व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ५०

देवाच्या प्रीतीचा आदर्श

देवाच्या प्रीतीचा आदर्श

(१ योहान ४:१९)

१. करुनी असीम प्रीती यहोवाने

आम्हावर,

सर्वांवर,

दाखविला पथ प्रकाशाचा त्याने,

चालू त्यावर,

चालू त्यावर.

स्वीकारुनी ज्योत याहाच्या प्रीतीची,

उजळू या वाट आपण इतरांची,

ठेवू पेटती मशाल एकोप्याची,

दाखवुनी

देवाची प्रीती.

२. देवाच्या लोकां जो बांधितो धागा

प्रीतीचा,

स्नेहाचा,

असता अतूट, धावू बांधवांच्या

साहाय्याला,

सांत्वनाला.

खरी ममता त्यांना दाखवुनी,

मनापासुनी क्षमा त्यां करुनी,

माळ एकीची अखंड ठेवुनी,

खरे ख्रिस्ती

दिसू शोभुनी.

३. याहाची सेवा करू प्रीतीपोटी

नेमाने,

जोमाने.

पाळुनी सदा वचन याहाचे

मनोभावे,

आनंदाने.

लोकां दाखवू यहोवाची प्रीती,

त्यांनाही मिळो आशा अविनाशी,

तेव्हा जीवनात बनू समाधानी,

निसदिनी,

प्रीती करुनी.