जॉर्जिया देशात आनंदी कुटुंब हे माहितीपत्रक देताना

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका नोव्हेंबर २०१७

नमुना सादरीकरणं

आपल्या पत्रिकेसाठी, माहितीपत्रकासाठी आणि देवाचं नाव याबद्दल सत्य शिकवा यांसाठी नमुना सादरीकरणं. दिलेली उदाहरणं वापरून स्वतःचं सादरीकरण तयार करा.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

यहोवाला शोधा म्हणजे तुम्ही वाचाल

देवाचा शोध करण्याचा काय अर्थ होतो? ज्या इस्राएली लोकांनी यहोवाचा शोध केला नाही, त्यांच्या उदाहरणावरून आपण कोणता धडा शिकू शकतो?

ख्रिस्ती जीवन

सेवाकार्यातली आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—पुनर्भेट घेणं

तुम्ही चांगल्या रीत्या पुनर्भेट कशी घेऊ शकता? आवड वाढवत राहा, प्रत्येक भेटीसाठी एक उद्देश ठेवा, तसंच मुख्य ध्येय नेहमी मनात असू द्या.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

आपल्या चुकांमधून शिका

योनाच्या अहवालातून आपल्याला समजतं, की आपण जेव्हा चुका करतो तेव्हा यहोवा देव आपल्याविषयी आशा सोडत नाही. पण, आपण आपल्या चुकांमधून शिकावं अशी अपेक्षा तो करतो.

ख्रिस्ती जीवन

योनाच्या पुस्तकातून शिकायला मिळणारे धडे

योनाच्या उदाहरणावर मनन केल्यामुळे आपल्याला निराशेचा सामना करण्यासाठी, सेवाकार्याबद्दल असलेला नकारात्मक दृष्टिकोन सुधारण्यासाठी आणि प्रार्थनेद्वारे सांत्वन मिळवण्यासाठी मदत होऊ शकते.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?

आध्यात्मिक बांधवांसोबतच्या आपल्या नातेसंबंधाचा आणि आपल्या उपासनेचा काय संबंध आहे?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

आध्यात्मिक रीत्या जागृत आणि सक्रिय राहा

बाबेल यहूदाचा नाश करणार नाही असं लोकांना वाटत होतं. पण ही भविष्यवाणी नक्की पूर्ण होणार होती आणि हबक्कूकला याची वाट पाहत राहण्याची गरज होती.

ख्रिस्ती जीवन

तुमच्या परिस्थितीत बदल होतो, तेव्हाही आध्यात्मिक रीत्या जागृत आणि सक्रिय राहा

बदलांमुळे जेव्हा आपल्या उपासनेत व्यत्यय येण्याचा आणि यहोवासोबतचा आपला नातेसंबंध कमजोर होण्याचा धोका निर्माण होतो, तेव्हा आध्यात्मिक रीत्या जागृत आणि सक्रिय राहण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते?