गीत ३८
आपला भार यहोवावर टाक
१. आर्त माझ्या याचनेला
कान दे बापा याहा!
धाव घे माझ्या साहाय्या,
दे मला तू आसरा.
(कोरस)
भार आपुला याहावर
टाकुनी निश्चिंत हो.
सावरे तो नम्र दासां,
पीडितांचा वाली तो.
२. घेरते जिवा बेचैनी,
वेढते मना भीती,
जाऊ वाटे झेपावुनी
आकाशी पक्षापरी.
(कोरस)
भार आपुला याहावर
टाकुनी निश्चिंत हो.
सावरे तो नम्र दासां,
पीडितांचा वाली तो.
३. निर्दयी ते दुष्ट वैरी,
घेऊ पाहती प्राणा.
आळवेन मी याहाला,
वाचवील तो मला.
(कोरस)
भार आपुला याहावर
टाकुनी निश्चिंत हो.
सावरे तो नम्र दासां,
पीडितांचा वाली तो.
(स्तो. २२:५; ३१:१-२४ देखील पाहा.)