ख्रिस्ती जीवन
पायनियरिंग करून यहोवाची स्तुती करा
इस्राएली लोकांजवळ यहोवाची स्तुती करण्याची काही खास कारणं होती. त्याने त्यांना इजिप्तमधून सोडवलं होतं आणि फारोच्या सैन्यापासून वाचवलं होतं! (निर्ग १५:१, २) आजही यहोवा आपल्या लोकांना बरेच आशीर्वाद देतो. मग आपण त्यांबद्दल त्याचे आभार कसे मानू शकतो?—स्तो ११६:१२.
असं करण्याचा एक मार्ग म्हणजे सहायक किंवा सामान्य पायनियर सेवा करणं. तुम्हाला पायनियर म्हणून सेवा करण्याची इच्छा व्हावी आणि ही सेवा करण्यासाठी ताकद मिळावी म्हणून तुम्ही प्रार्थना करू शकता. (फिलि २:१३) बरेच जण सुरुवातीला सहायक पायनियरिंग करतात. मार्च आणि एप्रिल महिन्यांत, तसंच विभागीय पर्यवेक्षकांची भेट असते त्या महिन्यात तुम्ही एकतर ३० किंवा ५० तास सेवा करायचं निवडू शकता. सहायक पायनियरिंगचा आनंद अनुभवल्यानंतर तुम्ही आणखी प्रयत्न करून सामान्य पायनियर म्हणून सेवा करायचं ठरवू शकता. पूर्ण वेळेची नोकरी किंवा आरोग्याच्या समस्या असूनही काही जणांना सामान्य पायनियर म्हणून सेवा करणं शक्य झालं आहे. (सभेसाठी कार्यपुस्तिका१६.०७ पृ. ८) आपण यहोवाची स्तुती करण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे, कारण ही स्तुती मिळवायला तो नक्कीच पात्र आहे!—१इत १६:२५.
मंगोलियातल्या तीन बहिणी हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
पायनियरिंग सुरू करण्यासाठी त्या तीन बहिणींनी कोणत्या अडचणींवर मात केली?
-
त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले आहेत?
-
सामान्य पायनियर म्हणून सेवा केल्यामुळे त्यांना यहोवाची सेवा करण्याच्या आणखी कोणत्या संधी मिळाल्या?
-
त्यांच्या चांगल्या उदाहरणामुळे इतरांवर कोणता परिणाम झाला?