महान शिक्षकाचे अनुकरण करा
महान शिक्षकाचे अनुकरण करा
“तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा.”—लूक ८:१८.
१, २. येशूने सेवेमध्ये लोकांबरोबर ज्याप्रकारे व्यवहार केला त्याकडे आपण लक्ष का दिले पाहिजे?
येशू ख्रिस्त, महान शिक्षक म्हणून आपली भूमिका पार पाडत असताना आपल्या अनुयायांना म्हणाला: “तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा.” (लूक ८:१६-१८) ख्रिस्ती या नात्याने हे तत्त्व तुमच्या सेवेला लागू होते. तुम्ही जर आध्यात्मिक सूचनांच्या बाबतीत जपून राहिलात अर्थात त्याकडे लक्ष दिलेत तर तुम्ही त्यावर कार्य कराल आणि एक प्रभावी राज्य प्रचारक व्हाल. अर्थात, आज तुम्हाला येशूचा आवाज ऐकू येणार नाही पण त्याने जे काही म्हटले व केले ते शास्त्रवचनांत नमूद करण्यात आले त्याविषयी तुम्ही वाचू शकता. येशूने आपल्या सेवेच्या वेळी लोकांबरोबर कशाप्रकारे व्यवहार केला याविषयी शास्त्रवचनांत काय सांगितलेले आहे?
२ येशू सुवार्तेचा उत्तम प्रचारक आणि शास्त्रवचनीय सत्याचा उल्लेखनीय शिक्षक होता. (लूक ८:१; योहान ८:२८) शिष्य बनवण्याच्या कार्यात प्रचार करणे आणि शिकवणे या दोन्ही गोष्टींचा समावेश असला तरी, काही ख्रिश्चन जे प्रभावी प्रचारक आहेत त्यांना लोकांना प्रभावशालीपणे शिकवणे जड जाते. प्रचार करण्यात फक्त एका संदेशाची घोषणा करणे समाविष्ट आहे. परंतु लोकांना यहोवा आणि त्याच्या उद्देशांबद्दल शिकवण्यासाठी शिक्षकाने शिष्याबरोबर चांगला नातेसंबंध जोडणे महत्त्वाचे आहे. (मत्तय २८:१९, २०) हे, महान शिक्षक व शिष्य बनवणाऱ्या येशू ख्रिस्ताचे अनुकरण करून केले जाऊ शकते.—योहान १३:१३.
३. येशूचे अनुकरण केल्यामुळे शिष्य बनवण्याच्या तुमच्या प्रयत्नांवर कोणता प्रभाव पडेल?
३ तुम्ही जर येशूच्या शिकवण्याच्या पद्धतींचे अनुकरण केले तर प्रेषित पौलाने दिलेला सल्ला तुम्ही अनुसराल: “बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; संधि साधून घ्या. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे ते तुम्ही समजावे.” (कलस्सैकर ४:५, ६) शिष्य बनवण्याच्या कार्यात येशूचे अनुकरण करण्याकरता प्रयत्नांची गरज आहे. पण यामुळे तुम्ही प्रभावी शिक्षक व्हाल कारण यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या गरजांनुरूप तिला ‘कसकसे उत्तर द्यावयाचे ते तुम्हाला समजेल.’
येशूने लोकांना बोलते केले
४. येशू लोकांचे म्हणणे लक्ष देऊन ऐकत असे, हे आपण का म्हणू शकतो?
४ बालपणापासून येशूची लोकांचे बोलणे ऐकून घेण्याची आणि लोकांनी आपली मते व्यक्त करण्यास प्रोत्साहन देण्याची प्रथाच होती. जसे की तो जेव्हा १२ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याला मंदिरांतील गुरुजनांमध्ये बसून “त्यांचे भाषण ऐकताना व त्यांस प्रश्न करताना” पाहिले. (लूक २:४६) येशूजवळ भरपूर ज्ञान होते. पण तो मंदिरात, गुरुजनांना कमी लेखण्यासाठी गेला नाही. तर तो तेथे ऐकावयास गेला. अर्थात त्यानेही प्रश्न विचारले. तो लोकांचे म्हणणे लक्ष देऊन ऐकत असे. कदाचित या एका गुणामुळे देखील तो देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढला.—लूक २:५२.
५, ६. येशूने ज्या लोकांना शिकवले त्यांचे म्हणणे त्याने ऐकून घेतले हे आपल्याला कसे ठाऊक?
५ येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर व त्याला मशीहा म्हणून नियुक्त केल्यानंतरही तो लोकांचे म्हणणे ऐकून घेत असे. तो शिकवण्यात इतका गुंग झाला नाही की जे त्याचे बोलणे ऐकायला त्याच्याजवळ आले होते त्यांना तो विसरून गेला. बहुतेकदा तो बोलताना मध्ये थांबत असे आणि लोकांना त्यांचे मत विचारत असे आणि त्यांचे उत्तर ऐकून घेत असे. (मत्तय १६:१३-१५) उदाहरणार्थ, मार्थाचा भाऊ लाजर याच्या मृत्यूनंतर येशूने तिला सांगितले: “जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीहि मरणार नाही.” मग त्याने तिला विचारले: “हे तू खरे मानतेस काय?” आणि मार्थेचे उत्तर येशूने लक्ष देऊन ऐकले: “होय प्रभुजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहा असा मी विश्वास धरला आहे.” (योहान ११:२६, २७) मार्थेला अशाप्रकारे आपला विश्वास प्रकट करत असल्याचे पाहून येशूला किती समाधान वाटले असावे!
६ अनेक शिष्य येशूला सोडून गेले तेव्हा आपल्या प्रेषितांच्या मनात काय आहे हे तो जाणून घेऊ इच्छित होता. त्यामुळे त्याने त्यांना विचारले: “तुमचीहि निघून जाण्याची इच्छा आहे काय?” शिमोन पेत्राने उत्तर दिले: “प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत; आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखिले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहा.” (योहान ६:६६-६९) शिमोनाचे हे शब्द ऐकून येशूला किती आनंद झाला असेल, नाही का? एक बायबल विद्यार्थी जेव्हा अशाप्रकारे आपला विश्वास व्यक्त करतो तेव्हा तुम्हालाही, तुमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे असे वाटेल.
येशूने आदराने लोकांचे म्हणणे ऐकून घेतले
७. अनेक शोमरोनी येशूवर विश्वास कसे ठेवू लागले?
७ येशू प्रभावीपणे शिष्य बनवू शकला त्याचे दुसरे कारण म्हणजे त्याला लोकांची चिंता होती आणि त्याने आदराने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. जसे की, एके प्रसंगी येशूने सूखार येथे याकोबाच्या विहिरीजवळ एका शोमरोनी स्त्रीला साक्ष दिली. या संभाषणात फक्त येशूच बोलत नव्हता तर त्याने या स्त्रीचे म्हणणेही ऐकून घेतले. आणि तिचे म्हणणे ऐकून घेत असताना येशूने, तिला उपासनेच्या बाबतीत आवड आहे हे लक्षात घेऊन तिला सांगितले, की देवही जे लोक आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना करतात अशाच लोकांना शोधत आहे. येशूने या स्त्रीचे म्हणणे आदराने ऐकून घेतले, त्याने तिच्याबद्दल खरी चिंता व्यक्त केली. म्हणूनच या शोमरोनी स्त्रीने इतरांना त्याच्याविषयी जाऊन सांगितले आणि “त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.”—योहान ४:५-२९, ३९-४२.
८. लोकांना आपली मते व्यक्त करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे तुम्हाला सेवेमध्ये संभाषण करण्यास कशी मदत होऊ शकते?
८ लोकांना सहसा आपली मते व्यक्त करायला आवडते. जसे की, प्राचीन अथेन्सच्या रहिवाशांना स्वतःची मते व्यक्त करायला आणि नवीन गोष्टी ऐकायला खूप आवडत असे. याचमुळे प्रेषित पौलाने एकदा त्या शहरातील एरोपेगस येथे एक जोरदार भाषण दिले. (प्रेषितांची कृत्ये १७:१८-३४) तुमच्या सेवेत घरमालकाबरोबर संभाषण सुरू करताना तुम्ही म्हणू शकता: “तुम्हाला भेटण्याचे कारण म्हणजे, या विषयावर [एक विशिष्ट विषय सांगा] तुमचे मत काय आहे हे मी जाणून घेऊ इच्छितोय.” घरमालकाचा दृष्टिकोन ऐकून घ्या, त्यावर भाष्य करा आणि त्याविषयी एखादा प्रश्न विचारा. मग अगदी आदराने, त्या विषयावर बायबल काय म्हणते ते दाखवा.
संभाषण कसे सुरू करायचे हे येशूला माहीत होते
९. क्लयपा आणि त्याचा सोबती यांना “शास्त्राचा उलगडा” करून सांगण्याआधी येशूने काय केले?
९ आता काय बोलायचे, असा प्रश्न येशूला कधी पडला मत्तय ९:४; १२:२२-३०; लूक ९:४६, ४७) उदाहरणार्थ, येशूचे पुनरुत्थान होऊन काहीच दिवस झाले होते. त्याचे दोन शिष्य जेरूसलेमहून अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. शुभवर्तमान अहवाल या घटनेविषयी असे सांगतो, की ते “एकमेकांशी संभाषण करीत होते. आणि असे झाले की, ते संभाषण व चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला; परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहा त्या कोणत्या? तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. मग त्यांच्यातील क्लयपा नावाच्या इसमाने त्याला उत्तर दिले, अलीकडे यरूशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय? तो त्यांना म्हणाला, कसल्या गोष्टी?” त्यांनी महान शिक्षक येशूला सांगण्यास सुरुवात केली, की नासरेथकर येशू देवाच्या गोष्टी शिकवत होता, चमत्कार करत होता आणि शेवटी त्याला देहान्त शिक्षा देण्यात आली. आणि आता काही जण म्हणत होते, की त्याला मृतातून उठवण्यात आले आहे. येशूने क्लयपा आणि त्याच्या सोबत्याला त्यांचे विचार व्यक्त करू दिले. आणि मग त्यांना जी गोष्ट समजली पाहिजे ती “शास्त्राचा उलगडा” करून सांगितली.—लूक २४:१३-२७, ३२.
नाही. तो लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यात तरबेज असण्यासोबतच, लोक सहसा काय विचार करत आहेत हे त्याला समजायचे आणि नेमके काय म्हणायचे हेही त्याला माहीत होते. (१०. सेवेमध्ये भेटणाऱ्या व्यक्तीचा धार्मिक दृष्टिकोन काय आहे, हे तुम्ही कसे जाणून घेऊ शकता?
१० एखाद्या विशिष्ट घरमालकाच्या धार्मिक दृष्टिकोनाविषयी तुम्हाला कदाचित काहीही माहीत नसेल. माहीत करून घेण्यासाठी तुम्ही कदाचित असे म्हणू शकता, की प्रार्थनेविषयी लोक सहसा काय विचार करतात हे तुम्हाला जाणून घेण्यास आवडते. मग तुम्ही विचारू शकता, “आपली प्रार्थना खरंच कोणी ऐकतं असं वाटतं का तुम्हाला?” या उत्तरावरून त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनाविषयी व धार्मिक पार्श्वभूमीविषयी तुम्हाला बरेच काही समजू शकेल. तो जर धार्मिक प्रवृत्तीचा असेल तर तुम्ही असा प्रश्न विचारून त्याचे आणखी मनोगत जाणून घेऊ शकता की, “देव सर्वच प्रार्थना ऐकतो, असं तुम्हाला वाटतं का? की, काही प्रार्थना अशाही आहेत ज्या त्याला पसंत नाहीत?” अशाप्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही एखाद्याबरोबर निवांतपणे चर्चा करू शकता. शास्त्रवचनातून वचन दाखवणे उचित असते तेव्हा तुम्ही व्यवहार कुशलतेचा उपयोग करू शकता; त्याच्या धार्मिक विश्वासांना ठेच पोहचणार नाही अशापद्धतीत तुम्ही त्याला शास्त्रातून वचन दाखवू शकता. त्याला जर तुमचे बोलणे ऐकायला आवडत असेल तर तो तुम्हाला पुन्हा येण्यास सांगेल. पण समजा त्याने तुम्हाला असा एखादा प्रश्न विचारला ज्याचे उत्तर तुम्हाला माहीत नाही. मग काय? तुम्ही पुढच्या भेटीच्या वेळी ते उत्तर द्याल, असे त्याला सांगू शकता. मग तुम्ही त्या विषयावर आणखी संशोधन करून, “जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या.”—१ पेत्र ३:१५.
येशूने योग्य लोकांना शिकवले
११. कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला, शिकून घेण्यास इच्छुक असलेल्यांना शोधून काढण्यास मदत होऊ शकते?
११ परिपूर्ण येशू समजदार होता त्यामुळे जे योग्य आहेत त्यांना ओळखून तो शिकवू शकला. पण आपण “सार्वकालिक जीवनास योग्य असलेल्यांना” ओळखू शकत नाही. (प्रेषितांची कृत्ये १३:४८) “ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा,” असे येशूने ज्यांना म्हटले त्या येशूच्या प्रेषितांनाही योग्य लोक ओळखता येत नव्हते. (मत्तय १०:११) येशूच्या प्रेषितांप्रमाणेच आपणही, आपले बोलणे ऐकण्यास व शास्त्रवचनांतील सत्य शिकून घेण्यास तयार असलेल्यांना शोधून काढले पाहिजे. तेव्हा, प्रत्येक व्यक्तीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून, प्रत्येक व्यक्तीची मनोवृत्ती कशी आहे याकडे लक्ष देऊन आपण योग्य लोकांना शोधून काढू शकतो.
१२. एका आस्थेवाईक व्यक्तीला तुम्ही कशाप्रकारे मदत करत राहू शकता?
१२ एखाद्या व्यक्तीने राज्य संदेशात थोडीशी जरी आवड दाखवली असेल तर तुम्ही तिच्या आध्यात्मिक गरजांविषयी विचार करीत राहिल्यास तिचा फायदा होईल. एखाद्या व्यक्तीबरोबर सुवार्तेच्या संबंधाने चर्चा केल्यानंतर तुम्हाला तिचे विचार समजतील, तर ते तुम्ही एका कागदावर लिहून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला या व्यक्तीला आध्यात्मिकरीत्या मदत करता येईल. आणि पुनर्भेटींच्या वेळी, तुम्हाला जर त्या व्यक्तीच्या धार्मिक विश्वासांविषयी, मनोवृत्तीविषयी किंवा परिस्थितीविषयी आणखी माहीत करून घ्यायचे असेल तर तुम्ही त्या व्यक्तीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकणे आवश्यक आहे.
१३. बायबलविषयी एखाद्याचे मत काय आहे हे जाणून घेण्यास कोणती गोष्ट तुम्हाला मदत करू शकेल?
१३ देवाच्या वचनाविषयी त्यांचे काय मत आहे हे सांगण्यास तुम्ही लोकांना प्रवृत्त कसे करू शकता? काही बाबतीत असे विचारणे योग्य ठरू शकते: “बायबल समजायला कठीण आहे, असे तुम्हाला वाटते का?” ती व्यक्ती या प्रश्नाचे उत्तर ज्याप्रकारे देते त्यावरून तुम्हाला आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीत तिची काय मनोवृत्ती आहे ते समजेल. दुसरा एक मार्ग आहे एखादे वचन वाचून मग असे विचारा: “या वचनाविषयी तुमचे काय मत आहे?” येशूप्रमाणे तुम्हीही योग्य प्रश्नांचा उपयोग करून तुमच्या सेवेमध्ये पुष्कळ उत्तम परिणाम प्राप्त करू शकता. परंतु एक सावधगिरीचा इशारा लक्षात घ्या.
येशूने प्रभावीपणे प्रश्नांचा उपयोग केला
१४. लोकांची उलटतपासणी न करता तुम्ही त्यांच्या दृष्टिकोनात आस्था कशी घेऊ शकता?
१४ इतरांना अस्वस्थ न करता त्यांच्या दृष्टिकोनात तुम्हाला आस्था आहे हे दाखवा. येशूने अवलंबलेल्या पद्धतीचे अनुकरण करा. त्याने पूस-तपास करणाऱ्याप्रमाणे उलटसुलट प्रश्न विचारले नाहीत तर समोरच्या व्यक्तीला विचार करायला प्रवृत्त करतील असे प्रश्न विचारले. येशू लोकांचे बोलणे प्रेमाने ऐकून घेत असे त्यामुळे लोकांना त्याच्या संगतीत विसावा मिळत असे व ते निवांत होत असत. (मत्तय ११:२८) सर्व वयोगटातील लोक अगदी मनमोकळेपणे आपल्या समस्या घेऊन त्याच्याकडे येत असत. (मार्क १:४०; ५:३५, ३६; १०:१३, १७, ४६, ४७) लोकांनी तुम्हाला बिनधास्तपणे, बायबल व बायबलच्या शिकवणींविषयी त्यांना काय वाटते हे सांगावेसे वाटत असेल तर तुम्ही त्यांची उलटतपासणी करणे टाळले पाहिजे.
१५, १६. धार्मिक विषयांवर तुम्ही लोकांना बोलते कसे करू शकता?
१५ प्रश्नांचा प्रभावीपणे उपयोग करण्याव्यतिरिक्त तुम्ही, एखादी मनोरंजक गोष्ट सांगून संभाषण चालू ठेवू शकता आणि घरमालकाची प्रतिक्रिया लक्ष देऊन ऐकू शकता. जसे की, येशूने निकदेमाला सांगितले: “नव्याने जन्मल्यावाचून कोणालाहि देवाचे राज्य पाहता येत नाही.” (योहान ३:३) निकदेमाला या शब्दांचे इतके अप्रूप वाटले की त्याला प्रतिक्रिया व्यक्त करणे व येशूचे बोलणे लक्षपूर्वक ऐकणे राहावले नाही. (योहान ३:४-२०) तुम्हीही लोकांना अशाचप्रकारे संभाषण चालू ठेवण्यास बोलते करू शकता.
१६ आज, आफ्रिका, पूर्व युरोप आणि लॅटिन अमेरिका येथील अनेक ठिकाणी सर्वांच्या तोंडात, नव्याने सुरू होणाऱ्या धर्मांचाच विषय आहे. अशा ठिकाणी तुम्ही असे म्हणून संभाषण सुरू करू शकता: “इतके सारे धर्म निघालेले आहेत की मला चिंता वाटू लागली आहे. पण मला आशा आहे, की लवकरच सर्व राष्ट्रांतील लोक खऱ्या उपासनेत एकजूट होतील. तुम्हालाही असे पाहायला आवडेल का?” तुमच्या आशेविषयी काहीसे आश्चर्यजनक बोलून तुम्ही लोकांना त्यांचे मत व्यक्त करायला प्रवृत्त करू शकता. एखाद्या प्रश्नाचे दोन संभाव्य उत्तरे असतात तेव्हा उत्तर देणे सोपे असते. (मत्तय १७:२५) घरमालकाने तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर तुम्ही एक अथवा दोन शास्त्रवचने दाखवून आपले उत्तर देऊ शकता. (यशया ११:९; सफन्या ३:९) घरमालकाचे बोलणे लक्ष देऊन ऐकण्याद्वारे व ते एका कागदावर लिहून घेण्याद्वारे तुम्हाला, पुनर्भेटीत कोणत्या विषयावर चर्चा करायची ते ठरवता येईल.
येशूने मुलांचे बोलणे लक्ष देऊन ऐकले
१७. येशूला मुलांमध्येही आस्था होती, हे कशावरून दिसून येते?
१७ येशूने केवळ प्रौढांमध्येच नव्हे तर मुलांमध्येही आस्था घेतली. लहान मुले कोणते खेळ खेळतात, ते कोणत्या गोष्टी लूक ७:३१, ३२; १८:१५-१७) येशूचे बोलणे ऐकायला जमलेल्या जमावात मुलेही असायची. एकदा काही मुले मोठमोठ्याने मशीहाची स्तुती करत होते तेव्हा येशूचे त्यांच्याकडे लक्ष गेले आणि असे शास्त्रवचनांत भाकीत करण्यात आले होते, हे त्याने शास्त्रवचनांतून दाखवले. (मत्तय १४:२१; १५:२८; २१:१५, १६) आजही अनेक लहान मुले येशूचे शिष्य बनत आहेत. तुम्ही त्यांना कशाप्रकारे मदत करू शकता?
बोलतात, हे त्याला माहीत होते. कधीकधी तो मुलांना आपल्याजवळ बोलवत असे. (१८, १९. तुमच्या मुलांना तुम्ही आध्यात्मिक मदत कशी करू शकता?
१८ आपल्या मुलांना आध्यात्मिकरीत्या मदत करण्याकरता तुम्ही त्यांचे बोलणे लक्ष देऊन ऐकले पाहिजे. यहोवाच्या विचारांशी जुळत नसलेल्या कोणत्या कल्पना त्यांच्या मनात आहेत हे तुम्ही समजणे आवश्यक आहे. तुमचे मूल काहीही बोलून दाखवत असले तरी, सुरुवातीला त्याची प्रशंसा करणे योग्य आहे. मग तुम्ही यहोवाचा अमूक गोष्टींबाबत काय दृष्टिकोन आहे हे समजण्यास त्याला मदत करताना उचित शास्त्रवचनांचा उपयोग करू शकता.
१९ मुलांच्या बाबतीतसुद्धा तुम्ही प्रश्नांचा उपयोग करू शकता. परंतु, प्रौढांप्रमाणे मुलांनाही जास्त प्रश्न विचारलेले आवडत नाही. त्यामुळे, कठीण प्रश्न विचारून मुलाच्या मनावर दडपण आणण्याऐवजी तुम्ही स्वतःविषयी किंवा एखाद्या मनोरंजक विषयावर एखादे विधान करू शकता. ज्यावर विषयावर तुमची चर्चा चालली आहे त्याच्यावर आधारित तुम्ही, तुम्हाला असे वाटायचे, व असे का वाटायचे ते समजावून सांगा. मग तुम्ही विचारू शकता: “तुलाही असंच वाटतं का?” यावर तुमचे मूल जशी प्रतिक्रिया दाखवेल त्यानुसार तुम्ही त्याच्याशी फायदेकारक व उत्तेजनकारक शास्त्रवचनीय चर्चा करू शकता.
महान शिक्षकाचे अनुकरण करीत राहा
२०, २१. शिष्य बनवण्याच्या कार्यात तुम्ही लक्ष देऊन का ऐकले पाहिजे?
२० तुमच्या मुलाबरोबर अथवा कोणा दुसऱ्याबरोबर तुम्ही एखाद्या विषयावर चर्चा करत असाल तर, लक्षपूर्वक ऐकणे महत्त्वाचे आहे. होय, एखाद्याचे बोलणे ऐकणे हे प्रेमळपणाचे लक्षण आहे. दुसऱ्यांचे बोलणे ऐकण्याद्वारे तुम्ही नम्रपणा दाखवता. जी व्यक्ती बोलत आहे तिला तुम्ही आदर आणि समंजसपणा दाखवता. अर्थात, इतरांचे बोलणे ऐकण्याकरता तुम्ही, ते व्यक्त करत असलेल्या भावनांकडे लक्ष दिले पाहिजे.
२१ ख्रिस्ती सेवेत भाग घेत असताना घरमालकांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. तुम्ही जर लक्ष देऊन ऐकले तर तुम्हाला, बायबल सत्याचा कोणता पैलू त्यांना खासकरून आवडेल, हे समजण्यास मदत होईल. मग येशूने वापरलेल्या विविध शिकवण्याच्या पद्धतींचा उपयोग करून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. असे करत असताना तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल कारण तुम्ही महान शिक्षकाचे अनुकरण करता. (w०७ ११/१५)
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• येशूने लोकांना आपले विचार व्यक्त करण्यास कसे प्रवृत्त केले?
• येशू ज्या लोकांना शिकवत असे त्या लोकांचे म्हणणे तो ऐकून का घेत असे?
• सेवेमध्ये तुम्ही प्रश्नांचा कशाप्रकारे उपयोग करू शकता?
• मुलांना आध्यात्मिक मदत देण्याकरता तुम्ही काय करू शकता?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२८ पानांवरील चित्र]
प्रचार करताना, ऐकण्याचे भान ठेवा
[३० पानांवरील चित्र]
मुलांना आपण आध्यात्मिकरीत्या मदत करतो तेव्हा आपण येशूचे अनुकरण करतो