जागे राहा!
तुम्ही कोणत्या नेत्याला निवडणार?—बायबल काय म्हणतं?
आपण कोणाला निवडून आणायचं या महत्त्वाच्या प्रश्नावर लोक विचार करत आहेत.
बायबल काय म्हणतं?
मानवी नेत्यांच्या क्षमतांना सीमा आहेत
याबद्दल बायबल असं म्हणतं:
“शासकांवर भरवसा ठेवू नका. माणसावर भरवसा ठेवू नका, कारण तो तारण करू शकत नाही. त्याचा श्वास निघून जातो, तो मातीला मिळतो; त्याच दिवशी त्याच्या विचारांचा शेवट होतो.”—स्तोत्र १४६:३, ४.
चांगल्यातल्या चांगल्या नेत्यांचासुद्धा शेवटी मृत्यू होतो. इतकंच काय, तर त्यांनी केलेली चांगली कामं त्यांच्या नंतर येणारे नेते पुढे चालू ठेवतील, याचीही खातरी ते देऊ शकत नाहीत.—उपदेशक २:१८, १९.
बायबल सांगतं की माणसांना स्वतःवर राज्य करण्यासाठी बनवलंच नव्हतं आणि ही गोष्ट खरी आहे.
“[माणसाला] तर आपली पावलंही नीट टाकता येत नाहीत.”—यिर्मया १०:२३.
मग, आज आपल्या काळात कोणी चांगला नेता असू शकतो का?
देवाला मान्य असलेला एक नेता
बायबल म्हणतं, की देवाने अशा एका नेत्याची निवड केली आहे, ज्याच्याकडे राज्य करायची क्षमता आहे आणि तो भरवशालायकही आहे. तो नेता म्हणजे येशू ख्रिस्त. (स्तोत्र २:६) येशू देवाच्या राज्याचा राजा आहे. हे असं एक सरकार आहे, जे स्वर्गातून राज्य करतं.—मत्तय ६:१०.
तुम्ही येशूला नेता म्हणून निवडाल का? यावर विचार करणं इतकं महत्त्वाचं का आहे याचं कारण बायबल सांगतं:
“देवाच्या मुलाचा [येशू ख्रिस्ताचा] सन्मान करा, नाहीतर देव संतापेल आणि तुमचा नाश होईल, कारण देवाचा क्रोध लगेच भडकतो. त्याचा आश्रय घेणारे सुखी आहेत.”—स्तोत्र २:१२.
निर्णय घ्यायची आताच वेळ आहे. बायबल सांगतं की १९१४ मध्ये येशूने राज्य करायला सुरुवात केली आणि ते राज्य लवकरच मानवी सरकारांची जागा घेईल.—दानीएल २:४४.
येशूला पाठिंबा कसा द्यायचा हे जाणून घेण्यासाठी “आत्ताच देवाच्या राज्याची बाजू घ्या!” हा लेख वाचा.