गीत ७
ख्रिस्ती समर्पण
१. तू शिल्पकार यहोवा,
अखंड विश्वाचा!
आकाश, धरणीवरी
हस्तकृती तुझ्या.
दिलेस जीवन आम्हा,
आभार तुझे याहा!
तुझेच करू आम्ही स्तवन,
तुझीच उपासना!
२. ‘करण्या पुरा तुझा मानस
आलो मी,’ म्हणुनी,
केले समर्पण येशूने
पित्यास प्रार्थुनी.
पाण्यातुनी वर येता
तो पुत्र याहाचा,
झाला अभिषिक्त आत्म्याने
करण्या समर्पित सेवा.
३. सन्मुख तुझ्या आज याहा,
येतो लवून आम्ही,
करण्या समर्पित आपुले
जीवन तुझ्या चरणी.
अर्पुनी लाडक्या पुत्रा,
आम्हा तू तारिले!
यहोवा, तुझ्यासाठी आता
आमचे जगणे मरणे!
(मत्त. १६:२४; मार्क ८:३४; लूक ९:२३ देखील पाहा.)