तुम्हाला माहीत होतं का?
बायबल लिहिले त्या काळातील लोकही पाटा वरवंट्याचा उपयोग करायचे!
बायबल लिहिले त्या काळातील लोक पाट्यावर धान्य वाटून भाकरीसाठी पीठ करायचे. जवळजवळ प्रत्येक घरातील स्त्रिया किंवा दास दररोज पाट्यावर धान्य वाटायचे. रोजच घराघरातून धान्य वाटायचा आवाज ऐकू यायचा.—निर्गम ११:५; यिर्मया २५:१०.
पाटा वरवंट्याचा उपयोग कसा केला जायचा, ते इजिप्टमध्ये सापडलेल्या पुरातन वसतुंवरून आपल्याला कळतं. त्या काळात वापरल्या जाणाऱ्या पाट्याचा आकार जरा वेगळा होता. तो एका बाजूनं उंच तर मधून खोलगट असायचा. धान्य दळणारी व्यक्ती, पाट्यासमोर गुडघ्यांवर बसून, वरवंट्यानं धान्य वाटायची. एका नियतकालिकानुसार, हा वरवंटा साधारणतः २ ते ४ किलो वजनाचा असायचा आणि यानं जर कुणी एखाद्यावर हल्ला केला तर तो घातक ठरू शकत होता.—शास्ते ९:५०-५४.
बायबलमध्ये या पाटा वरवंट्यालाच जातं म्हटलं आहे. त्यामुळं जातं किंवा जात्याची वरची तळी जामीन म्हणून गहाण ठेवून घेऊ नये, असा इस्राएली लोकांना स्पष्ट नियम होता. बायबलमधील अनुवाद या पुस्तकाच्या २४ अध्यायाच्या ६ व्या वचनात असं म्हटलं आहे: “जाते किंवा जात्याची वरची तळी कोणी गहाण ठेवून घेऊ नये; असे करणे म्हणजे मनुष्याचे जीवितच गहाण ठेवून घेणे होय.” यावरून कळतं की पाटा वरवंटा किंवा जातं हे कुटुंबासाठी किती जीवनावश्यक होतं.
येशू देवाच्या “उराशी” आहे याचा नेमका काय अर्थ होतो?
येशू “देवपित्याच्या उराशी” आहे, असं बायबलमध्ये सांगितलं आहे. (योहान १:१८) यावरून येशूची देवासोबत असलेली खास जवळीक आणि त्याच्याकडून त्याला असलेली मान्यता दिसून येते. एखाद्याच्या उराशी बसणं हे, प्राचीन काळातील यहुदी लोकांच्या जेवायला बसण्याच्या प्रथेला सूचित करतं.
येशूच्या काळातील लोकांची जेवायला बसायची पद्धत वेगळी होती. ते एका कमी उंचीच्या टेबलाभोवती गाद्या टाकून उशीवर आपला डावा कोपरा टेकवून आरामात पाय लांब करून बसायचे. सर्वजण टेबलाभोवती असे एकमेकांच्या जवळ बसल्यामुळं ते एकमेकांच्या “उराशी” आहेत असं वाटायचं, असं एका बायबल विश्वकोशात सांगितलं आहे.
कुटुंबप्रमुखाच्या किंवा मेजवानी देणाऱ्या यजमानाच्या उराशी असणं मोठा बहुमान आहे असं मानलं जायचं. म्हणूनच जेव्हा येशू शेवटल्या वल्हांडणाचं भोजन करत होता, तेव्हा त्याचा आवडता शिष्य प्रेषित योहान, त्याच्या उराशी होता आणि तो “मागे लवून” म्हणजेच मागे होऊन त्याला एक प्रश्न विचारू शकला.—योहान १३:२३-२५; २१:२०. ▪ (w15-E 07/01)