चर्चेतून होणाऱ्या मोफत बायबल अभ्यासात तुम्ही बायबलचं कुठलंही भाषांतर वापरू शकता. तुम्ही तुमच्या पूर्ण परिवाराला किंवा मित्रांनासुद्धा तुमच्यासोबत अभ्यासासाठी बसायला सांगू शकता.
भेटण्यासाठी विनंती करा
बायबलच्या एखाद्या प्रश्नावर चर्चा करा किंवा यहोवाच्या साक्षीदारांबद्दल जास्त जाणून घ्या.